ADVERTISEMENT
home / xSEO
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामीला । Happy Birthday Mami In Marathi

मामीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Birthday Wishes For Mami In Marathi

आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात आजोळचे एक वेगळेच स्थान असते. लहानपणच्या अनेक सुंदर गोड आठवणी आपल्या आजोळशी जोडल्या गेल्या असतात. आजोळी गेल्यावर जे आपले  लाड होतात ते दुसरीकडे कुठेच होत नाहीत. आपल्या बरोबर लहान होऊन आपल्याशी खेळणारे आजोबा, म्हणू ते चविष्ट पदार्थ करून प्रेमाने खाऊ घालणारी आजी, आईच्याच मायेने सगळं करणारी आपली मावशी, आपले सगळे हट्ट पूर्ण करणारा आपला हक्काचा मामा हे सगळे तर आजोळी असतातच. पण मामाचे लग्न झाल्यावर यात आपले लाड करणारी आणखी एक व्यक्ती येते ती म्हणजे मामी! मामी व भाच्यांचे नाते अगदी खास असते. ती आजीच्या मायेने खाऊ -पिऊ घालते, मावशीच्या मायेने काळजी घेते, आजोबांसारखी पाठीशी खंबीरपणे उभी राहते आणि मामाच्या बरोबरीने आपले लाड करते. आजी तर आपली खास लाडकी असते. आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा आपण पाठवतो आणि आजीलाही आपले खूप कौतुक असते. पण आजोळी गेल्यावर आपण जिच्याकडून हक्काने लाड करून घेतो त्या मामीलाही आपले खूप कौतुक असते. म्हणून तर ती आपल्या सगळ्या खास दिवशी आपले कोडकौतुक करते. अशा लाडक्या मामीचा वाढदिवस असेल तर आपणही तिच्यावरचे प्रेम व्यक्त केले पाहिजे. तुम्हालाही मामीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा (Birthday Wishes For Mami In Marathi) पाठवायच्या असतील तर पुढे वाचा. आम्ही तुमच्यासाठी खास मामीला वाढदिवसाच्या शुभेच्छा (Happy Birthday Mami In Marathi ) देण्यासाठी खास शुभेच्छा संदेश आणले आहेत. यातील काही संदेश तुम्हाला नक्कीच आवडतील. तर मग पाठवा तुमच्या लाडक्या प्रेमळ मामीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश.

मामीसाठी वाढदिवसाच्या खास शुभेच्छा – Birthday Wishes For Mami In Marathi

मामीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा । Birthday Wishes For Mami In Marathi
मामीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मामा आणि मामी म्हणजे असे जवळचे लोक ज्यांच्याकडून आपण हक्काने लाड करून घेऊ शकतो. आजोळी गेल्यावर आपली आईप्रमाणे काळजी घेणाऱ्या मामीला वाढदिवसाच्या शुभेच्छा तर द्यायलाच हव्यात. पाठवा मामीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश…

नेहमी आनंदी राहो तुमचा चेहेरा, पडो तुमच्यावर कायम सुखाची छाया,  धन, संपत्ती आणि सुखाची कमतरता नसो, याच आहेत आपणास वाढदिवसाच्या शुभेच्छा… 

सुख, समृद्धी ,समाधान ,दिर्घायुष्य ,आरोग्य तुला लाभो! वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा मामी!

ADVERTISEMENT

मी ही लवकरच येतोय, माझ्याशिवाय नका साजरा करू तुम्ही तुमचा जन्मदिन, आपणास सुख शांती लाभो हीच प्रार्थना या शुभ दिनी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामी! 

प्रत्येकाच्या आयुष्यात मध्ये एकतरी मामी असावीच, जी आपले लाड करेल, नेहमी आपली बाजू घेईल,

आपल्यासोबत मजा मस्ती करेल आणि आपल्यासाठी आई – बाबांनाही समजावेल…काहीही झालं तरी मला कायम धीर देणारी अशी माझी मामी, तू माझ्या आयुष्यात आहेस याबद्दल मी देवाची आभारी आहे. 

मामी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

ADVERTISEMENT

तुमचे आयुष्य सदैव फुलांसारखे सुगंधी असावे, आनंदाचा झरा सदैव तुमच्या घरी वाहावा याच तुमच्या खास दिवशी शुभेच्छा! हॅपी बर्थडे मामी.. 

तुझे अस्तित्व म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा, सळसळणारा शीतल वारा !तुझा वाढदिवस म्हणजे उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा.. अशा सगळ्या भाच्याच्या लाडक्या मामीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…! 

आजच्या दिवशी देवाकडे एकच मागणे आहे की प्रत्येकाला तुझ्यासारखी प्रेमळ मामी मिळावी. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा मामी! 

संकल्प असावेत नवे तुझे, मिळाव्यात त्यांना नव्या दिशा , प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे, जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा मामी! 

ADVERTISEMENT

आयुष्यातील तुमची जागा, कोणी घेऊ शकत नाही… तुमच्या एवढी माया भाच्याला, कोणी देऊ शकत नाही.. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामी!

लहानपणी अंगाखांदयावर लडीवाळपणे खेळवते, ती माया म्हणजे मामी.. अडचणीच्या वेळी आईसारखी धाऊन येते ती माया म्हणजे मामी..मामी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 

असेच जर लाडक्या वडिलांचा वाढदिवस असेल तर त्यांनाही खास शुभेच्छा तुम्ही देऊ शकता.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिय मामीला – Happy Birthday Wishes For Mami In Marathi 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामीला  ।  Happy Birthday Wishes For Mami In Marathi
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामीला

मामी म्हणजे आजीसारखे लाडही करणार आणि मैत्रिणीप्रमाणे आपले सिक्रेट्स जपूनही ठेवणार. आई-बाबांना काही पटवून द्यायचे असेल तर मामा -मामीच आपल्या मदतीला धावून येणार. मग अशा खास व्यक्तीला त्यांच्या वाढदिवशी खास शुभेच्छा तर पाठवल्याच पाहिजेत! मामाही आपले तितकेच लाड करतो. त्यामुळे मामाचाही वाढदिवस लक्षात ठेवून मामासाठी वाढदिवस शुभेच्छा पाठवायला हव्यात.

ADVERTISEMENT

मामाबरोबरच प्रेमाने लहानपणी हात धरून चालायला शिकवते, चांगले काम केल्यावर तोंडभरून कौतुक करते 

लहानपणी भाच्यांचा वाढदिवस साजरा करतांना सर्वात उत्साही असते ती म्हणजे मामी..अशा माझ्या मामीला वाढदिवसाच्या सोनेरी शुभेच्छा! 

नेहमीच प्रेमाने आणि हक्काने पाठीशी उभी राहणारी आमची मामी..कोणत्याही निर्णयात खंबीरपणे आमच्या सोबत असणारे व्यक्तिमत्व म्हणजे मामी..आमचे सर्व लाड आणि हट्ट पुरवणारी आमची प्रेमळ मामी..! अशा तुझ्या वाढदिवशी मामी तुला हॅपी बर्थडे! 

जल्लोष आहे गावाचा, कारण वाढदिवस आहे आमच्या मामीचा, घरातील सर्वात मनमिळावू आणि हसऱ्या व्यक्तिमत्वास, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…! 

ADVERTISEMENT

जन्मदिनाच्या या शुभ दिवशी आपली सारी स्वप्नं साकार व्हावीत, आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा! मामी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

नाती जपली अन् संपूर्ण कुटुंबास प्रेम दिले, वेळोवेळी आम्हा भाच्यांचे प्रेमाने हट्ट पुरवले.  पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा, मामी तुमच्या वाढदिवशी हीच एक सदिच्छा! 

तुमच्या आयुष्यात आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत आणि तुमचे आयुष्य सुखाच्या सुगंधाने बहरून जावे, ईश्वर आपणास दीर्घायुष्य देवो व आपल्या आयुष्यात आपणास हवे ते मिळो. मामी आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

मामी तुमच्या वाढदिवसाचे हे आनंददायी क्षण तुमच्या चेहेऱ्यावर हसू ठेवत राहो.. आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुमच्या हृदयात सतत तेवत राहो..हीच मनापासून शुभेच्छा! हॅपी बर्थडे मामी!

ADVERTISEMENT

प्रत्येक गोष्टीबद्दल अनुभवी, प्रत्येक विषयाबद्दल स्पष्टपणे मत मांडणारी, मनाने प्रेमळ आणि विचारांनी निर्मळ,मला आईसारखीच जीव लावणारी आणि माझे सर्व लाड पुरवणारी अशी माझी लाडकी मामी!माझ्या प्रिय मामीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

सूर्याने आणली सोनेरी किरणे, पक्षी गात आहेत मधुर गाणे, आजच्या या दिवशी देवाकडे एकच मागणे, द्यावे आमच्या मामीला सुखी आयुष्याचे देणे!मामी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे, सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस, सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा सोन्यासारखा लोकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! हॅपी बर्थडे मामी…

अधिक वाचा – वहिनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

ADVERTISEMENT

मामीसाठी वाढदिवसाचे शुभेच्छा संदेश – Birthday Messages For Mami In Marathi 

मामीसाठी वाढदिवसाचे शुभेच्छा संदेश | Birthday Messages For Mami In Marathi
मामीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आजोळच्या घरची लक्ष्मी म्हणजे मामी! जी आपल्यासोबतच आपल्या आईचे देखील मनापासून लाड आणि कौतुक करते. आपल्या बरोबरच आपल्या आईच्याही हक्काची मैत्रीण म्हणजे मामी! त्याच मामीच्या वाढदिवशी तिला पाठवा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश!

मामी तुमच्या वाढदिवशी देवाकडे एकच प्रार्थना आहे की तुम्ही नेहमी निरोगी राहा, तंदुरुस्त राहा आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा. भूतकाळ विसरून नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

तू या जगातील केवळ सर्वात चांगली मामी नाहीस तर माझी चांगली मैत्रीण देखील आहेस. तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामी!

दिवस आज आहे खास, मामी तुला उदंड आयुष्य लाभो हाच आहे मनी ध्यास. मामी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…! 

ADVERTISEMENT

अधिक वाचा – भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

नवे क्षितीज नवी पहाट , फुलावी आयुष्यातील फुलांच्या पायघड्या असलेली सुगंधी वाट, स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर सदैव राहो . तुमच्या आयुष्यात आनंदाचा झरा वाहत राहो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामी!!

तुमच्यासारखी मातृतुल्य प्रेमळ मामी मिळणे ही खरंच परमेश्वराची कृपा आहे.सुखदुःखात स्वतःला कधीही एकट्या समजू नका. कारण प्रत्येक क्षणी आम्ही तुमच्या सोबत आहोत! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामी…

माझ्या प्रिय आणि आदरणीय मामींना,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! मी ईश्वराकडे तुमच्या उत्तम आरोग्य, आणि दीर्घायुष्याची प्रार्थना करतो! तुमच्या आयुष्यात सुखाची बरसात होवो आणि दुःखाचे काळे ढग कधीही तुमच्या आयुष्यात न येवोत हीच परमेश्वराकडे प्रार्थना! 

ADVERTISEMENT

तुमच्या आयुष्यात आशेचा दीप सदैव तेवत राहो. निराशा तुमच्यापासून कायम लांब राहो. तुमच्या ओठांवरचे स्मितहास्य कधीही लुप्त न होवो हीच आजच्या दिवशी मंगल कामना! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामी!

आपलं नातं मामी आणि भाचीचं असलं तरी तू मला कायम आईसारखंच प्रेम दिलं. मामी तुझे प्रेम मला असेच आयुष्यभर मिळत राहो हीच सदिच्छा! तुला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 

आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे.. मनात आमच्या एकच इच्छा, आपणास उदंड आयुष्य लाभू दे हीच सदिच्छा! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 

मला कायम आईप्रमाणे प्रेम लावणाऱ्या माझ्या मामींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 

ADVERTISEMENT

मामी तिच्या भाचीसाठी एका मैत्रिणीपेक्षा कमी नसते.. ज्यांची मामी तुझ्यासारखी खंबीर असते, त्यांच्याशी नडायला कुणात हिंम्मत नसते! वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा मामी..

अधिक वाचा – मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

युनिक वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामीला – Unique Happy Birthday Wishes For Mami In Marathi

वाढदिवसाच्या युनिक शुभेच्छा मामीला | Unique Happy Birthday Wishes For Mami In Marathi
युनिक वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामीला

वाढदिवस म्हणजे वर्षातला सगळ्यात खास दिवस! जसे इतर वेळी मामी तुमचे हट्ट पुरवते तर तिच्या या खास दिवशी तुम्ही तिच्यासाठी काहीतरी खास करा. मामीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जरा युनिक पद्धतीने द्या. 

तुझी बुद्धी तुझी प्रगती,तुझे यश तुझी कीर्ती, वृद्धिंगत होत जावी आणि सुखसमृद्धीची बरसात तुझ्या आयुष्यात कायम होत राहावी…मामी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

ADVERTISEMENT

आजच्या शुभ दिवशी माझी प्रार्थना आहे की तुम्ही आयुष्यात पाहिलेली सर्व स्वप्ने पूर्ण व्हावीत आणि तुमचे आयुष्य आनंदाने व समाधानाने भरून जावे. मामी, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

कधी मैत्रीण तर कधी सल्लागार असते मामी..मस्ती असो वा गंभीर गोष्ट, नेहमीच माझ्या बरोबर असते मामी..अशा माझ्या लाडक्या मामीला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा! 

पैशाने भेटवस्तू विकत घेता येतात परंतु  मामा- मामीचे प्रेम केवळ नशिबवान लोकांनाच मिळते. मामा -मामीच्या प्रेमाने सगळं बालपण सुगंधित आणि आनंदी होते. माझे बालपण आनंदी करणाऱ्या माझ्या मामीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! हॅपी बर्थडे मामी! 

चुकले तर कधी रागावतेस ओरडतेस आणि मोठ्या मनाने समजून घेतेस, तर कधी लाड करतेस बाबांसारखा..शिकवतेस प्रेम करतेस आईसारखी.. तुझ्या वाढदिवशी आज ईश्वराला प्रार्थना करतो की सर्वांना मिळो मामी तुझ्यासारखी..हॅपी बर्थडे मामी! 

ADVERTISEMENT

नवा सुगंध,  नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी हा आनंद शतगुणित व्हावा हीच सदिच्छा!  मामी तुम्हाला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा…. 

अधिक वाचा – भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Latest वाढदिवसाच्या शुभेच्छा मामीसाठी – Latest Birthday Wishes For Mami In Marathi

Latest वाढदिवसाच्या शुभेच्छा मामीसाठी | Latest Birthday Wishes For Mami In Marathi
मामीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मामी माझी गुणाची, आवड तिला स्वयंपाकाची..  मामीचा स्वभाव साखरेपेक्षाही गोड, तिच्या प्रेमाची मला ओढ.. अशा माझ्या प्रेमळ मामीला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!

काळजीरुपी तिचा धाक, अन् प्रेमळ तिची साथ. ममतेने तिचे मन आहे ओलेचिंब, जणू पाण्यात दिसती आईचेच प्रतिबिंब! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामी.. 

ADVERTISEMENT

माझ्यासाठी माय व मामी एकरूप जणू, एक विचारी, एक समान! देवानेच बनवले रूप हे, माझ्या आईचे प्रतिबिंब लहान.. वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा मामी! 

आकाशात तारे आहेत तेवढे आयुष्य तुम्हाला लाभो, तुमच्या सुखी आयुष्याला कोणाची नजर ना लगो , तुमचे जीवन नेहमी आनंदी असो, याच मनापासून सदिच्छा! लाडक्या मामीला वाढदिवसाच्या शुभेच्छा… 

मामी तुम्ही माझ्यासाठी अखंड प्रेरणेचा स्त्रोत आहात. एका मामीपेक्षा जास्त तुम्ही माझी मैत्रीणच आहात…मामीला वाढदिवसाच्या शुभेच्छा! 

मामी असावी तुमच्यासारखी आनंद वाढवणारी, भाग्यवान आहे मी जो मला तुमच्यासारखी मामी मिळाली.

ADVERTISEMENT

तुम्ही नेहमी अशाच हसत आणि आनंदी राहा हीच प्रार्थना आज मी देवापाशी केली.मामी, तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!

अधिक वाचा – मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

मामीच्या बर्थडेसाठी इन्स्टा कोट्स मराठी – Birthday Wishes For Mami Insta Quotes

मामीच्या बर्थडेसाठी खास इन्स्टा कोट्स मराठी - Birthday Wishes For Mami Insta Quotes
मामीच्या वाढदिवसासाठी इन्स्टा कोट्स

जी आमची इच्छा होती ते आम्हास लाभले, जेवढा विचार केला त्यापेक्षा जास्त परमेश्वराने दिले. खरोखर भाग्यवान आहोत आम्ही जो आमच्या घरात तुमच्या सारखी लक्ष्मी आली. परमेश्वरास धन्यवाद कारण त्यांनीच ही कृपा केली. मामी तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

मामी आहे आमची देवगाय भोळी, पतीच्या सुखासाठी वाहते आहे संसाराची मोळी

ADVERTISEMENT

मामी आमची लाडाची छान, ती आहे आम्हास आमच्या आई समान! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामी! 

पावसातून जेवढा ओलावा मिळत नाही, तेवढा जिव्हाळा तुमच्या प्रेमात जाणवतो. नात्यांमधील आपुलकीचा अर्थ तुमच्या सावलीत आल्यावर कळतो.  प्रिय मामी, तुम्हास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

भरपूर स्वप्ने होती तिच्या डोळ्यांत, पण स्वसुखाची आशा न धरता ती आली आमच्या घरात. ती येण्या आधी सर्व आम्ही बांधलेलो होतो रक्ताच्या नात्याने, पण ती आमच्याशी नातं जोडून आली वेद मंत्राच्या वाटेने. हॅप्पी बर्थडे मामी! 

सुंदर आणि कोमल फुलपाखराप्रमाणे संपूर्ण घरात सात्विक प्रेमाचे रंग पसरवणाऱ्या, लक्ष्मीच्या रूपाने घरात राहणाऱ्या मामीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

ADVERTISEMENT

परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण त्याने मला जगातील सर्वात सुंदर, प्रेमळ आणि समजदार मामी दिली..आईसारखेच प्रेम करणाऱ्या माझ्या प्रिय मामीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

मामीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा । Birthday Wishes For Mami In Marathi
मामीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आपलं नातं रक्ताचं नसलं जरी, पण त्याहूनही घट्ट करूया

आयुष्यात आलेल्या आईच्या दुसऱ्या रूपाला ‘मामी’ हे नाव देऊया…हॅप्पी बर्थडे मामी! 

चंद्रताऱ्या प्रमाणे चकाकत राहो तुमचे जीवन, आनंदाने भरलेले राहो तुमचे जीवन, वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा मामी! 

ADVERTISEMENT

आजचा हा शुभ दिवस तुमच्या जीवनात शंभर वेळा येवो….आणि प्रत्येक वेळी आम्ही तुम्हाला शुभेच्छा देत राहो. माझ्या प्रिय मामीला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..

आभाळा एवढी तिची माया, शीतल-प्रेमळ तिची छाया.. ममतेने ओथंबलेले तिचे बोल,  तर कधी रुसवा धरून होई अबोल, आईचेच जणू दुसरे रूप, आमच्यावर प्रेम करते खूप! मामी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… 

नशीबवान लोकांनाच आईसारखी प्रेमळ आणि बहिणीसारखी मैत्रीण असलेल्या मामीचे सानिध्य लाभते. माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या माझ्या प्रिय मामीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..Happy Birthday Dear Mami! 

आजोळी गेल्यावर आपली काळजी घेणारी, आपले लाड,हट्ट पुरवणारी आपली मामी ही आपल्यासाठी आईच्याच जागी असते. अशा लाडक्या मामीचा वाढदिवस विसरून कसे चालेल? या खास व्यक्तीचा वाढदिवस आणखी खास बनवण्यासाठी मामीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा (Birthday Wishes For Mami In Marathi) पाठवा. 

ADVERTISEMENT

अधिक वाचा – भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

16 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT