ADVERTISEMENT
home / Natural Care
रेिसॉर्टमधील पूलमध्ये उतरण्याआधी आणि नंतर अशी घ्या त्वचेची काळजी

रेिसॉर्टमधील पूलमध्ये उतरण्याआधी आणि नंतर अशी घ्या त्वचेची काळजी

डिसेंबर महिना जवळ आला की, पिकनिक, पूल पार्टीचे वेध सगळयांना लागतात. काहींना पाण्यात उतरुन खेळण्याची इतकी हौस असते की, त्वचेच्या काळजीचा अनेकांना विसर पडतो. तासनतास पाण्यात डुंबून मजा केल्यानंतर त्वचा खराब, रुक्ष आणि काळवंडलेली दिसू लागते. अगदी काहीचय कालावधीत तुमचा चेहरा फोटो काढण्यासाठीही योग्य वाटत नाही. जर तुम्ही येत्या काही काळात अशा पिकनिकला जाणार असाल आणि पाण्यात उतरणार असाल तर तुम्हाला तुमच्या त्वचेची काळजी घेणे फारच गरजेचे आहे. पूलमध्ये उतरण्याआधी आणि नंतर अशा पद्धतीने त्वचेची काळजी घेतली तर तुमची त्वचा रुक्ष आणि काळवंडण्याचा त्रास तुम्हाला मुळीच होणार नाही.

खोबरेल किंवा बदामाचे तेल

त्वचचेची घ्या काळजी

Instagram

तुमची त्वचा नैसर्गिक पद्धतीने मॉईश्चरायईज करण्याचे आणि तुमच्या त्वचेवर एक सुरक्षा कवच तयार करण्याचे काम करते. हातात अगदी थोडेसे तेल घेऊन चेहरा- हात- पाय आणि तुमचे जे अवयव उघडे असतील त्याला लावून घ्या. त्यानंतरच पाण्यात उतरा. तेलामुळे तुमची त्वचा क्लोरीनमुळे कोरडी पडत नाही. पाण्यातून बाहेर आल्यानंतर तुम्हाला त्याचा फारसा त्रास होत नाही. त्यामुळे तुमच्या त्वचेला सूट होईल असे हलके तेल लावा. म्हणजे पाण्यात गेल्यानंतर तुमच्या तेलाचा त्रास इतरांना होणार नाही.

ADVERTISEMENT

tanning oil वापरण्याचे फायदे माहीत आहेत का?(Best Tanning Oils In Marathi)

सनस्क्रिन आहे फायद्याचे

सनस्क्रिन लावायला विसरु नका

Instagram

सनस्क्रिन लावणे हे नेहमीच फायद्याचे असते. पाण्यात उतरताना तुम्ही खास करुन सनस्क्रिन लावायला हवे. अनेकदा पूलमध्ये उतरण्याची अनेकांची वेळ ही दुपारची असते. पाण्यात थंड वाटावे म्हणून अनेक जण भर उन्हात उतरतात. पाण्यामध्ये ऊन अधिक शोषले जातात. त्यामुळे त्वचा अधिक टॅन होते. अशावेळी तुम्ही सनस्क्रिन लावले की, त्वचा काळवंडत नाही. त्यामुळे तुमच्या त्वचेवर एक सुरक्षा कव्हर तयार होते.

ADVERTISEMENT

शॉवर घेणे महत्वाचे

शॉवर घेणे महत्वाचे

Instagram

 अनेक जणांना पूलमधून आल्या आल्या आंघोळ करायची अनेकांना सवय नसते. पण हीच सवय घातक ठरु शकते.  कारण क्लोरीनच्या पाण्यात खूप काळ राहिल्यानंतर ते त्वचेवर चिकटून राहते. आंघोळ केल्यानंतर अंगावर पाण्याच्या माध्यमातून चिकटलेले जास्तीचे क्लोरीन निघून जाते. त्यामुळे थोडा कंटाळा झटकून कोमट पाण्याने पूर्ण अंग साबण लावून धुवून घ्या. म्हणजे तुमचे शरीर स्वच्छ होते. 

तुमची त्वचा 10 मिनिट्समध्ये बनवायची असेल चमकदार तर करा वापरा ‘हे’ फेसपॅक

ADVERTISEMENT

मॉश्चरायझर लावायला विसरु नका

पूलमधून बाहेर आल्यानंतर आणि आंघोळ केल्यानंतर त्वचेचा तजेला टिकवून ठेवण्यासाठी तुमच्या आवडीचे मॉईश्चरायझर  लावायला विसरु नका. मॉईश्चरायझर लावल्यामुळे तुमच्या त्वचेला आलेला रुक्षपणा निघून जातो. त्वचेची जळजळ होत नाही. त्यामुळे आंघोळीनंतर मॉईश्चरायझर अगदी मस्ट आहे. 

केसांची काळजीही महत्वाची

त्वचेसोबतच केसांची काळजी घेणे ही फार महत्वाचे असते. त्यामुळे केसांची काळजी घ्यायलाही  विसरु नका. केसांच्या बाबतीत सांगायचे झाले तर लांब केस असण्याऱ्यांनी केसांच्या मुळांना हलके तेल लावा. म्हणजे स्काल्प कोरडी पडत नाही. शिवाय केसांच्या टोकांना तेल लावल्यामुळे केसही अधिक चांगले राहण्यास मदत मिळते. 


आता एखाद्या वीकेंडला स्विमिंग पुलमध्ये उतरणार असाल तर ही काळजी घ्यायला विसरु नका आणि पाण्याचा आनंद घ्या.

घरच्या घरी असे करता येईल Whitening pedicure

ADVERTISEMENT
19 Nov 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT