ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
हिना खानलाही लागले लग्नाचे वेध

हिना खानलाही लागले लग्नाचे वेध

टीव्हीवर लोकप्रियता मिळवून झाल्यावर अभिनेत्री हिना खान बॉलीवूडमध्ये एंट्री करण्यासाठी तयार आहे. लवकरच ती निर्माता-दिग्दर्शक विक्रम भटच्या हॅक्ड या चित्रपटात दिसणार आहे. हे झालं तिच्या करिअरबाबत पण हिना नेहमीच तिच्या पर्सनल लाईफबाबतही दिलखुलास सांगते. नुकताच एका मुलाखतीत तिने तिच्या लग्नाबाबत केला खुलासा. जाणून घ्या काय आहेत हिनाचे लग्नाबाबतचे प्लॅन्स.

लग्न एक फॉर्मेलिटी

हिना नेहमीच तिच्या बॉयफ्रेंड रॉकी जयस्वालसोबतच सोशल मीडियावर नेहमीच फोटो शेअर करत असते. त्यामुळे तिच्या फॅन्सना ती लग्न कधी करणार याबाबतही उत्सुकता असतेच. पण हिनाने मात्र तिच्या लग्नाबाबत सांगितले की, माझं करिअर नुकतंच सुरू झालं आहे. त्यामुळे मी आता लग्न कसं करेन? मला वाटतं की, मी अजून पूर्णतः सेटल झाले नाही. लग्न एक फॉर्मेलिटी आहे. पण हो…येत्या दोन-तीन वर्षात मी नक्कीच लग्न करेन. हिनाच्या या उत्तरावरून हे स्पष्ट झालं आहे की, पुढची दोन वर्ष हिना तिच्या करियर पूर्णपणे फोकस करणार आहे.

चांगला परफॉर्मन्स देणाऱ्यांचं करियरही चांगलं

हिनाने आपल्या आगामी हॅक्ड चित्रपटाबाबत आणि दिग्दर्शक विक्रम भटबाबत ही सांगितलं की, ‘ते (विक्रम भट्ट) तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगतील जी त्यांना अपेक्षित आहे. जर तुम्ही त्यांच्या अपेक्षापेक्षा जास्त केलंत तर ते खूपच खूष होतात. नशीबाची गोष्ट म्हणजे मी आणि रोहन (हॅक्डमध्ये निगेट‍िव्ह भूमिका करणारा रोहन शाह) दोघंही चांगला परफॉर्मन्स देत होतो. जर तुम्ही चांगला परफॉर्मन्स दिला तर तुमचं करिअरही लांबलचक असणार यात शंका नाही. हिनाचा हॅक्ड चित्रपट 7 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.

हिना आणि रॉकीची जोडी

हिना खान बऱ्याच काळापासून रॉकी जयस्वालसोबत रिलेशनश‍िपमध्ये आहे. दोघांच्याही वेकेशन सेलिब्रेशनचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले होते आणि चर्चाही होती. काही महिन्यांपूर्वीच हिनाच्या मालदीव वेकेशनमधील ग्लॅमरस फोटोजकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं. तेव्हा हिनासोबत रॉकीही होता.

ADVERTISEMENT

आता कोमोलिका हिना खानला बॉलीवूडची लॉटरी लागते का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

अभिनेत्री हिना खानच्या व्हायरल व्हिडिओने फॅन्स हैराण

कान्समध्ये दिसला कोमोलिकाचा जलवा

#POPxoLucky2020 मध्ये आम्ही देत आहोत प्रत्येक दिवशी एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

ADVERTISEMENT

 

06 Feb 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT