ADVERTISEMENT
home / Make Up Trends and Ideas
difference between hd and airbrush makeup in marathi

एचडी मेकअप आणि एअरब्रश मेकअपमध्ये काय आहे नेमका फरक

लग्न कार्य असो वा शॉपिंगला जाणं मेकअप शिवाय कोणी घराबाहेर पडत नाही. ऑफिस अथवा फिरायला जाताना साधं कॉम्पॅक्ट आणि लिपस्टिकने काम भागत असलं तरी,  लग्नसोहळे, सणसमारंभ अथवा एखाद्या खास कार्यक्रमासाठी हाय कव्हरेज मेकअप केला जातो. अशा मेकअपसाठी लागणारं साहित्यही तितक्याच गुणवत्तेचं असतं. अशा स्पेशल मेकअपसाठी नेहमीचं फाउंडेशन, प्रायमर, काजळ सूट होत नाही. यासाठीच जर तुम्ही देखील एच डी अथवा एअरब्रश मेकअप ट्राय करण्याचा विचार करणार असाल तर त्याआधी तुम्हाला या दोघांमधला फरक आणि काही महत्त्वाच्या गोष्टी माहीत असायला हव्या.

काय आहे एचडी मेकअप 

एचडी मेकअप हा मेकअपचा असा एक प्रकार आहे ज्यामध्ये तुमच्या मेकअपच्या अनेक गरजा पूर्ण होतात. साधारणपणे तुम्ही जेव्हा मेकअप करता तेव्हा थोड्या कालावधीनंतर तुमच्या चेहऱ्यावरील घामाने मेकअप निघून जातो. मेकअपनंतर तुमच्या चेहऱ्यावरील थकवा अथवा घाम स्पष्ट दिसू लागतो. कधी कधी तर घामामुळे मेकअप खराब होतो आणि तो क्रॅकी दिसू लागतो. मात्र एचडी मेकअपमुळे तुमचा मेकअप लवकर खराब होत नाही. या मेकअपसाठी असे प्रॉडक्ट वापरले जातात. ज्यामुळे तुमच्या त्वचेवर एक थर निर्माण होतो ज्यामुळे तुमच्या त्वचेवर होणाऱ्या परिणामांचा तुमच्या मेकअपवर काही परिणाम होत नाही. सहाजिकच तुमचा मेकअप जास्त काळ टिकतो आणि तुम्ही दिवसभर छान आणि टवटवीत दिसता. तेलकट त्वचेसाठी बेस्ट फाऊंडेशन (Best Foundation For Oily Skin In Marathi)

एअर ब्रश मेकअप म्हणजे काय

एअर ब्रश मेकअप देखील एक चांगल्या गुणवत्तेच्या प्रॉडक्टने केला जातो. मात्र यात मेकअप करण्यासाठी ब्रशचा वापर केला जात नाही तर त्यासाठी एक वेगळे टूल वापरले जाते. या टूलला एअर ब्रश असं म्हणतात त्यामुळे या मेकअपलाही एअर ब्रश मेकअप म्हटलं जातं. हा एअर ब्रश त्वचेला स्पर्श न करता तुमचा मेकअप करतो. मात्र एअर ब्रश योग्य पद्धतीने हाताळता येणं गरजेचं आहे. यासाठीच नववधूचे रुप खुलवणाऱ्या एअरब्रश मेकअप (Airbrush Makeup) विषयी जाणून घ्या सर्व काही

एचडी की एअर ब्रश कोणता मेकअप आहे बेस्ट

मेकअप करणाऱ्या अनेक महिलांना एचडी आणि एअरब्रश मेकअपमधील फरक माहीत नसतो. तुम्हाला कोणत्या कार्यक्रमासाठी काय लुक करायचा आहे यावरून तुम्ही कोणता मेकअप करायला हवा ते ठरत असतं. एचडी मेकअप साधारणपणे लग्न अथवा मोठ्या कार्यक्रमांसाठी केला जातो. जर मेकअप आर्टिस्टला एअर ब्रश हाताळण्याचे तंत्र माहीत असेल तर तो एअर ब्रशनेही एच डी मेकअप करू शकतो. तज्ञ्जांच्या मते ज्यांची त्वचा तेलकट आहे अशा लोकांना नेहमी एअरब्रशचा वापर करूनच मेकअप करावा. एअर ब्रशने मेकअप करणं हे त्वचेच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या सोयीनुसार कोणत्याही टुलने एच डी मेकअप करू शकता. डोळे लहान असतील तर असा करा डोळ्यांचा मेकअप | Makeup Tips For Small Eyes In Marathi

ADVERTISEMENT
21 Dec 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT