घरात तान्हुली परी आली की, एक वेगळंच चैतन्य घरात येतं. घरात लक्ष्मी रुपाने येणाऱ्या कन्येचे किती लाड करु असे होऊन जाते. आजी-आजोबांची लाडकी, आई- बाबांची परी… असलेल्या कन्येचे सगळे लाड पुरवण्यासाठी सगळेच सज्ज असतात. आताच्या या काळात मुलगीच व्हायला हवी. असा होणाऱ्या आई-बाबांचा हट्ट असतो. आपल्या मुलीचे नाव काय ठेवायचे? ते जरा युनिक असायला हवे असे प्रत्येक पालकांना वाटते. मुलांपेक्षाही मुलीचे नाव हे थोडे वेगळे आणि हटके असावे असे प्रत्येक पालकांचे मत असते. त्यामुळे घरात मुलगी झाली की, लगेचच नावाचा शोध सुरु होते. मुलीच्या जन्मवेळेनुसार आणि पत्रिकेनुसार जर तिच्या नावाचे आद्याक्षर ‘प’ आले असेल तर तुम्ही प वरून मुलींची नावे (p varun mulinchi nave) ठेवू शकता. आम्ही तुमच्यासाठी प वरून मुलींची नावे शोधून काढली आहेत. जी एकदम युनिक आहे आणि त्यासोबतच त्यांचे अर्थही दिलेले आहेत. यामध्ये प वरून मुलींची नावे नवीन, प वरुन मुलींची जुनी नावे, प वरुन मुलींची रॉयल नावे यांचा समावेश आहे. तुमच्याही आजुबाजूला कोणाला मुलगी झाली असेल आणि ते काही वेगळ्या नावांच्या शोधात असतील तर तुम्ही काही युनिक नावं नक्की ठेवू शकता. तसंच वाचा द वरून अक्षरावरून मुलींसाठी खास नावे (d varun mulinchi nave).
‘ध’ वरुन मुलांची नावे, युनिक आणि आधुनिक अर्थासह (‘Dha’ Varun Mulanchi Nave)
प वरुन मुलींची युनिक नावे अर्थासह (Unique Baby Girl Names In Marathi Starting With ‘P’)
Unique Baby Girl Names In Marathi Starting With ‘P’
प वरुन मुलींची काही युनिक नावे शोधून काढली आहेत. जी हाक मारल्यानंतर खुप जणांच्या नजरा तिच्याकडे जाणारच.
मुलींची नावे | नावांचे अर्थ |
पंखुडी | फुलाची पाकळी |
पलाशी | शुभ्र |
पलक | डोळ्यांची रक्षा करणारी,पापणी |
प्रियोना | आवडती व्यक्ती, सगळ्यात प्रिय |
प्रदुनी | कमळ |
परिष्णा | प्रिय |
पलाशा | लाल फुलांचे एक झाड, पलाश |
पीयुषी | अमृत जल |
परुषी | सुंदर आणि बुद्धिमान |
प्रेशा | ईश्वराद्वारे दिलेले गुण |
पर्याप्ती | संपूर्ण |
पर्णश्री | पाकळ्यांची सुंदरता |
पियाली | वृक्ष |
प्रिशिता | देवाचे नाव असलेली |
पविश्ना | दिव्य, देवी सारखी सुंदर |
पाजस | देवी लक्ष्मी |
पार्थी | राणी |
पूर्णश्री | सौंदर्यन्वित |
पुष्पिता | फुललेली |
पौरवी | शहर |
स वरून मुलींची नावे, खास तुमच्यासाठी (“S” Varun Mulinchi Nave In Marathi)
प वरुन मुलींची रॉयल नावे अर्थासह (Royal Baby Girl Names In Marathi Starting With ‘P’)
Royal Baby Girl Names In Marathi Starting With ‘P’
जर तुम्हाला प वरून मुलींची नावे शोधताना काही रॉयल नावे हवी असतील तर तुमच्या रॉयल आवडीसाठी मुलींची ‘प’ वरुन रॉयल नावे
मुलींची नावे | नावांचे अर्थ |
पौलोमी | देवी सरस्वती |
परंद | रेशमासारखी मऊसुत |
पृथा | पृथ्वी |
प्राप्ति | लाभ |
पार्श्वी | लोखंडाचे सोने करणारा दगड |
पाखी | पक्षी |
प्रांजल | निरागस, निर्दोष |
पक्षालिका | योग्य मार्गावर असणारी |
परोक्षी | अदृश्य |
पाजस | देवी लक्ष्मी |
पश्चिमा | पश्चिम दिशा |
पूर्वा | पूर्व दिशा, पूर्वा नक्षत्र |
पार्थी | राणी |
पौष्टी | मजबूत |
प्रियवदना | गोड चेहऱ्याची |
प्रभदा | स्त्री |
प्रदिप्ती | चमक, तेज |
प्रभृती | नियती |
पिरोजा | रत्न विशेष |
प्रणवी | क्षमा |
प वरुन मुलींची जुनी नावे अर्थासह (Old Baby Girl Names Starting With ‘P’ In Marathi)
Old Baby Girl Names Starting With ‘P’ In Marathi
काही जुनी नावे आजही खूप जण ठेवतात. जुनी नावेही खूप छान होती. त्यामुळेच तुमच्यासाठी आम्ही शोधून काढली आहेत. प वरुन मुलींची जुनी नावे
मुलींची नावे | नावांचे अर्थ |
पद्मनयना | कमळासारखे सुंदर डोळे असणारी |
पद्मसुंदरी | कमळासारखी सुंदर |
पद्मराणी | कमळांची राणी |
पद्माक्षी | कमळासारखे डोळे असणारी |
पद्मिनी | रुपवान स्त्री |
प्रगती | सुधारणा |
प्रतिभा | तेज, बुद्धी, प्रकाश, स्वरुप |
प्रथमा | पहिली |
प्रणाली | वाड्: मय परंपरा |
प्रफुल्ला | हसरी, टवटवीत |
प्रमिला | राज्याची राणी, राणी |
प्रबोधिनी | जागृकता |
प्रज्ञा | ज्ञान, बुद्धी |
प्राजक्ता | पारिजातकाचे फुल |
प्रभा | तेज |
परिमला | सुगंधी |
प्रीती | निखळ प्रेम |
पुनम | पौर्णिमा |
प्रेमला | प्रेमळ |
पुष्पगंधा | फुलांचा सुगंध असलेली |
स वरून मुलांची नावे, तुमच्यासाठी खास नावे (Baby Boy Names Starting With “S” In Marathi)
प वरुन मुलींची पौराणिक नावे अर्थासह (Mythical Baby Girl Names Starting With ‘P’ In Marathi)
Mythical Baby Girl Names Starting With ‘P’ In Marathi
काही जणांना पुराणामधील नावं ठेवायलाही आवडतात. अशी नावेही ट्रेंडमध्ये आहेत जाणून घ्या प वरुन मुलींची पौराणिक नावे
मुलींची नावे | नावांचे अर्थ |
पद्मजा | कमळापासून निर्माण झालेली देवी |
पाविका | देवी सरस्वती |
पृथिका | पृथ्वी |
प्रियंवदा | गोड बोलणारी |
पयोष्णिका | गंगा नदी |
पर्णाक्षी | डोळ्यांचा आकार पानासारखी असणारी |
पयोधि | समुद्र |
परिणीता | विशेषज्ञ, पूर्ण ज्ञान |
परिविता | स्वतंत्र |
प्रिशिता | देवाचे नाव असलेली |
पल्लविनी | कळी, पाकळ्यांसोबत |
पिंगला | देवी लक्ष्मी, देवी दुर्गा |
पुण्यकिर्ति | देवी दुर्गेचे नाव |
पार्थिवी | सीतेचे नाव |
पुलकिता | आनंदी |
पद्मल | कमळ |
पानीथा | प्रशंसा केलेली |
पर्णी | पर्णी |
पाविका | देवी सरस्वती |
पावना | शुद्धता |