ADVERTISEMENT
home / Care
केसांना कलर केला असेल तर उन्हापासून कसे करायचे संरक्षण

केसांना कलर केला असेल तर उन्हापासून कसे करायचे संरक्षण

केसांना कलर करणं तर सोपं आहे पण त्यानंतर केसांना जपणं तितकंच कठीण आहे. कारण उन्हापासून अशा केसांना जपावं लागतं नाहीतर केस लवकर खराब होतात अथवा रंग लवकर उडून जातो. मग अशावेळी केसांना कलर केला असेल तर उन्हापासून कशा तऱ्हेने रक्षण करायचं हे आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. असंही केसांची काळजी घेणं अत्यंत गरजेचं असतं. आपल्याकडे धूळ, प्रदूषण यामुळे आधीच केस लवकर खराब होतात. त्यातही केसगळती आणि केसांच्या तुटण्यासारख्या समस्या आपल्याकडे अनेकांना असतात. हल्ली तर बऱ्याच जणांचे केस लवकर पांढरे होतात. परंतु योग्य काळजी घेत आपण पांढरे केस काळे करू शकता. मग अशावेळी केसांना कलर करणे हा पर्याय आपण निवडतो. पण केसांना रंग दिल्यानंतर त्याची काळजी घेणंही तितकंच गरजेचं आहे. वास्तविक कलर केलेल्या केसांची जास्त काळजी घ्यावी लागते. पण नक्की काय काळजी घ्यायची ते मात्र माहीत नसतं. मग अशावेळी उन्हापासून त्याचं संरक्षण कसं करायचं ते जाणून घेऊया.

खास शँपू आणि कंडिशनरचाच वापर करा

Shutterstock

केसांना कलर केल्यानंतर कोणत्याही शँपूचा वापर त्यावर करू नये.  एकतर केस त्यामुळे कोरडे आणि फ्रिजी होतात. त्यामुळे कलर केल्यानंतर खास बनविण्यात आलेले शँपू आणि कंडिशनरचा वापरच केला जावा. यामुळे उन्हापासूनही संरक्षण होते आणि केसांचा रंग लवकर निघत नाही. अन्यथा वेगळ्या शँपूच्या वापराने केसांचा रंग लवकर उडून जातो. 

ADVERTISEMENT

केसांना करा कलर आणि हायलाईट घरी (How To Highlight Hair At Home In Marathi)

नेहमी स्कार्फचा वापर करा

तीव्र सूर्यप्रकाशाने केस लवकर खराब आणि कोरडे होतात. त्यामुळे घरातून बाहेर पडताना नेहमी केसांना स्कार्फ बांधून घ्या. विशेषतः केसांना कलर केला असेल तेव्हा तर हा नियम तुम्ही पाळायलाच हवा. कारण सूर्यकिरणांच्या संपर्कात आल्याने केसांचा रंग लवकर फिका पडतो आणि पुन्हा एकदा केस पांढरे दिसायला लागतात. नियमित वेळेच्या आधीच केसांचा रंग निघून जातो. त्यामुळे न विसरता स्कार्फचा वापर करा.

केसांना कलर करण्याआधी जाणून घ्या या महत्वाच्या गोष्टी

शक्यतो सल्फेट फ्री शँपू वापरा

ADVERTISEMENT

Shutterstock

केसांना कलर केल्यानंतर शक्यतो तुम्ही सल्फेट फ्री शँंपू वापरा. कारण रंगामध्ये अनेक केमिकलयुक्त पदार्थांची मिसळ असते. सल्फेट फ्री शँपू वापरल्याने कुरळे अथवा निस्तेज केसांमध्ये मुलायमपणा जास्त काळ टिकून राहतो. तसंच रंगही टिकून राहतो. उन्हाचा त्रास होत नाही. त्यामुळे तुम्ही याचा वापर करा. सल्फेट असणारे शँपू हे केसांच्या मुळातील मुलायमपणा कमी करतात आणि उन्हामुळे त्यावर अधिक परिणाम होऊन ते अधिक खराब आणि कोरडे होतात. 

हेअर कलर करायचा विचार करताय, तुमच्या राशीनुसार निवडा या शेड

प्रोटीन आणि कॅल्शियम खा

कॅल्शियम आणि आयर्नचं प्रमाण अधिक असणारे पदार्थ खा. जेणेकरून केसांना व्यवस्थित काळजी पोहचेल. तसंच प्रोटीनही व्यवस्थित प्रमाणात खा. म्हणजे मग उन्हात तुम्ही गेल्यानंतरही तुमच्या केसांना बाधा होणार नाही. तसंच तणाव कमी घ्या आणि दिवसभरात 8 तास झोप नक्की घ्या. यामुळे तुमचे केस व्यवस्थित राहतील. केसांचा रंगही टिकून राहील. 

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

20 Sep 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT