ज्यांना फॅशन आणि फॅशनेबल गोष्टींची आवड असते त्यांना वय किंवा इतर कोणत्याही गोष्टींमुळे फरक पडत नाही. ट्रेंडमध्ये राहण्यासाठी लोक आपल्या फॅशन सेंस (fashion sense) सोबत एक्सपेरिमेंट करायलाही घाबरत नाहीत. साधारणतः फॅशन एक्सपर्ट्सच असं मानणं आहे की, फॅशनचा वयाशी काही संबंध नाही. वय वाढणं हा फॅक्टर हा फक्त प्रत्येक व्यक्तीच्या दृष्टीकोनावर अवलंबून असतो.
Table of Contents
कोणतं आउटफिट (outfit) किंवा फॅशन ट्रेंड (fashion trend) ला कॅरी करणं हे बहुतेकवेळा तुमच्या अॅटिट्यूड (attitude) वर डिपेंड करतं. जर तुम्ही एखाद्या खास रंगाच्या ड्रेसमध्ये कंफर्टेबल (comfortable) फील करत असाल तर तुम्ही कोणत्याही वयात किंवा ऑकेजन (occasion) ला तो घालू शकता. जाणून घ्या वाढत्या वयातही फॅशन कशी कॅरी करावी याबाबतच्या खास टीप्स.
एव्हरग्रीन दृष्टीकोन (Evergreen Outlook)
जेव्हा आपण फॅशनबाबत बोलतो तेव्हा आपल्याला हे माहीत असलं पाहिजे की, फॅशन कोणत्याही खास वयोगट किंवा जेंडरपर्यंत सीमित नाही. प्रत्येक वयोगटातील पुरूष आणि महिलेला फॅशनबाबतचे प्रयोग करण्याचा अधिकार आहे. फॅशन म्हणजे जो ट्रेंड सुरू आहे, त्याप्रमाणे स्वतःला अप टू डेट ठेवणं आणि हे तर कोणीही करू शकतं. कितीवेळा मिडल एज किंवा प्रौढ महिला-पुरूष हे यंगस्टर्सपेक्षाही जास्त चांगल्यारितीने फॅशन कॅरी करताना दिसतात. जर तुमचे विचार तारूण्यपूर्ण असतील तर तुमच्या ओव्हरऑल अपियरन्सवर ते साफ दिसतं. वय वाढणं याचा अर्थ हा नाही की, तुम्ही प्रत्येक बाबतीत कॉम्प्रोमाईज करून आपल्या वॉडरोबला मर्यादा घालाव्या. म्हणूनच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत काही खास रंग, ट्रेंड आणि लेटेस्ट फॅशन टीप्स, ज्यामुळे तुम्ही दिसू शकता फॅशनेबल आणि प्रेझेंटेबल तेही कोणत्याही वयात.
असे रंग ज्यामुळे तुम्ही दिसाल यंग (Colors That Will Make You Look Younger)
तुम्ही प्रत्येक अवॉर्ड फंक्शनमध्ये आपली उमराव जान म्हणजेच रेखाला पाहातच असाल. आजही रेखा कोणत्याही फंक्शनला गेल्यावर तिच्या साडीच्या रंगामुळे आणि पॅटर्नमुळे लक्ष वेधून घेते. रेखाला बॉलीवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री म्हटलं जातं. जे योग्यही आहे.
वय वाढणं याचा अर्थ असा नाही की, तुम्ही फक्त पांढरा, पीच (peach), बेबी पिंक (baby pink), पावडर ब्ल्यू (powder blue), लाईट ग्रीन (light green), लाईट ब्राउन (light brown) या रंगातील कपडे घालावे. तुम्हीही तुम्हाला आवडतील त्या रंगातले कपडे छानपणे कॅरी करू शकता. फक्त फंक्शन कोणतं आहे हे लक्षात घ्या.
Also Read : इन्स्टाग्रामसाठी फॅशन मथळे
1. टरक्वॉईज (Turquoise) – निळा आणि हिरव्या असा दिसणारा हा रंग शक्यतो प्रत्येक स्कीन टोन (skin tone) ला सूट करतो. या रंगाचे अपर वेअर (टॉप, कुर्ता, शर्ट, टीशर्ट) जे तुम्ही व्हाईट पँट/ जीन्स/ लेगिंग सोबत पेअर करू शकता.
जर तुम्हाला ड्रेस घालण्याची आवड असेल तर टरक्वॉईज व्हेलवेट ड्रेसही खूप सुंदर दिसेल. तसंच या रंगाचा प्रिंटेड किंवा वेगळ्या पॅटर्नचा स्कर्ट किंवा प्लेन टॉप हे तुम्ही टीशर्टसोबत पेअर करून तुम्हाला आवडेल तो लुक मिळवू शकता.
2. रेड- व्हॉयलेट (Red- violet) – तसं तर पेस्टल पिंक (pastel pink) आजही फॅशनमध्ये हीट आहे पण आता या रंगाला काहीश्या डार्क शेडने रिप्लेस केलं आहे. रेड- व्हॉयलेट म्हणजेच मजेंटा शेड (magenta shade) चं आउटफिट घालून तुम्हीही यंग (young) लुक मिळवू शकता.
कोणत्याही मीटींग किंवा इव्हेंटसाठी तुम्ही या शेडचा पँट सूट (pant suit) किंवा लाँग ड्रेस (long dress) कॅरी करून पाहा. तुम्हाला पाहताच कॉम्पलिमेंट्स नक्की मिळतील. या रंगाचे हील्स किंवा फूटवेअरसुद्धा सध्या फॅशनमध्ये आहे. या रंगाचे अपर वेअर डेनिम (denim) सोबतही सुंदर दिसेल. तुमच्या रोजच्या पेहरावापेक्षा काहीतरी हटके घालण्याची इच्छा असेल तर या कलरसोबत तुम्ही पँट किंवा स्कर्टही घालू शकता.
3. न्यू ब्लॅक (New Black) – जास्त वयाच्या बायकांनी गडद काळा रंग टाळावा, हा रंग घातल्यास फाईन लाइंस (fine lines), सुरकुत्या किंवा डार्क सर्कल्स (dark circles) यासारख्या एजिंगच्या समस्या प्रामुख्याने दिसून येतात. खरंतर ब्लॅक कलर (black color) आपल्या कलेक्शनमधून हद्दपार करणं जरा कठीणच आहे. असं जर तुम्हालाही वाटतं असेल तर चारकोल ग्रे (charcoal grey), नेव्ही ब्ल्यू (navy blue), ऑफ ब्लॅक (off black) किंवा दुसरे गडद रंगांचे आऊटफिट्स तुम्ही घालू शकता.
4. पेरीविंकल (Periwinkle) – असं पाहिल्यास हा रंग ब्ल्यू म्हणजेच निळा दिसतो. पण जर नीट पाहिल्यास हा रंग थोडासा पर्पल शेड (purple shade) कडे झुकणारा आहे. दुसऱ्या रंगाचे कपडे या रंगाच्या कानातल्यासोबत किंवा एक्सेसरीज (accessories) घातल्यास खूप छान दिसतील.
Image : Amazon.com
5. रेड (Red) – असं म्हणतात की, जगातील प्रत्येक महिलेकडे लाल रंगाची एक फिक्स शेड असतेच. हा एकच असा रंग आहे जो प्रत्येक स्कीन टोन आणि वयाच्या व्यक्तीला चांगला दिसतो. लाल रंगाला प्रत्येक रंगाचा केंद्रबिंदू मानलं जातं. जास्तकरून रंगांमध्ये पिवळा किंवा निळा रंग हा मिक्स असतो. तर लाल रंगाला प्रायमरी रंग मानलं जात.
जर तुम्ही लाल रंग घालणं सोडून दिलं असेल तर पुन्हा एकदा विचार करा. हा रंग तुमचं वय तर कमी दाखवतोच त्यासोबतच तुमच्या सुंदरतेतही भर पाडतो.
6. व्हाईट (White) – या रंगाला एलिगन्स (elegance) चा पर्याय मानलं जातं. शांती सूचक असा पांढरा रंग प्रत्येकालाच रॉयल लुक फिलींग देतो. जर तुम्हाला अगदीच पांढऱ्या रंगाचं (pure white color) आउटफिट घालायचं नसल्यास तुम्ही क्रीम कलर (cream color), पेस्टल शेड्स (pastel shades) किंवा ऑफ व्हाईट कलर (off white color) ला पसंती देऊ शकता.
तुम्ही कोणत्याही फिकट रंगाचे आउटफिट्स कोणत्याही गडद किंवा ब्राईट कलरच्या अॅक्सेसरीजसोबत पेअर करू शकता.
7. गोल्डन (Golden) – सदाबहार गोल्डन रंग तुमच्या पर्सनॅलिटी (personality) ला अजून सुंदर बनवण्याचं काम करतो. जर तुम्हाला फंक्शनमध्ये सगळ्याचंच लक्ष आपल्याकडे वेधलं जावं असं वाटत असेल तर या रंगाची साडी किंवा आऊटफिट तुमच्या वॉडरॉबमध्ये असलंच पाहिजे. जर तुम्हाला साडीची आवड असेल तर बनारसी किंवा कांजीवरम गोल्डन साडी नेसून तुम्ही कोणत्याही वयात सुंदर दिसू शकता.
8. राणी पिंक (Rani Pink) – गुलाबी एक असा रंग आहे जो प्रत्येक वय आणि स्किन टोनच्या महिलांच्या सौंदर्यात भर टाकायचं काम करतो. जर लाईट पिंक किंवा पेस्टल पिंक शेड (pastel pink shade) चा तुम्हाला कंटाळा आला असेल तर यावेळी राणी कलर ट्राय करून पाहा. विश्वास ठेवा हा रंगही तुमच्यावर खूप छान दिसेल.
9. यलो (Yellow) – फ्रेश लुक (fresh look) साठी पिवळा म्हणजेच यलो कलरला पसंती दिली जाते. उन्हाळा असो वा हिवाळा पिवळ्या रंगाच्या विविध शेड्समधील आऊटफिट्स घालून तुम्ही यंग दिसू शकता. जर तुम्हाला पिवळा रंग जास्त आवडत नसेल तर त्याऐवजी तुम्ही मस्टर्ड कलरचा कुर्ता, साडी, पँट्स, ड्रेस किंवा शर्टही घालू शकता. ओव्हरऑल लुक तुम्ही हलका ठेवून या रंगाचे फुटवेअर किंवा अॅक्सेसरीजही कॅरी करू शकता.
10. सिल्व्हर (Silver) – जर तुम्हाला मॅटेलिक (metallic) किंवा सिल्वर रंगाचा काही प्रोब्लेम नसेल तर तुम्ही कोणत्याही पार्टीला किंवा फंक्शनला जाताना या रंगाचं आउटफिट नक्की घाला. हा शिमरी रंग तुम्हाला सुंदरताही देईल आणि तुमचं वयही लपवेल.
तुमच्या वॉर्डरोबमध्ये नक्की असायला हवेत डेनिमचे ‘हे’ आऊटफिट्स
या पॅटर्न्सची आहे क्रेझ (Patterns To Rule Fashion Industry)
प्रत्येक वर्षी फॅशन ट्रेंड बदलत असतो. पण वय वाढण्याचा अर्थ हा नाही की, तुम्ही फॅशन ट्रेंड्स फॉलो करू शकत नाही. नवीन ट्रेंड्सबद्दल बोलायचं झाल्यास प्रत्येक डिझाईनर आपलं काही ना काही नवीन कलेक्शन मार्केटमध्ये लाँच करतो आणि तेच नवीन ट्रेंड्सच कलेक्शन फॅशन शोज आणि फॅशन मॅगझीनमध्ये तसंच ऑनलाईन शॉपिग वेबसाईट्सवर दिसतं. जे तुमच्या दैनंदिन आयुष्यात तुम्हाला दिसतं. जाणून घ्या या वर्षीच्या ट्रेंडमध्ये असणाऱ्या पॅटर्न्सबाबत
1. जॉमेट्रीक पॅटर्न (Geometri Pattern) – गेल्या काही वर्षांमध्ये जॉमेट्रिक किंवा ग्राफिक (graphic) पॅटर्नने मार्केटमध्ये धूमाकूळ घातला आहे. वेस्टर्न आउटफिट्स (western outfits) बाबत बोलायचं झाल्यास हा ट्रेंडची खूपच चलती आहे. यंदाही वेस्टर्न आउटफिट्समध्ये या ट्रेंडची झलक दिसत आहे. पण पूर्वी एवढा जोर या ट्रेंडमध्ये आता दिसत नाही.
भारतीय किंवा पारंपारिक वेअरबाबत बोलायचं झाल्यास मात्र तुम्ही या एक्सपेरिमेंटला तुम्हाला टाळावं लागेल. जर तुम्हाला यंग लुक हवा असेल तर आपल्या उंचीप्रमाणे या पॅटर्नचे काही ऑप्शन तुमच्याजवळ ठेऊ शकता.
2. अॅनिमल प्रिंट (Animal Print) – दरवर्षीप्रमाणे यंदाही तुम्ही या पॅटर्नचे वेस्टर्न आउटफिट्स आणि अॅक्सेसरीज़ मार्केट तसंच रँपवरही दिसून येतील पण भारतीय पेहरावाबाबत बोलायचं झाल्यास हे प्रिंट जास्त सूट होत नाही. जर तुम्हाला वाईल्ड लुक कॅरी करायचा असल्यास तुम्ही या प्रिंटचे एक ते दोन आऊटफिट्स तुमच्या वॉर्डरोबमध्ये सामील करू शकता.
#FashionInspiration : मिथिला पालकरचा स्टाईलिश अंदाज
ट्रेंडबाबत राहा अप टू डेट (Fashion Trends To Make You Look Younger)
ट्रेंड व्यवस्थित कॅरी करण्यासाठी फॅशनची योग्य ओळख असणं आवश्यक आहे. यासाठी तुम्ही इंटरनेटची मदत घेऊ शकता. इंटरनेटवर तुम्हाला नवीन ट्रेंड्सबाबत माहिती मिळू शकते. वेगवेगळ्या फॅशन मॅगझीन आणि वेबसाईटला तुम्ही आपली मैत्रिण बनवू शकता.
1. कोणतंही आऊटफिट खरेदी करताना हे ठरवा की, यावर तुम्हाला कोणत्या अॅक्सेसरीज घालू शकता किंवा बॅग कॅरी शकता. अनेकवेळा आऊटफिट खरेदी केल्यानंतर तुम्ही यावर कोणत्या अॅक्सेसरीज घालायचा हा प्रश्न पडतो.
ड्रेससोबत तुम्ही मेकअप आणि अॅक्सेसरीजबाबत ही चूझी होणं गरजेचं आहे. कारण योग्य अॅक्सेसरीजनेही तुमचं वय कमी दिसण्यात मदत होते.
2. जीन्ससोबत तुम्ही पेन्सिल हील्स न घालता वेजेस किंवा प्लॅटफॉर्म हील्ससुद्धा कॅरी करू शकता. तर साडीसोबत तुम्ही पेन्सिल हील्स घातल्यास तुमचा लुक एकदम एलिगंट वाटतो.
3. वाढत्या वयात फ्लेयर्सचे स्कर्ट न घालता शक्यतो स्ट्रेट स्कर्ट घाला. तसंच तुमच्या कम्फर्ट लेव्हलप्रमाणे फूटवेअर वापरा. यामुळे तुम्ही अॅक्टीव्ह आणि कॉन्फिडंच दिसाल.
4. आउटफिटसोबतच मेकअपही तुम्हाला यंग लुक देण्यास मदत करतो. ड्रेसला मॅचिंग आयशॅडो किंवा लिपस्टिक लावण्याऐवजी हलक्या रंगाचा नॅचरल दिसणारं आयशॅडो लावावं. लिपस्टीकही सॉफ्ट रंगाची लावा किंवा नुसता लिप ग्लॉसही लावू शकता.
5. सीक्वेंस किंवा चमचमणारे कपडे हे फक्त टीनएज मुलींसाठीच असतात असं काही नाही. या प्रकारचे आउटफिट्स तुम्हालाही फ्रेश आणि युथफूल लुक देऊ शकतात.
6. यंग लुक आणि फीलसाठी ब्लॅक, ब्राउन आणि व्हाईट शेड्सना थोडा आराम द्या. आता वेळ आहे ती ब्राईट कलर्सचं आपल्या आयुष्यात वेलकम करण्याची. तुम्ही हवं असल्यास ब्लॅक आऊटफिटवर कोणत्याही ब्राईट कलरचं जॅकेट किंवा श्रग घालून पेअर करू शकता.
7. प्रत्येक रंगाच्या अनेक शेड्स असतात. तुम्हीही आपल्या आवडत्या रंगाच्या शेड्सना समजून घ्या. ज्या तुमच्या व्यक्तिमत्वाला सूट करतील. अशा रंगांमध्ये तुम्ही कॉन्फिडंटही दिसाल आणि तुमच्या आत्मविश्वासामुळे तुमचं वयही कमी दिसेल.
8. आपल्या आवडत्या शेड्ससोबतच काही परफेक्ट न्यूट्रल्स कलर्सना ही घालंणं आवश्यक आहे. जिथे काही जणी ब्लॅक, ग्रे, चारकोल किंवा व्हाईट कलर्समध्ये खूप सुंदर आणि एलिगेंट दिसतात तर काही जणींवर बेज कलरमध्ये सुंदर दिसतात.
9. प्रत्येक सिझनचा स्वतःचा असा एक रंग असतो. यंग दिसण्यासाठी आणि फॅशन ट्रेंडसोबत मॅच करण्यासाठी हे आवश्यक असतं की, तुम्हाला सिझनल रंग ओळखणं आवश्यक आहे. जिथे उन्हाळ्यात म्यूटेड आणि सॉफ्ट कलर्स चांगले दिसतात. तिथे थंडीमध्ये ब्राईट शेड्स चांगल्या दिसतात.
10. यंग लुकसाठी व्हाईट आणि ब्लू रंगाचं पेअरिंग ही खूप छान दिसतं.
जुन्या साड्यांपासून शिवा ड्रेसचे असे हटके पॅटर्न्स
या फॅशन मिस्टेक्स टाळा (Fashion Mistakes To Avoid To Look Younger)
अनेकदा खूप फॅशनेबल लोकंही आऊटफिट्सबाबत चूका करतात. खरंतर जर तुम्हाला यंग दिसण्याबाबत कोणतीही चूक करायची नसेल तर आम्ही तुमची मदत करण्यासाठी आहोतच. फॅशनच्या या चूका टाळल्यास तुम्हीही बनू शकता फॅशनिस्टा (fashionista).
1. साईज (Size) – कोणताही ड्रेस आवडला आणि घेतला, असं टीनएजमध्ये चालून जातं. आपण आता मात्र असं करणं टाळा. जर तुम्हाला एखादा ड्रेस नीट फिंटीगला आला नाहीतर एखाद्या चांगल्या टेलरकडून फिटींग करून घ्या.
2. ब्रा (Bra) – प्रत्येक आउटफिटवर एकसारखी ब्रा चालत नाही. जर तुम्हाला तुमच्या यंग लुकला कायम ठेवायचं असेल तर तुमचं ब्रा कलेक्शनही वाढवावं लागेल. वेगवेगळ्या रंगातील आणि डिझाईनमधील ब्रा कलेक्शनला तुमच्या वार्डरोबचा भाग बनवा.
3. जीन्स (Jeans) – कट्स किंवा डिझायनर जीन्सऐवजी एखादी सिंपल डेनिम घाला. जर तुम्हाला स्लीम फिट डेनिम घालायची असेल तर स्ट्रेचिंग व्हर्जनची डेनिम घ्या.
4. स्कार्फ (Scarf) – काहींना गळ्यात स्का्र्फ घालून फिरायची सवय असते. पण हे चुकीचं आहे. जर तुम्हाला फ्लाईट अटेंडटऐवजी सफिस्टिकेटेड फॅशनिस्टा दिसायचं असेल तर तुमचा स्कार्फ बॅगला बांधा आणि जेव्हा गरज असेल तेव्हाच वापर करा.
5. अॅक्सेसरीज (Accessory) – जर तुम्हाला असं वाटतं की, ड्रेसच्या कलरला मॅचिंग अॅक्सेसरी घातल्यावर ती कूल दिसेल तर ती तुमची चूक आहे. आजकाला मिक्स अँड मॅचचा जमाना आहे.
‘एज इज जस्ट अ नंबर’, ही फक्त एक फ्रेज (phrase) नसून सत्यपरिस्थिती आहे. तुमचं वय हे तुमच्या विचारांप्रमाणे आणि व्यवहाराने वाढतं किंवा कमी होतं. जर तुमची ईच्छा असेल तुम्हीही एव्हरग्रीन फॅशनेबल दिसू शकता. ट्रेंड फॉलो करायचे असतील तर एक्सपेरिमेंट करायला घाबरू नका. तुमचा कॉन्फिडंस तुमच्या चेहऱ्यावर दिसायला हवा आणि मग बघा तुम्हीही फॅशनच्या बाबतीत यंगस्टर्सना टक्कर देऊ शकता.
Images & Inputs Credits : लाइमरोड (Limeroad)/ डब्ल्यू (Wishful by W)
हेही वाचा –