Advertisement

Recipes

नवरात्रीसाठी खास उपवासाचे पदार्थ, यावर्षी चाखा वेगळी चव

Dipali NaphadeDipali Naphade  |  Oct 6, 2020
नवरात्रीसाठी खास उपवासाचे पदार्थ, यावर्षी चाखा वेगळी चव

Advertisement

लवकरच नवरात्रीला सुरूवात होईल. काहीजण नवरात्रीत आवर्जून नवरात्री मराठी स्टेटस | Navratri Marathi Status शेअर करतात. तर अनेक जण या नऊ दिवसात भक्तीभावाने उपवास करतात. पण मग 9 दिवस उपाशी राहणं (Navaratri Fasting) शक्य नसतं आणि तेच तेच उपवासाचे पदार्थ तुम्हाला खायचे नसतील तर आम्ही तुमच्यासाठी यावर्षी नवरात्रीला काही खास वेगळे पर्याय आणले आहेत. तुम्ही जर उपवास करणार असाल तर तुम्ही आम्ही सांगितलेले हे पदार्थ नवरात्रीच्या उपवासाला करून नक्की खा. तुम्हाला जर नेहमीच्या साबुदाणा खिचडी, शेंगदाणे आमटी, वरीच्या भाताचा कंटाळा आला असेल तर तुम्ही हे पदार्थही करून पाहू शकता.

राजगिरा आणि बटाट्याचे थालिपीठ

Instagram

 

राजगिरा आणि बटाटा हे दोन्ही उपवासातील ठरलेले पदार्थ. आपल्याला राजगिऱ्याची पुरी तर माहीत आहेच. पण तुम्ही आता राजगिरा आणि बटाटा या दोन्हीचा उपयोग करून थालिपीठही करून बघा. 

साहित्य – 

 • 2 उकडलेले बटाटे 
 • राजगिऱ्याचे 1 वाटी पीठ 
 • 2 हिरव्या मिरच्या (तिखट तुमच्या आवडीप्रमाणे) 
 • मीठ 
 • साखर 
 • तूप

कृती 

उकडलेल्या बटाट्याची साले काढून ते कुस्करून घ्यावेत. त्यामध्ये राजगिऱ्याचे पीठ, हिरवी मिरची, मीठ, चिमूटभर साखर, थोडेसे तूप घालून मीठ व्यवस्थित मळून घ्यावे. त्यानंतर त्याने गोळे करावेत. बटर पेपरला तूप लावा आणि त्यावर हे थालिपीठाप्रमाणे थापा आणि मध्ये एक छिद्र पाडा. तवा मध्यम आचेवर ठेवावा. त्यावर तूप सोडावे आणि वरून थालिपीठ लावावे. मंद गॅसवर हे थालिपीठ खमंग भाजा. तयार झाल्यावर दही अथवा शेंगदाण्याच्या उपवासाच्या चटणीसह खायला द्या. 

वाचा – Navratri Wishes In Marathi

साबुदाणा इडली

Instagram

 

साबुदाण्याची खिचडी  आपण नेहमीच खातो पण साबुदाण्याची इडली ऐकून थोडं वेगळं वाटलं ना? पण हो तुम्ही घरच्या घरी हा वेगळा प्रकार उपवासासाठी करून पाहू शकता. 

साहित्य – 

 • 200 ग्रॅम  साबुदाणे
 • पाव किलो वरीचे तांदूळ
 • शेंगदाण्याचे कूट (हवे असल्यास)
 • 200 ग्रॅम दही
 • चवीनुसार मीठ
 • बेकिंग सोडा 
 • तूप
 • जिरे
 • पाणी 

कृती 

साबुदाणे आणि वरीचे तांदूळ वेगवेगळे मिक्सरमधून वाटून घ्या. नंतर ते मिश्रण एकत्र करून त्यात दही, मीठ, जिरं घालून पाण्याने भिजवा. हे मिश्रण साधारण एक तास भिजू द्या. त्यानंतर इडली पात्राला तूप अथवा तेल लावा आणि त्यावर हे मिश्रण इडलीप्रमाणे घाला. पीठ भिजल्यावर तुम्ही त्यात अगदी पाव चमचा बेकिंग सोडा घाला. जेणेकरून इडली शिजताना ती फुलून येईल. नेहमीप्रमाणे इडली वाफवून घ्या आणि खोबऱ्याच्या उपासाच्या चटणीसह खायला द्या. 

रव्याच्या चविष्ट रेसिपी, पाहून तोंडालाही सुटेल पाणी (Rava Recipes In Marathi)

भरवा पराठा

Instagram

 

आपण अनेक पराठे ऐकले आहेत पण भरवा पराठा ऐकला आहे का? उपवासासाठी हा पराठा उत्तम आहे. याने पोट भरलेले राहते आणि दिवसभर शरीरात ऊर्जाही राहाते. 

साहित्य – 

 • वाटीभर राजगिऱ्याचे पीठ
 • 2 उकडलेले बटाटे 
 • 2 चमचा ओले खोबरे 
 • आर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, 
 • चिरलेल्या अथवा वाटून घेतलेल्या हिरव्या मिरच्या 
 • मीठ
 • साखर
 • लिंबाचा रस
 • तूप

कृती 

उकडलेले बटाटे सोलून किसून घ्या. त्यामध्ये राजगिरा पीठ आणि मीठ घालून मळून घ्या. मळताना तुपाचा हात घ्यावा आणि त्याचा व्यवस्थित गोळा करून घ्या. ओले खोबरे, हिरवी मिरची, मीठ, साखर, लिंबू रस हे एकत्र करून त्याचे सारण करून घ्या. पिठाचे गोळे करून घ्या. गोळा लाटताना राजगिरा पीठ वापरा. त्यानंतर छोटी पोळी लाटून त्यामध्ये नारळाचे सारण भरा. राजगिरा पिठावरच हा पराठा हलक्या हाताने लाटा अथवा हलक्या हाताने थापा. चिरा पडणार नाहीत याची काळजी घ्यावी. मंद तव्यावर तूप सोडून त्यावर खरपूस भाजून घ्यावा आणि दही अथवा चटणीबरोबर याचा आस्वाद घ्यावा.

परफेक्ट उकडीचे मोदक कसे बनवायचे, मराठीत रेसिपी

शिंगाड्याच्या पिठाचा हलवा

Instagram

 

शिंगाडा उपवासाला शिजवून खाल्ला जातो. मात्र त्याचा हलवादेखील तितकाच चविष्ट लागतो. याची रेसिपी जाणून घेऊया. 

साहित्य – 

 • एक वाटी शिंगाड्याचे पीठ
 • साखर एक वाटी
 • मोठे 4 चमचे तूप
 • वेलची पावडर
 • पाणी
 • ड्रायफ्रूट्स (कापलेले)

कृती 

एका पॅनमध्ये तूप ओता. तूप गरम झाल्यावर त्यात शिंगाडा पीठ घालून भाजून घ्या. रव्याच्या शिऱ्यासाठी रवा भाजतो त्याप्रमाणे भाजून घेणे. दुसऱ्या भांड्यात कोमट पाणी आणि साखर एकत्र करून ढवळून ठेवा. साखर विरघळू द्या. त्यानंतर भाजलेल्या पिठात गॅस चालू असतानाच हे पाणी गुठळ्या होणार नाही अशा पद्धतीने त्यात मिक्स करा आणि चमच्याने ढवळत राहा. पाच मिनिट्समध्ये हे मिश्रण घट्ट होऊन त्याला बाजूने तूप सुटू लागेल. मग गॅस बंद करून त्यात वेलची पावडर आणि कापलेले ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार मिक्स करा. हा हलवा पचायलाही हलका असतो. 

महाशिवरात्रीनिमित्त ट्राय करा उपवासाच्या ‘या’ पौष्टिक रेसिपी

उपवासाचा दहीवडा

Instagram

 

उपवासाला जर दहीवडा मिळाला तर? भारीच ना? तुम्हीदेखील असा दहीवडा घरच्या घरी बनवू शकता. या नवरात्रीला हा प्रयोग नक्की करून पाहा. 

साहित्य – 

 • 400 ग्रॅम बटाटा
 • शिंगाडा पीठ 50 ग्रॅम 
 • चवीप्रमाणे काळे मीठ
 • 1 चमचा काळी मिरी पावडर
 • कोथिंबीर
 • 400 ग्रॅम दही 
 • तळण्यासाठी तूप वा तेल

कृती 

बटाटे उकडून त्याची सालं काढून ते कुस्करून घ्या. त्यामध्ये शिंगाड्याचे पीठ,  काळे मीठ, काळी मिरी पावडर, कोथिंबीर तुम्हाला हवं असल्यास, वाटलेली मिरचीही घालू शकता. हे घालून मिक्स करून घ्या. हे सारण बटाट्यामुळे थोडं चिकट होतं. त्यामुळे त्याचे गोळे करून ते तळताना पाण्याचा हात लावावा लागतो. कढईत तूप अथवा तेल तापवून हे वडे तळून घ्या. वडे गार झाल्यावर दह्यात बुडवा आणि खायला देताना कोथिंबीर आणि तिखट वरून घाला. तुम्हाला हवं असल्यास, दह्यात साखर घालून ती त्यामध्ये विरघळवून दही थोडं सैलसर करून ठेवा. हे अधिक चविष्ट लागते. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक