ADVERTISEMENT
home / Diet
दही चिवडा अर्थात दही पोहे आहे अप्रतिम नाश्ता, मिळतील फायदे

दही चिवडा अर्थात दही पोहे आहे अप्रतिम नाश्ता, मिळतील फायदे

रोज सकाळी नाश्त्याला काय बनवायचं हा खूपच मोठा प्रश्न असतो.  कारण सकाळचा नाश्ता हेल्दी हवा.  त्यातही काही तेलकट नको. आपल्याला दिवसभर त्रास होईल असं  नको. या सगळ्याचा विचार करूनच नाश्ता बनवावा लागतो. शहरांमध्ये तर सकाळी निघायची इतकी घाई असते की, नाश्ता करायला जास्त वेळही नसतो.  मग अशावेळी हेल्दी, झटपट बनणारा आणि पोटातील भूक शमवणारा असा नाश्ता म्हणजे दही चिवडा (Dahi Chivada). याला दही पोहा असंही म्हटलं जातं. दही पोहे (Dahi Pohe) बऱ्याच ठिकाणी खाल्ले जातात. सकाळी सकाळी हेल्दी नाश्त्यामध्ये  तुम्ही दही चिवड्याचा नक्की समावेश करू शकता. दही चिवडा म्हणजे आपला पोह्यांचा चिवडा घालून त्यात दही मिक्स करणे असं  नाही. अर्थात तुम्ही तुम्ही तसंही करू शकता.  पण हा थोडा वेगळा नाश्ता आहे. यासाठी तुम्ही पोहे धुऊन त्यामध्ये दही आणि गूळ मिक्स करून तयार करावा लागतो. काही घरांमध्ये हा पदार्थ देवासाठी नवैद्य म्हणूनही वापरण्यात येतो.  तर असा हा हेल्दी नाश्ता कसा करायचा आणि त्याचे नक्की काय फायदे आहेत ते आपण जाणून घेऊया. 

एका बाजूला आधुनिक दलिया,  ओट्स  आणि चीज असे पदार्थ नाश्त्यासाठी वापरण्यात येतात. पण तुम्ही तुमच्या नाश्त्यामध्ये नक्कीच हा पदार्थ सामावून घेऊ शकता.  देशी आणि पौष्टिक असा हा नाश्ता खाऊन आपल्याला अनेक फायदे मिळतात. तुम्हाला खूपच भूक लागली असेल अगदी दिवसाच्या मधल्या कोणत्याही वेळी तरीही दही चिवडा खाऊन तुमचे पोट नक्की भरेल. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड अशा राज्यांमध्ये हा नाश्ता जास्त प्रसिद्ध आहे. आपल्याकडे गावात दूध, साखर,  पोहे एकत्र करूनही नाश्ता करण्यात येतो. 

कसा बनवावा दही चिवडा

दही चिवडा बनवणे अत्यंत सोपे आहे. तुम्हाला यासाठी केवळ दही, गूळ आणि पोहे हे तीनच पदार्थ असणे आवश्यक आहे. 

  • तुमच्या आवडीनुसार पातळ अथवा जाड पोहे पाण्यात धुऊन घेणे आणि मऊ करणे 
  • त्यात गुळाची पावडर अथवा गूळ मिक्स करणे 
  • दही मिक्स करणे आणि व्यवस्थित त्याचा  गोडवा येण्यासाठी थोडा वेळ तसंच मिक्स करून ठेवणे
  • साधारण दहा मिनिट्सने हा दही चिवडा तुम्ही खावा
  • काही जण तिखट दही चिवडादेखील बनवतात. यामध्ये पोहे भिजवून घ्यावे. त्यात दही मिक्स करावे, मीठ घालवे आणि वरून तेलाची वा तूपाची फोडणी द्यावी. तेल तापवून त्यात जिरे, मोहरी, हिंग, हिरवी वा लाल मिरची, कडिपत्ता घालून मिक्स करावे. चवीला अप्रतिम लागते. हवी असल्यास,  कोथिंबीर मिक्स करा. 

काय आहेत याचे फायदे

सकाळी सकाळी तेलकट खाऊन दिवसभर घसा दुखत राहतो तसंच नंतर भूक लागत नाही. अशावेळी दही चिवडा हा नाश्ता खूपच फायदेशीर ठरतो. याचे नक्की काय काय फायदे आहेत पाहूया.

ADVERTISEMENT

पचण्यास सोपे

दही चिवडा हा अत्यंत खाल्ल्यानंतर पोटात पटकन बसतो पण हा नाश्ता तितकाच पचायला हलका आहे. सकाळी सकाळी हा नाश्ता तुम्ही खाल्ला तर तुम्हाला बऱ्याच तासांपर्यंत पोट भरल्यासारखे वाटते. तसंच हे खाल्ल्यामुळे दिवसभर चांगली ऊर्जा आणि उत्साह राहातो. तुम्हाला जर लहान मुलांना हा नाश्ता द्यायचा असेल तर तुम्ही गूळ आणि साखर दोन्ही मिक्स करून देऊ शकता. कारण मुलांना गूळ सहसा आवडत नाही. हा नाश्ता अधिक चविष्ट बनविण्यासाठी यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स अथवा फळांचाही वापर करू शकता. यामध्ये केळी, चिकू, सफरचंद, द्राक्ष अशा फळांचा समावेश केला तर नक्कीच चविष्ट लागते.

फायबरयुक्त आहे दही चिवडा

हा दही चिवडा फायबरयुक्त असतो कारण यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असतो. पोहे जेव्हा दह्यासह मिक्स होतात तेव्हा ते अधिक फायदेशीर ठरतात. आतड्यांना अधिक निरोगी ठेवण्यासाठी हे परफेक्ट डाएट आहे. तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर तुम्ही तुमच्या डाएटमध्ये दही चिवडा नक्कीच समाविष्ट करून घेऊ शकता. गूळ आणि दही या दोन्ही गोष्टी वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. तसंच नियमित दही भात खाणं योग्य असतं. त्याचप्रमाणे याचाही फायदा होतो. 

कॅलरी असतात कमी

कॅलरी असतात कमी

Shutterstock

ADVERTISEMENT

फायबरसह यामध्ये कॅलरीची मात्रा कमी असते. त्यामुळे वजन वाढत नाही. विशेषतज्ज्ञांनुसार यामध्ये सर्व आवश्यक पोषक तत्व असतात. तसंच यामध्ये केवळ 300 कॅलरी असतात. यामुळे वजन कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. बरेच जण केवळ नाश्ताच नाही तर दुपारच्या जेवणातही याचा समावेश करतात.

लोह भरपूर प्रमाणात असते

तुमच्या शरीरामध्ये जर लोहाची कमतरता असेल तर तुम्ही दही चिवडा तुमच्या डाएटमध्ये नक्की समाविष्ट करायला हवा. इतकंच नाही तर गर्भवती महिलाही याचे सेवन करू शकतात. याशिवाय एनिमियासारखा आजार असेल तर तुम्ही त्यावेळीही याचे सेवक करू शकता. जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही. जर तुम्हाला दही चिवडा खाताना काही समस्या जाणवली तर तुम्ही खाणे थांबवा. पण याचा त्रास सहसा होत नाही.

 

पोट खराब असेल तर करते ठीक

तुम्हाला पोटात दुखत असेल अथवा जंत झाले असतील तर तुम्ही दही चिवडा गूळ मिक्स करून तुम्ही खाऊ शकता. त्यासाठी तुम्हाला मॅश केलेला गूळ यामध्ये घालणं योग्य आहे. काही जणांना पोह्यांचा त्रास होतो अशा व्यक्तींनी मात्र हे खाणे टाळा.

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

01 Mar 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT