निसर्ग ही परमेश्वराने माणसाला विनामुल्य दिलेली एक सुंदर देणगी आहे. माणूस हा देखील याच निसर्गाचा एक अविभाज्य भाग आहे. निसर्ग पृथ्वी, आप, अग्नी, वायु आणि आकाश या पाच तत्त्वांनी बनवलेला आहे. मानवी देहदेखील या पंचतत्त्वातूनच तयार झालेला आहे. म्हणूनच माणसाचे जीवन निसर्गावर अवलंबून आहे. माणूस या निसर्गात जन्माला येतो, जीवन जगतो आणि याच निसर्गात विलिन होतो. म्हणूनच या निसर्गाची काळजी घेणं आणि निसर्गाचं संवर्धन करणं हे माणसाचं पहिलं कर्तव्य असायला हवं. निसर्गाकडून माणसाला अनेक गोष्टी शिकता येतात. जगण्यासाठी आवश्यक असलेले अन्न, पाणी, निवारा, शुद्ध हवा औषधी वनस्पती सारं काही या निसर्गाकडूनच मिळतात. अशा विस्मयकारक आणि अद्भूत निसर्गाचं वर्णन करावं तितकं थोडं आहे. यासाठीच त्याच्या बद्दल अधिक जाणून घ्या निसर्ग सुविचार मराठीतून
बेस्ट निसर्ग सुविचार – Best Nature Quotes In Marathi
निसर्गावर आधारित सुविचार ज्यांच्यामुळे मिळते जगण्याची प्रेरणा.
जीवनात वेळ आणि निसर्ग सर्वात कडक शिक्षक आहेत, ते आधी परिक्षा घेतात मग धडा शिकवतात.
आत्मविश्वास, इच्छाशक्ती व दृढ निश्चय या त्रिवेणी संगमाने जीवनाचा झरा जलद वाहत जातो.
शेतामध्ये बी पेरले नाही तर निसर्ग ती जमीन गवताने भरून टाकतो, त्याचप्रमाणे आपण डोक्यात सकारात्मक विचार भरले नाही तर नकारात्मक विचार आपली जागा बनवतात.
जे पेराल तेच उगवेल.
जमवणं सोपं असतं आणि जपणं अवघड, मग ती नाती असो, निसर्ग अथवा माणसं
निसर्गाची काळजी घ्या निसर्ग तुमची दामदुपटीने काळजी घेईल
निसर्गासारखा नाही रे सोयरा गुरू सखा बंधू मायबाप, त्याच्या कुशीमध्ये सारे व्यापताप मिटती आपोआप
निसर्गाची निर्मिती अतिशय अचूक असते, म्हणूनच आजपर्यंत त्यामध्ये कोणताही बदल करावा लागलेला नाही.
मानवाने निसर्गावर अतिक्रमण केलं तर, कधी ना कधी मानवाला याचा मोबदला स्वतःचे नुकसान करून द्यावाच लागेल
कधी निसर्ग निराळा, ऋतूंचा हा खेळ सारा, कधी उन कधी पाऊस, कधी सोसाट्याचा वारा
वाचा – आर्य चाणक्य विचार मराठी
निसर्ग स्टेटस मराठी – Nature Status In Marathi
निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यावर मनात आध्यात्मिक विचार येतात ज्यांच्यामुळे मिळते जगण्याची प्रेरणा.
निसर्गातील प्रत्येक घटकामध्ये एक आश्चर्य दडलेलं आहे.
झाडांमध्ये खर्च केलेला वेळ कधीच वाया जात नाही.
पानगळ होऊनही जेव्हा नवी पालवी फुटते, निसर्गाची ही न्यारी किमया पाहून मनाची मरगळ दूर होते
घ्यास घ्यावा फुलांचा, रंग गंधही प्यावे, नकळत त्यांच्यामधले फुल होऊन जावे – सोनाली चॅटर
एकदा निसर्गाच्या सानिध्यात सहज फिरून आलो दुःखाचे क्षण सारे विसरूनिया गेलो – शिशुपाल वाघुकी
या अद्भूत सुंदर निसर्गाच्या, कणकणात बेंधुंद होऊन जावे, गंध त्याचे हे आगळे वेगळे, प्रत्येक श्वासात भरून घ्यावे
नको नको मानवा नको करून रे निसर्गाचा घात, तुझे आणि त्याचे असे अतूट नाते घे हातात हात -प्रचिती जोशी
जेथे जेथे मी पाहतो तेथे मज गुरू दिसतो, निसर्ग असते शाळा अन मी विद्यार्थी असतो
एकीकडे आपण निसर्गात हरवण्याची स्वप्न पाहतो, तर एकीकडे स्वतः निसर्ग हरवत चालला आहे – अल्पेश सोलकर
कसे उगवायचे हे निसर्ग बघेल, कसे जगवायचे ते आपल्याला पाहावे लागेल
निसर्गाच्या अंतर्गत जी न दिसणारी व्यवस्था असते तिला पर्यावरण असं म्हणतात. यासाठीच जागतिक पर्यावरण दिनानिमित्त घोषवाक्य
निसर्गावर कविता – Marathi Poems On Nature
माणसावर निसर्गाचे उपकार इतके आहेत की, जन्मोजन्मी तो निसर्गाचं देणं लागतो. यासाठीच माणसाने निसर्गावर रचलेल्या या कृतज्ञतापर कविता
हिरवे हिरवेगार गालिचे, हरित तृणाच्या मखमालीचे
त्या सुंदर मखमालीवरती, फुलराणी ती खेळत होती
गोड निळ्या वातावरणात, अव्याज मने होती डोलत
प्रणयचंचला त्या भ्रुलीला, अवगत नव्हत्या कुमारिकेला
आईच्या मांडीवर बसुनी, झोके घ्यावे गाणी गावी
याहुनि ठावे काय तियेला, साध्या भोळ्या फुलराणीला
पुरा विनोदी संध्यावात, डोलेडोलवी हिरवे शेत
तोच एकदा हासत आला, चुंबून म्हणे फुलराणीला
छानी माझी सोनुकली ती, कुणाकडे ग पाहत होती
कोण बरे त्या संध्येतून, हळुच पाहते डोकावून
तो रविकर का गोजिरवाणा, आवडला अमुच्या राणींना
लाजलाजली या वचनांनी, साधी भोळी ती फुलराणी – बालकवी
श्रावममासी हर्स मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरूनी उन पडे
वरती बघता इंद्रधनुचा, गोफ दुहेरी विणलासे
मंगल तोरण काय बांधले, नभोमंडपी कुणी भासे
झालासा सुर्यास्त वाटतो, सांज अहाहा तो उघडे
तरू शिखरांवर, उंच घरांवर पिवळे पिवळे उन पडे
उठती वरती जलदांवरती, अनंत संध्या राग पहा
पूर्ण नभांवर हाय रेखिले, सुंदतेचे रूप महा
बलाक माला उडता भासे, कल्प सुमनची मालाची ते
उतरूनि येती अवनीवरती, ग्राहगोलाची कि एकमते
सुंदर परडी घेऊनि हाती, पुरोपकंठी शद्धमती
सुंदर बाला त्या फुल माला, रम्य फुले पत्री खुडती
सुवर्ण चंपक फुलाला विपिनी, रम्य केवडा दरवळला
पारिजातही बघता, भामारोष मनीचा मावळला
फडफड करूनी थकले,अपुले पंख पाखरे सावरती
सुंदर हरणी हरिव्या कुरणी, निजबाळांसह बागडती
खिल्लारे हि चरती राणी, गोपही गाणी गात फिरे
मंजुळ पाव गात त्याचा, श्रावण महिना एक सुरे
देव दर्शन निघती ललना, हर्ष माइ ना ह्रदयात
वदनी त्यांच्या वाचून घ्यावे, श्रावण महिन्याचे गीत – बालकवी
ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे
आणि ह्या मातीतुनी चैतन्य गावे
कोणती पुण्ये अशी येती फळाला
जोंधळ्याला चांदणे लखडून जावे
ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे
आणि माझ्या पापणीा पूर यावे
पाहता ऋतुगंध कांती सांडलेली
पाखरांशी खेळ मी मांडून गावे
गुंतलेले प्राण ह्या रानात माझे
फाटकी ही झोपडी काळीज माझे
मी असा आनंदुनी बेहोश होता
शब्दगंधे, तू मला बहुत घ्यावे ! – बालकवी
नभं उतरू आलं, चिंब थरथर वलं
अंग झिम्माड झालं, हिरव्या बहरात
अशा वलंस राती, गळा शपथा येती
साता जल्मांची प्रीती, सरंल दिनरात
वल्या पान्यात पारा, एक गगन धरा
तसा तुझा उबारा, सोडून रीतभात
नगं लागंट बोलू, उभं आभाळ झेलू
गाठ बांधला शालू, तुझ्याच पदरा – कवी ना. धो. महानोर
आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहिकडे
वरती खाली मोद भरे , वायूसंगे मोद फिरे
नभांत भरला, दिशांत फिरला, जगांत उरला
मोद विहरतो चोहिकडे
सूर्यकिरण सोनेरी हे , कौमुदि ही हसते आहे
खुलली संधया प्रेमाने , आनंदे गाते गाणे
मेघ रंगले, चित्त दंगले, गान सफुरले
इकडे, तिकडे, चोहिकडे
नीलनभी नक्षत्र कसे , डोकावुिन हे पाहतसे
कुणास बघते? मोदाला; मोद भेटला का त्याला
तयामधे तो, सदैव वसतो, सुखे विहरतो
इकडे, तिकडे, चोहिकडे
वाहति निर्झर मंदगती , डोलित लतिका वृक्षतती
पकी मनोहर कूजित रे , कोणाला गातात बरे
कमल विकसले, भ्रमर गुंगले, डोलत वदले
इकडे, तिकडे, चोहिकडे
स्वार्थाच्या बाजारात, किती पामरे रडतात
त्यांना मोद कसा मिळतो , सोडुिन स्वार्था तो जातो
द्वेष संपला, मत्सर गेला, आता उरला
इकडे, तिकडे, चोहिकडे -बालकवी
या गाण्यातून व्यक्त होणाऱ्या निसर्गाचा आनंदोत्सव साजरा करणं म्हणजे जागतिक वसुंधरा दिन साजरा करणं
निसर्ग सौंदर्यावरील सुविचार – Nature Beauty Quotes In Marathi
निसर्ग म्हणजे परमेश्वराचा विलक्षण आणि अदभूत चमत्कार अशा या निसर्गाचे वर्णन करणारे सुविचार.
पर्यावरण हाच नारायण – सदगुरू श्री वामनराव पै
पृथ्वी फुलांनी हसते – राल्फ वाल्डो इनर्सन
मी देवावर विश्वास ठेवतो, मी फक्त त्याला निसर्ग असं म्हणतो – फ्रॉंक लॉयड राइट
केवळ एकच गुरू निवडा तो म्हणजे निसर्ग – रेमब्रॉंड्ट (Rembrandt)
सर्व पूर्ण होत नाही तोपर्यंत निसर्ग घाई करत नाही – लाओ त्झू
जर तुमचं निसर्गावर खरं प्रेम असेल तर तुम्हाला निसर्गात सगळीकडे सौंदर्य दिसेल – लौरा इंगल्स वाइल्डर
माणसं युक्तिवाद करतात निसर्ग क्रिया करतो – वॉल्टेअर
रंग म्हणजे निसर्गाचं हास्य – लईहंट
निसर्गाच्या सर्व गोष्टींमध्ये काहितरी अद्भूत असते – अॅरिस्टॉटल
निसर्ग हे पर्यटन स्थळ नसून ते आपलं घर आहे – गॅरी स्नायडर
निसर्गाचं रक्षण म्हणजे पाण्याची बचत करणं कारण पाणी निसर्गाचा एक घटक आहे. यासाठीच जाणून घ्या जागतिक जल दिवसानिमित्त ’50’ पाणी वाचवा घोषवाक्य
इन्स्टा कॅप्शनसाठी निसर्ग सुविचार – Nature Captions For Instagram
इन्स्टाग्रामवर स्टेटस अपडेट करण्यासाठी हे कोट्स तुमच्या नक्कीच उपयोगी येतील.
वरूणराजाच्या स्पर्शाने, वसुंधरा चिंब चिंब न्हाली, जणू हिरवा शालु नेसून, शृंगार नववधूचा ल्याली
चराचरातील कणाकणामध्ये अगाध लीला तुझी पाहतो, दिव्य तुझ्या त्या दृश्य रूपाला निसर्ग ऐसे नाव लावतो
माणसं कृत्रिम आणि निसर्ग अप्रतिम दिसायला लागला की समजायचं पाऊस सुरू झालाय
आवडतो मज अफाट सागर, अथांग पाणी निळे, निळ्या जांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे
निसर्ग रंगात रंगुया, सरगम सुर हे आपण छेडूया, निसर्ग रंगात आपण सारे रंगुया
श्रावणसरी प्रभात काळी मेघ दाटती अंबरी, तांबूस पिवळ्या किरणामधुनी रिमझिम रिमझिम बरसते सरी
आभाळानं द्यावे पाणी, धरतीनं गावी गाणी, धरतीनं जागा द्यावी झाडांची आई व्हावी
निसर्ग माझा सखा, निसर्ग माझा सोबती, जिथे जिथे जाईन मी, तिथे हा माझा सांगाती
निळ्या तांबड्या छटा नभाच्या पांघरूी आभाळ हसते, त्याच क्षणी या धरतीवरती दिवस रात्रीचे मिलन होते
निसर्गाचा ठेवा, जपायला हवा, वरदान तयाचे मानवाला दुवा, निसर्गाची कृपा किती अनंत, कधी ठसेल हे मानवी मना
प्रेरणादायी निसर्ग कोट्स – Inspirational Nature Quotes In Marathi
निसर्गावर आधारित हे प्रेरणादायी कोट्स तुमच्या जीवनाला नक्कीच चांगली दिशा देतील.
पाहण्यातला आणि समजून घेण्यातला आनंद ही निसर्गाची सर्वात सुंदर भेट आहे – अल्बर्ट आइनस्टाइन
निसर्ग नियमांसहित, स्वयंचलित, स्वयंनियंत्रित, नैसर्गिक, पद्धतशीर व्यवस्था म्हणजे परमेश्वर – सदगुरू श्री वामनराव पै
निसर्ग अभ्यासा, निसर्गावर प्रेम करा, निसर्गाजवळ राहा, तो आपल्याला कधीच अपयशी करणार नाही – फ्रॅंक लॉईड राईट
फक्त जगणे पुसेसं नाही सुर्यप्रकाश, स्वातंत्र्य आणि लहानसे फुलही गरजेचं आहे – हंस ख्रिश्चन अॅंडसन
निसर्गासोबत टाकलेल्या प्रत्येक पावलागणिक अपेक्षेपेक्षा जास्तच मिळत जाते – जॉन मईर
निसर्गाच्या गतीचा अवलंब करा कारण त्यात धैर्याचे रहस्य आहे – राल्फ वाल्डो इमर्सन
वसंत ऋतू म्हणजे निसर्गाचा आनंदोत्सव साजरा करण्याची अप्रतिम पद्धत – रॉबिन्स विल्यम्स
साधेपणा हा निसर्गाचे पहिले पाऊल आहे, शेवटचे कला आहे – फिलिप्स जेम्स बेली
प्रत्येक डोंगरावर एक मार्ग दडलेला आहे, जरी तो दरीखोऱ्यातून दिसत नसला तरी – थिओडोर रोएटेक
प्रत्येक फुलात आत्मा आहे जो निसर्गात उमलत असतो – जेरार्ड डी नर्वल
हेही वाचा –
Slogan on Earth in Hindi
About Earth Day in Hindi
Slogan on Environment Day in Hindi