ADVERTISEMENT
home / आरोग्य
surrogacy

जोडप्याने सरोगसीचा पर्याय नक्की कधी वापरावा, जाणून घ्या

सरोगसी लोकप्रिय होत आहे कारण अंबर हर्ड, निकोल किडमन, एल्टन जॉन सारखे हॉलिवूड सेलिब्रिटीसह शाहरुख खान (Shah Rukh Khan), आमिर खान (Amir Khan), शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty Kundra), करण जोहर (Karan Johar), एकता कपूर (Ekta Kapoor) सारखे बॉलिवूड सेलिब्रिटी सरोगसी (Surrogacy) उपचाराने पालक झाले आहेत. पण हा पर्याय नक्की काय आहे आणि याचा कधी वापर केला गेला पाहिजे याबाबत आम्ही अधिक माहिती घेतली डॉ माधुरी रॉय, स्त्रीरोग आणि वंधत्व निवारण तज्ज्ञ, कन्सिव्ह आयव्हीएफ, पुणे यांच्याकडून. 

जोडप्याने सरोगसीसाठी कधी जावे? (Who can apply for surrogacy)

जेव्हा काही वैद्यकीय कारणांमुळे नैसर्गीकरित्या गर्भधारणेस अडचणी येत असतील तेव्हा जोडप्याने सरोगसी सारख्या पर्यायाचा आधार घेण्यास हरकत नाही. काही वैद्यकिय कारणांमुळे जोडप्यांना गर्भधारणा होऊ शकत नाही, आई-बाबा होण्याचे स्वप्न पूर्ण करता न येऊ शकणा-या जोडप्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते अशावेळी आई-बाबा होण्याच्या आनंदापासून वंचित न राहता सरोगसी सारखा पर्याय जोडप्यांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करू शकतो.

कोणत्या वैद्यकिय अडचणी तुम्हाला नैसर्गीकरित्या गर्भधारणेत अडथळे निर्माण करतात?

–         गर्भाशयाची अनुपस्थिती

ADVERTISEMENT

–         जीवाला धोका निर्माण करणारी आरोग्याची स्थिती

–         अंडी किंवा शुक्राणूंची अनुपस्थिती

–         मागील गर्भधारणेदरम्यान प्रीक्लेम्पसिया, आघात

मेयर रोकिटांस्की कस्टर हाऊसर (एमआरकेएच) हा दुर्मिळ जन्मजात सिंड्रोम आहे ज्यामुळे गर्भाशय तसेच योनीवर त्याचा विपरित परिणाम होतो. अविकसित किंवा अनुपस्थित परिणाम होतो, अशा स्त्रिया युटेरीन फॅक्टर इनफर्टीलिटी (युएफआय) ग्रस्त असतात. जे जगभरातील 5%महिलांच्या प्रजनन क्षमतेवर प्रभावी राहते.अशी स्त्री गर्भवती होऊ शकत नाही. गर्भाशयाच्या कर्करोगासारख्या काही वैद्यकीय परिस्थितींमध्ये गर्भाशय काढण्याची वेळ येऊ शकते.

ADVERTISEMENT

अधिक वाचा – गर्भधारणेदरम्यान सुरुवातीच्या काळातच पोटात कळा येण्याची कारणे, तज्ज्ञांचे मत

जीवाला धोका निर्माण करणारी परिस्थिती

pregnancy

हृदयविकाराचा झटका, अर्धांगवायू, कर्करोग, मूत्रपिंड निकामी होणे यासारख्या जीवघेण्या आजारांनी ग्रस्त असलेल्या जोडप्याला औषधांची आवश्यकता असते. ज्यामुळे शुक्राणू/अंडी प्रभावित होतात जे त्यांच्या गर्भधारणेच्या नैसर्गिक क्षमतेला प्रतिबंध करते. अभिनेत्री लिसा रे (Lisa Ray) हिला रक्ताचा कर्करोग होता आणि बरे झाल्यानंतर तिला सरोगसीद्वारे जुळी मूलं झाली. काही स्त्रियांना पीसीओडी, फायब्रॉइड किंवा गर्भाशयाला जखम होणे,गर्भपात झाल्यामुळे गर्भधारणा टिकवून ठेवू देत नाही. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला ऑटो इम्यून डिसीज एपीएलएमुळे अनेक गर्भपात झाले आणि म्हणून दुसऱ्या मुलासाठी सरोगसीचा पर्याय निवडला होता.

अधिक वाचा – प्रेगनन्सी टेस्ट किटबाबत माहिती मराठी (Information About Pregnancy Test Kit In Marathi)

जोडप्यांमध्ये अंडी किंवा शुक्राणूंची अनुपस्थिती

जीवनशैली किंवा जैविक घटकांमुळे, जोडप्यामध्ये शुक्राणूंची किंवा अंड्यांची गुणवत्ता कमी होऊ शकते जी त्यांना वर्षभर प्रयत्न करूनही नैसर्गिकरित्या गर्भधारणा होऊ शकत नाहीअशा स्थितीला वंध्यत्व म्हणतात. सुमारे 10-15% जोडप्यांना वंध्यत्वाचा त्रास होतो. गर्भधारणेदरम्यान प्रीक्लेम्पसिया ही उच्च रक्तदाबामुळे होणारी गुंतागुंत असून ती एक वैद्यकीय आणीबाणी आहे ज्यामुळे मेंदू, यकृत, किडनीला इजा होऊ शकते. वेळीच उपचार न केल्यास आई आणि मुलाचा मृत्यू होऊ शकतो. अशा महिलांनी स्वतःची काळजी घेण्यास प्रथम प्राधान्य देणे गरजेचे आहे. ज्या स्त्रिया भूतकाळातील काही आघात आणि गुंतागुंतीच्या परिस्थितीतून जात आहेत त्या सरोगसीची निवड करू शकतात.

ADVERTISEMENT

सरोगसी म्हणजे काय? (What is Surrogacy)

सरोगसी ही अशी व्यवस्था आहे जिथे सरोगेट मदर ही दुस-या जोडप्याच्या मुलाला जन्म देण्यास आणि बाळगण्यास,बाळाच्या जन्मानंतर बाळाच्या पालकत्वास सहमती देते. सरोगसी आयव्हीएफ नावाच्या सहाय्यक पुनरुत्पादन तंत्राद्वारे तृतीय पक्षाच्या मदतीने कुटुंब वाढण्यास मदत करते.

अधिक वाचा – तुम्हालाही गर्भधारणेत अडचणी येत आहेत, मग या गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष द्या

सरोगसी असतानाही चमत्कारिक बाळ कसे जन्माला आले?

सरोगसीचा प्रकार सरोगेट आई आणि बाळ यांच्यातील अनुवांशिक संबंधावर अवलंबून असतो. जेव्हा सरोगेट आईची अंडी गर्भधारणेसाठी वापरली जातात, तेव्हा त्याला पारंपरिक सरोगसी म्हणतात ज्यावर भारतात बंदी आहे.

जेव्हा सरोगेट आई तिची अंडी वापरत नाही आणि फक्त बाळ बाळगते तेव्हा त्याला जेस्टेशनल सरोगसी म्हणतात ज्यामध्ये आयव्हीएफ प्रक्रिया असली तरी गर्भ तयार करण्यासाठी अंडी आणि/किंवा जैविक पालकांच्या शुक्राणूंचा वापर केला जातो, नंतर गर्भ सरोगेट आईच्या गर्भाशयात ठेवला जातो. भारतात फक्त जेस्टेशनल सरोगसीला परवानगी आहे.

ADVERTISEMENT

भारतातील कायदा काय सांगतो? (What does law say about surrogacy)

केंद्रीय मंत्रिमंडळाने सरोगसी विधेयकाला 2020 मध्ये मंजुरी दिली ज्याने सरोगसीला कायदेशीर मान्यता दिली. या विधेयकामुळे विधवा आणि घटस्फोटीत महिलांना वंध्यत्वाने ग्रस्त जोडप्यांना फायदा होईल. देशात फक्त भारतीय जोडप्यांनाच सरोगसीची परवानगी आहे. सरोगेट मदर विमा अंतर्गत 36 महिन्यांसाठी संरक्षित आहे.

आव्हाने कोणती?

सरोगसीचा वापर करून तृतीय-पक्षाच्या पुनरुत्पादनाची संभाव्य आव्हाने शारीरिक पेक्षा अधिक मानसिक आहेत. प्रक्रिया सुलभतेने हाताळण्यासाठी मानसशास्त्रीय समुपदेशन घेणे उचित आहे. जर तुमच्याकडे प्रतिबंधात्मक वैद्यकीय परिस्थिती असेल आणि तरीही तुमचे कुटुंब नियोजनाचे स्वप्न असेल तर आपण सरोगसी वापरू शकता.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

17 Aug 2021
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT