ADVERTISEMENT
home / सौंदर्य
घरगुती फ्रूट फेसपॅक वापरून आणा त्वचेवर ग्लो

घरगुती फ्रूट फेसपॅक वापरून आणा त्वचेवर ग्लो

सुंदर त्वचा असणं हे प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं. त्यासाठी मुली काहीही करायला तयार असतात. मग अगदी तासनतास पार्लरमध्ये वेळ घालवणं असो वा महाग ब्युटी प्रॉडक्ट्स विकत घेणं असो. चांगली त्वचा मिळवण्यासाठी आपण मुली काय काय नाही करत. हो ना? पण जेव्हा आपण काही उत्पादनं खरेदी करत असतो तेव्हा हे नक्की लक्षात ठेवतो की, त्यामध्ये कोणत्या गोष्टी वापरल्या गेल्या आहेत. उत्पादन जर फळांनी बनलेलं असेल तर नक्कीच उत्कृष्ट. त्यामुळे आपण पटकन फळांनी बनलेलं असं उत्पादन विकत घेतो. मग अगदी फेसवॉश असो वा फेशियल किट. आपण आपल्या आवडीच्या फ्रूट्सचे उत्पादन लगेच खरेदी करतो. पण आपण कितीही चांगल्या ब्रँडच्या या वस्तू विकत घेतल्या तरीही त्यामध्ये केमिकल मिसळलेलं असतंच. कितीही नाही म्हटलं की एका विशिष्ट वेळेनंतर केमिकल आपल्या त्वचेला नुकसान करतंच. त्यामुळे तुम्ही घरच्याघरीच फळांपासून स्वतःचं फेसपॅक तयार करू शकता. जे केमिकलयुक्त नसेल आणि पूर्णतः नैसर्गिक आणि सुरक्षितही असेल. आम्ही तुमच्या सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी नक्की काय करायला हवं याची माहिती देणार आहोत.

चमकदार त्वचेसाठी वापरा हे फ्रूट फेसपॅक – Fruit Face Pack For Glowing Skin In Marathi
इथे आम्ही तुम्हाला फळांपासून तयार करता येणारे असे खास फेसपॅक सांगणार आहोत. हे तुम्ही अगदी सहजपणे आपल्या घरामध्ये तयार करू शकता आणि यामुळे तुम्हाला चमकदार आणि सुंदर त्वचा नक्कीच मिळेल.

फेसपॅक म्हणजे नेमकं काय?

Fruit Face Pack 2
घरी बनवण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या फेसपॅकबद्दल आम्ही तुम्हाला सांगण्यापूर्वी आपण हे जाणून घेऊया की, फेसपॅक म्हणजे नेमकं काय असतं? फेसपॅक त्वचेच्या आत जाऊन त्वचेला मॉईस्चराईज करतं. तसंच त्वचेसंबंधी कोणतीही समस्या दूर करून त्वचेला निरोगी, सुंदर आणि चमकदार बनवतं. त्यामुळेच आपल्या त्वचेसाठी नक्की कोणते फेशियल चांगले आहेत याची माहिती बऱ्याच मुलींना हवी असते. आपण अनेक तऱ्हेचे फळांचे घरगुती फेसपॅक बनवू शकतो जे आपल्याला आवश्यक असणाऱ्या फेशियलची गरज पूर्ण करतात. हे फक्त त्वचेमध्ये चांगला ताजेपणाच आणत नाहीत तर केमिकलविरहित असल्यामुळे त्वचेचं पोषणही करतात. याचं वैशिष्ट्य असं की, तुम्हाला जास्त पैसे आणि वेळ दोन्ही खर्च करावा लागत नाही. कमी वेळात अतिशय फायदेशीर आणि तुमची त्वचा अधिक चांगलं करण्याचं काम हे फ्रेश फ्रूटपॅक करत असतात. कसं ते आता जाणून घेऊया.

ADVERTISEMENT

वाचा – त्वचा, केस आणि बऱ्याच रोगांवर गुणकारी मोहरीच्या बिया

त्वचेसाठी का गरजेचा आहे फेसपॅक – Why Fruit Face Pack is Important For Skin
फेसपॅक त्वचेच्या आत जाऊन त्वचा चांगली बनवतो. हे लावल्यामुळे त्वचेतील ब्लड सर्क्युलेशन वाढतं. त्यामुळे त्वचा जास्त तजेलदार होते. फेसपॅक त्वचेतील असलेली घाण, धूळ, माती आणि तेल काढण्यासाठी मदत करतं. त्यामुळे आपली खराब झालेली आणि अगदी ढेपाळलेली त्वचा पुन्हा एकदा फेसपॅकमुळे ताजी होते. घरगुती फेसपॅकमध्ये मिळणारी पोषक तत्व हे तुमच्या त्वचेला निरोगी राखण्यासाठी मदत करते तर त्यातील फळांचे गुण हे तुमच्या त्वचेची काळजी घेतात. याशिवाय बऱ्याच फळांमध्ये विटामिन सी चे अँटीऑक्सीडेंट गुण सापडतात. यामुळे त्वचेवर येणारे काळे डाग, वाढत्या वयाचे निशाण आणि चेहऱ्यावर येणाऱ्या पुटकुळ्यादेखील दूर होतात. तर काळी फळांमध्ये असणाऱ्या अल्फा हायड्रॉक्सी अॅसिड, सायट्रिक अॅसिड आणि विटामिन्ससारखे तत्व असतात, जे त्वचेला कोरडी होण्यापासून वाचवतात.

घरगुती फेसपॅकचे फायदे – Benefits of Homemade Fruit Face Pack
मेकअप तुमचं सौंदर्य दाखवण्यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका बजावत असतो. पण प्रत्येकवेळी तुम्ही मेकअपमध्ये राहू शकत नाही. मेकअपपेक्षा जास्त तुमचं नैसर्गिक सौंदर्य जास्त महत्त्वाचं आहे आणि त्वचेला नैसर्गिकरित्या सुंदरता देण्यासाठी फळांनी बनलेले फेसपॅक हा सर्वोत्कृष्ट उपाय आहे. घरी बनवलेले फेसपॅक हे तुमच्या त्वचेला एक नैसर्गिक चमक देण्यासाठी मदत करतात. आम्ही तुम्हाला इथे घरगुती फ्रूट फेस पॅकचे बरेच फायदे सांगणार आहोत.

इन्स्टंट ग्लो (लगेच येणारा चमकदारपणा)
फ्रूट फेस पॅक हा तुमच्या त्वचेला लगेचच फायदा मिळवून देतो. याचा वापर केल्यानंतर तुम्ही स्वतः तुमच्या त्वचेमध्ये ताजेपणा आणि इन्स्टंट ग्लो अर्थात लगेच येणारा चमकदारपणा अनुभवू शकता. यामुळे तुमच्या त्वचेचं केवळ पोषणच होतं असं नाही तर तुमची त्वचा अतिशय रिलॅक्सदेखील होते.

ADVERTISEMENT

नैसर्गिक गुणांनी पुरेपूर
चमकदार त्वचा मिळवण्यासाठी घरी बनवण्यात आलेले फळांचे फेसपॅक संपूर्णतः नैसर्गिक आहेत. यामध्ये कोणत्याही तऱ्हेचं केमिकल वापरलेलं नाही. त्यामुळे तुमच्या त्वचेला अगदी नैसर्गिक पोषण मिळतं.

बनवण्यासाठी सोपं
तुम्ही जर विचार करत असाल की, घरी फ्रूट फेसपॅक बनवणं हे गुंतागुंतीचं काम आहे. तर आम्ही तुम्हाला सांगतो असं काहीही नाही. या फेसपॅकचं सर्वात मोठं वैशिष्ट्य असं की, हे बनवणं अतिशय सोपं आहे. हे बनवण्यासाठी लागणारं साहित्य हे तुम्हाला तुमच्या घरातच सापडतं. त्यामुळे हे खर्चिकही नाही आणि मिनिटांमध्ये तयार होतं.

वाचा – अनावश्यक केस काढून आणा चेहऱ्यावर Natural Glow!

डागांपासून होते सुटका
फळांपासून बनलेले फेसपॅक तुमच्या त्वचेची योग्य काळजी घेतात. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील डागांपासूनही तुमची सुटका होते. त्याशिवाय त्वचेतून निघणारं तेल कमी करून चेहऱ्यावर येणाऱ्या पुटकुळ्या कमी करायलादेखील मदत होते. त्वचेची नियमित काळजी घेण्यासह हे फेसपॅक त्वचेला मॉईस्चराईज ठेवण्यासाठी मदत करतात.

ADVERTISEMENT

घरी कसे बनवता येतील फ्रूट फेसपॅक – How To Make Fruit Face Pack at Home
पपई आणि मधाचा फेसपॅक

Fruit Face Pack 3
पपई हे असं फळ आहे जे वर्षभर बाजारामध्ये मिळतं. बऱ्याच लोकांना पपई नुसती खायला आवडत नाही. मात्र पपई त्वचेसाठी अतिशय फायदेशीर असते. पपईपासून बनवलेलं फेसपॅक त्वचेवर लगेच काम करतं आणि त्वचा अतिशय चमकदार बनवतं. विटामिन ए ने युक्त असणाऱ्या पपईमधये एक्सफॉलिएटिंग गुण असतात जे त्वचेतून डेडड स्किन सेल्स काढून टाकतात. यामध्ये अँटीएजिंग गुणदेखील असतात ज्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या आणि डाग राहत नाहीत.

हा फेसपॅक बनवण्यासाठी सर्वात पहिले पपईचे दोन तुकडे घेऊन ते मिक्सरमधून वाटून घ्या. या पल्प तयार झाल्यानंतर यामध्ये एक चमचा मध घाला. आता हे मिश्रण तुम्ही तुमच्या साफ आणि कोरड्या त्वचेवर लाऊन साधारणतः 15 ते 20 मिनिटं तसंच ठेऊन द्या. आता पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुवा. थोड्या वेळ्यानंतर तुम्हाला स्वतःलाच तुमच्या त्वचेमधील बदल आणि चमकदारपणा जाणवेल. हा फेसपॅक नॉर्मल त्वचेपासून ते कोरड्या त्वचेपर्यंत सर्वांसाठी आहे. चांगल्या परिणामासाठी तुम्ही हा प्रयोग आठवड्यातून एक दिवस करू शकता.

किवी आणि अवोकाडो फेसपॅक
किवी आणि अवोकाडो ही दोन्ही फळं स्वादिष्ट तर आहेतच पण यामध्ये पोषणतत्व जास्त प्रमाणात असतात. फक्त खाण्यासाठीच नाही तर याचा फेसपॅकदेखील त्वचेला फायदेशीर ठरतो. अवोकाडोमध्ये अँटीऑक्सीडंट भरपूर प्रमाणात असतं. तसंच यामध्ये अल्फा आणि बीटा कॅरेटीनदेखील असतं, जे त्वचेला निरोगी बनवण्यासह वेळेपूर्वी होणाऱ्या एजिंगची निशाणी दूर करण्यासाठीदेखील मदत करतं. तर किवीमध्ये विटामिन सी आणि ई चं प्रमाण भरपूर असतं. विटामिन ई त्वचेतील सेल्सचा मॉईस्चराईज करून त्यामध्ये नवा प्राण आणतात. किवी त्वचेचा रंग उजळवण्याबरोबरच त्वचा एक्सफोलिएट करण्यासाठीदेखील उपयुक्त आहे.

ADVERTISEMENT

याचा फेसपॅक बनवण्यासाठी तुम्हाला 1 किवी, 1 अवोकाडो आणि 1 चमचा मध हवा. सर्वात पहिले किवी आणि अवोकाडो एकत्र करून मिक्सरमधून मॅश करून घ्या. त्यानंतर ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर आणि मानेच्या त्वचेवर लाऊन अर्धा तासासाठी ठेऊन द्या. त्यानंतर पाण्याने स्वच्छ चेहरा धुऊन घ्या. चेहरा साफ केल्यानंतर मॉईस्चराईजर लावायला विसरू नका. हे फेसपॅक सर्व तऱ्हेच्या त्वचेसाठी लागू आहे. चांगल्या परिणामांसाठी तुम्ही आठवड्यातून एकदा हे फेसपॅक नक्की लावा.

संत्र

Orange

संत्र्याचा रस असो वा संत्र्याची सालं दोन्हीही फायदेशीर आहेत. संत्र्यामध्ये विटामिन सी बरोबरच बऱ्याच तऱ्हेची पोषक तत्व असतात. संत्र्याच्या घरगुती फेसपॅकमुळे चेहऱ्यावरील पुटकुळ्या आणि डाग कमी होतील.

संत्र्याचा फेस पॅक बनवण्यासाठी तुम्हाला दोन चमचे अलोव्हेरा जेल अर्थात कोरफडीच्या जेलमध्ये एक चमचा संत्र्याचा रस मिक्स करायचा आहे. हे फेसपॅक तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर 10 मिनिटं लाऊन ठेवा आणि मग कोमट पाण्याने चेहरा साफ करून घ्या. त्यानंतर चेहऱ्याला साफ करून मॉईस्चराईजर लावा. हे पॅक आठवड्यातून एक वेळा नक्की लावा त्यामुळे तुम्हाला कोरड्या त्वचेपासून सुटका मिळेल आणि तुमच्या चेहऱ्यावर चमक दिसू लागेल.

ADVERTISEMENT

वाचा – लग्नाचा सीझन आला, नैसर्गिक पद्धतीने आणा चेहऱ्यावर *ग्लो*

केळं
केळ्यामध्ये फायबर, विटामिन ए, बी, (बी6, बी12), सी, ई आणि लोह, पोटॅशियम, मँगनीज आणि जिंक असे अनेक मिनरल्स असतात. हे आरोग्याबरोबरच सौंदर्यही जपतात. याचा फेसपॅक चेहऱ्यावर लावल्याने तुमच्या चेहऱ्याचा तजेलदारपणा अधिक वाढतो.

याचा फेसपॅक बनवण्यासाठी 1 केळं मिक्सरमधून मॅश करून घ्या. याच्या पेस्टमध्ये मध आणि लिंबाचा रस घालून मिक्स करून घ्या. तयार फेसपॅक तुमच्या चेहऱ्याला आणि मानेला लावा आणि साधारणतः 15-25 मिनिटं ठेऊन दिल्यानंतर चेहरा पाण्याने धुऊन टाका. चांगल्या परिणामासाठी आठवड्यातून दोन वेळा तुम्ही हा प्रयोग करू शकता.

स्ट्राॅबेरी आणि चाॅकलेट फेसपॅक
स्ट्राॅबेरी आणि चाॅकलेट फेसपॅक तुमच्या त्वचेसाठी एका ट्रीटपेक्षा नक्कीच कमी नाही. चॉकलेट आणि स्ट्रॉबेरीचं कॉम्बिनेशन अर्थात एक चमत्कारच आहे. स्ट्रॉबेरीमध्ये आवश्यक विटामिन आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतं. यामधील अल्फा – हायड्रॉक्सी अॅसिड त्वचेला साफ ठेवतं आणि डेडस्किन सेल्स काढून टाकण्यासाठी मदत करतं.

ADVERTISEMENT

याचं फेसपॅक बनवण्यासाठी तुम्हाला गरज आहे ती, 4 स्ट्राॅबेरीज, 1 चमचा कोको पावडर आणि 1 चमचा मधाची. आता स्ट्रॉबेरी मिक्सरमधून वाटून त्याची पेस्ट तयार करा. त्यामध्ये कोको पावडर आणि मध मिक्स करून हा फेस पॅक साधारण 15 मिनिट्स चेहऱ्याला लावा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. हा उपाय तुम्ही आठवड्यातून एक वेळा केलात तर तुम्हाला चांगला परिणाम दिसून येईल.

कलिंगडाचा फेसपॅक

Watermelon
उन्हाळ्यात मिळणारं हे फळ खाण्यासाठी जितकं स्वादिष्ट आहे तितकंच त्वचेसाठीदेखील फायदेशीर आहे. याचा रस कोरड्या त्वचेसाठी उत्कृष्ट असतो. यामुळे चेहऱ्यावर तजेलदारपणा आणि चमकदारपणा येतो.

याचं फेसपॅक बनवण्यासाठी 2 चमचे कलिंगडाचा रस, 2 चमचे काकडीचा रस, 1 चमचा घट्ट दही, 1 चमचा मिल्क पावडर आणि एक साफ छोटी वाटी हवी. सर्वात पहिले कलिंगड आणि काकडीचा रस एका वाटीत एकत्र करून घ्या. आता यामध्ये दही आणि मिल्क पावडर घाला. हे सगळं मिक्स करून घट्ट पेस्ट तयार करून घ्या. आता ही पेस्ट चेहरा आणि मानेला लाऊन साधारण 15 मिनिटं ठेवा आणि मग थंड पाण्याने धुऊन टाका.

ADVERTISEMENT

द्राक्ष आणि सफरचंद फेसपॅक
द्राक्ष आणि सफरचंद ही दोन्ही अशी फळं आहेत जी सर्वांना आवडतात. केवळ माणसांनाच नाही तर माणसाच्या त्वचेलाही आवडणारी ही फळं आहेत. सफरचंदामध्ये विटामिन सी बरोबरच कॉपरही असतं जे त्वचेला निरोगी बनवतं. तर त्वचेला चमकदार होण्यासाठीही मदत करतं.  द्राक्षामध्ये विटामिन ई असतं जे तुमच्या त्वचेला मॉईस्चराईज ठेवतं आणि तुमच्या त्वचेला डाग आणि पुटकुळ्यांपासून लांब ठेवतं.

हे फेसपॅक बनवण्यासाठी द्राक्ष आणि सफरचंद मिक्सरमधून वाटून घ्या. त्यामध्ये एक चमचा मध घालून ते तुमच्या चेहऱ्याला साधारणतः दहा मिनिटं लाऊन ठेवा आणि मग थंड पाण्याने धुऊन टाका. चांगल्या परिणामासाठी तुम्ही हा प्रयोग आठवड्यातून एकदा करू शकता.

Also Read Homemade Face Pack In Marathi

आंब्याचा फेसपॅक

ADVERTISEMENT

mango
फळांचा राजा असलेल्या आंब्या स्वाद जितका अप्रतिम असतो तितकाच त्याचा त्वचेवरील प्रभावदेखील चांगला असतो. यामध्ये त्वचेला हायड्रेट करण्यचे गुण आहेत. आंबा कोरड्या त्वचेला मऊ आणि चमकदार बनवतो.

याचा फेसपॅक बनवण्यासाठी तुम्हाला एक मध्यम आकाराचा पिकलेला आंबा, 10 बदामाची पावडर, 2 चमचे मुल्तानी मिट्टी, 2 चमचे कच्चं दूध, 2 चमचे पाणी आणि 2 चमचे ओटमील इतकं साहित्य लागतं. सर्वात पहिले तुम्ही आंबा मिक्सरमधून वाटून घ्या. त्यामध्ये बाकी साहित्य अर्थात बदाम पावडर, मुल्तानी मिट्टी, कच्चं दूध, ओटमील आणि पाणी घाला. आता हे सर्व एकत्र करून घट्ट फेसपॅक करून घ्या. हे फेसपॅक तुम्ही चेहऱ्यावर अर्धा तासा लावा आणि मग थंड कच्च्या दुधाने चेहरा धुवा.

टॉमेटो आणि लिंबाचा फेसपॅक
टॉमेटो त्वचेचं टॅनिंग आणि कोरडेपणापासून सुटका मिळवून देतो. तर लिंबू तुमची त्वचा अधिक चमकदार बनवतं. दोन्ही एकत्र करून होणारा फेसपॅक त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहे.

याचा फेसपॅक बनवण्यासाठी 1 टॉमेटोची मिक्सरमधून प्युरी करून घ्या. त्यामध्ये 2 मोठे चमचे लिंबाचा रस घाला. दोन्ही व्यवस्थित मिक्स करून हा फेसपॅक चेहरा आणि मानेवर लावा आणि मग साधारण 20 मिनिटं लाऊन ठेवा. त्यानंतर पाण्याने चेहरा धुऊन घ्या. तुम्हाला चांगला परिणाम नक्कीच दिसेल.

ADVERTISEMENT

काकडीचा फेसपॅक
काकडीमध्ये रस जास्त प्रमाणात असतो. हा रस त्वचेसाठी मॉईस्चराईजरचं काम करतो. यामध्ये कोरफडीची जेल घातल्यास याचा जास्त प्रमाणात फायदा होतो.

याचं फेसपॅक बनवण्यासाठी तुम्हाला कमीत कमी एक कप काकडीचा रस त्यामध्ये दोन चमचे कोरफड जेल इतकं लागतं. सर्वात पहिले काकडीचे तुकडे मिक्सरमधून काढून त्याचा रस तयार करा. आता हे चाळतीतून गाळून एका वाटीत त्याचा रस काढा. त्यामध्ये कोरफडीची जेल घालून मिक्स करा. हा फेसपॅक 15 मिनिट्स त्वचेला लाऊन ठेवा सुकल्यावर चेहरा पाण्याने धुऊन घ्या.

फोटो सौजन्य –  Shutter Stock

तुम्हाला कदाचित ही गोष्ट आवडेल:

ADVERTISEMENT

Home Remedies & How To Use Makeup To Hide Pimples In Marathi

बदाम तेलाचे गुण आणि त्वचेसाठी बदामाच्या तेलाचे फायदे

Oily Skin Care Tips In Marathi At Home

10 Mar 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT