ADVERTISEMENT
home / Recipes
दिवाळीत उरलेल्या मिठाईचे काय करायचे असा पडलाय प्रश्न, तर वाचा (Recipes With Mithai)

दिवाळीत उरलेल्या मिठाईचे काय करायचे असा पडलाय प्रश्न, तर वाचा (Recipes With Mithai)

दिवाळीत येणारा प्रत्येक पाहुणा घरात मिठाई घेऊन येत असतो. फराळा व्यतिरिक्त घरात  इतक्या प्रकारच्या मिठाई येतात की, एकाचवेळी सगळी मिठाई खाऊन संपत नाही. मग ती फ्रिजमध्ये टाकली जाते. हल्ली लोक मिठाई किंवा एकूणच दुग्धजन्य पदार्थांबाबत इतके जागरुक झाले आहेत की, एकदा त्याची एक्सपायरी संपली की, हे खाद्यपदार्थ थेट कचऱ्याच्या डब्यात जातात. पण तुम्हाला मिठाई फेकून देणे नको झाले असेल. पण आहे त्या स्वरुपात खाणेही कठीण झाले असेल तर मग तुम्हाला त्याचा असा वापर नक्कीच करुन पाहायला हवा.

हैदराबादमध्ये जाणार असाल तर इथे खा चविष्ट चिकन बिर्याणी

या मिठाई तर हमखासच येतात (Recipe Of Sweets In Marathi)

Instagram

ADVERTISEMENT

पाहुणे दिवाळीत घरी येताना काजू कतली,काजू बर्फी, गुलाबजाम, माव्याची बर्फी किंवा माव्याची मिठाई हे गोड पदार्थ हमखास दिले जातात. हे पदार्थ इतरवेळी खायला बरे वाटत असतील पण दिवाळीत घरात इतकं गोड येतं की, ते डोळ्यासमोर आणावेसेही वाटत नाही. शिवाय हल्ली लोक इतके कॅलरी कॉन्शस झाले आहेत की, त्यांना इतकी साखर पोटात घालावीशी वाटत नाही. 

दुपारच्या जेवणात या पदार्थांचा समावेश असेल… तर तुम्ही राहाल निरोगी

रबडी (Rabdi)

Instagram

ADVERTISEMENT

आता गोड मिठाई नाही पण थंडगार कुल्फी कधी कोणाला टाळता येते का? तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई शिल्लक राहिली असेल तर तुम्ही त्यापासून कुल्फीसुद्धा तयार करु शकता. 

साहित्य: गुलाबजाम, काजू बर्फी किंवा काजूची मिठाई, ड्रायफ्रुटचे काही काप, ब्रेडचे तुकडे, एक मोठा कप दूध

कृती:  ब्रेडच्या कडा काढून घ्या.आता तुमच्या मिक्सरच्या भांड्यात ब्रेडचे स्लाईस, काजू बर्फीचे काही तुकडे आणि दूध घालून मिक्सरमध्ये हे सगळे वाटून घ्या. एका सॉसपॅनमध्ये तयार मिक्सरमधील दूधाचे मिश्रण घेऊन ते उकळून घ्या. आता तुम्हाला रबडी किती घट्ट हवी तितक्यावेळ हे दूध उकळून घ्या. गॅसवरुन काढून गुलाबजामचे बारीक बारीक तुकडे करुन दुधाच्या मिश्रणात घाला. आता रबडीची चव थंडच चांगली लागते. त्यामुळे तुम्ही छान 4-5 तास फ्रिजमध्ये ठेवा. वर मस्त ड्रायफ्रुटचे काप सजवून रबडीचा आनंद घ्या.

कुल्फी आईस्क्रिम (Kulfi Ice Cream)

ADVERTISEMENT

Instagram

जर तुमच्याकडे माव्याची खूपच मिठाई शिल्लक असेल तर मग तुम्ही कुल्फी आईस्क्रिम हा प्रकारही करु शकता. आता यासाठी तुम्हाला एकच मिठाई हवी असे नाही. तुमच्या घरात असलेली कोणतीही मिठाई यासाठी चालू शकेल. 

साहित्य: कोणताही मिठाईचा प्रकार म्हणजे काजू रोल, काजू कतली,मावा मिठाई, मावा बर्फी, अंजीर रोल, अंजीर मिठाई असा कोणताही प्रकार, साधारण अर्धा लीटर दूध,अर्धा चमचा वेलची पूड 

कृती: मिक्सरच्या भांड्यात शिल्लक असलेली मिठाई आणि थोडे दूध घेऊन तुम्ही मिठाई छान वाटून घ्या.  एका दुसऱ्या भांड्यात मिठाईच्या मिश्रणापेक्षा साधारण तिप्पट दूध घ्या. दूध उकळून घ्या. त्यात वेलची पूड घालून दूध गॅसवरुन खाली उतरवा. दूध थंड झाल्यानंतर त्यात मिठाईचे मिश्रण व्यवस्थित एकत्रित करुन घ्या. कुल्फीच्या भांड्यात कुल्फीचे मिश्रण घालून मस्त सेट करायला तयार.मग एन्जॉय करा ही मस्त मिठाईची कुल्फी 

ADVERTISEMENT


मग आता दिवाळीला आणलेली मिठाई फेकून देऊ नका तर त्यापासून बनवा हे झक्कास पदार्थ

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच  POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty  लिंकवर क्लिक करा.

देखील वाचा –

झटपट नाश्ता रेसिपी मराठी भाषेत (Easy Breakfast Recipes In Marathi)

ADVERTISEMENT

मैद्याचे पदार्थ रेसिपी मराठीत, बनवा विविध प्रकारच्या ‘या’ डिश

31 Oct 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT