लग्नानंतर सर्व काही बदलते. नवरा बायकोचे नाते (Husband Wife Relations) हे जन्माजन्मांतरीचे मानले जाते. आयुष्यात सर्वात जास्त महत्त्व नवरा आणि बायको एकमेकांना देतात. एकमेकांशी भांडणं असोत वा एकमेकांबद्दल प्रेम असो सर्व काही एकमेकांना जपत आयुष्यभर जपण्याची वचनं लग्नात दिली जातात. अनेक जोड्यांमध्ये ही वचनं काय निभावण्यात येतात. नवरा बायकोचं नातं हे वेगळंच आहे. तुझं मान जमेना आणि तुझ्यावाचून करमेना असंच काहीसं अनेक जोड्यांमध्ये पाहायला मिळतं. तरीही आपल्याकडे नवऱ्याबायकोच्या नात्याला एक वेगळाच आदर दिला जातो. नेहमी लग्नाच्या शुभेच्छा दिल्या जातात अथवा वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव केला जातो. नवरा – बायकोच्या नात्यावरील काही हृदयस्पर्शी कोट्स (Husband Wife Relation Quotes In Marathi) खास तुमच्यासाठी आम्ही या लेखातून देणार आहोत. हे नाते भावनिकरित्या अत्यंत महत्त्वाचे ठरते. तर नवऱ्यासाठीही काही खास कोट्स आपण पाठवतो. असेच नवरा बायकोच्या नात्यावरील काही खास भावनिक कोट्स (Emotional Quotes On Husband) आणि बायकोसाठी प्रेमाच्या संदेशांचा वापर नक्कीच करू शकता.
Table of Contents
- Husband Wife Relation Quotes In Marathi | नवरा बायकोच्या नात्यावरील कोट्स मराठीतून
- Love Husband Quotes In Marathi | नवऱ्यासाठी प्रेमळ कोट्स
- Navra Bayko Quotes In Marathi | नवरा बायको कोट्स
- Emotional Husband Wife Quotes In Marathi | भावनिक कोट्स, नवरा आणि बायकोच्या नात्यावरील
- Funny Husband And Wife Relationship Quotes In Marathi | नवरा आणि बायकोच्या नात्यावरील विनोदी कोट्स
- Sad Quotes On Husband Wife Relationship In Marathi | नवरा बायकोच्या नात्यावरील दुःखी कोट्स
Husband Wife Relation Quotes In Marathi | नवरा बायकोच्या नात्यावरील कोट्स मराठीतून
नवरा आणि बायकोचे नाते हे वेगळेच असते. लग्न झाल्यानंतर आपण सर्वाधिक प्राधान्य देतो ते आपल्या नवऱ्याला अथवा नवरा प्राधान्य देतो ते म्हणजे आपल्या बायकोला . अशाच या नात्याला सांभाळण्यासाठी (Husband And Wife Relationship Quotes In Marathi) आणि या नात्यातील रूसवा फुगवा, प्रेम जागृत ठेवण्यासाठी काही खास कोट्स (Husband Wife Quotes In Marathi).
1. आयुष्य खूप सुंदर आहे, कारण माझ्या आयुष्यात तू आहेस सोबत आणि ते पण शेवटच्या श्वासापर्यंत
2. तुझ्याशिवाय मी आयुष्याचा विचारही करू शकत नाही. तू सोबत आहेस म्हणून मी जगत आहे. तुझ्याशिवाय संसाराचा विचारही मी करू शकत नाही. तू फक्त सोबत राहा अजून मी काही मागत नाही
3. मला कधीच तुझ्याकडून प्रेम आणि आदर याव्यतिरिक्त कोणत्याही अपेक्षा नाहीत. हेदेखील मी कधीच मागत नाही आणि तुझ्याकडून नेहमीच भरभरून मिळतं.
4. अपेक्षा नसतानाही तू अचानक येऊन प्रेम देऊन जातोस, यापेक्षा अधिक काय हवं. आपला संसार म्हणूनच खूप सुखाचा आहे. तू माझ्या आयुष्यात आहेस हेच माझ्यासाठी सर्व काही आहे
5. आयुष्यात प्रत्येक संकटात तुझी साथ अशीच राहू दे
6. कितीही संकटं आली तरीही तुझी साथ असेल तर मी कोणत्याही संकटांचा सामना करण्यासाठी तयार आहे
7. आयुष्यात काही जण आपल्यासाठी खूप स्पेशल असतात. माझ्यासाठी माझ्या आयुष्यात तुझ्याइतकं स्पेशल कोणीच नाहीये
8. तुझा नवरा नाही तर तुझा श्वास बनून शेवट पर्यंत तुझ्यासोबत जगायचं आहे
9. तुला माझ्यावर रागावण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण रागाच्या भरात हे कधीच विसरू नकोस माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे
10. तुला पाहिलं की असं काहीसं होतं, की माझं मन वेड्यासारखं तुझ्यामध्ये गुंततं
Love Husband Quotes In Marathi | नवऱ्यासाठी प्रेमळ कोट्स
नवरा म्हणजे बायकोसाठी सर्वस्व असतो. नवऱ्याशी भावनिक बंध (Husband Wife Love Quotes In Marathi) बांधलेले असतात. नवऱ्यासाठी असेच काहीसे प्रेमळ कोट्स तुम्हाला पाठवायचे असतील तर तुम्ही नक्की आमचा लेख वाचा.
1. नवरा हा आभाळासारखा स्थितप्रज्ञ, स्थिर, शांत नि अथांग असावा. जेणेकरून बायकोरूपी चंचल, आकर्षक, नाजूक व सैरभैर मनाच्या चंद्राला त्याच्या कुशीत सुरक्षित भासेल आणि मी भाग्यवान आहे कारण मला असाच नवरा लाभला आहे
2. प्रिय नवरोबा, मला प्रेमात कधीच हरायचं आणि जिंकायचं नाही फक्त तुझ्यासोबत आयुष्यभर जगायचं आहे…!
3. खूप नशीब लागतं समजून घेणारा, काळजी करणारा, जीव लावणारा, वेळ देणारा आणि वेड्यासारखं प्रेम करणारा नवरा भाग्यात असायला, तू माझ्या आयुष्यात आहेस, यापेक्षा अधिक मला काहीच नको
4. जीवनाच्या वाटेवर चालताना मी जगेन अथवा मरेन. पण शेवटच्या श्वासापर्यंत फक्त तुझ्यावरच प्रेम करेन
5. मला तुझ्याकडून तुझ्या आनंदाशिवाय काहीच नको. कारण तू आनंदी राहिलास तर आम्ही सगळेच आनंदी राहू
6. दिवसाची सुरूवात आणि रात्रीचा शेवटही कायम तुझ्यासोबत पहायचा आहे. एकमेकांवरचा विश्वास आयुष्यभर कायम ठेवायचा आहे
7. नवऱ्यासमोर तर ‘ती’ इतर नात्याला पण महत्त्व द्यायला विसरते आणि मित्रमैत्रिणीनां वाटतं लग्नानंतर ‘ती’ बदलली. कळलं ना तुला तू माझ्यासाठी किती महत्त्वाचा आहेस ते
8. आपली काळजी करणारी आपल्याला समजून घेणारी व्यक्ती भेटायला नशीब लागते. नाहीतर फक्त प्रेम करणारे ह्या जगात ढीगभर पडले आहेत. मी अत्यंत नशीबवान आहे की, तू माझा नवरा आहेस
9. मला नाही माहिती तुझ्यात अस काय आहे पण रोज नव्याने तुझ्या प्रेमात पडावसं वाटतं. तू इतरांसारखा असूनही वेगळा आहेस
10. कोणीही कितीही आपलं नातं तोडायचा प्रयत्न केला तरी माझा तुझ्यावर विश्वास आहे. तू आपलं नातं कधीही तोडू नकोस आणि माझा हात कधीच सोडू नकोस
Navra Bayko Quotes In Marathi | नवरा बायको कोट्स
नवरा बायको नात्यात प्रेम, रूसवा, फुगवा, चिडवाचिडवी, एकमेकांवर रागावणं आणि एकमेकांची समजूत काढणं या सगळ्याच गोष्टी येतात. त्या नातं टिकविण्यासाठी महत्त्वाच्याही असतात. नवरा बायको कोट्स (Husband Wife Relation Quotes In Marathi) हे त्यासाठीच असतात. सध्या सोशल मीडियाच्या जमान्यात असेच काही कोट्स आपण स्टेटस म्हणूनही ठेवतो. असेच काही मस्त कोट्स (Husband And Wife Relationship Quotes In Marathi) तुमच्यासाठी.
1. पाणीदार डोळे तुझे बोलतात खूप काही, ओठांवर शब्द येत नाही पण सांगतात खूप काही, इवल्या इवल्या कारणाने रडतच राही, आहेस तू सुंदर तुझ्यासारखं माझ्यासाठी या जगात दुसरं कुणीच नाही
2. नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात तर आयुष्यभर एकटे राहाल आणि मला कधीच तुझ्यातले दोष शोधण्यात रस नाही.
3. लोक आपल्याबद्दल काय विचार करता मला फरक पडत नाही पण तू माझ्याबद्दल काय विचार करतेस हे महत्त्वाचे आहे माझ्यासाठी कारण तू जीव आहेस माझा
4. रोज रोज गोड बोलून मुंग्या लागतील ना आपल्या नात्याला, म्हणून कधीतरी भांडणही करावं लागतं, हस ना आता जरा
5. एवढ्या जगात मी तुलाच निवडलं मग तूच ठरव तुझी किंमत काय असेल
6. नवरा बायको जेवढे जास्त भांडतात ना तितकेच जास्त ते एकमेकांवर प्रेम करतात, पटतंय का तुला?
7. नवरा बायकोचं नातं म्हणजे स्वर्गात बांधलेली गाठ, ती गाठ कधीही कुठेही कशीही जुळते
8. तुझ्याशिवाय जगणं काय, जगण्याचं स्वप्नंही पाहू शकत नाही, श्वासाशिवाय किमान काही क्षण जगता येतं, पण तुझ्याशिवाय जगणं शक्यच नाही
9. तू म्हणजे माझा श्वास आहेस, तुझ्याशिवाय माझं पानही हलत नाही. तू नसतीस तर कदाचित मी इथपर्यंत पोहचूच शकलो नसतो
10. नवरा तर असा हवा, ज्याला मी न बोलता माझ्या मनात काय आहे ते समजेल असं मला नेहमी वाटायचं आणि तू माझ्या आयुष्यात आल्यानंतर माझं हे स्वप्नं पूर्ण झालंय
Emotional Husband Wife Quotes In Marathi | भावनिक कोट्स, नवरा आणि बायकोच्या नात्यावरील
नवरा आणि बायकोच्या नात्यामध्ये भावनिकता (Emotional Quotes On Husband Wife Relationship In Marathi) अधिक असते. हे नातं विश्वासावर आणि भावनांवरच अधिक टिकतं. असेच काही नवरा बायकोच्या नात्यावरील भावनिक कोट्स (Marathi Emotional Quotes) तुमच्यासाठी.
1. मिटल्या पापण्या तरी आपसूक जाणवेल सहवास, डोळ्यात फक्त तू दिसणं महत्त्वाचं. तुझ्यावर अतोनात प्रेम आहे आणि आजन्म राहील
2. आपलं नातं हे ओढूनताणून नाही तर निर्मळ मनाने निर्माण झाले आहे, त्यामुळे ते कधीच तुटणार नाही. तुझ्याशिवाय माझं आयुष्य हे आयुष्यच राहणार नाही
3. नात्यामध्ये प्रेम निर्माण झाल्यावर, ते नातं कधीच धोका देणार नाही आणि आपलं नातं हे तसंच आहे
4. तुझ्या मिठीत जे सुख आहे ते सुख कशातच नाही. तू जवळ नसल्यावर याची उणीव जाणवते. तू आयुष्यभर साथ दे आणि सोबत राहा
5. अंधकारमय आयुष्यात अचानक तू आलीस आणि सर्व काही बदलले. शुभ्र सहवास तुझा, मन चांदण्यात न्हाले. सोबत तुझ्या जीवन अप्रतिम झाले
6. वडिलांनंतर जो आपली काळजी करतो आणि कोणत्याही गोष्टीची उणीव भासू देत नाही तो असतो नवरा. तू माझ्या आयुष्यात आहेस यासाठी मी कायम देवाची ऋणी राहीन
7. हजारो नाती असतात, पण आयुष्यभर साथ देते ते महत्त्वाचे नाते म्हणजे नवरा – बायकोचे नाते
8. नातं तेच टिकते ज्यामध्ये शब्द कमी आणि समज जास्त. तक्रार कमी आणि प्रेम जास्त. अपेक्षा कमी आणि विश्वास जास्त असतो. तुझं आणि माझं नातं तसंच आहे. तुझ्याशिवाय जगणं अत्यंत कठीण आहे
9. ती माझ्यासाठी नक्की काय आहे या प्रश्नाचं उत्तर केवळ आणि केवळ तिला मिठी मारूनच मला देता येईल आणि कारण हे शब्दात मांडणं माझ्यासाठी शक्यच नाही. ती माझ्यासाठी सर्वकाही आहे
10. तू इतक्या प्रेमानं बघावं की नजरेनंही लाजावं. मी फक्त आणि फक्त तुझ्यासाठी जगत आहे, कारण तुझ्याशिवाय जगण्याला काही अर्थच नाहीये
Funny Husband And Wife Relationship Quotes In Marathi | नवरा आणि बायकोच्या नात्यावरील विनोदी कोट्स
नवरा आणि बायकोच्या नात्यावर नेहमीच विनोद केले जातात. सगळेच नवरे बायकोला घाबरून असतात असं नेहमी म्हटलं जातं. नात्यामध्ये असा विनोद असेल, विनोदी कमेंट्स असतील तरच आयुष्य हलकंफुलकं होतं. असेच काही विनोदी कोट्स (Quotes On Husband Wife Relation In Marathi) खास तुमच्यासाठी.
1. तुम्ही स्वतःला वाघ समजत असाल तर पत्नीला शेरावाली माँ समजा. अन्यथा तुम्हाला जगणं होईल मुश्किल
2. गप्प बसणे हे कोणत्याही बायकोचे स्त्री धन आहे आणि ते फक्त ती झोपतानाच घालते.
3. सर्वांना लग्न करायलाच हवे. कारण आयुष्यात आनंदच सर्वकाही नसतो
4. जे अमृत पितात त्यांना देव म्हणतात, जे विष पितात, त्यांना महादेव म्हणतात आणि जे विष आहे हे समजल्यानंतरही प्यायल्यानंतर अमृत असल्यासारखे वागतात त्यांना ‘पतिदेव’ असे म्हणतात
5. नवरा बायकोचं नातं म्हणजे, दोघांसाठीही संकट पण तूच आणि त्या संकटावरील इलाजही तूच
6. अगदी परफेक्ट बायको कोणती? तर जी कधी त्रास देत नाही, आपल्याशी खोटं बोलत नाही, कधी विश्वासघात करत नाही, ना कधी शॉपिंगला जात, पण हे कदाचित सर्व स्वप्नंच आहे
7. लग्नातील सर्वात मोठा विश्वासघात म्हणजे, आमची मुलगी गाय आहे सांगून नवऱ्याला वाघिण सोपवली जाते
8. लग्नानंतर I Love You पेक्षाही अधिक परिणामकारक शब्द म्हणजे, दे आज मी भांडी घासतो…
9. बायकोने I Love You म्हटल्यानंतर I Love You too म्हणणं तितकंच गरजेचे आहे जितकं, जोर से बोलो, जय माता दी म्हणणं
10. माझ्याशिवाय तुला कुणी झेलू शकत नाही…हा प्रत्येक बायकोचा नारा असायला हवा.
Sad Quotes On Husband Wife Relationship In Marathi | नवरा बायकोच्या नात्यावरील दुःखी कोट्स
बऱ्याचदा नवरा बायकोच्या नात्यामध्ये तणाव आणि दुरावा येत असतो. तो वेळीच दूर करायला हवा अन्यथा हा दुरावा वाढत जाऊन त्याचा परिणाम नात्यावर होतो. अशावेळी कदाचित तुम्ही समोरासमोर बसून एकमेकांशी बोलू शकत नसता. तेव्हा तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप स्टेटससाठी काही कोट्स टाकून आपल्या नवरा अथवा बायकोला तुमच्या मनातील भावना नक्कीच सांगू शकता.
1. प्रेम हे तेव्हाच टिकते जेव्हा ते दोघांनाही हवे असते. एकमेकांना समजून घेतले तरच नातं टिकू शकतं. मात्र ते टिकविण्यासाठी एकमेकांशी बोलणंही तितकंच गरजेचे आहे.
2. कुणाला कितीही द्या, कुणावर कितीही प्रेम करा, पण कुठेतरी काहीतरी कमी पडतंच…
3. प्रेमाने जग जिंकता येतंही, पण काही वेळा आपण ज्या व्यक्तीला जग मानतो, त्या व्यक्तीला आपल्याला मात्र जिंकता येत नाही
4. माणूस गमावणं हे नक्कीच सर्वात मोठं नुकसान आहे. मात्र त्याहीपेक्षा मोठं नुकसान म्हणजे त्या माणसाच्या आठवणीत आयुष्यभर जगणं होय
5. प्रेमात शंका आणि राग त्याच व्यक्ती व्यक्त करतात, ज्यांना कोणाला तरी गमावण्याची भीती असते, पण सतत शंका घेण्याने नात्यावर मात्र परिणाम होतो हे विसरता कामा नये
6. एकटेपणा तेव्हा वाटत नाही, जेव्हा आपण एकटे असतो. पण तेव्हा जाणवतो जेव्हा आपली आवडती व्यक्ती आपल्याला हवं असताना आपल्यासोबत नसते
7. वेदना कधीच कमी होत नाहीत, मात्र त्या वेदनेसह आयुष्य जगायची सवय होऊन जाते. ही सवय होते ती केवळ नात्यात मिळालेल्या वागणुकीमुळे
8. सोसण्याची सवय झाली की, हसण्याचं आणि रडण्याचं प्रमाण आपोआपच कमी होत जातं – अमर
9. फक्त सांगायच्या गोष्टी असतात, कोणीच कोणाचं दुःख समजून घेऊ शकत नाही आणि हेच सत्य आहे
10. कसं असतं ना, प्रत्येकवेळी दुसऱ्याला समजून घेणारी माणसंच जास्त दुखावली जातात. कारण त्यांना गृहीत धरलं जातं
तुम्हीही तुमच्या नवरा आणि बायकोला असे नात्यावरील कोट्स नक्की पाठवू शकता. तुम्हाला आपल्या मनातील भावना शब्दाने व्यक्त करता येत नसतील तर या कोट्सचा आधार घ्या आणि पाठवा आपल्या मनातील भावना.