सुंदर दिसण्यासाठी महिला नेहमी वेगवेगळा मेकअप ट्राय करत असतात. मात्र मेकअप हा लिपस्टिकशिवाय कधीच पूर्ण होत नाही. काजळ, लायनर आणि लिपस्टिक हा अगदी बेसिक मेकअप बऱ्याच महिला करतात. पण काही महिलांना पातळ आणि लहान ओठ आवडत नाहीत. त्यासाठी काही जणी सर्जरीही करून घेतात. काही महिलांना वाटते की, पातळ आणि लहान ओठ हे चांगले दिसत नाहीत. तर फुलर ओठांमुळे चेहऱ्याचे सौंदर्य अधिक उठावदार दिसते असाही समज आहे. पण प्रत्येकाकडे फुलर ओठ मिळविण्यासाठी सर्जरी हा पर्याय नक्कीच उपलब्ध नाही. पण तुम्ही कोणत्याही उपचाराशिवाय नैसर्गिकरित्या फुल ओठ नक्कीच मिळवू शकता. त्यासाठी काय घरगुती उपाय करायचे हे आम्ही तुम्हाला या लेखातून सांगणार आहोत.
दालचिनीचे तेल (cinnamon oil)
पातळ आणि लहान ओठ जर तुम्हाला मोठे आणि फुलर (Fuller Lips) करायचे असतील तर तुम्ही दालचिनीच्या तेलाचा उपयोग करून घेऊ शकता. दालचिनीचे हे तेल मात्र तुम्ही अगदी डायरेक्ट ओठाला लाऊ नका. लिप बाममध्ये तुम्ही दालचिनीचे तेल मिक्स करून घ्या. रात्री झोपण्यापूर्वी लिप बाम लावा आणि हलक्या हाताने तुम्ही ओठांना 2-3 मिनिट्स मसाज करा. रात्रभर तुम्ही हे दालिचिनीचे तेल ओठांवर तसंच राहू द्या. यामुळे तुमचे ओठ फ्लफी (Fluffy lips) आणि मोठे दिसतील.
अधिक वाचा – आकर्षक ओठ करणारी ‘लिप ब्लशिंग’ ट्रिटमेंट नक्की काय आहे
नारळाचे तेल आणि साखरेचा स्क्रब (Coconut Oil and Sugar Scrub)
नारळाचे तेल हा खूपच चांगला नैसर्गिक पर्याय आहे. तसंच साखरेचा स्क्रब हादेखील ओठांना सुंदर ठेवण्यासाठी नेहमीच एक नैसर्गिक उपाय मानला जातो. स्क्रब केल्याने तुमचे ओठ मोठे दिसतात. नारळाचे तेल आणि साखर एकत्र मिक्स करा आणि ओठांना लावा. साधारण 2-3 मिनिट्स हलक्या हाताने मसाज करा. त्यानंतर ओठ व्यवस्थित स्वच्छ करून घ्या. स्क्रब केल्याने ओठांवरील डेड स्किन निघून जाण्यास मदत मिळते. नारळाचे तेल आणि साखरेच्या मिश्रणाने स्क्रब केल्यास, ओठ गुलाबी आणि फ्लफी दिसतात.
अधिक वाचा – ओठांचे सौंदर्य खुलविण्यासाठी या टिप्स येतील कामी
पुदिना ऑईल (Pudina Oil)
पुदिना ऑईल हे आरोग्यासाठी तर चांगले असतेच. त्याचबरोबर त्वचेसाठीही अत्यंत उत्तम मानले जाते. तुम्ही लहान आणि पातळ ओठांसाठी याचा उपयोग करून घेऊ शकता. तुम्हाला पातळ ओठ आवडत नसतील आणि फुलर ओठ हवे असतील तर तुम्ही पुदिन्याच्या तेलाचा वापर करा. पुदिन्याच्या तेलामुळे ओठ अधिक फ्लफी आणि जाड बनतात. पुदिना तेलाचा वापर करून रक्तप्रवाहदेखील चांगला राहतो. पुदिना तेल तुम्ही ओठांना लावा आणि हलक्या हाताने रात्री झोपण्यापूर्वी मसाज करा. रात्रभर तसंच राहू द्या. सकाळी उठून व्यवस्थित तोंड धुवा. काही दिवसातच तुम्हाला याचा परिणाम दिसून येईल.
अधिक वाचा – उन्हाळ्यातही घ्यावी लागते ओठांची काळजी, सोप्या टिप्स
सूचना – यापैकी कोणत्याही तेलाची अथवा कोणत्याही वस्तूची तुम्हाला अलर्जी असेल तर याचा वापर करू नका. तसंच वापर करण्यापूर्वी पॅच टेस्ट नक्की करून पाहा. तुम्हाला कोणतीही शंका असेल तर तुम्ही तुमच्याशी डॉक्टरांशी नक्की सल्लामसलत करा. त्वचेवर कोणतेही तेल डायरेक्ट लाऊ नका. तसंच तुमची त्वचा संवेदनशील असेल तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही पाऊल न उचलणेच योग्य आहे हे लक्षात ठेवा.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक