ADVERTISEMENT
home / Recipes
soup recipes in marathi

Soup Recipes In Marathi | सोप्या सूप रेसिपीज मराठी

हिवाळ्याच्या थंड वातावरणात गरमागरम सूप पिण्याची वेगळीच मजा आहे. मस्तपैकी उबदार रजईत गरम सूपचा आस्वाद घेत टीव्ही पाहणे, ही परफेक्ट वीकेंडची कल्पना कशी वाटते. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत खास हिवाळ्यात बनवता येतील अशा पौष्टिक आणि चवदार सूप्सच्या रेसिपीज.

हिवाळ्यात सूप पिण्याचे फायदे (Health Benefits Of Soup)

थंडीच्या दिवसात सूप पिणं हे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. तुमच्या कुटुंबाच्या चांगल्या आरोग्यासाठी त्यांना द्या भरपूर भाज्या, मासांहारी असल्यास फिश, चिकन वापरून घरच्याघरी केलेली बजेट फ्रेंडली सूप्स. सायनसचा त्रास असल्यास सूप घेणं उत्तम असतं. जेवणाचा कंटाळा आल्यासही तुम्ही सूप हा पर्याय निवडू शकता किंवा ख्रिसमस आणि न्यू ईयरच्या पार्टीसाठीही स्टार्टर म्हणून यापैकी एखादं सूप ठेवू शकता. रेडी कुक सूप्स किंवा टिन्ड सूप्सपेक्षा कधीही घरी केलेलं ताजं सूप हे जास्त हेल्दी असतं. कारण आपल्याकडे कढी रेसिपीज बऱ्याचदा केल्या जातात. पण त्यातून भाज्या पोटात जात नाहीत. पण हिवाळ्यात बाजारातही मोठ्या प्रमाणावर भाज्या येतात. त्यामुळे तुम्हाला व्हरायटी ऑफ सूप्स घरी करता येतील. चला तर मग पाहूया व्हेज आणि नॉनव्हेज सूप रेसिपीज.

Easy Vegetable Soup Recipes In Marathi | सोप्या व्हेज सूप रेसिपीज

जर तुमच्या मुलांना भाज्या खाण्याचा कंटाळा येत असेल तर तुम्ही सूपच्या माध्यमातून त्यांना पौष्टिक भाज्या खाऊ घालू शकता. तसंही बाजारात हिवाळ्याच्या दिवसात हिरव्या पालेभाज्या, गाजरं आणि हिरवे मटारसारख्या बऱ्याच ताज्या भाज्या भरपूर येतात. त्यामुळे त्या स्वस्तही मिळतात. मुख्य म्हणजे आम्ही खाली देत असलेल्या रेसिपीजमध्ये कुठेही कॉर्नफ्लॉवरचा वापर करण्यात आलेला नाही. 

वाचा – सकाळच्या घाईत बनवा झटपट नाश्ता रेसिपी, सोप्या रेसिपी जाणून घ्या

ADVERTISEMENT

ब्रोकोली सूप (Broccoli Soup)

veg soup recipes in marathi

veg soup recipes in marathi

ब्रोकोलीचं सूप अनेक प्रकारे बनवता येतं. पांढऱ्या व्हेजिटेबल स्टॉकपासून बनवलेलं हे ब्रोकोली सूप जितकं बनवायला सोपं आहे तितकंच चविष्ट. म्हणूनच ट्राय करा ही पौष्टिक रेसिपी

साहित्य (Ingredients)

ब्रोकोली – 300 ग्रॅम (एक ब्रोकोली)
टोमॅटो – 150 ग्रॅम (3 टोमॅटो मध्यम आकाराचे)
बटाटा – 150 ग्रॅम (2 बटाटा)
आलं – 1 इंच लांब तुकडा
काळी मिरी 7-8
लवंग – 4
दालचिनी – एक तुकडा
मीठ – चवीनुसार (एक छोटा चमचा)
लोणी – 1 1/2 टेबल स्पून
कोथिंबीर – अर्धा टेबल स्पून (बारीक चिरलेली)

कृती (Method)

ADVERTISEMENT

ब्रोकोलीचे तुकडे करून पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. एका भांड्यात ब्रोकोलीच्या फुलांचे तुकडे बुडतील एवढं पाणी गरम करत ठेवा. पाण्याला उकळी आल्यावर त्यात ब्रोकोलीचे तुकडे घालून झाका. 2 मिनिटानंतर गॅस बंद करा. ब्रोकोलीचे तुकडे पाच मिनिटांपर्यंत झाकून ठेवा.

टोमॅटो धुवून मोठे तुकडे करून घ्या. बटाटा सोलून त्याचे बारीक तुकडे करा. ब्रोकोलीच्या देठाचेही छोटे तुकडे करून घ्या. आलं किसून घ्या.

दुसऱ्या एका भांड्यात एक टेबल स्पून लोणी घालून गरम करा. काली मिरी, लवंग आणि दालचिनी लोण्यात घालून थोडं परतून घ्या. टोमॅटो, बटाटा आणि ब्रोकोलीच्या देठाचे तुकडे घालून थोडं पाणी घालून पुन्हा झाकून ठेवा. थोडं थोडं पाणी वाढवून पुन्हा झाकून ठेवा. 6-7 मिनिटांनंतर झाकण उघडून बटाटे शिजलेत का बघा. नसल्यास अजून 2-3 मिनिटं झाकून शिजवा. गॅस घालवा. थंड झाल्यावर हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.

आता हे मिश्रण एका भांड्यात काढा त्यात चार कप पाणी आणि चवीनुसार मीठ घाला. सूप 3-4 मिनिटं उकळल्यावर गॅस बंद करा. ब्रोकोली सूप तयार आहे. सूपला बारीक चिरून घेतलेल्या कोथिंबीरीने गार्निश करा किंवा क्रीमनेही गार्निश करू शकता. तयार आहे तुमचं गरमागरम पौष्टिक ब्रोकोली सूप (Broccoli Soup).

ADVERTISEMENT

वाचा – Misal Pav Recipe Marathi

स्पाईस्ड रूट व्हेजिटेबल सूप (Spiced Root Vegetable Soup)

soup recipes in marathi

या सूपमधून तुमच्या कुटुंबाला मिळतील भरपूर प्रमाणात व्हिटॅमीन्स आणि मिनरल्स.

साहित्य (Ingredients) 

2 चमचे ऑलिव्ह ऑईल
2 कांदे बारीक चिरलेले
2 रताळी चिरलेली
2 चिरलेली गाजरं
2 पार्सनिप्स हा खरंतर गाजराच्याच कुटुंबातला एक प्रकार आहे. त्यामुळे आश्चर्यचकित होऊ नका. तेही चिरून घ्या.
1 लाल मिरची चिरलेली
1 चमचा धने पावडर
1.3 व्हेजिटेबल स्टॉक
425ml दूध
100g योगहर्ट
1 चमचा कोथिंबीर चिरलेली

ADVERTISEMENT

कृती (Method)

मोठ्या तव्यात ऑलिव्ह ऑईल गरम करत ठेवा. त्यात चिरलेला कांदा घालून खरपूस होईपर्यंत परतून घ्या. आता यात बाकीच्या भाज्या घालून पाच मिनिटं शिजवून घ्या. नंतर त्यात मिरची आणि कोथिंबीर घालून अजून 2 मिनिटं शिजवा. नंतर व्हेजिटेबल स्टॉक करा. उकळी येऊ द्या. उकळी आल्यावर गॅस बारीक करा किमान 25 मिनिटं तसंच राहू द्या. भाज्या शिजल्यावर त्यात दूध घाला. गरज असल्यास अजून व्हेजिटेबल स्टॉक घाला. शिजल्यावर बाऊलमध्ये काढून योगहर्ट आणि कोथिंबीरीने गार्निश करून सर्व्ह करा.

गाजर आणि आलं सूप (Carrot & Ginger Soup)

soup recipes in marathi
soup recipes in marathi

साहित्य (Ingredients) 

3 मोठी गाजरं
1 चमचा किसलेलं आलं
1 चमचा हळद
चिमूटभर मिरपूड,
20g ब्रेड
1 चमचा क्रिम, अधिकच क्रिम गार्निश करायला
200ml व्हेजिटेबल स्टॉक

ADVERTISEMENT

कृती (Method)

गाजरं सोलून आणि बारीक चिरून घ्या. नंतर मिक्सरमध्ये गाजरं, आलं, हळद, मिरपूड, ब्रेड, क्रिम आणि व्हेजिटेबल स्टॉक घाला. पातळ होईपर्यंत वाटून घ्या. नंतर एका भांड्यात काढून उकळत ठेवा. चांगली उकळी आल्यावर त्यात क्रिम घाला आणि मिरपूड स्प्रिंकल करून सर्व्ह करा. आवडीनुसार वरून मीठ घाला.

बीटरूट आणि कांद्याच्या बी चं सूप (Beetroot & Onion Seed Soup)

vegetable soup recipe in marathi

साहित्य (Ingredients)

250g उकडलेलं बीटरूट
100g कॅन्ड डाळ किंवा शिजलेली डाळ
1 छोटंसं सफरचंद
1 ठेचून घेतलेला लसूण
1 tsp कांद्याच्या बिया (nigella), सर्व्ह करण्यासाठी जास्तीच्या
250ml व्हेजिटेबल स्टॉक

ADVERTISEMENT

कृती (Method)

हे सर्व घटक ब्लेंडरमध्ये पातळ मिश्रण होईपर्यंत वाटून घ्या. नंतर मायक्रोवेव्ह किंवा गॅसवर उकळून घ्या. नंतर वरून कांद्याच्या बियांनी गार्निश करून सर्व्ह करा.

रताळं आणि डाळीचं सूप (Sweet Potato & Lentil Soup)

vegetable soup recipe in marathi
vegetable soup recipe in marathi

साहित्य (Ingredients)

2 चमचे करी पावडर
3 चमचे ऑलिव्ह ऑईल
2 कांदे चिरलेले
1 सफरचंद सोलून आणि किसलेलं
3 लसून ठेचून घेतलेले
20g कोथिंबीर बारीक चिरलेली
किसून घेतलेलं आलं
800g रताळं
1.2l व्हेजिटेबल स्टॉक
100g लाल डाळ (शिजवलेली)
300ml दूध
एका लिंबाचा रस

ADVERTISEMENT

कृती (Method)

करी पावडर एका मोठ्या तव्यात घेऊन भाजून घ्या. मग त्यात ऑलिव्ह ऑईल घालून पुन्हा परता. नंतर यामध्ये कांदा, सफरचंद, लसूण, कोथिंबीर आणि आलं घाला. 5 मिनिटं नीट परतून घ्या. रताळी सोलून आणि किसून घ्या. एका मोठ्या भांड्यात घेऊन त्यात वरील मसाला, व्हेजिटेबल स्टॉक, दूध आणि शिजवून घेतलेली डाळ घाला. झाकण ठेवून किमान 20 मिनिटं उकळून घ्या. नंतर थंड करून ब्लेंडरमध्ये वाटून घ्या. लिंबाचा रस घाला, घट्ट झाल्यास आवडीनुसार पाणी घालून चव घ्या आणि कोथिंबीरीने गार्निश करून सर्व्ह करा.

क्रिमी मशरूम सूप (Creamy Mushroom Soup)

veg soup recipes in marathi

साहित्य (Ingredients)

25g सुकवलेले मशरूम
50g बटर
1 बारीक चिरलेला कांदा
1 चिरलेला लसूण
थाईम
400g मिक्स्ड वाईल्ड मशरूम्स
850ml व्हेजिटेबल स्टॉक
200ml क्रिम
4 स्लाईस पांढरा ब्रेड आणि ट्रफल ऑईल

ADVERTISEMENT

कृती (Method)

एका भांड्यात पाणी उकळून त्यात मशरूम घाला आणि त्यावर झाकण ठेवा. दुसरीकडे सॉसपॅनमध्ये बटर घ्या त्यात कांदा, आलं आणि थाईमच्या काड्या घाला. सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. उकळलेले मशरूममधील पाणी गाळून घ्या. ते पाणी भांड्यात काढून ठेवा. मग त्यात सॉसपॅनमधील मिश्रण घाला आणि मग वाईल्ड मशरूम्स घाला. पुन्हा शिजायला ठेवा. मशरूममधील गाळून घेतलेलं पाणी घालून उकळा. किमान 20 मिनिटं बारीक गॅसवर उकळा. नंतर हँड ब्लेंडरने बारीक करा. नंतर जास्तीचा बटर पॅनमध्ये गरम करून त्यात स्लाईस ब्रेडचे तुकडे घालून परता. सूपमध्ये हे तुकडे घालून ट्रफल ऑईलने गार्निश करून सर्व्ह करा.

भोपळ्याचे सूप (Pumpkin Soup)

veg soup recipes in marathi

साहित्य (Ingredients)

2 चमचे ऑलिव्ह ऑईल
2 बारीक चिरलेले कांदे
1kg शिजवून घेतलेला भोपळा
700ml व्हेजिटेबल स्टॉक किंवा चिकन स्टॉक
150ml डबल क्रिम
भोपळ्याच्या काही बिया

ADVERTISEMENT

कृती (Method)

सॉसपॅनमध्ये 2 चमचे ऑलिव्ह ऑईल घाला. नंतर त्यात कांदा परतून घ्या. नंतर शिजवलेल्या भोपळ्याचे तुकडे त्यात घाला आणि परतून घ्या. यामध्ये आता व्हेजिटेबल स्टॉक घाला. मग त्यात चवीनुसार मीठ आणि मिरपूड घाला. हे सूप उकळून घ्या आणि घट्ट सूपसारखं मिश्रण झाल्यावर 10 मिनिटाने गॅस बंद करा. नंतर 150ml डबल क्रिम घाला. पुन्हा उकळी येऊ द्या. मग ब्लेंडरने प्युरी बनवा. ही प्युरी तुम्ही 2 महिन्यांपर्यंत फ्रिझ करून ठेवू शकता. जेव्हा प्यायचं असेल तेव्हा थोडा व्हेजिटेबल स्टॉक किंवा दूध घालून उकळून सर्व्ह करा. भोपळ्याच्या बियांनी गार्निश करा.

क्रिमी पालक सूप (Creamy Spinach Soup)

Creamy Spinach Soup

Instagram

साहित्य (Ingredients)

ADVERTISEMENT

50g बटर
1 मध्यम कांदा चिरलेला
2 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरलेल्या
1 मध्यम बटाटा सोलून आणि बारीक चिरलेला
450ml चिकन किंवा व्हेजिटेबल स्टॉक
600ml दूध
450g ताजा पालक धुवून आणि चिरलेला
अर्धा लिंबू, 3 चमचे डबल क्रिम

कृती (Method)

एका सॉसपॅनमध्ये बटर वितळून घ्या त्यात कांदा आणि लसूण 5-6 मिनिटं परतून घ्या. त्यात बटाट्याचे तुकडे घाला आणि पुन्हा शिजू द्या. मग व्हेजिटेबल स्टॉक घाला आणि बारीक गॅसवर 8-10 मिनिटं बटाटा शिजेपर्यंत उकळा. आता त्यात दूध घाला आणि उकळा. अर्धा चिरलेला पालक त्यात घाला. लिंबाचा रस पिळा. झाकून 15 मिनिटं उकळू ध्या. थंड झाल्यावर ब्लेंडर किंवा फूड प्रोसेसरमध्ये पातळ वाटा. मग त्यात उरलेला पालक घालून पुन्हा वाटा. हे सूप तुम्ही किमान एक महिन्यापर्यंत फ्रिझरमध्ये फ्रिझ करू शकता. पालक पौष्टिक असतो. त्यामुळे तुम्हाला कधीही हे करता येईल. जेव्हा हवं असेल तेव्हा गरम करा. आवडीनुसार मीठ आणि मिरपूड घालून घ्या. घट्ट झालं असल्यास हवा तेवढा व्हेजिटेबल स्टॉक घालून थोडं उकळून घ्या. मग वरून क्रिम घालून सर्व्ह करा.

वाचा – ख्रिसमससाठी सोप्या केक रेसिपीज

ADVERTISEMENT

Non Veg Soup Recipes In Marathi | नॉन व्हेजिटेरियन्ससाठी खास सूप रेसिपीज

थंडीच्या दिवसात जर तुम्हाला खोकला किंवा सर्दीचा त्रास होत असल्यास शरीराला उर्जा मिळण्यासाठी नॉनव्हेज सूप आणि त्यातही चिकन सूप उत्तम पर्याय आहे. म्हणूनच आम्ही आणल्या आहेत चिकन सूपच्या तीन वेगवेगळ्या रेसिपीज आणि नॉनव्हेज सूप रेसिपीज.

चिकन नूडल्स सूप (Chicken Noodle Soup)

soup recipes in marathi
soup recipes in marathi

ही सूप रेसिपी एका क्लासिक चायनीज सूपची हूबेहूब कॉपी आहे. ज्यामध्ये आलं, चिकन आणि स्वीट कॉर्नचा वापर करण्यात आला आहे. हे एक लो-फॅट, लो-कॅलरी, हायप्रोटीन मिल असून हे हलकं सूप खूपच फायदेशीर आहे.

साहित्य (Ingredients)

900ml चिकन किंवा व्हेजिटेबल स्टॉक
1 बोनलेस चिकन ब्रेस्ट साधारण 175g/6oz
1 चमचा बारीक चिरलेलं आलं
1 लसूण बारीक चिरलेला
50g तांदूळ किंवा गव्हापासून बनलेले नूडल्स
2 चमचे स्वीटकॉर्न ताजे किंवा फ्रोजन
2-3 बारीक चिरलेले मशरूम्स
2 कांद्याची पात
2 सोया सॉस
पुदीन्याची पानं आणि बारीक चिरलेली मिरची.

ADVERTISEMENT

कृती (Method)

एका पॅनमध्ये 900ml चिकन किंवा व्हेजिटेबल स्टॉक ओतून घ्या. नंतर त्यात बोनलेस चिकन घाला. 1 चमचा किसलेलं आलं आणि लसूण ही यात घाला. नंतर चांगली उकळी आल्यावर गॅस बारीक करा. 20 मिनिटं तसंच झाकून ठेवा आणि उकळू द्या. जोपर्यंत चिकन मऊ होत नाही. यातील चिकन काढून त्याचे तुकडे करून घ्या. पुन्हा त्या स्टॉकमध्ये घाला. आता यामध्ये 50g तांदूळ किंवा गव्हाचे नूडल्सही घाला, नंतर स्वीटकॉर्न, मशरूम्स, कांद्याची पात आणि सोया सॉसही घाला. 3-4 मिनिटं नूडल्स शिजेपर्यंत उकळू द्या. नंतर बाऊलमध्ये काढून उरलेली कांद्याची पात, पुदीन्याची पानं आणि मिरचीने गार्निश करा. हवं असल्यास सोया सॉस घालून सर्व्ह करा.

चिकन क्‍लियर सूप (Chicken Clear Soup)

सुप रेसिपी मराठी
सुप रेसिपी मराठी

जर तुम्ही चिकनचे चाहते असाल आणि काहीतरी वेगळी डिश घरच्यांसाठी करायची असल्यास ही चिकन क्लियर सूप नक्की करून पाहा. घरातील आजारी व्यक्तीसाठी हे सूप उत्तम आहे.

साहित्य (Ingredients)

ADVERTISEMENT

100 ग्रॅम बोनलेस चिकन छोटे तुकडे, 4 कांद्याच्या पाती, 4 लसूण, 2-3 कोथिंबिरीच्या काड्या, 2 चमचे बटर, धने पावडर आणि मीठ चवीनुसार.

कृती (Method)

सर्वात आधी बोनलेस चिकन दोन लसूण आणि दोन कांद्याच्या पातीसोबत कुकरमध्ये शिजवून घ्या. नंतर चिकनमधील पाणी गाळून घेऊन बाजूला ठेवा. आता चिकन सोडून इतर साहित्य बारीक चिरून घ्या. एका पॅनमध्ये बटर वितळवून घ्या त्यात इतर साहित्य घालून हलकं फ्राय करून घ्या. आता यामध्ये चिकन पीस घाला आणि पुन्हा काही मिनिटं फ्राय करा. आता मगाशी ठेवलेला चिकन स्टॉक पॅनमध्ये घाला आणि त्यात किमान दोन कप पाणी घाला. नंतर 15 मिनिटं चांगलं उकळू द्या. सूप गॅसवरून काढताना त्यात धने पावडर घाला. गार्निश करण्यासाठी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला किंवा बटरही घालू शकता.

रस्सम स्टाईल क्रॅब सूप (Rasam Style Crab Soup)

soup recipe in marathi
soup recipe in marathi

रस्समची तिखट-आंबट चव आणि जोडील खेकड्याचा स्वाद हे कॉम्बिनेशन तुम्हाला नक्कीच आवडेल. हे कुकरमध्येही बनवता येतं किंवा पॅनमध्येही.

ADVERTISEMENT

साहित्य (Ingredients)

2 मध्यम आकाराचा खेकडा
1 छोटा कांदा
2 सुकलेली लाल मिरची
1 छोटा चमचा चिरलेलं आलं
2 मोठे टोमॅटो
1/2 छोटा चमचा बडीशोप
चवीनुसार मीठ
1 छोटा चमचा चिंचेचा कोळ
आवश्यकतेनुसार कोंथिबीर
1 चमचा तेल
1 चिमूटभर हींग

वाटपासाठी –
4-5 लसूण कळ्या
1 छोटा चमचा जिरं
1/2 छोटा चमचा काळी मिरी

कृती (Method)

ADVERTISEMENT

वाटपासाठी असलेलं साहित्य तुम्ही मिक्सरमध्ये वाटू शकता किंवा कुटूनही घेऊ शकता. एका कुकरमध्ये तेल गरम करून त्यात हींग, कडीपत्ता, बडीशोप, चिरलेलं आलं, सुकी मिरची आणि चिरलेला कांदा घाला. 2-3 मिनिटं परतून ग्या आणि यात वाटप घाला. चिरलेला टोमॅटोसुद्धा मीठ घालून परतून घ्या. खेकडा धुवून त्याचे तुकडे करा. खेकड्याचे पाय थोडे कुटून घ्या नंतर तो परतलेल्या मसाल्यात घालून दोन मिनिटं शिजवा. आता यात चिंचेचा कोळ, गरजेनुसार पाणी आणि कोथिंबीरीची पानं घाला. कुकरचं झाकण लावून दोन शिट्ट्या होऊ द्या. तुमचं गरमागरम रस्सम स्टाईल क्रॅब सूप तयार आहे. याचा आस्वाद तुम्ही भात किंवा ब्रेडसोबत घेऊ शकता.

सिंपल चिकन सूप रेसिपी (Simple Chicken Soup Recipe)

chicken soup recipe in marathi
chicken soup recipe in marathi

साहित्य (Ingredients)

200 ग्रॅम – चिकन
3 मोठे चमचे कॉर्नफ्लोर,
1 अंड, 1 टोमॅटो आणि 1 गाजर
3 लसूण पाकळ्या
1 मोठा चमचा व्हिनेगर
1 इंच आल्याचा तुकडा
1/2 छोटा चमचा काळी मिरी
चिली सॉस आवश्यकतेनुसार
मीठ चवीनुसार

कृती (Method)

ADVERTISEMENT

सर्वात आधी आलं आणि लसूणची पेस्ट बनवून घ्या. आता एक प्रेशर कुकर घ्या. त्यात चिकन, आलं-लसूण पेस्ट, काळीमिरी घालून आवश्यकतेनुसार पाणी घाला. आता कुकरचं झाकण लावून मध्यम आचेवर 20 मिनिटं शिजवून घ्या. शिजल्यावर कुकरमधून काढा. झाकण उघडा आणि आता हे मिश्रण थंड होऊ द्या. नंतर कुकरमधून पाणी आणि चिकन पीस वेगळे करून घ्या. चिकन सोलून हाडं काढून टाका. नंतर उकडलेल्या चिकनचं कोमट पाणी घेऊन त्यात कॉर्नफ्लोर घालून मिक्स करा आणि चिकनचे छोटे तुकडे करा. तसंच कांदा आणि टोमॅटोही बारीक चिरून घ्या. आता पुन्हा कुकर गॅसवर ठेवा. त्यात चिकन स्टॉक, चिकन पीस, गाजर, कांदा आणि टोमॅटो घाला आणि मध्यम आचेवर शिजू द्या. यामध्ये अंड फोडून घाला आणि 15 मिनिटं शिजू द्या. जेव्हा सूप घट्ट होईल तेव्हा गॅस बंद करा. नंतर त्यात व्हिनेगर आणि चिली सॉस घाला. कुकर बंद करा. आता पाच मिनिटाने कुकरचं झाकण उघडा. तुमचं चिकन सूप तयार आहे. बाऊलमध्ये गरमागरम सूप सर्व्ह करा.

फिश सूप विथ टॅमरिंड अँड जिंजर (Fish Soup With Tamarind and Ginger)

soup recipes in marathi

साहित्य (Ingredients)

आवडीनुसार फिश घेऊन त्याचे बारीक तुकडे करा (500 ग्रॅम)
½ कप चिंच
4 छोटे कांदे
2 चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर
काळीमिरी एक चमचा
किसलेलं आलं
फिश सॉस 4 चमचे
चिरलेला कांदा दोन चमचे
मीठ चवीनुसार

ADVERTISEMENT

कृती (Method)

फिशचे तुकडे तयार ठेवा. चिंच, काळी मिरी आणि कोथिंबीर हा मसाला एकत्र करा. 6 कप पाणी उकळायला ठेवा. जेव्हा पाणी उकळेल तेव्हा त्यात हा मसाला घाला. चांगलं उकळू द्या. आता यामध्ये फिश सॉस, फिशचे तुकडे, उरलेली चिंच, आलं-कांदा आणि कोथिंबीर घाला. चांगलं उकळल्यावर चव घ्या आणि सर्व्ह करा. फिश सॉसमध्ये आधीच मीठ असतं त्यामुळे चव घेऊन मगच मीठ घाला.

पाया सूप (Paya Soup)

Canava

नॉनव्हेज सूपची रेसिपी म्हटल्यावर पाया सूप तर असलंच पाहिजे. खासकरून हैद्राबादमध्ये हे सूप प्रामुख्याने मिळतं. 

ADVERTISEMENT

साहित्य (Ingredients)

4 बकरी ट्रॉटर्स  
1 मोठा कांदा 
1 आलं-लसूण पेस्ट 
1 टोमॅटो 
1 काळीमिरी पावडर 
1 जिरं पावडर
हळद पावडर अर्धा चमचा
मीठ चवीनुसार 

कृती (Methods)

बकरी ट्रॉटर्स साफ करून एका बाजूला ठेवा. कांदा-टोमॅटो चिरून घ्या. एका प्रेशरकुकरमध्ये तुमच्या आवडीनुसार पाणी घ्या. त्यात बकरी ट्रॉटर्स, कांदा, टोमॅटो, हळद पावडर, काळीमिरी पावडर, जिरं पावडर आणि आलं-लसूण पेस्ट घाला. सर्वात शेवटी मीठ घाला आणि उकळू द्या. नंतर झाकण लावून शिजू द्या. बकरी ट्रॉटर्स शिजल्यावर गॅस वरून काढून सर्व्ह करा. 

ADVERTISEMENT

मटण सूप (Mutton Soup)

soup recipes in marathi
soup recipes in marathi

साहित्य (Ingredients)

200 ग्रॅम मटणा,
2 टोमॅटो
1 मोठा कांदा
1 चमचा आलं-लसूण पेस्ट
2 लाल मिरच्या
3 हळद पावडर
1 धने
1 काळीमिरी पावडर
1 चमचा जिरं
बडीशोप अर्धा चमचा
मीठ चवीनुसार
1 चमचा तिळाचं तेल

कृती (Methods)

मटणाचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्या. टोमॅटो कांदा चिरून घ्या. कुकरमध्ये 700 मिलीलीटर पाणी घ्या. हळद घालून मटण शिजवून घ्या. मटण शिजण्याच्या अंदाजाने कुकर बंद करा. भाजलेले धणे, जिरं, काळीमिरी, बडीशोप, लाल मिरची एकत्र वाटून घ्या. सॉस पॅनमध्ये तेल गरम करून घ्या. त्यात आल्याची पेस्ट परतून घ्या. मग त्यात कांदा,टोमॅटो आणि मटनाचे तुकडे स्टॉकसकट घाला. वाटलेलं वाटप आणि मीठ घालून पाच मिनिटं उकळू द्या. गॅसवरून काढून गरमागरम सर्व्ह करा.

ADVERTISEMENT

प्रॉन्स आणि पोटॅटो सूप (Prawns & Potato Soup)

soup recipes in marathi
soup recipes in marathi

सीफूडच्या चाहत्यांना हे सूप नक्कीच आवडेल. प्रॉन्स, बटाटा, कांदा, दूध आणि अंडी घालून हे पौष्टिक सूप तयार करण्यात आलं आहे.

साहित्य (Ingredients)

2 कांदे चिरलेले
1 बटाटा
6-7 प्रॉन्स
2 अंडी
1 कप दूध
40 ग्रॅम बटर
बारीक चिरलेली कोथिंबीर
मीठ चवीनुसार आणि पाणी गरजेनुसार

कृती (Methods)

ADVERTISEMENT

बटाटे सोलून मोठे तुकडे करून घ्या. बटाटा आणि कांदा उकडून त्याची प्युरी करून घ्या. प्रॉन्स सोलून स्वच्छ करा. धुवून त्याचे तुकडे करून घ्या. अंड्याचा पांढरा भाग आणि पिवळा भाग वेगळा करा. पिवळ्या भागात दूध फेटून घ्या. एका पॅनमध्ये बटर गरम करा आणि त्यात प्रॉन्स घाला. थोडे गोल्डन झाल्यावर त्यात कांदा-बटाटा प्युरी घाला. नंतर यामध्ये अंड आणि दूधाच मिश्रण घाला आणि थोडा वेळ शिजवा. सूप घट्ट झाल्यावर यात पाणी, मीठ आणि कोथिंबीर घाला. थोडा वेळ अजून शिजवून नंतर सर्व्ह करा.

वाचा – स्वयंपाक करण्यासाठी ट्राय करा या ‘टॉप 25’ भारतीय डिनर रेसिपीज

सूपबाबत विचारले जाणारे काही प्रश्न आणि उत्तरं (FAQs)

सूप हे पिणं कितीही चांगलं असलं तरी ते दिवसातून किंवा आठवड्यातून किती वेळा प्यावं, किती प्रमाणात प्यावं आणि कोणत्या वेळी प्यावं हे प्रश्न तुम्हालाही नक्कीच पडत असतील नाही का.  

घरी बनवलेलं सूप हेल्दी असतं का?

आरोग्याची गुरूकिल्ली आहे व्हेजिटेबल सूप असं म्हणायला हरकत नाही. सूप नियमितपणे प्यायल्यास तुम्हाला भूक कमी लागते आणि परिणामी कमी जेवण जेवल्याने वजन कमी होतं. पण वजन कमी करण्यासाठी सूप पिताना सोबत वेटलॉस प्लॅन आणि व्यायामही गरजेचा आहे. एक बाऊल सूपमध्ये मिनिमम कॅलरीज आणि भरपूर पोषक तत्त्वं असतात.

ADVERTISEMENT

सूप किती प्रमाणात प्यावं ?

प्रत्येक वयोगटातील व्यक्तींसाठी सूप पिणं चांगल आहे खासकरून वयोवृद्ध आणि आजारी व्यक्तींसाठी. कारण त्यांना अन्न चावून खाणं आणि पचवण्यास बरेचदा त्रास होतो. त्यामुळे सूप प्यायल्याने त्यांना पूरेश्या प्रमाणात पौष्टिक तत्त्व मिळतात. जी मूलं भाज्या आणि डाळी खात नाहीत त्यांच्यासाठी सूप हे उत्तम पर्याय आहे. 5 वर्षांखालील मुलांसाठी रोज 50 मि.ली. सूप पिणं चांगलं आहे.

रोज सूप पिणं कितपत योग्य आहे ?

जोपर्यंत तुमचा इतर आहार व्यवस्थित व योग्य प्रमाणात आहे. तोपर्यंत तुम्ही दिवसातून दोनदा सूप पिणं योग्य आहे. त्यामुळे सूपसोबतच शरीरासाठी परिपूर्ण आहार आवश्यक आहे.

सूप पिण्याची योग्य वेळ कोणती ?

फूड एक्स्पर्ट्सनुसार रिकाम्या पोटी सूप प्यायल्यास त्यातील पौष्टिक घटक लवकर शरीरात शोषले जातात. त्यामुळे जेवणाआधी सूप पिणं कधीही चांगलं असतं. खरंतर सूप पिण्याची सर्वात योग्य वेळ संध्याकाळी 6 ते 7 या दरम्यान आहे. म्हणजेच रात्रीच्या जेवणाच्याआधी एक ते दीड तास सूप प्यावं. तसंच हिवाळ्यात संध्याकाळी उष्ण पदार्थ खावेत. यामध्ये तुम्ही सूपचा समावेश करू शकता.

You Might Like This:

ADVERTISEMENT

Kitchen Tips : असं केल्यास वाया जाणार नाहीत गोष्टी

30 Nov 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT