ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
Dalchini Benefits In Marathi

दालचिनी खाण्याचे फायदे जाणून घ्या (Dalchini Benefits In Marathi)

पुलाव, बिर्याणी आणि चिकनमध्ये दालचिनीचा एक तुकडाही कमाल करुन जातो. दालचिनीचे फायदे मराठी (dalchini che fayde in marathi) खाद्यजगतात अनेक आहेत. दालचिनीची तिखट – गोड चव पदार्थांमध्ये उतरल्यानंतर पदार्थ अधिक रुचकर लागतो. दालिचिनी ही मुख्यत: श्रीलंका आणि भारतातील केरळ भागात अधिक पाहायला मिळते. दालचीन हे सदाहरित वृक्षात मोडते. त्याच्या खोडाच्या सालीला दालचिनी असे म्हणतात. याच वृक्षाच्या वाळलेल्या पानांचा वापर तमालपत्र म्हणून केला जाते. हे दोन्ही मसाल्याचे पदार्थ असून याचा वापर फार पूर्वीपासून स्वयंपाकात केला जातो. पण जेवणाव्यतिरिक्तही दालचिनी चे फायदे भरपूर आहेत. तुम्हालाही दालचिनीचे फायदे जाणून घ्यायचे असतील तर मग हा लेख पूर्ण वाचा कारण दालचिनी चे फायदे (dalchini che fayde in marathi) तुम्ही कदाचित कधीही वाचले नसतील.

Table Of Content:

1. आरोग्यासाठी दालचिनी खाण्याचे फायदे (Health Benefits Of Dalchini In Marathi)

2. दालचिनीत असणारे मुख्य घटक (Ingredients in Cinnamon in Marathi)

3. सौंदर्यासाठी दालचिनी चे फायदे (Dalchini Benefits In Marathi For Beauty)

ADVERTISEMENT

4. FAQ’s

आरोग्यासाठी दालचिनी खाण्याचे फायदे (Health Benefits Of Dalchini In Marathi)

वेगवेगळ्या चमचमीत पदार्थाच्या माध्यमातून दालचिनी आपल्या पोटात जात असते. पण ही दालचीन नुसतीच पदार्थाची चव वाढवत नाही तर ते आरोग्यासाठीही वरदान आहेत. अनेक आजारांवर दालचिनी गुणकारी आहे. म्हणून डॉक्टरसुद्धा दालचिनी खाण्याचा सल्ला देतात. दालचिनी चे फायदे मराठी आरोग्यजगतात खूप मानले जातात.

1. ह्दय विकार ठेवते नियंत्रणात

ह्रदयविकारावर दालचिनी अत्यंत गुणकारी आहे. दालचिनीमुळे तुमचा रक्त पुरवठा सुरळीत होतो. त्यामुळे दिवसातून एकदा तरी तुमच्या जेवणात दालचिनी असू द्या. त्यामुळे ह्रदयविकार नियंत्रणात राहते

2. डायबिटीस ठेवते नियंत्रणात

शरीरातील साखर नियंत्रणात ठेवण्याचे कामही दालचिनी करत असते. त्यामुळे डायबिटीझमधील दुसऱ्या प्रकारात इन्सुलिन नियंत्रणात ठेवण्याचे काम दालचिनी करते. त्यामुळे नित्य सेवनात असावी.

ADVERTISEMENT

वाचा – मेथीचे आरोग्यासाठी काय आहेत फायदे

3. वजन ठेवते नियंत्रणात

महिलांच्या आयुष्यात अनेक शारिरीक बदल होत असतात. शारिरीक बदलांमुळे वजन कमी जास्त होत असते. तुमचेही वजन असंतुलित झाले असेल तर तुमच्या वजनाला नियंत्रित ठेवण्याचे कामही दालचिनी करते. जर तुम्हाला वजन नियंत्रणात आणायचे असेल तर दालचिनी चहा करुन प्या. १ कप गरम पाण्यात दालचिनी पावडर घालून ते पाणी ३० मिनिटे तसेच ठेवा. पाणी थंड झाल्यानंतर त्यात एक चमचा मध घाला. (गरम पाण्यात मध घालू नका. कारण त्यातील चांगले घटक कमी होतील) हे पाणी रोज प्या तुमचे वजन कमी होईल.

Benefits Of Cinnamon In Marathi

4. डोक्यांच्या विकारावर गुणकारी

डोळे कोरडे पडणे, शुष्क वाटणे असे त्रास तुम्हाला होत असतीलत तर तुम्ही आवर्जून दालचिनीचे सेवन करायला हवे. दालचिनीच्या सेवनाने हे त्रास कमी होतील. दालचिनी चहाच्या रोजच्या सेवनाने तुमच्या डोळ्यांचे विकार कमी होईल.

ADVERTISEMENT

5. पीसीओएसवर चांगले

जर तुम्हाला PCOSची तक्रार असेल तर त्यावरही दालचिनी उपयुक्त आहे. PCOS मध्ये अनेकदा पोटदुखीचा त्रास होतो. दालचिनीच्या नित्य सेवनाने तुम्हाला PCOSमुळे होणारा त्रास कमी होईल 

पीसीओएसवर चांगले

6. बॅक्टेरियाला ठेवते दूर

दालचिनीमधील अँटीबॅक्टेरीअल गुणधर्म असतात. ते तुम्हाला बॅक्टेरियापासून दूर ठेवतात. हे आम्ही नाही तर एका रिसर्चमध्येसमोर आले आहे.

7. डोकेदुखी आणि अंगदुखी ठेवते दूर

डोकेदुखी आणि अंगदुखी ठेवते दूर

ADVERTISEMENT

दालचिनीमुळे तुमची डोकेदुखी आणि अंगदुखीदेखील कमी होण्यास मदत होते. तुम्हाला दालचिनीपावडरची पेस्ट तयार करुन तुम्हाला तुमच्या डोक्याला लावून ठेवायची आहे. साधारण ३० मिनिटे तुम्हाला ही पेस्ट डोक्याला लावून ठेवायची आहे. तुम्हाला ही पेस्ट लावल्यानंतर थोडे जळजळल्यासारखे वाटेल. पण ही पेस्ट काढून टाकल्यानंतर तुमची डोकेदुखी थांबेल अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला अंग दुखत असेल तर अशीच पेस्ट करुन तुमच्या दुखणाऱ्या भागावर लावायची आहे.

आता तुम्हाला नक्कीच वाटेल की, मसाल्याचा पदार्थ आरोग्यासाठी ठिक आहे. पण याचा सौंदर्याशी काय संबंध? पण तुम्हाला विश्वास बसणार नाही असे दालचिनीचे सौंदर्यवर्धक फायदे आहेत.

लवंग खाण्याचे फायदे (Benefits Of Lavang In Marathi)

दालचिनीत असणारे मुख्य घटक(Ingredients in Cinnamon in Marathi)

छोट्याश्या आणि सदाबहार राहणाऱ्या झाडापासून मिळणारी दालचिनीही नेहमी सुवासिक असते. दालचिनीच्या सालाचा वापर मसाल्यात केला जातो. तसंच यापासून काढल्या जाणाऱ्या तेलाचाही विविध प्रकारे वापर केला जातो. 

ADVERTISEMENT

दालचिनीमध्ये प्रामुख्याने थाईमीन, फॉस्फरस, प्रोटीन, सोडियम, व्हिटमीन, कॅल्शियम, मँगनीज, पोटॅशिअम, निआसीन, कार्बोहायड्रेट इ. महत्त्वपूर्ण तत्त्व आढळतात. ज्यामुळे दालचिनी चवीला थोडी गोड आणि तिखट असते. पदार्थांची चव वाढवण्यासोबतच दालचिनीही कफ निगडीत रोगांनाही दूर करण्यात उपयोगी पडते. त्यामुळे हिचा वापर अनेक औषधींमध्ये केला जातो.

सौंदर्यासाठी दालचिनी चे फायदे (Benefits Of Cinnamon In Marathi For Beauty)

आरोग्यासाठी दालचिनी किती फायदेशीर आहे ते आपण जाणून घेतले. पण दालचिनी ही तुमच्या सौंदर्यासाठीही अधिक फायदेशीर आहे. तुमच्या त्वचेवर दालचिनी नेमकी काय जादू करते ते आता जाणून घेऊया.

1. रंग उजळवते  

रंग उजवण्यासाठी दालचिनी अत्यंत उपयुक्त आहे. दालचिनीमध्ये असणारे ब्लिचींग एजंट तुमचा चेहऱ्याचा रंग उजळवतात. तुम्हाला अगदी चिमूटभर दालचिनी आणि त्यात १ चमचा मध किंवा दही घालायचे आहे. हा मास्क तुम्हाला चेहऱ्याला लावायचा आहे. हा मास्क तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्सचे डाग कमी करते आणि तुमची त्वचा उजळवण्यास मदत करते.

2. पिंपल्सना करते दूर

पिंपल्सवर दालचिनी एक उत्तम इलाज आहे. पिंपल्सना कमी करण्याचे काम दालचिनी करते. यासाठीही एक खास फेसपॅक तुम्हाला दालचिनीपासून तयार करायचा आहे. जो तुमच्या पिंपल्सना कमी करेल.

ADVERTISEMENT

पिंपल्स

दालचिनी फेसपॅक

दालचिनी फेसपॅक बनवण्यासाठी तुम्हाला १ चमचा दालचिनी पावडर, २ ते ३ चमचे मध घ्यायचे आहे. एका भांड्यात दालचिनी पावडर आणि मध एकत्र करुन पेस्ट तयार करायची आहे. ही तयार पेस्ट तुम्हाला तुमच्या चेहऱ्याला लावायची आहे. साधारण १० मिनिटे हा पॅक तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर ठेवायचा आहे. त्यानंतर कोमट पाण्याने तुम्हाला तुमचा चेहरा धुवायचा आहे.

3. मृत त्वचा करते दूर

अनेकदा आपली त्वचा काळवंडलेली दिसते ती त्यावर असलेल्या मृत त्वचेमुळे. दालचिनी तुमच्या त्वचेवरील मृत त्वचा काढून तुमचा चेहरा एकदम मुलायम बनवते. त्यासाठी तुम्हाला दालचिनीचा स्क्रब तयार करायचा आहे.

दालचिनी स्क्रब

ADVERTISEMENT

दालचिनी स्क्रब बनवणे अगदी सोपे आहे. यासाठी तुम्हाला जाडसर वाटलेली दालचिनी पावडर लागेल. तर या स्क्रबला पेस्टचे स्वरुप आणण्यासाठी तुम्हाला मध किंवा दही वापरायचे आहे. हा स्क्रब तुम्हाला साधारण १ मिनिट चेहऱ्यावर चोळायचे आहे. स्क्रब करताना तुम्हाला मसाज करायचा आहे. जेणेकरुन तुमचा चेहऱ्यावरील रक्तपुरवठा सुधरण्यास मदत करतो.  

या स्क्रबबद्ल आणखी एक गोष्ट सांगायची झाली तर हा स्क्रब कोणत्याही स्किनटाईपसाठी चालणारा आहे. त्यामुळे तुम्ही हा स्क्रब वापरु शकता. आठवड्यातून दोनवेळा तुम्ही हा स्क्रब वापरला तरी चालेल.

वाचा- तुमच्या त्वचेचा प्रकार कोणता हे जाणून घेण्यासाठी घरगुती टीप्स

4. पायांच्या भेगांवर गुणकारी

पायांच्या भेगांवरही दालचिनी गुणकारी आहे. दालचिनीमध्ये जखम भरुन काढण्याची क्षमता असते त्यामुळे दालचिनीचा उपयोग पायांच्या भेगांसाठी करतात. तुमच्याही पायांना भेगा पडल्या असतील तर तुम्ही नक्की हा प्रयोग करुन पाहायला हवा.

ADVERTISEMENT

पायांच्या भेगांवर गुणकारी

दालचिनी फिट पॅक

एका भांड्यात 1 चमचा दालचिनी पावडर आणि त्यामध्ये 1 ते 2 चमचा ऑलिव्ह आईल मिसळायचे आहे. तयार मिश्रण तुम्हाला तुमच्या पायांच्या भेगांना लावायचे आहे. सॉक्स घालून रात्रभर तुम्हाला पाय पॅकमध्ये ठेवायचे आहेत. तुमच्या भेगा कालांतराने कमी होतील.

5. केसांच्या वाढीला देते चालना

केसांच्या वाढीसाठीही दालचिनी चांगली आहे. जर तुम्हाला कोंडा झाला तर तुमचे केस गळण्याचे प्रमाण वाढते. केसांवर तेलाचा थर साचत राहिला तरी केस गळतीला सुरुवात होते. दालचिनी तुमच्या केसांच्या मुळांकडे साठलेल्या घाणीला काढून केस वाढीला प्रेरणा देते. तुम्हालाही केस गळतीचा त्रास असेल तर तुम्ही हा खास मास्क तयार करुन पाहा.

ADVERTISEMENT

दालचिनी हेअर मास्क

एका भांड्यात १ चमचा दालचिनी पावडर आणि १ चमचा मध एकत्र करायचे आहे. हे मिश्रण थोडे पातळ करण्यासाठी त्यात पाणी घाला. तुमच्याकडे स्प्रे बॉटल असेल तर तुम्हाला ते मिश्रण त्या बॉटलमध्ये भरुन तुम्हाला तुमच्या केसांना लावून स्काल्पला थोडा मसाज करायचा आहे. १५ मिनिटे ठेवून मग तुम्हाला केस थंड पाण्याने धुवायचे आहे. केस वाळल्यानंतर तुम्हाला केसातून कोंडा कमी झालेला दिसेल. शिवाय तुमचे स्काल्पही तुम्हाला स्वच्छ दिसेल.

6. सेल्युलाईट करते कमी

सेल्युलाईट करते कमी

कमी जास्त वजनामुळे अनेकदा तुमच्या मांड्यावर cellulite दिसू लागतात. Cellulite म्हणजे तुमची त्वचा ताणली गेल्यामुळे तुमच्या मांड्यांची त्वचा एकसारखी दिसत नाही. तुमच्या मांड्यांवर खळ्यांप्रमाणे खड्डे दिसू लागतात. Cellulite वर दालचिनी खूप चांगले काम करते. जर तुमच्याकडे दालचिनी तेल असेल तर त्यात थोडे नारळाचे तेल घालून तुम्हाला मसाज करायचा आहे. याशिवाय तुम्ही आणखी एक प्रयोग करु शकता ते म्हणजे तुम्हाला दालचिनी पूड किंवा तेल, नारळाचे तेल, कॉफी पावडर एकत्र करुन ते तुम्हाला तुमच्या पायांना लावायचे आहे. काही दिवसातच तुम्हाला झालेला बदल जाणवेल.

ADVERTISEMENT

                                                                     वाचा – शिळ्या पोळींनी बनवा हे अप्रतिम पदार्थ

7. पाऊटी लिप्स

हल्ली कोणताच फोटो पाऊट शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हाला हवे असतात फ्रेश आणि गुलाबी ओठ. तुमच्या ओठांवरील मृत त्वचा काढून त्याला सुंदर बनवण्याचे काम दालचिनी करते.

दालचिनी लीप प्लंब स्क्रब

ओठांसाठी दालचिनी स्क्रब बनवण्यासाठी तुम्हाला चिमूटभर दालचिनी पावडर आणि मध एकत्र करुन साधारण १ मिनिटांसाठी तुम्हाला दालचिनी स्क्रब ओठांवर साधारण १ ते २ मिनिटे चोळायचे आहे. पाण्याने ओठ स्वच्छ करुन तुम्हाला त्यावर नारळाचे तेल लावायचे आहे.

ADVERTISEMENT

FAQ’s

हे झाले दालचिनीचे फायदे. पण दालचिनी वापरण्याबाबत अनेकांच्या मनात काही प्रश्न असतात . त्या प्रश्नांना आम्ही समाधानकारक उत्तरे देण्याचा प्रयत्न करत आहोत. 

1. दालचिनी मसाल्याचा प्रकार आहे मग ते चेहऱ्याला लावून कसे चालेल? 

दालचिनी संदर्भात पडणारा हा प्रश्न अगदीच स्वाभाविक आहे. कारण खडे मसाले हे अधिक उष्ण असतात. त्यामुळे त्याचा वापर सौंदर्यासाठी करताना हा प्रश्न पडू शकतो. म्हणून तु्म्ही वर काही फेसपॅक आणि स्क्रब वाचले असतील तर तुम्हाला लक्षात येईल की आम्ही कुठेही दालचिनी नुसती लावण्याचा सल्ला दिलेला नाही तर तुम्हाला दालचिनीसोबत मध किंवा दही लावण्याचा सल्ला दिला आहे. दालचिनीमधील काही गुण चेहऱ्यासाठी आवश्यक असतात. म्हणून त्याचा वापर चेहऱ्यासाठी करण्यास काहीच हरकत नाही. पण जर तुम्हाला भिती वाटत असेल तर तुम्ही आधी हा प्रयोग हातावर करुन पाहा.

2. दालचिनीचा हा प्रयोग आठवड्यातून कितीवेळा करायला हवा? 

दालचिनी हा मसाल्याचा प्रकार आहे. अर्थात त्यामुळे त्यात उष्णता आालीच. जर तुमची त्वचा एलर्जिक असेल तर तुम्ही हा प्रयोग आठवडयातून जास्तीत जास्त दोनवेळा करा. जर तुम्हाला दालचिनी चेहऱ्याला सूट होत नाही असे वाटत असेल तर तुम्ही दालचिनी पावडर टाळा.

3. वजन कमी करण्यासाठी दालचिनी चहा दिवसातून कितीवेळी प्यावा? 

दालचिनी चहा तुम्ही दिवसातून एकदाच प्या. झटपट कमी करण्यासाठी सतत चहा प्याल तर तुम्हाला इतर त्रास होऊ शकतील. त्यामुळे सतत चहा पिऊ नका. जर तुम्ही सकाळी चहा पित असाल तर तुमचा रोजचा चहा बंद करुन तुम्ही हा चहा सुरु करण्यास हरकत नाही. 

ADVERTISEMENT

4. दालचिनी पावडर घरी करुन ठेवली तर चालेल का? 

बाजारात रेडिमेड दालचिनी पावडर मिळते. पण विकतची दालचिनी पावडर घेण्यापेक्षा तुम्ही घरी आणून दालचिनी पावडर करा. दालचिनी उन्हात वाळवून मग तुम्हाला त्याची पावडर करायची आहे. ही पावडर एअर टाईट डब्यात भरुन ठेवायची आहे. 

5. दालचिनीचा वापर आरोग्यासाठी चांगला आहे. मग जेवणात दालचिनीचा वापर कसा करावा? 

दालचिनी चांगली म्हणून दालचिनीचा वापर मोकळ्या हाताने करु नका. शेवटी हा मसाल्याचा प्रकार आहे. आणि त्याचा जेवणात वापर करतानाही मोजून मापूनच करायला हवे. पुलाव, बिर्याणी आणि खोबऱ्याचे वाटप असलेल्या पदार्थात दालचिनी चांगली लागते. पण ती चांगली म्हणून सगळ्याच रेसिपीमध्ये घालण्याचा अट्टहास अजिबात करु नका.

सौजन्य- Shutterstock

You Might Like These:

ADVERTISEMENT

Importance Of Giloy In Ayurveda & Benefits Of Giloy In Marathi

ऑलिव्ह ऑईलचे विविध प्रकार आणि फायदे

ब्रोकोलीचे आरोग्यदायी फायदे (Health Benefits Of Broccoli In Marathi)

04 Apr 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT