ADVERTISEMENT
home / बिग बॉस
काटा लगा फेम शेफाली जरीवाला हिला लागले मातृत्वाचे वेध

काटा लगा फेम शेफाली जरीवाला हिला लागले मातृत्वाचे वेध

कांटा लगा…असं म्हणत एकेकाळी बोल्ड लुकमध्ये झळकलेली आणि बिग बॉस 13 कंटेस्टंट शेफाली जरीवाला पुन्हा एकदा चर्चेत आहे, पण एका चांगल्या कारणामुळे. काय आहे हे कारण जाणून घेण्यासाठी वाचा.

शेफाली जरीवालाचं लग्न टेलीव्हिजन अभिनेता पराग त्यागीशी झालं आहे. शेफाली आणि परागचं लग्न 2014 साली झालं. त्याआधी चार वर्ष हे दोघं एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर आता शेफालीला लागले आहेत आई होण्याचे वेध. पण तिला आई व्हायचंय ते दत्तक घेण्याच्या माध्यमातून. तिच्या या निर्णयाचं सध्या सगळ्यांकडून कौतुक होत आहे. तिचा नवरा परागनेही तिच्या या निर्णयात तिला पाठिंबा दिला आहे. पण मुख्य गोष्ट म्हणजे शेफालीने दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे तो एका व्यक्तीमुळे प्रेरित होऊन. कोण आहे ती व्यक्ती?

शेफालीला मिळाली या अभिनेत्रीकडून प्रेरणा

नुकत्याच एका मुलाखतीत शेफालीने याबाबत सांगितलं की, दत्तक घेण्याबाबत मी बिग बॉसच्या घरात हिंदुस्तानी भाईंशी चर्चा केली होती. खरंतर मी सनी लिओनने दत्तक घेतलेल्या मुलीच्या निर्णयाने विचाराधीन झाले. माझाही मुलीला दत्तक घेण्याचा मानस होता आणि लग्न झाल्यावर फॅमिली प्लॅनिंगच्या वेळी मी माझा हा विचार परागला सांगितला. त्यानेही मला याबाबत पाठिंबा दर्शवला. याबाबत तिने परागचं मतही सांगितलं, पराग मला म्हणाला की, तुझ्या या निर्णयाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. तुला आई व्हायचंय म्हटल्यावर मुलाला जन्म द्यायचा की दत्तक घ्यायचं हा सर्वस्वी तुझा निर्णय आहे. यात माझा तुला सपोर्ट आहे. जगात भरपूर मुलं आहेत ज्यांना एका घराची गरज आहे. माझी परिस्थिती अशी आहे की, मी एका मुलाला चांगल आयुष्य देऊ शकतो. मग का नाही. देवाने मला सगळं दिलयं. खरंच या दोघांचाही हा निर्णय धाडसी आणि चांगला आहे. सनी लिओननेही दोन जुळ्या मुलांची आई होण्याआधी निशा नावाच्या मुलीला दत्तक घेतलं होतं. 

सनी लिओनने मारली फेसबुकवर बाजी

ADVERTISEMENT

शेफालीची लहानपणापासूनची इच्छा

जेव्हापासून मला कळायला लागलं म्हणजे वयाच्या साधारण 10 किंवा 11 व्या वर्षी तेव्हापासून मला मुलाला दत्तक घ्यायचं होतं. पण आता मी ही जबाबदारी घेऊ शकते म्हणूनच मला मुलीला दत्तक घ्यायचं आहे. दत्तक घेण्याच्या प्रोसेसला आम्ही सुरूवात केली आहे. पण हे खूपच लांबलचक प्रोसेस आहे. तरीही आम्हाला खात्री आहे की, आम्ही लवकरच सर्व फॉर्मेलिटीज पूर्ण करून हे चांगल काम करू शकू. ज्यामुळे मला आई होता येईल.

एकीकडे शेफालीची दत्तक घेण्याची बातमी आली तर दुसरीकडे अशी अफवा व्हायरल झाली की, ती प्रेग्नंट आहे. तिने सोशल मीडियावर शेअर केलेला परागसोबतचा निळ्या साडीतल्या फोटोवरून ही चर्चा सुरू झाली. ज्याला तिने कॅप्शन दिलं होतं तू मी आणि क्वारंटाईन. ज्यावर कमेंट्सचा पाऊस पडला. एकाने तिली विचारलं की, तू प्रेग्नंट आहेस का, यावर तिने उत्तर दिलं की, नाही भरपूर खाल्लंय.

असो, काहीही असलं तरी सनी लिओनीमुळे शेफालीला दत्तक घेण्याची प्रेरणा मिळाली आहे व ती एक चांगलं काम करत आहे. आता पाहूया कधी येते शेफालीकडे सनीच्या मुलीसारखी एक गोड मुलगी.

अर्नब गोस्वामीने घेतले सनी लिओनचं नाव, सनीनेदेखील घेतली फिरकी

ADVERTISEMENT
16 Apr 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT