ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
कोबीची भाजी कापण्याची सोपी पद्धत, वाचवा वेळ

कोबीची भाजी कापण्याची सोपी पद्धत, वाचवा वेळ

गृहिणी अथवा ऑफिसमध्ये काम करणारे असो. प्रत्येकाला स्वयंपाकघरात काम करावेच लागते. स्वयंपाकघरातील काही कामं अशी असतात जी कठीणच नाही तर ती करण्यासाठी बराच वेळही लागतो. यातील सर्वात वेळ घेणारे काम म्हणजे भाजी कापणे. त्यातही कोबीसारखी भाजी असेल तर अजूनच डोक्याला ताप. ही भाजी नक्की कशी कापायची हेच कळत नाही. एकदा कोबी कापायला घेतला की, त्याची पाने सुटू लागतात आणि त्यामुळे सकाळच्या घाईत भाजी कापणे कठीण होते. तसंच कोबी कापताना बऱ्याचदा हातावर सुरी लागते असा सूरही महिलांच्या तोंडून ऐकू येतो. पण तुम्ही घाईच्या वेळी अगदी सहज कोबी कापू शकता. कोबी कापायला जमत नसेल तर तुम्ही सोप्या पद्धती वापरा. आम्ही तुम्हाला काही सोप्या पद्धती सांगत आहोत. तुम्हाला हाताला लागणारही नाही आणि पटकन कोबी कापून होईल. ज्यामुळे तुम्हाला कोबीची भाजी रेसिपी झटपट करता येईल.

स्टीलच्या ग्लासचा करा वापर (Use steel glass)

स्टीलच्या ग्लासचा करा वापर (Use steel glass)

Freepik

  • तुम्ही स्टील ग्लासच्या मदतीने कोबी अगदी सहज काही मिनिट्समध्ये कापू शकता. त्यासाठी तुम्ही स्टीलचे ग्लास घ्या, ज्याचा काठ शार्प असेल
  • आता तुम्ही कोबीचे बाहेरची खराब झालेली पहिली पानं काढून टाका आणि वरील टणक भाग चाकूने कापून घ्या
  • आता ग्लास उलटे पकडा आणि त्याच्या तोंडाने कोबीवर जोरात दाबा. असेच तुम्ही जलद गतीने संपूर्ण कोबीवर स्टीलचे ग्लास फिरवून कापून घ्या
  • अशाप्रकारे कोबी कापायला केवळ 5 मिनिट्स लागतात. लांब आकाराचा कोबी असेल तर तुम्ही ही पद्धत नक्की अवलंबू शकता

अधिक वाचा – रोजची भाजी बनवायची असेल अधिक चविष्ट तर घरीच तयार करा असा सुका मसाला

ADVERTISEMENT

चाकू (सुरी) च्या मदतीने कसा कापवा कोबी

चाकू (सुरी) च्या मदतीने कसा कापवा कोबी

Freepik

  • कोबी लहान आकाराचा असेल आणि तो कापण्यासाठी तुम्हाला चाकू अथवा सुरीचाच वापर करावा लागेल. अशा पद्धतीने कोबी कापण्यासाठी सुरीचे टोक अथवा सुरीची धार चांगली असणे गरजेचे आहे
  • कोबीच्या पानाचा पहिला काळा भाग काढून घ्या. दोन भाग करा आणि मग कोबी कापा
  • दोन भाग करून पहिला भाग घ्या आणि त्याचे पुन्हा दोन समान भाग करा आणि चाकूने कापा
  • तीन ते चार भाग करून तुम्ही कोबी कापून घेऊन शकता

चिप्स कटरच्या मदतीने कापा कोबी

  • तुमच्याकडे चिप्स कटर असेल तर तुम्ही कोबी कापण्यासाठी त्याचा उपयोग करून घ्या
  • त्यासाठी तुम्ही कोबीचे दोन भाग करून घ्या. मग दोन्ही भाग चिप्स कटरवर त्याच पद्धतीने ठेवा ज्याप्रमाणे तुम्ही बटाट्याचे काप काढण्यासाठी ठेवता
  • असं केल्याने कोबी पटकन कापून होतो. फक्त अशाप्रकारे तुम्ही कोबी अगदी बारीक कापू शकत नाही हे लक्षात घ्या

अधिक वाचा – डाळी आणि पिठांमध्ये होणार नाहीत किडे, स्वयंपाकघरातील टिप्स

किसून घ्या

तुम्हाला कोबी कापायला जमत नसेल तर तुम्ही कोबी किसूनही घेऊ शकता. तुम्ही जाड आकाराची किसणी घेऊन कोबी किसून घ्या. यामध्ये मोठे आणि लहान छेद असतात. तुमच्या आवडीनुसार तुम्ही करून घ्या. यासाठी तुम्हाला केवळ 5 मिनिट्स लागतात.

ADVERTISEMENT

या चार प्रकाराने तुम्ही कोबी कापून वा किसून त्याची भाजी वा पचडी बनवू शकता. तुम्हाला घाईच्या वेळात जास्त वेळ लागणार नाही. कोबी कसा कापयचा याचे हॅक्स तुम्हाला आवडले असतील तर नक्की शेअर करा आणि दिलेल्या टिप्स वापरून कोबीची भाजी करून पाहा.

अधिक वाचा – स्वयंपाकघरात करायच्या असतील स्वादिष्ट रेसिपीज तर वापरा सोप्या टिप्स

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

17 Jul 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT