आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकालाच जवळजवळ शंभर वर्षे जगण्याची इच्छा असते. परंतु कोणाच्या नशिबात किती आयुष्य लिहिलेले आहे हे कुणालाच माहित नसते. आयुष्य हे क्षणभंगुर आहे. त्यामुळे जीवनातील सर्व संघर्ष आणि अज्ञात गोष्टींना सामोरे जात असताना आयुष्यातील प्रत्येक टप्पा आपण पार पाडतो ती आपल्यासाठी मोठीच गोष्ट असते. आपल्या वयाची पन्नाशी गाठणे ही खरंच खास गोष्ट असते. त्यामुळे पन्नासावा वाढदिवस (50th Birthday Wishes In Marathi ) सुद्धा खास असतो. आयुष्याचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष असते. त्यामुळे हा वाढदिवस तर प्रत्येकानेच दणक्यात साजरा करायला हवा. तुमच्या जवळच्या कुणाचा 50वा वाढदिवस असेल तर त्याचे सेलिब्रेशन आणखी खास बनवण्यासाठी तुम्ही त्यांना खास 50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी मध्ये पाठवू शकता. कारण हा क्षण मोठा आणि रोमांचक असतो. तुमचे आई ,बाबा किंवा घरातील इतर ज्येष्ठ मंडळी, किंवा बहीण भाऊ ,मित्र मैत्रीण यांच्यापैकी कुणाचा पन्नासावा वाढदिवस असेल तर तुम्ही त्यांना पन्नास दिव्यांनी औक्षण करण्याबरोबरच 50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा (Golden Jubilee 50th Birthday Wishes In Marathi) खास पद्धतीने पाठवू शकता. या लेखात आम्ही तुमचे मित्र, कुटुंब आणि नातेवाईक यांच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसाच्या सुंदर शुभेच्छा शेअर करत आहोत.त्यापैकी तुम्हाला आवडतील त्या निवडा आणि ते तुमच्या मित्र, कुटुंबीय किंवा नातेवाईकांना पाठवा.
वाचा – वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आभार संदेश
स्पेशल 50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी | Special 50th Birthday Wishes In Marathi
पन्नास वर्षे हा चांगला आणि वाईट अशा दोन्ही गोष्टींनी भरलेला काळ असतो. त्यामुळे आयुष्याचे टक्केटोणपे खात आयुष्याची पन्नाशी गाठणे हा क्षण तुमच्या प्रिय व्यक्तीसाठी खास असतो. त्यांचा हा स्पेशल दिवस साजरा करण्यासाठी त्यांना स्पेशल 50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवा.
प्रत्येक कामात तुमची स्फूर्ती आणि उत्साह बघून आम्हाला तुमच्या वाढत्या वयाची अजिबात आठवण होत नाही. कायम असेच आनंदी व उत्साही राहा. 50 व्या वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.
जशी सूर्याशिवाय सकाळ होऊ शकत नाही तसेच तुमच्याशिवाय आमचे आयुष्य आणि आनंद अपूर्ण आहे.
Happy 50th Birthday Dear _____.
आयुष्यात कुठलाही प्रसंग आला तरी त्याला हसतमुखाने सामोरे जाणे सोपे नाही. आयुष्याची 50 वर्षे आनंदात व उत्साहात व्यतीत केल्याबद्दल तुम्हाला अनेक शुभेच्छा. तुमच्या पुढील आयुष्यात आनंदाची भर पडत राहो हीच शुभेच्छा! Happy 50th Birthday…
तुमच्या या वाढदिवशी आम्ही प्रार्थना करतो की आजपासून तुमच्या आयुष्यातला आनंद उत्तरोत्तर वाढत जावो. 50 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .
50 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आम्ही आशा करतो की तुमचे पुढचे सगळे दिवस आनंदी व उत्साहाने भरलेले राहोत.
आज 50 वर्षानंतरही तुम्ही निरोगी व आनंदी आहेत हा परमेश्वराचीच कृपा आहे. देवाकडे आम्ही प्रार्थना करतो की तुमचे पुढील आयुष्य असेच निरोगी व आनंदी जावो. 50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
तुमच्या जीवनात आनंदाचा बहर येवो. आनंदाच्या सुगंधाने तुमचे आयुष्य भरून जावो. तुमच्या चेहेऱ्यावरील स्मितहास्य असेच कायम राहो आणि तुमच्या मनात आमची आठवण ताजी राहो. 50 व्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..
तुम्हाला 50 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमचे आयुष्य आनंदाने भरून जावो. दिवसेंदिवस तो आनंद द्विगुणित होत जावो हीच देवाकडे प्रार्थना!
आम्ही परमेश्वराकडे प्रार्थना करतो की तुमच्या आयुष्यात येणारी पुढील 50 वर्षे यापेक्षा उत्कृष्ट आणि आनंदी जावोत. Happy Birthday Dear ____…
आज आपण आयुष्यातला एक मोठा टप्पा पूर्ण केलात. या अविस्मरणीय प्रवासाची 50 वर्षे पूर्ण झाली. मी आशा करतो की तुमची यापुढील 50 वर्षे आणखी आनंदी असोत.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
वाचा – वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काका
गोल्डन ज्युबिली 50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | Golden Jubilee 50th Birthday Wishes In Marathi
वाढदिवस हा वर्षातून एकदाच येतो. त्यात जर तो पन्नासावा म्हणजेच गोल्डन ज्युबिली असेल तर तो दिवस आणखी खास असतो. या दिवशी जर आपण कुटुंबियांना, नातेवाईकांना आणि मित्रांना त्यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त वेगळ्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या, तर यामुळे त्यांना विशेष आनंद होईल. वर्षातील हा एक दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात खूप आनंद घेऊन येतो. या निमित्ताने तुमचे मित्र आणि कुटुंबीयांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी गोल्डन ज्युबिली 50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा संग्रह घेऊन आलो आहोत.त्या वाचा आणि आपल्या जवळच्या व्यक्तीला खास संदेश पाठवा.
आठवून बघा जेव्हा आपण 10 वर्षाचे होतो,तेव्हा किती उत्साहित असतो. असो,पण आता तर तुम्ही 50 वर्षांचे झाला आहात. आज तर तुम्ही 5 पट जास्त उत्साहित व्हायला हवे. गोल्डन ज्युबिली 50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा…
तुम्हाला 50 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. नक्कीच आपले वय वाढतेय, पण मनाने आपण कायम पंचविशीचे तरुणच राहाल.
तुमच्या 50 व्या वाढदिवशी तुम्हाला मी तरुण राहण्याचे रहस्य सांगतो. नेहमी प्रामाणिक राहणे, हळू हळू व चावून खाणे आणि कुणी आपले वय विचारल्यावर आपले खोटे वय सांगणे. 50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रा…
मला या गोष्टीचा खूप आनंद होत आहे की तुम्ही तुमचा 50 वा वाढदिवसही उत्साहाने आणि स्फूर्तीने साजरा करीत आहात.आपणास 50 व्या वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
आयुष्यात अनेक माणसे येतात नि जातात. परंतु तुमच्यासारखी लाखमोलाची माणसे नशिबानेच मिळतात. तुम्हाला पुढील आयुष्याच्या प्रत्येक क्षणी आनंद व सुख लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
मोठ्या मनाच्या मोठ्या माणसाला 50 व्या वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा! तुम्हाला आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य व समाधान लाभो हीच देवाकडे प्रार्थना!
जगातील सर्वात चांगल्या स्वभाव असणाऱ्या व्यक्तीला 50 व्या वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा! परमेश्वराकडे हीच प्रार्थना आहे की तुमचे आयुष्य कायम असेच निरोगी व सुखी राहो..
आम्हाला तुमचा वाढदिवस लक्षात राहतो. पण तुमचे वय मात्र लक्षात राहत नाही. तरुणांना लाजवेल असा उत्साहाच्या अखंड वाहणाऱ्या झऱ्यासाठी वय हा फक्त एक आकडा आहे. Happy 50th birthday!
सूर्याची सोनेरी किरणे तुम्हाला तेज देवो, फुलणारी फुले तुमचे आयुष्य सुगंधी करो, तुमच्या प्रत्येक कार्यात तुम्हाला यश लाभो, आयुष्याचा येणारा प्रत्येक क्षण तुम्हाला सुख देवो! Happy 50th Birthday Dear…
आपल्या वाटेत फुलांच्या पायघड्या पडो, आयुष्यातील सर्व सुखे तुमच्यापुढे लोटांगण घेवो, तुमच्या इच्छेनुसार सर्व गोष्टी घडत जावो हीच प्रार्थना! आपणास 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
वाचा – बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश
बाबांसाठी 50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | 50th Birthday Wishes For Dad In Marathi
आई व वडिलांच्या पायांशीच स्वर्ग आहे असे म्हणतात ते खोटे नाही. आई मायेचा ओलावा आहे तर वडील हे आयुष्याचा भक्कम आधार आहेत. आईचे प्रेम मुलांना कळते पण वडील त्यांचे प्रेम व काळजी कृतीतून व्यक्त करतात. त्यामुळे अनेकांना ते खूप उशिरा कळते. पण जितके आईचे तिच्या मुलांवर प्रेम असते तितकेच वडिलांचेही असते. आणि आईप्रमाणेच बाबांवरचे प्रेमही आपण व्यक्त केले पाहिजे. जर तुमच्या वडिलांचा पन्नासावा वाढदिवस असेल आणि एक मुलगा किंवा मुलगी म्हणून तुम्ही तुमच्या वडिलांना सांगू इच्छित असाल की तुम्ही त्यांच्यावर खूप प्रेम करता तर ही भावना तुमच्या वडिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी बाबांसाठी 50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवा.
परमेश्वराकडे एकच प्रार्थना आहे की मी जेव्हा तुमच्या वयाचा होईन तेव्हा मी देखील स्वभावाने तुमच्यासारखाच दयाळू आणि स्वाभिमानी राहावे. तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा!
मी प्रार्थना करते की येणाऱ्या काळात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत. तुम्हास आनंद, सुख, समाधान व मन:शांती लाभो..Happy 50th Birthday Baba!
जगातील सर्वात चांगल्या व्यक्तीला सुवर्णमहोत्सवी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..Happy 50th Birthday Baba!
तुमच्या असण्यानेच आमचे आयुष्य आनंदी आणि सुखी आहे. तुम्ही नेहमी सुखी आणि निरोगी राहावे हीच प्रार्थना! हॅपी बर्थडे बाबा…
बाबा तुम्ही माझे वडील असण्यासोबतच माझे सर्वात जवळचे मित्रही आहात. माझ्या आयुष्यातील सगळ्या चांगल्या-वाईट क्षणांचे साक्षीदार आहात. नेहमी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल तुमचे कसे आभार मानू! जगातल्या सगळ्यात चांगल्या बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुमच्यासारखे वडील मिळाल्याबद्दल मी स्वत:ला खूप भाग्यवान मानतो. माझ्यासाठी तुम्ही देवाच्याच स्थानी आहेत. तुम्ही नेहमी असेच निरोगी व सुखी राहावे हीच प्रार्थना…50व्या वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा बाबा ..
ज्याप्रकारे तुम्ही तुमच्या खांद्यांवर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी उचलली आहे, त्याचप्रकारे तुम्ही आम्हाला आमच्या
जबाबदाऱ्यांची हसतखेळत जाणीव करून दिली आणि जबाबदारी पेलण्यासाठी आम्हाला सक्षम बनवले.
आपणास सुवर्णमहोत्सवी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा!
बाबा, आजचा दिवस ‘मी तुमचा खूप आभारी आहे’ हे सांगण्यासाठी सर्वोत्तम आहे. हॅपी 50th बर्थडे! आम्हाला आयुष्यात तुमच्यासारखेच उत्तम व्यक्ती म्हणून घडवल्याबद्दल तुमचे शतशः आभार!
माझा सन्मान, माझी कीर्ती आणि माझा मान आहेत माझे बाबा! नेहेमी माझी हिंमत वाढवणारे माझा अभिमान आहेत माझे बाबा ..बाबांना 50व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा Happy Birthday Dear Dad..
बाबा, जेव्हाही मी तुमच्याकडे बघते मला तुमच्यासारखेच एक उत्तम व्यक्ती व्हावेसे वाटते. तुम्ही माझ्यासाठी आदर्श आहात.तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
वाचा – नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश
आईसाठी 50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | 50th Birthday Wishes In Marathi For Mother
आई ही सर्वांची आवडती असते कारण आपल्या आयुष्याची सुरुवात तिच्यापासूनच होते. आईशिवाय आयुष्याची कल्पना देखील आपण करू शकत नाही. आपल्यावर निस्वार्थपणे प्रेम करणारी ती पहिली व्यक्ती असते. तिच्या प्रेमाच्या बदल्यात ती तुमच्याकडून काहीही अपेक्षा करत नाही. ती अशी असते जी तुमच्या सर्व चुका माफ करते आणि शेवटपर्यंत फक्त तुमच्याच भल्याचा विचार करते. अशा आईचा पन्नासावा वाढदिवस म्हणजे मोठाच दिवस नाही का? मग आईसाठी 50 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तर पाठवायलाच हव्यात.
आयुष्याच्या वाटेत अनेकांना बदलताना पाहिले पण आई, प्रत्येक वेळी तुला मात्र मी माझ्यावर प्रेमच करताना पाहिले. आई तुला 50 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
कितीही मोठे झालो तरी आई तुझी माया कधी कमी होत नाही. आजच्या या खास दिवशी सुद्धा तुझ्या मनात आमचाच विचार आहे.आई तुला 50 व्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!
संपूर्ण कुटुंबाला तिच्या मायेच्या बंधनात बांधून ठेवणाऱ्या, सर्वांवर भरभरून प्रेम करणाऱ्या आणि सर्वांची काळजी करणाऱ्या माझ्या लाडक्या आईला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
माझ्या आयुष्यातील तुझे महत्व व स्थान सांगितल्याशिवाय माझा परिचय कधीच पूर्ण होऊ शकत नाही. तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे. 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिय आई!
माझ्या प्रत्येक दिवसाची सुरुवात तुझा प्रेमळ चेहरा बघूनच होते आणि दिवसाचा शेवट तुझ्या मांडीवर डोके ठेवून झोपल्याशिवाय होऊ शकत नाही. तुझे प्रेम मला असेच कायम मिळत राहो हीच देवाकडे प्रार्थना! आई 50व्या तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि नमस्कार!
माझी आई ही अशी व्यक्ती आहे मला सगळ्यांपेक्षा नऊ महिने जास्त आणि अंतर्बाह्य ओळखते. खरंच माझी आई म्हणजे माझ्यासाठी देवाने दिलेला अनमोल खजिना आहे. जिच्या प्रेमामुळेच आज आयुष्य सुखकर होते अशा माझ्या लाडक्या आईला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आई तुझे कितीही वय झाले तरी माझे लाड करण्यासाठी तुझा उत्साह कमी होत नाही. मी कितीही मोठा झालो तरी माझे लाड करण्यासाठी तुझे हात कायम सरसावतात. तुझे प्रेम आणि तुझा सहवास माझ्यासाठी अनमोल आहे. आई तुला 50व्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा…
आई तू माझ्या आयुष्यातील आनंदाचे कारण आहेस. माझ्या जन्माच्या आधीपासून तू स्वतःचे सगळे विसरून माझी काळजी घेत आहेस. आई तूच माझा देव आहेस. आई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!
आपली आई ही जगात सर्वांची जागा घेऊ शकते पण जगातील कोणीच आईची जागा घेऊ शकत नाही. आई तूच माझ्या जगण्याचे कारण आहेस. तुला 50व्या वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा…
आई तुझा हात असाच माझ्या डोक्यावर राहू दे तर एकेदिवशी मी हे सगळं जगही जिंकू शकेन. आई तुला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
वाचा – भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश
विनोदी 50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | Funny Wishes For 50th Birthday In Marathi
मैत्रीचे नाते तसेच भावंडांशी असलेले नाते खूप खास असते. या नात्यात मोकळेपणा असतो त्यामुळे चेष्टामस्करी, थट्टा केलेली चालते. त्यामुळे नात्यातली रंगत वाढते. तुमच्या मित्र-मैत्रिणीचा किंवा भावंडांचा पन्नासावा वाढदिवस असेल तर त्यांच्या चेहेऱ्यावर हसू उमटवण्यासाठी त्यांना विनोदी 50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवा. यामुळे त्यांचा हा खास दिवस आणखी आनंदात व उत्साहात जाईल. वाचा मित्रमैत्रिणींसाठी वाढदिवसाचे शुभेच्छा संदेश –
तुमचा वाढदिवस आमच्यासाठी तर एक सणच असतो. ओली असो वा सुकी असो आमची पार्टी या दिवशी तर ठरलेलीच असते. मग लवकर सांगा कधी करायची पार्टी? तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
भाऊ आपण किती चांगले आहात, भाऊ आपण किती गोड आहात, भाऊ आपण किती खरे आहात! नाहीतर एक आम्ही… नेहमी खोटे बोलतच आहोत! आमच्या सर्वगुणसंपन्न, सरळ साध्या भोळ्या मित्रास 50व्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!
खरच तू खूप भाग्यवान आहेस कारण तुला एक चांगला हुशार मित्र मिळाला. आता मला मिळाला नाही म्हणून
काय झालं? तुला तर मिळाला आहे ना! 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा!
वयाच्या या टप्प्यावरही दिसण्यात एखाद्या अभिनेत्याला ही लाजवणारे, शहराचे चॉकलेट बॉय, आपले लाडके भावी
नेते, अजूनही डझनभर मुलींच्या हृदयात अडकून पडलेल्या आमच्या रुबाबदार भाऊला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
मी तुझा वाढदिवस विसरू शकतो, पण तू एका वर्षाने म्हातारी झालीस याची आठवण करून द्यायला मला नेहमी आवडते..Happy 50th Birthday Dear ____!
तुमच्यासाठी एक महागडं गिफ्ट घ्यायला जाणारच होते पण, अचानक मला आठवलं तुमचं आता वय जास्त झालंय!
गेल्या वर्षी देखील मी तुम्हाला खूप साऱ्या गिफ्ट्स दिल्या होत्या, या कारणास्तव या वर्षी आपल्याला केवळ प्रेम आणि शुभेच्छा मिळतील. Happy 50th Birthday Dear ____!
दरवर्षी आपले वय वाढतच चाललेय याबद्दल आपले कौतुक करावे की आपल्याला सहानुभूती दाखवावी हे मला कळत नाही. परंतु तरीही आपल्याला सुवर्ण महोत्सवी वाढदिवसाच्या शुभेच्छा!
मी वयाचा उल्लेख असलेला कोणताही विनोद कधीच करत नाही कारण मला माहित आहे की तुमच्यासारख्या एखाद्याला दुःख होईल. तरी पन्नासाव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपण आता एवढे मोठे झाला आहात की आता केकवर तेवढ्या मेणबत्त्या लावायलाही जागा उरली नाही. तरीही तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
काही जणांचा वाढदिवस हा फक्त वय वाढल्याचे सिद्ध करणारा एक दिवस असतो.. बाकी मॅच्युरिटीच्या बाबतीत तर बोंबच असते. असो, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
वाचा – Birthday Jokes Marathi
पन्नासाव्या वाढदिवसाचे कोट्स मराठी । 50th Birthday Quotes In Marathi
वाढदिवस हा आयुष्यातला एक खास प्रसंग असतो. हा एक दिवस जो प्रत्येकाच्या आयुष्यात दरवर्षी येतो आणि बहुतेक लोक तो साजरा करतात. हा जर पन्नासावा वाढदिवस असेल तर तो तर दणक्यात साजरा व्हायलाच हवा. आपण आपल्या जवळच्या व्यक्तींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांच्याविषयी आपल्या मनात असलेले प्रेम व्यक्त करत असतो. आपण आपल्या भावना व्यक्ती करतो तेव्हा समोरच्या व्यक्तीला खूप आनंद होतो. तुम्हालाही तुमच्या मनातल्या भावना शुभेच्छांद्वारे व्यक्त करायच्या असतील तर पाठवा पन्नासाव्या वाढदिवसाचे कोट्स मराठी-
तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुम्हाला सदैव आनंदी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल
आठवणी तुमच्या हृदयात सतत तेवत राहो हीच शुभकामना..पन्नासाव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
नेहेमी तुम्ही निरोगी व तंदुरुस्त राहावे आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करावे. भूतकाळ विसरून नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हावे ही आजच्या खास दिवशी सदिच्छा. पन्नासाव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
संकल्प असावेत नवे तुझे, त्यांना मिळाव्या नव्या दिशा…तुझे प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे ह्याच पन्नासाव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा…
उत्कर्षाची शिखरे तुम्ही सर करीत रहावी, मागे वळून पाहता आठवण आमची स्मरावी! तुमच्या प्रगतीचा वेलू गगनाला भिडू दे , तुमच्या जीवनात सगळे तुमच्या मनासारखे घडू दे !तुम्हाला दीर्घायुष्य लाभो ही इच्छा, पन्नासाव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
नवा गंध नवा आनंद निर्माण करीत तुमच्या आयुष्यात पुढचा प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी हा आनंद शतगुणित व्हावा…ह्याच तुम्हाला पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!
आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना! आपणास पन्नासाव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!
प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या कर्तृत्वाचेआभाळ अधिक अधिक विस्तारीत होत जावो हीच आपणास पन्नासाव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
वाचा – भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
50 व्या वाढदिवसासाठी शुभेच्छा । 50th Birthday Greetings In Marathi
वर्षातील सर्वात खास दिवस म्हणजे वाढदिवस होय. या प्रसंगी मित्र आणि कुटुंबातील नातेवाईकांकडून आपल्याला आशीर्वाद व शुभेच्छा मिळतात. आपणही त्यांच्या वाढदिवशी त्यांना शुभेच्छा देतो. तुमच्या जवळच्या व्यक्तीचा पन्नासावा वाढदिवस असेल तर त्यांना या खास शुभेच्छा पाठवा.
मनापासून दिलेल्या शाश्वत शुभेच्छा माणसाला या जन्मात तसेच,पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात…बाकी सारं नश्वर आहे!म्हणुन तुमच्या पन्नासाव्या वाढदिवसाच्या या शुभदिनी तुम्हाला लक्ष लक्ष शुभेच्छा ..
आयुष्याच्या या टप्प्यावर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे हीच सदिच्छा! 50 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
सगळ्याच जवळच्या, ओळखीच्या माणसांचे वाढदिवस आपण साजरे करतो. पण त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना मनाला एक वेगळाच आनंद होतो. कारण ते आपल्या मनात घर करून बसलेल्या काही खास माणसांचे वाढदिवस असतात. पन्नासाव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आज तू जे देवाकडे मागशील ते तुला मिळो हीच आज माझी देवाकडे प्रार्थना आहे…तुला 50व्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!
आपणांस पुढील आयुष्यात चांगले आरोग्य, लहान थोरांचे प्रेम, सुख शांति, मानसिक समाधान आणि दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना… 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
या पृथ्वीवरील सर्वात रुबाबदार आणि सर्वात चांगल्या व्यक्तीला पन्नासाव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
शांत, सयंमी, मनमिळावू आणि कर्तव्यनिष्ठ असे अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या थोर व्यक्तीला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
व्हावीस तू शतायुषी, व्हावीस तू दीर्घायुषी ही एकच माझी इच्छा… तुला पन्नासाव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
पन्नासावा वाढदिवस म्हणजे आयुष्याची हाफ सेंच्युरी पूर्ण झाली. या काळात माणूस अनेक चांगले-वाईट क्षण जगलेला असतो. आयुष्याचा भरपूर अनुभव घेऊन झालेला असतो. त्यामुळे मॅच्युरिटी आलेली असते. पण मॅच्युअर झालो म्हणजे वाढदिवस साजरा करायचा नाही असे नाही ना! हाफ सेंच्युरी पूर्ण झाल्यावर बॅट्समनचे जसे प्रेक्षक कौतुक करतात तसेच पन्नासाव्या वाढदिवशी कुटुंबिय, नातेवाईक, मित्रपरिवार देखील कौतुक करतात. तुमच्याही जवळच्या व्यक्तीचा 50वा वाढदिवस असेल तर त्यांना 50व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा (50th Birthday Wishes In Marathi) पाठवा.
Photo Credit – istockphoto
वाचा – Birthday Wishes For Teacher In Marathi