केस सरळ करणे म्हणजेच हेअर स्ट्रेटनिंग अथवा हेअर स्मूथनिंगची फॅशन कधीच जुनी होत नाही. त्यामुळे जरी कायमस्वरूपी केस स्ट्रेट केले नाही तरी एखाद्या कार्यक्रमासाठी तात्पुरते तुम्ही हेअर स्मूथनिंग नक्कीच करू शकता. विशेषतः जेव्हा तुमचे केस कुरळे असतात अथवा गुंतागुंतीचे असतात तेव्हा तुम्हाला केस सरळ करणे खूप आवडू शकते. यासाठी पार्लरमध्ये खूप वेळ आणि पैसा मात्र नक्कीच खर्च करावा लागतो. शिवाय पार्लरमध्ये यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्रॉडक्टमध्ये खूप केमिकल्स असते. ज्यामुळे पुढे केसांचे नुकसान होण्याची शक्यता असते. यासाठीच आम्ही तुम्हाला केस सरळ करणे सोपे करणाऱ्या काही नैसर्गिक घटकांची माहिती देत आहोत. या साहित्याने तुम्ही घरच्या घरी केस सरळ करू शकता. जाणून घ्या केस सरळ करण्याचे उपाय (Hair Smoothening At Home In Marathi)
नारळाचे दूध आणि लिंबू
केस सरळ करण्यासाठी घरगुती उपाय
लिंबाचे केसांसाठी फायदे अनेक आहेत. जसं लिंबाच्या रसामध्ये तुमचे केस सरळ करणारे गुणधर्म असतात. पण जेव्हा लिंबाच्या रसाला नारळाच्या दुधाची जोड मिळते तेव्हा त्याचा तुमच्या केसांवर नक्कीच चांगला फायदा होतो. कारण त्यामुळे तुमच्या केसांचे योग्य पोषणही होते. नारळाचे दुध आणि लिंबाचा मास्क केसांवर लावण्यामुळे तुमचे केस मऊ आणि मुलायम होतात शिवाय केसांवर नैसर्गिक चमकही येते. शिवाय पहिल्यांदा ही ट्रिटमेंट ट्राय करणार असाल तर केस सरळ करण्याचा हा उपाय (Kes Saral Karnyasathi Upay) नक्कीच चांगला ठरेल.
साहित्य –
- अर्धी वाटी नारळाचे दूध
- एक चमचा लिंबाचा रस
हेअर मास्क बनवण्याची पद्धत –
- नारळाचे दूध आणि लिंबाचा रस एकत्र करा.
- रात्रभर हे मिश्रण रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा.
- सकाळी केसांच्या मुळांपासून टोकापर्यंत हा मास्क लावा.
- तीस मिनीटांनी केस स्वच्छ धुवा.
- साध्या पाण्याने केस धुतल्यानंतर एखादा सल्फेट फ्री शॅम्पू लावा.
- चांगल्या परिणामासाठी आठवड्यातून एकदा हा मास्क वापरा.
अंडे, मध आणि ऑलिव्ह ऑईल
अंड्यातील प्रोटिन्समुळे तुमच्या केसांचे चांगले पोषण होते. मध आणि ऑलिव्ह ऑईल तुमच्या केसांवर एक उत्तम कंडिशनरप्रमाणे काम करते. यासाठीच घरीच करा केस सरळ करण्याचा हा उपाय (Kes Saral Karnyasathi Upay)
साहित्य –
- दोन अंडी
- एक चमचा मध
- तीन चमचे ऑलिव्ह ऑईल
हेअर मास्क बनवण्याची पद्धत –
- अंडी, मध आणि ऑलिव्ह ऑईल एकत्र करा
- अंडे फेटून त्याची चांगली पेस्ट करा
- मिश्रण केसांच्या मुळापासून टोकाकडे लावा
- एक तास हे मिश्रण केसांवर ठेवा
- तासाभराने केस धुवा आणि नंतर अंड्याचा वास घालवण्यासाठी केसांना शॅम्पू करा.
केळी आणि पपई
जशी केळी आणि पपई तुमच्या आरोग्य आणि त्वचेसाठी उपयुक्त आहेत. तसाच याचा वापर तुम्ही तुमचे केस सरळ करण्यासाठी करू शकता. कारण या दोन्ही फळांच्या मिश्रणामुळे तुमच्या केसांचे चांगले पोषण होते आणि केस निरोगी होतात.
साहित्य –
- एक पिकलेले केळे
- एक वाटी पपईचा गर
मास्क बनवण्याची पद्धत –
- दोन्ही फळांचे प्रमाण समान घ्या आणि त्याची चांगली पेस्ट तयार करा.
- पेस्ट करताना ती केसांना लावण्याइतपत पातळ होईल याची काळजी घ्या.
- केसांना मास्क लावा आणि अर्धा तासानंतर केस साध्या पाण्याने धुवा
- आठवड्यातून एकदा हा उपाय करा ज्यामुळे तुमचे केस सरळ आणि चमकदार होतील.
एरंडेल तेल
Kes Saral Karnyasathi Upay
एरंडेल तेल तुमच्या केसांच्या वाढीसाठी खूपच फायदेशीर आहे. पण हे तेल खूप चिकट असल्यामुळे यामुळे तुमचे कुरळे केस सरळ होतात. शिवाय केसांना छान मऊपणाही येतो. तुम्ही आठवड्यातून एकदा एरंडेल तेल केसांना नक्कीच लावू शकता.
साहित्य –
- एक चमचा एरंडेल तेल
- एक चमचा नारळाचे तेल
केसांना लावण्याची पद्धत –
- दोन्ही तेल एकत्र करून ती व्यवस्थित मिक्स करा.
- थोडं कोट करून हे तेल तुम्ही तुमच्या केसांच्या मुळांना कापसाच्या मदतीने लावा
- पंधरा ते वीस मिनीटे केसांना हलका मसाज करा.
- तीस मिनीटांनी केस स्वच्छ पाण्याने धुवा.
अॅव्होकॅडो
Hair Straightening At Home In Marathi
अॅव्होकॅडोमध्ये अनेक पोषक घटक असतात जे तुमच्या केसांना मऊ आणि मुलायम करतात. केसांचे टेक्चर सुधारल्यामुळे केस आपोआप मऊ आणि सरळ होतात. यासाठीच घरी केस सरळ करण्यासाठी वापरा अॅव्होकॅडो हेअर मास्क. ज्यामुळे तुमचे केस नैसर्गिक पद्धतीने सरळ आणि सुंदर दिसतील.
साहित्य –
- एक अॅव्होकॅडो
- एक चमचा दही
मास्क बनवण्याची पद्धत –
- अॅव्होकॅडो कापून त्याचा गर स्मॅश करा.
- अॅव्होकॅडो गरामध्ये दही मिसळा.
- दोन्ही घटकांची चांगली पेस्ट तयार करा.
- हेअर मास्क केसांच्या मुळांपासून लावत टोकाकडे जा.
- केस अर्धा तासाने स्वच्छ धुवा.
मध
मध त्वचेप्रमाणे केसांसाठीदेखील अतिशय पोषक असते. मधातील घटक केसांसाठी नैसर्गिक कंडिशनरप्रमाणे काम करतात. ज्यामुळे केस मऊ आणि हायड्रेट राहतात. यासाठीच केस सरळ करण्यासाठी तुम्ही मधाचा वापर करू शकता.
साहित्य –
- एक चमचा मध
- एक चमचा नारळाचे दूध
कसा बनवाल मास्क –
- नारळ्याच्या दूधामध्ये मध मिसळा.
- दोन्ही घटक मिक्स होतील अशाा पद्धतीने एकत्र करा.
- केसांच्या मुळांपासून केसांच्या टोकापर्यंत हेअर मास्क लावा.
- अर्धा तासाने थंड पाण्याने केस धुवा.
कोरफड
कोरफड त्वचेसाठी उत्तम असल्यामुळे कोरफडाचा गर तुम्ही स्काल्पसाठी नक्कीच वापरू शकताा. ज्यामुळे तुमच्या केसांच्या अनेक समस्या कमी होतात. शिवाय यामुळे तुमचे केस मऊ आणि सरळदेखील होतात.
साहित्य –
- दोन चमचे नारळाचे तेल
- दोन चमचे कोरफडाचा गर
मास्क लावण्याची पद्धत –
- नारळाचे तेल कोमट करा आणि त्यात कोरफडाचा गर मिसळा.
- सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करा.
- हेअर मास्क केसांना लावा आणि अर्धा तासाने केस धुवा.
- आठवड्यातून एकदा हा मास्क केसांना लावा आणि घरच्या घरी केस सरळ करा.
कोमट तेलाने मालिश
Hair Straightening At Home In Marathi
डोक्याची चंपी म्हणजे कोमट तेलाने केसांना मालिश केल्यामुळेही तुमच्या केसांवर चांगला परिणाम दिसून येतो. जर तुमचे केस कुरळे असतील अथवा केसांमध्ये सतत गुंता होत असेल तर तुम्ही नियमित केसांना कोमट तेलाने मालिश करायला हवी.
साहित्य –
- दोन चमचे नारळाचे तेल
- दोन चमचे बदामाचे तेल
- दोन चमचे ऑलिव्ह ऑईल
केसांना लावण्याची पद्धत –
- तीनही तेल समप्रमाणात घ्या आणि एकत्र करा.
- कोमट करून त्याने केसांना हळूवार मालिश करा.
- वीस मिनीटांनंतर केस कोमट पाण्याने धुवा.
- केसांमधील तेलाचा चिकटपणा जाण्यासाठी सौम्य शॅम्पू करा.
- आठवड्यातून दोन ते तीन वेळा कोमट तेलाने केसांना मसाज करा.
मेयॉनिज
मेयॉनिज हे अंड्यापासून तयार केले जाते. सहाजिकच त्यामध्ये केसांसाठी उपयुक्त घटक असतात. अंड्यातील प्रोटिन्समुळे तुमच्या केसांचे फॉलिकल्स मजबूत होतात. यासाठीच केस सरळ करण्यासाठी तुम्ही मेयॉनिज वापरू शकता.
साहित्य –
- दोन चमचे मेयॉनिज
- एक चमचा व्हिनेगर
कसा बनवाल हेअर मास्क –
- दोन्ही घटक एकत्र करा आणि हेअर मास्क तयार करा.
- केसांच्या मुळांपासून टोकापर्यंत हेअर मास्क लावा.
- अर्धा तासाने केस स्वच्छ धुवा.
केस सरळ करणेबाबत निवडक प्रश्न – FAQ’s
स्मूथनिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या केमिकलयुक्त प्रॉडक्टमुळे केस ड्राय होतात ज्यामुळे ते कमजोर झाल्याने लवकर तुटतात. यासाठी नैसर्गिक घटकांनी केस सरळ करणे केसांच्या आरोग्यासाठी नेहमी चांगले असते.
केस स्मूथनिंग केल्यावर लगेच बांधू नयेत कारण त्यामुळे तुमच्या केसांवर झालेला परिणाम कमी होतो आणि केस सरळ होत नाही. यासाठीच केस न बांधण्याचा सल्ला दिला जातो.
केस स्मूथनिंग करताना अनेक केमिकल्सचा केसांवर वापर केलेला असतो. सहाजिकच त्यानंतर केस धुताना स्मूथनिंग केसांसाठी असलेल्या सौम्य शॅम्पू वापरण्याची गरज असते.
केस स्मूथनिंग केल्यावर केसांवर अनेक केमिकल्सचा वापर करण्यात आलेला असते. त्यामुळे केसांचा सरळ होण्याचा परिणाम टिकण्यासाठी हेअर ट्रिटमेंटच्या पहिल्या आठवड्यात तरी केसांना तेल लावू नये.