Advertisement

Diet

पोटातील चरबी आणि वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे पपई

Dipali NaphadeDipali Naphade  |  Dec 13, 2019
पोटातील चरबी आणि वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे पपई

Advertisement

वजन वाढल्यानंतर सर्वात जास्त चरबी जर कुठे जमा होत असेल तर ते आहे पोट. पोटातील ही चरबी कमी करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. व्यायामाने तर वजन कमी करण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो पण त्याचबरोबर तुम्हाला जर आम्ही सांगितलं की, पपईनेदेखील तुमच्या पोटातील चरबी आणि वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते तर…हो हे खरं आहे. अशा काही भाज्या आणि फळं आहेत ज्यामुळे आपलं वजन कमी करता येतं. त्यापैकी सर्वात फायेशीर ठरते ती पपई. पपई या फळामध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स, मिनरल्स असातत आणि सर्वात कमी असाते ती कॅलरी. पपईमध्ये असणारे इंजाम्स हे केवळ आपलं वजन कमी करत नाहीत तर शरीरातील वाईट कॉलेस्ट्रॉल कमी करण्याचं कामही पपई करते. पपई कशी खाल्ली तर त्याचा आपलं वजन कमी करण्यासाठी आणि पोटातील चरबी कमी करण्यासाठी फायदा होतो ते जाणून घेऊया – 

वजन कमी होताना पोषण मिळणंही गरजेचं

Shutterstock

वजन कमी करण्यापेक्षाही जास्त गरजेचं आहे ते म्हणजे वजन अशा तऱ्हेने कमी करावं ज्याने आपल्या शरीराचं पोषणही कमी होऊ नये.  कारण शरीराला योग्य पोषण मिळणंही आवश्यक आहे. पपईमध्ये असे अनेक पोषक तत्व आढळतात. ज्यामुळे, तुम्ही तुमच्या शरीरावरील चरबी कमी करू शकता आणि तुमचं शरीर व्यवस्थित पहिल्याप्रमाणे योग्य आकारात येऊ शकेल. त्याचबोरबर तुम्हाला पोषण देण्यासाठीही पपईची मदत होते. पपईमध्ये अनेक मिनरल्स असल्यामुळे तुमच्या शरीराला योग्य पोषण मिळतं. 

चेहऱ्याला चमक देतील हे फ्रूट पील्स

पपईच्या बिया आहेत जास्त फायदेशीर

Shutterstock

वजन कमी करण्यासाठी सर्वात जास्त ज्या गोष्टीचा फायदा होतो ते म्हणजे पपईच्या बिया. पपई ही आपल्या शरीराची पचनक्रिया सुधारण्यासाठी फायदेशीर ठरते. तसंच आपल्या शरीराला आवश्यक असणाऱ्या फायबरची गरजही पपईमुळे पूर्ण होते. त्याचप्रमाणे पपईच्या बियांमध्ये आपल्या शरीरातील विषारी पदार्थ अर्थात टॉक्झिन्स काढून टाकण्याची ताकद असते. त्यामुळे आपलं शरीर शुद्ध राहून शरीरातील मेटाबॉलिजम नियंत्रित करण्यासाठी या बियांचा उपयोग होतो. मेटाबॉलिजम व्यवस्थित असल्यास, शरीरामध्ये चरबी जमा होत नाही आणि वजनही वाढत नाही. 

चमकदार त्वचा हवी असल्यास करा घरगुती फेसपॅकचा (Homemade Facepack) वापर

करा पपईचं डाएट

Shutterstock

तुम्हाला वजन कमी करण्यासाठी पपईचा उपयोग करायला हवा. खरं तर तुम्ही तुमच्या डाएटमध्ये पपईचा समावेश करून घ्यायला हवा. पपई हे तुम्हाला तुमच्या शरीराचं डिटॉक्झिफिकेशन करण्यासाठी आणि शरीरातून चरबी कमी  करण्यासाठी उपयुक्त ठरते. त्यामुळे तुम्ही तुमच्या डाएटमध्ये याचा समावेश करू घ्या आणि रोज मर्यादेत तुम्ही पपई खायला हवी. कारण पपई शरीरासाठी उष्ण असते. त्यामुळे तुमची प्रकृती लक्षात घेऊन याचा तुमच्या आहारात समावेश करून घ्या. 

सौंदर्य खुलविण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी नियमित खा ‘पपई’

सकाळी नाश्त्यामध्ये खा पपई

सकाळी आपण नेहमीच भरपेट नाश्ता करायला हवा. जेणेकरून तुम्हाला दुपारच्या जेवणाआधी जास्त भूक लागणार नाही. तुम्ही जेव्हा भरपेट नाश्ता करणार आहात तेव्हा तुम्ही एक ग्लास दूध आणि एक मोठा बाऊल पपई खाणं जास्त चांगलं आहे. तसंच दुपारी जेवताना तुम्ही इतर उकडलेल्या भाज्यांसह पपईचं ज्युस पिऊ शकता. त्यामुळे तुमचं पोट लवकर भरेल आणि तुम्हाला भूक लवकर लागणार नाही. त्यामुळे तुम्ही सहसा अरबट चरबट खाण्याकडे लक्ष देणार नाही. तसंच पपई ही हेल्दी असल्याने याचा तुमच्या त्वचेवरही चांगला परिणाम होईल. तर रात्री तुम्ही पपई जेवणाच्या वेळेत खाऊ शकता. रात्रीच्या जेवणाच्या वेळेत नेहमी हलकं जेवण जेवायचा सल्ला देण्यात येतो. तेव्हा तुम्ही पपईचं सूप हा एक चांगला पर्याय निवडू शकता. ताजी पपई तुम्ही तुमच्या डाएटमध्ये समाविष्ट केलीत तर तुमच्या जेवणात एक गोड डिश म्हणून त्याचा उपयोग होऊ शकतो. 

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.

मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.