ADVERTISEMENT
home / आरोग्य
Harmful effects of eating junk food during pregnancy

यासाठी गरोदरपणी खाऊ नये जंक फूड

गरोदरपण हा महिलांच्या आयुष्यातील एक नाजूक आणि सुखद काळ असतो. या काळात त्या स्ज्ञीचं सर्व लक्ष फक्त बाळाच्या वाढ आणि विकासावर असतं. सहाजिकच तिला या काळात शारीरिक आणि मानसिक बदलांना सामोरं जावं लागतं. तुम्ही गरोदरपणापूर्वी तुमच्या आवडीचे कोणतेही पदार्थ खाऊ शकता. मात्र गरोदरपणी मात्र तुम्हाला थोडं सावधपणे आहारात बदल करावे लागतात. जरी तुम्हाला बर्गर, पिझ्झा, फ्राईजसारखे जंक फूड खूप आवडत असेल तरी  या काळात तुम्ही हे पदार्थ जाणिवपूर्वक खाणं टाळलं पाहिजे. यासाठीच जाणून घ्या गरोदरपणी असे पदार्थ खाऊ नयेत याची काही कारणे

गरोदरपणी जंक फूड का खाऊ नये

प्रेगनन्सीमध्ये महिलेच्या शरीराला नेहमीपेक्षा अधिक पोषणाची गरज असते. कारण बाळाची वाढ आणि विकास तिच्या पोटात होत असतो. सहाजिकच ती जे खाते त्यातून बाळाचे पोषण होत असते. यासाठी जाणून घ्या अशा स्थितीत जंकफूड टाळणे का गरजेचे आहे. याशिवाय गरोदरपणात करायलाच हव्या या टेस्ट (Essential Tests During Pregnancy)

जेस्टेशनल डायबिटीज होण्याची शक्यता

गरोदर महिलांना गरोदरपणाच्या  काळात मधुमेह होण्याचा धोका असतो. या मधुमेहाला जेस्टेशनल मधुमेह असे म्हणतात. हा मधुमेह फक्त गरोदरपणात असतो नंतर कमी होतो. मात्र त्यामुळे बाळाची वाढ आणि बाळंतपणात समस्या निर्माण होऊ शकतात. जंकफूडमधील अतिरिक्त कॅलरिज  आणि साखरेमुळे गर्भवती महिलांचे वजन वाढून त्यांच्या समस्या अधिक वाढण्याची शक्यता असते. यासाठी या काळात जंकफूड खाणे योग्य नाही.

अॅलर्जी होण्याचा धोका

गर्भावस्थेत बाळाची वाढ आणि विकास योग्य पद्धतीने नाही झाला तर बाळाच्या मेंदूवर परिणाम होऊ शकतो. शिवाय जंक फूड खाण्यामुळे एखादी अॅलर्जी झाली तर ती पटकन पसरण्याची शक्यता वाढते. अशा बाळाला जन्मानंतर अस्थमा अथवा इतर समस्या होऊ शकतात. यासाठीच याकाळात भावी मातेने जंक फूड खाऊ नये. 

ADVERTISEMENT

रक्तदाबावर परिणाम

गरोदरपण आणि बाळंतपणात महिलांच्या रक्तदाबावर परिणाम झाला तर समस्या अधिक वाढतात. यासाठी  या काळात रक्तदाब नियंत्रित ठेवणं गरजेचं असतं. मात्र अती प्रमाणात जंकफूडचे सेवन केल्यास महिलांचा रक्तदाब वाढण्याची शक्यता असते.अशा वेळी महिलांना छातीत दुखणे, ह्रदयाच्या समस्या होऊ शकतात. जे बाळासाठी मुळीच योग्य नाही. 

वजन अनियंत्रित होते

जंकफूडमध्ये  फॅटचे प्रमाण अधिक असते. अती जंकफूड खाण्याऱ्या लोकांचे वजन नियंत्रणात ठेवणे शक्य नसते. मात्र गर्भावस्थेत असे वजन वाढले तर त्याचा परिणाम बाळाच्या वाढ आणि विकासावर होतो. मुळातच या काळात बाळामुळे त्यांचे वजन वाढलेले  असते. अती वजन वाढल्यास बाळंतपण त्रासदाययक होऊ शकते. गरोदरपणात चालण्याचे फायदे तुम्हाला माहीत आहेत का

बाळाच्या विकासावर होतो परिणाम

जंक फूडमधून मातेच्या शरीराला कोणतेही पोषक घटक मिळत नाहीत. ज्यामुळे बाळाचा मेंदू, ह्रदय, फुफ्फुसे, हाडे यांचा विकास नीट होत नाही. त्याचप्रमाणे बाळ जन्मापासूनच अधु, अशक्त होण्याचा  धोका यामुळे वाढतो. यासाठी महिलांनी या काळात जंकफूड खाणे विचारपूर्वक टाळावे. गरोदर महिलांनी नारळपाणी पिणे सुरक्षित आहे का

06 Sep 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT