ADVERTISEMENT
home / Age Care
anti aging hacks

हे सोपे उपाय केलेत तर चेहऱ्यावरील सुरकुत्या होतील कमी

वयानुसार चेहेऱ्यावर सुरकुत्या पडणे ही एक नैसर्गिक गोष्ट आहे. आपले वय वाढते त्याचा आपल्या त्वचेवर परिणाम होतोच. पण हल्ली धकाधकीचे तणावयुक्त आयुष्य, प्रदूषण, अपुरी झोप आणि पौष्टिक खाण्याकडे दुर्लक्ष झाल्याने चेहेऱ्यावर अकाली सुरकुत्या पडू लागतात. आपला चेहेरा आरश्यात बघितला की म्हातारे झाल्यासारखे वाटते आणि मग त्यामुळे मनात एक नकारात्मक भावना घर करू लागते. जरी नैसर्गिक वृद्धत्वाच्या प्रक्रियेमुळे प्रत्येकालाच सुरकुत्या पडत असल्या तरीही अकाली म्हातारपण कुणालाही नको असते. विशेषत: चेहरा, मान या भागातील सुरकुत्या तर पटकन दिसून येतात आणि म्हणूनच त्या घालवण्यासाठी आपण विविध उपाय करतो. 

बाजारात मिळणारे विविध ओव्हर-द-काउंटर (OTC) क्रीम्स ज्यामध्ये व्हिटॅमिन-ए व्युत्पन्न रेटिनॉइड्स, अँटिऑक्सिडंट्स आणि कोलेजन नावाचे प्रथिन असते ते त्वचेच्या सुरकुत्या कमी करतात आणि त्वचेचा पोत आणि रंग देखील सुधारण्यास मदत करतात. परंतु हे क्रीम्स वापरण्याचे साईड इफेक्ट होऊ शकतात तर काहींना ऍलर्जी देखील होऊ शकते. त्यामुळे केमिकलयुक्त उत्पादने वापरण्याआधी, काही सोपे घरगुती उपाय वापरून पहावे ज्याने सुरकुत्या कमी होऊन त्वचा निरोगी होण्यास मदत मिळते. 

आहारात बदल 

आपण जे क्रीम्स वगैरे लावतो ते त्वचेत शोषले जातात. हे जरी खरे असले तरीही निरोगी त्वचेसाठी आपला आहार देखील तसाच संतुलित व पौष्टिक असायला हवा. आपल्याला जर आरोग्याच्या तक्रारी असतील तर त्याचा परिणाम सर्वात आधी त्वचेवर होतो. खास करून जर काही पचनाचे विकार असतील तर त्यामुळे त्वचेचे आरोग्य सुद्धा बिघडते. म्हणूनच आरोग्यास फायदेशीर पोषक तत्वांनी समृद्ध असा आहार घ्यायला हवा. असे बरेच अन्नपदार्थ आहेत जे सुरकुत्या कमी करतात आणि एकूणच आरोग्य सुधारण्यास मदत करतात. ताजी सिझनल फळे, भाज्या तर खायलाच हव्यात. तसेच अवाकाडो, चिया सीड्स, दालचिनी, अंड्याचा पांढरा बलक, आलं, ओट्स, सार्डिन मासे, रताळी, टोमॅटो व अक्रोड हे अन्नपदार्थ त्वचेसाठी फायदेशीर आहेत. यांचा आहारात समावेश केल्यास सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. 

अधिक वाचा – डोळ्याखालील सुरकुत्या करा घरगुती उपायांनी कमी, परिणाम होईल त्वरीत

ADVERTISEMENT

इसेन्शियल ऑईल्स 

सुरकुत्या कमी करण्यासाठी खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑइलमध्ये इसेन्शियल ऑईल्स मिसळून लावल्यास त्या कमी होण्यास मदत होते. बर्‍याचदा इसेन्शियल ऑईल्स एका विशिष्ट प्रमाणात एकत्र करून लावल्यास त्वचेचे आरोग्य सुधारते आणि त्वचेला जळजळ किंवा ऍलर्जी असे त्रासही होत नाहीत. फक्त हे इसेन्शियल ऑईल्स वापरण्याआधी त्वचेची पॅच टेस्ट करून बघा जेणे करून तुमच्या चेहेऱ्याला त्रास होणार नाही. आर्गन ऑइल, कॅरेट सीड ऑइल, ग्रेपसीड ऑइल, जोजोबा ऑइल, लव्हेंडर तेल, रोझ ऑइल, रोझमेरी ऑइल, चंदनाचे तेल हे इसेन्शियल ऑईल्स सुरकुत्यांवर प्रभावी आहेत. फक्त हे खूप कॉन्सन्ट्रेटेड असल्याने त्यात खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑइल मिसळून मगच त्यांचा वापर करा. 

व्हिटॅमिन सी 

व्हिटॅमिन सी हे एक अँटिऑक्सिडेंट आहे. ते त्वचेमध्ये कोलेजन तयार करण्यास मदत करते. संत्री, लिंबू, मोसंबी ,पेरू यासारख्या अनेक फळांमध्ये आणि भाज्यांमध्ये हे नैसर्गिकरित्या आढळते. व्हिटॅमिन सी असलेले टॉपिकल जेल लावल्याने त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात असे तज्ज्ञांच्या अभ्यासात आढळले आहे. व्हिटॅमिन सी जेल त्वचेला हायड्रेट करते, कोलेजनचे उत्पादन वाढवते आणि जळजळ कमी करते.

प्रोबायोटिक्स 

प्रोबायोटिक्सचे नियमित सेवन केल्याने पोटाचे तसेच त्वचेचेही आरोग्य सुधारते.दही, ताक, पनीर, केफिर, इडली या पदार्थांमध्ये शरीराला आवश्यक असणारे बॅक्टेरिया असतात. यामुळे पचन सुधारते आणि  त्वचेचे आरोग्य देखील सुधारते. तसेच प्रोबायोटिक्सचा फेस पॅक किंवा फेस मास्क लावल्यानेही त्वचेचा पोत सुधारतो. 

तर वरील उपाय करून बघा आणि त्वचेचे आरोग्य सांभाळा. 

ADVERTISEMENT

फोटो सौजन्य – Freepik

अधिक वाचा – ओठांजवळ आलेल्या सुरकुत्या 5 मिनिटात करा कमी, वाचा कसे

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा  MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

17 Feb 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT