रणवीर सिंह सध्या कपिल देवची भूमिका ‘83’ या वर्ल्ड कपवर आधारित चित्रपटामध्ये साकारत आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण संपलं असून एप्रिल 2020 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी रणवीर सिंह सध्या चर्चेमध्ये आहे. त्याने नुकताच या चित्रपटाचा नवा फोटो शेअर केला असून हा फोटो व्हायरल होत आहे. बॉलीवूडसह क्रिकेटप्रेमीदेखील या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. या चित्रपटात केलेला रणवीरचा लुक हा पूर्णतः कपिल देवसारखा दिसत असून रणवीरला ओळखणंही कठीण झालं आहे. या नव्या शेअर केलेल्या फोटोमध्ये कपिल देवचा नटराज शॉट मारताना रणवीर दिसत आहे. लवकरच या चित्रपटाचं पोस्ट प्रॉडक्शनदेखील पूर्ण होईल. पुन्हा एकदा या चित्रपटात रणवीर आणि दीपिका एकत्र दिसणार याचाही प्रेक्षकांना आनंद आहे. आतापर्यंत या दोघांचा प्रत्येक चित्रपट हिट ठरला आहे.
कपिल देवचा प्रसिद्ध नटराज शॉट
कपिल देव क्रिकेट खेळताना जो नटराज शॉट मारत होते त्याचप्रमाणे नव्या फोटोमध्ये रणवीर नटराज शॉट मारताना दिसत आहे. कपिल देव खेळताना जेव्हा शॉट मारत असत तेव्हा तो शॉट नटराजाच्या मूर्तीप्रमाणे दिसत असे. म्हणूनच या शॉटला नटराज शॉट असं नाव होतं. या चित्रपटातदेखील रणवीर सिंहने कपिल देव यांची हुबेहूब नक्कल करण्याचा प्रयत्न केला आहे. कपिल देव यांची बोली, त्यांची चालण्याची आणि खेळण्याची पद्धत हे सर्व रणवीरने अंगिकारलं आहे. 1983 मध्ये कपिल देव यांच्या मार्गदर्शनाअन्वये भारताने पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकला. भारतासाठी हा अतिशय अभिमानाचा आणि ऐतिहासिक असा क्षण होता. सर्वात पहिल्यांदा आलेल्या पोस्टरमध्ये बॉलिंग करतानाचा फोटो रणवीरचा होता. पण आता नटराज शॉटचा बॅटिंग करतानाचा हा फोटो रणवीरने शेअर केला आहे. त्यामुळे आता पुढे अजून कोणकोणते लुक असणार आणि या चित्रपटामध्ये कसा सिक्वेन्स घेतला गेला असेल याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आणि चाहत्यांमध्ये वाढू लागली आहे.
आगामी ’83’ मध्ये रणवीर सिंगचा नवा रेकॉर्ड
चित्रीकरण झालं इंग्लंडमध्ये
या चित्रपटाचं चित्रीकरण हे इंग्लंडमध्ये करण्यात आलं आहे. तसंच रणवीर कपिल देव साकारत असून त्यांच्या पत्नी रोमी भाटियाची भूमिका रणवीरची रिअल लाईफ पत्नी दीपिका साकारत आहे. तिची या चित्रपटामध्ये लहान भूमिका असली तरीही अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचं म्हटलं जात आहे. याशिवाय चित्रपटामध्ये ताहीर राज भसीन, साकिब सलीम, आदिनाथ कोठारे यांच्यादेखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन कबीर खानने केलं आहे. कबीर खान त्याच्या अॅक्शनपॅक्ड आणि खेळाशी संबंधित चित्रपटांसाठी ओळखला जातो. त्यामुळे या चित्रपटाकडूनही प्रेक्षकांच्या खूपच अपेक्षा आहेत.
रणवीर सिंह ठरतोय नंबर वन सेलिब्रेटी ब्रॅंड
रणवीरकडे इतरही चित्रपट
रणवीर सिंह सध्या खूपच व्यग्र आहे. त्याच्याकडे इतरही अनेक चित्रपट असून सध्या रणवीर जो चित्रपट करेल तो पडद्यावर हिट होत आहे. बाजीराव मस्तानी,पद्मावत, सिंबा, गली बॉय असे एकामागोमाग एक वेगळ्या भूमिका असलेले हिट चित्रपट रणवीरने या दोन ते तीन वर्षांच्या काळात दिले आहेत. ‘जयेशभाई जोरदार’ चित्रपटातही तो गुज्जू भाईची भूमिका साकारणार आहे असे कळत आहे. त्याने या चित्रपटाची अधिकृत घोषणा त्याच्या अकाऊंटवरुन केली आहे. जयेशभाई जोरदार हा यशराजचा चित्रपट असून हा चित्रपट दिव्यांक ठक्कर दिग्दर्शित करणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रणवीरला ही कथा आवडली आणि त्याने लगेचच या चित्रपटाला होकार दिला. या चित्रपटातील जयेश हा दिलदार आहे असे देखील त्याने एका मुलाखतीदरम्यान सांगितले.
तुमचा आवडता रणवीर बनणार गुज्जू भाई, साकारणार जयेश भाई
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.
मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.