ADVERTISEMENT
home / आरोग्य
Shengdane Khanyache Fayde

शेंगदाणे खाण्याचे फायदे हे आरोग्यदायी (Shengdane Khanyache Fayde In Marathi)

भारतात जेवणाच्या मधल्यावेळेत खाण्यासारखा एक उत्तम स्नॅक्सचा प्रकार म्हणजे शेंगदाणे. घरात बसल्यावर मधल्या वेळेत, टीव्ही पाहताना टाईमपास करण्यासाठी, प्रवासात भुक लागल्यावर खाण्यासाठी अनेकांना शेंगदाणे आवडतात. वास्तविक भाजलेले, खारवलेले अथवा तळलेले शेंगदाणे अतिशय उत्तम लागतात. शिवाय हा स्नॅक्स तुमच्या बजेटमध्ये असतो. एवढंच नाही तर शेंगदाणे खाण्यामुळे तुमच्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो. शेंगदाण्यामध्ये मॅगनीज, व्हिटॅमिन ई, फोलेट, फायबर, फॉस्फरस, झिंक, कॅल्शियम, लोह आणि व्हिटॅमिन बी 6 असतं. ज्यामुळे तुमच्या शरीराचे उत्तम पोषण नक्कीच होऊ शकतं. आरोग्य चांगले आणि शरीर सुदृढ राहण्यासाठी गुळ आणि शेंगदाणे खाण्याचा सल्ला दिला जातो. यासाठीच जाणून घेऊया शेंगदाणे खाण्याचे आरोग्यदायी फायदे. 

Shengdane Khanyache Fayde

शेंगदाणे खाण्याचे फायदे

शेंगदाण्याचे आरोग्यदायी फायदे

शेंगदाणे हे काही एखादं औषध मुळीच नाही. मात्र त्याचे तुमच्या शरीरावर चांगले फायदे नक्कीच होतात. यासाठी त्याचे आरोग्यदायी फायदे जरूर जाणून घ्या.

ADVERTISEMENT

पोटासाठी उत्तम

शेंगदाण्यात अॅंटि ऑक्सिडंट भरपूर असतं. ज्यामुळे शेंगदाणे नियमित खाण्यामुळे पोटाचे आजार आणि आतड्यांचा  कॅन्सर होण्याची शक्यता कमी असते. शेंगदाण्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होऊ शकतो.

रक्तदाब नियंत्रित राहण्यासाठी

शेंगदाण्यामध्ये अॅंटि ऑक्सिडंट असल्यामुळे तुमचा रक्तदाब नियंत्रित होण्यास मदत होते. रक्तदाबाचा त्रास असेल तर नियमित शेंगदाणे जरूर खा.

कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहण्यासाठी

शेंगदाण्यामध्ये मोनो सॅच्युरेटेड फॅटी अॅसिड असते. ज्यामुळे तुमच्या शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी होते आणि गुड कोलेस्ट्रॉल मध्ये वाढ होते. म्हणूनच कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहण्यासाठी शेंगदाणे खाणे फायद्याचे ठरू शकते. बॅड कोलेस्ट्रॉलचा परिणाम ह्रदयरोग, किडनीचे आजार, लठ्ठपणा अशा समस्या वाढू शकतात. 

प्रजनन समस्या कमी होतात

शेंगदाणे खाण्यामुळे तुमची प्रजनन शक्ती वाढते. कारण शेंगदाण्यामध्ये फॉलिक अॅसिड असते. ज्यामुळे तुमच्या गर्भधारणेमधील अडचणी कमी होऊ शकतात. जे कपल बाळासाठी प्रयत्न करत असतील आणि त्यांना गर्भधारणेत अडचण येत असेल. त्यांनी रोजच्या आहारात शेंगदाण्याचा वापर जरूर करावा. 

ADVERTISEMENT

कॅन्सरचा धोका कमी होतो

शेंगदाण्यामध्ये पोलिफिनिक अॅंटिऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे तुम्हाला पोटाचा कॅन्सर होण्याचा  धोका कमी होतो. यासाठी आहारात कमीत कमी दोन चमचे शेंगदाणे तेल अथवा मूठभर शेंगदाणे खाण्यास काहीच हरकत नाही. 

अल्झायमरचा धोका कमी होतो

आजकाल तरूण महिलांना अल्झायमरचा धोका वाढत असल्याचं एका संशोधनात दिसून आलं आहे. शेंगदाण्यामधील पोषक तत्त्वामुळे तुमची स्मरणशक्ती वाढते आणि ताणतणावाचा त्रास कमी होतो.

मधुमेह नियंत्रणात राहते

आजकालच्या जीवनशैलीमुळे अनेक आजारपणांचा तुम्हाला सामना करावा लागतो. या जीवनशैलीमुळे आजकाल मधुमेहाच्या रूग्णाचे प्रमाण वाढत आहे. मात्र जर तुम्ही मधुमेहावरील घरगुती उपाय म्हणून शेंगदाणे खाल्ले तर भविष्यातील त्रास टाळता येईल.

सर्दी- खोकला कमी होतो

फार कमी लोकांना हे माहीत असेल की शेंगदाणे खाण्यामुळे तुमचा सर्दी – खोकल्यापासून बचाव होऊ शकतो. हिवाळ्यात शेंगदाणे खाण्यामुळे तुमच्या शरीराला उष्णता आणि ऊर्जा मिळते. शिवाय शेंगदाणे तुमच्या फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी उत्तम असतात.

ADVERTISEMENT

वजन कमी होते

जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी प्रचंड मेहनत घेत  असाल तर शेंगदाणे खाणे तुमच्या फायद्याचे आहे. कारण शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. ज्यामुळे तुमचे पोट साफ राहते आणि तुमचे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.

अधिक वाचा –

दररोज अक्रोड खाण्याचे हे आहेत आरोग्यदायी फायदे

रताळ्यापासून तयार केलेल्या या रेसिपीज जरूर ट्राय करा

ADVERTISEMENT

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती आणि सोपे उपाय

07 Nov 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT