ADVERTISEMENT
home / Acne
केस आणि त्वचेच्या सौंदर्यासाठी दही आहे उपयुक्त

केस आणि त्वचेच्या सौंदर्यासाठी दही आहे उपयुक्त

सुंदर दिसावं असं प्रत्येकीलाच वाटत असतं. त्यासाठी तुम्ही अनेक उपाय करता. कधी पार्लरमध्ये जाऊन महागडे उपचार घेता तर कधी घरातच एखादा फेसपॅक लावता. वास्तविक आपल्या घरातच असे अनेक पदार्थ असतात ज्यांचा वापर करून तुम्ही तुमचे सौंदर्य खुलवू शकता. सध्या उन्हाळा वाढत आहे. त्यामुळे सर्वांच्या घरी दही नक्कीच  असणार. दही जितकं आरोग्यासाठी उत्तम असतं तितकंच ते तुमच्या सौंदर्यासाठीदेखील फायदेशीर ठरतं. यासाठी वाचा घट्ट दही तयार करण्याची घरगुती पद्धत ( How to make curd at home)

curd for beauty 3

दही आहे सौदर्यासाठी उपयुक्त

टॅनिंग कमी करण्यासाठी

दररोज त्वचेला दही लावल्यास तुमचं टॅनिंग कमी होतं.  यासाठी एक चमचा दही तळहातावर घ्या आणि त्याने तुमच्या त्वचेवर मसाज करा. दही तुमच्या त्वचेत मुरल्यावर चेहरा थंड पाण्याने धुवून टाका.  आठवड्यातून दोनदा अथवा तिनदा तुम्ही हा उपाय करू शकता. अधिक चांगल्या परिणामांसाठी दह्यात लिंबूरस अथवा संत्र्यांच्या रसाचे काही थेंब टाका. यामुळे तुमच्या त्वचेवरील टॅनिंग कमी होऊन तुमची त्वचा उजळ दिसू लागेल.

स्किन टाईनिंग होते

एका वाटीत दही घ्या ते चांगलं एकजीव करून चेहऱ्यावर फेसपॅक प्रमाणे लावा. दहा ते पंधरा मिनीटांनी चेहरा धुवून टाका. दह्यामुळे तुमची त्वचा खेचली जाते ज्यामुळे तुम्हाला स्किन टाईनिंग इफेक्ट मिळू शकतो.

ADVERTISEMENT

पिंपल्स कमी होतात

पिंपल्स कमी करण्यासाठी अनेक घरगुती उपाय आहेत. मात्र दही पिंपल्सवर अधिक परिणामकारक ठरतं. दही खाण्याने तुमच्या शरीरातील चांगल्या बॅक्टेरियाचं रक्षण होतं आणि तेच दही त्वचेवर लावल्यामुळे चेहऱ्यावरील बॅक्टेरिया कमी होतात.

सुरूकुत्या कमी होतात

एजिंग समस्येमुळे तुमच्या चेहऱ्यावर कमी वयातच सुरूकुत्या दिसू लागतात. मात्र दह्यामधील घटकांमुळे त्वचा खेचली जाते. ज्यामुळे तुमच्या सुरूकुत्या कमी होतात. चिरतरूण दिसण्यासाठी दर आठवड्यातून एकदा दह्याचा फेसपॅक जरूर लावा.

दही उत्तम मॉश्चराईझर

curd for beauty 1

तुमच्या त्वचेला नेहमीच पोषणाची गरज असते. दही एक उत्तम मॉश्चराईझर असल्यामुळे तुमच्या त्वचेचे योग्य पोषण होते. यासाठी एका वाटीत चार चमचे दही घ्या त्यात एक चमचा कोकोपावडर आणि एक चमचा दही मिसळा. हा फेसपॅक चेहऱ्यावर लावून तीस मिनीटांनी चेहरा धुवून टाका. या फेसपॅकमुळे तुमच्या त्वचेचं चांगलं मॉश्चराईझिंग होईल.

ADVERTISEMENT

कोरड्या त्वचेला मऊ आणि मुलायम करण्यासाठी वापरा ‘हे’ ब्रॅंडेड आणि होममेड मॉश्चराईझर

डार्क सर्कल्स कमी होतात

आजकाल बदलेली जीवनशैली आणि अपुरी झोप यामुळे तुमच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळं दिसू लागतात. जर तुम्हालाही डार्क सर्कल्सची समस्या असेल तर एक चमचा दही कॉटनपॅडवर लावून ते डोळ्यावर ठेवून आराम करा. यामुळे तुमच्या डोळ्यांचा दाह कमी होईल आणि तुमचे डार्क सर्कल्स कमी  होतील.

सुंदर केसांसाठी असा करा दह्याचा वापर

केसांसाठी बेस्ट कंडिश्नर

curd for hair

केसांनादेखील नियमित पोषणाची गरज असते. यासाठी केसांवर दही जरूर लावा. केसांना कंडिश्नर करण्यासाठी  चार चमचे दही, दोन चमचे कोरफडाचा रस आणि दोन चमचे नारळाचे तेल एकत्र करून केसांवर लावा. अर्धा तासाने केस स्वच्छ धुवा आणि एखादा सौम्य शॅंपू केसांवर लावा. यामुळे तुमचे केस मऊ आणि मुलायम दिसू लागतील.

ADVERTISEMENT

केस गळणं कमी होतं

जर तुमचे केस गळत असतील तर त्यावर हा हेअरमास्क जरूर लावा. एका वाटीत दही घ्या आणि तीन चमचे मेथी पावडर मिसळून केसांवर लावा. एक तासाने केस धुवून टाका. नियमित हा उपाय केल्यामुळे तुमचे केस गळणं कमी होईल.

केस धुताना करू नका या ‘7’ चुका

कोंडा कमी होतो

curd for hair %281%29

जर तुमच्या केसांमध्ये कोंडा झाला असेल तर दही यावर परफेक्ट उपाय आहे. यासाठी केसांना दह्याने मसाज करा आणि अर्धा तासाने केस धुवून टाका. ज्यामुळे केसांमधील कोंडा कमी होईल.

ADVERTISEMENT

दह्याचे हे सौंदर्यफायदे तुम्हाला कसे वाटले आणि त्याचा तुम्हाला काय फायदा झाला हे आम्हाला जरूर कळवा.

पुढे वाचा –

How to Use Dahi for Hair in Hindi

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम आणि शटरस्टॉक

ADVERTISEMENT
06 May 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT