जेड रोलर या ब्युटी टूलने सध्या इंन्स्टाग्राममवर धमाल उडवली आहे. अनेक ब्युटी इन्फ्लुंसर्स जेड रोलरचे गुणगाण गाताना दिसत आहेत. चेहऱ्यावर एखादे प्रॉडक्ट लावलानंतर मसाज करण्यासाठी त्वचेवरून जेल रोलर फिरवले जाते. ब्युटी एक्स्पर्ट जेड रोलरमुळे तुमच्या चेहऱ्यावरचा पफीनेस कमी होतो आणि त्वचेवर लावलेले ब्युटी प्रॉडक्ट त्वचेत व्यवस्थित मुरतं असा दावा करतात. जेडप्रमाणेच इतर वस्तूंपासुन बनवलेले फेशिअल रोलर सध्या बाजारात मिळतात. पण या सर्वांमध्ये जेड रोलर सर्वात जास्त लोकप्रिय आहेत. यासाठीच ते खरे आहेत की ड्युप्लिकेट हे तुम्हाला माहीत असायला हवं.
जेड रोलर म्हणजे नेमकं काय ?
जेड हा लोकप्रिय असलेला एक सेमी प्रिशिअस स्टोन आहे. सध्या त्यामध्ये Nephrite आणि Jadeite दोन प्रकार उपलब्ध आहेत. पांढऱ्या रंगाचा Nephrite जेड हा प्रकार चायनामधून आयात होतो तर Jadeite हे म्यानमारमध्ये निर्माण होते. फेंगशुई या शास्त्रानुसार जेडमुळे जीवनात आनंद, समृद्धी प्राप्त होते आणि ज्याच्याकडे हा स्टोन असतो त्याचा भाग्योदय होऊन त्याला आरोग्य मिळते. असं असलं तरी याबाबत कोणतेही शास्त्रीय पूरावे सिद्ध झालेले नाहीत. त्वचेवर या स्टोनचा स्पर्श झाल्यामुळे थंडावा निर्माण होतो. कारण तो एक थंड गुणधर्माचा आणि शांतता निर्माण करणारा स्टोन आहे. त्वचेवर जेड रोलर फिरवल्यामुळे तुम्हाला शांत आणि रिलॅक्स वाटते. ज्याचा तुमच्या त्वचेवर चांगला परिणाम होतो. योग्य प्रमाणात दाब देऊन रोलर त्वचेवरून फिरवल्यास तुमच्या डोळ्यांच्या खालील रक्तप्रवाह सुधारतो ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील पफीनेस कमी होतो.
जेड रोलर खरे आहे की ड्युप्लिकेट कसे ओळखावे –
जेड रोलर सध्या खूप लोकप्रिय होत असल्यामुळे बाजारात अनेक प्रकारचे जेड रोलर उपलब्ध आहेत. ज्यामध्ये खरे आणि ड्युप्लिकेट असे दोन प्रकार असू शकतात. या जेड रोलरच्या किंमतीत आणि रंगात खूप तफावत आढळते. पहिल्यांदा पाहिल्यावर तुम्ही खरे आणि ड्युप्लिकेट असा फरक पटकन करू देखील शकत नाही. जेड रोलर फार महाग असल्यामुळे काही उद्योजकांनी ते कमी दर्जा आणि कमी किंमतीत बाजारात उपलब्ध करून दिलेले आहेत. म्हणूनच जेड रोलर विकत घेताना ते सावधपणे आणि चिकित्सक पद्धतीने पाहयला हवे. नाहीतर जास्त किंमत मोजूनही तुमच्या हातात ड्युप्लिकेट जेड रोलर येण्याची शक्यता जास्त आहे. यासाठी जाणून घ्या ते खरे आहे की ड्युप्लिकेट कसे ओळखावे.
- जेड स्टोन नेहमी इतर स्टोनपेक्षा जड असतो आणि हातातून खाली पडला तर तुटू शकतो.
- जेड फॉरस्ट ग्रीन रंगाचे असून त्यावर पिवळसर पांढऱ्या रंगाचे पट्टे असतात.
- खऱ्या जेडमध्ये तुम्हाला एखादा तडा अथवा काळा डाग दिसू शकतो कारण तो खरा स्टोन असतो. ड्युप्लिकेट जेडमध्ये असा प्रकार आढळून येत नाही.
- खरे जेड रोलर हे ड्युप्लिकेटपेक्षा खूप महाग असतात. चांगल्या गुणवत्तेचे आणि खरा स्टोन असलेला जेड तुम्हाला दीड ते तीन हजाराला पडतात. मात्र ड्युप्लिकेट जेड तुम्हाला एक हजारात विकत मिळतात.
- खऱ्या जेड स्टोन थंड असतात तर ड्युप्लिकेट जेडचा स्पर्श कोमट लागू शकतो. ड्युप्लिकेट जेड थंड करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज लागू शकते.
- खऱ्या जेडसोबत त्याची प्युअरटी सिद्ध करणारे सर्टिफिकेट मिळते. ज्यामुळे तुम्हाला ते खरे आहे की खोटे हे नक्कीच समजू शकते.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
त्वचा टोन्ड करण्याचे काम करतात हे फेस मसाजर, नक्की वापरुन पाहा
मीरा राजपूतने शेअर केलं ब्युटी सिक्रेट, अशी घेते त्वचेची काळजी
चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासोबतच त्वचा खुलवतील हे फेसऑईल