ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
टोमॅटो खाण्याचे फायदे (Tomato Benefits In Marathi)

टोमॅटो खाण्याचे फायदे (Tomato Benefits In Marathi)

टोमॅटोशिवाय आपण किचनमधल्या कुठल्याही ग्रेव्ही रेसिपीचा विचार करू शकत नाही. टोमॅटोचा वापर आपण दैनंदिन आयुष्यात भाजी म्हणूनच करतो, पण खरंतर हे एक फळ आहे. लाल-लाल टोमॅटो जितके दिसायला सुंदर असतात, त्यापेक्षाही चवीला छान आणि भरपूर गुणयुक्त आहेत. याच्या किमतीवरूनच तुम्हाला कळत असेल की, वर्षभर टोमॅटोच्या दरात चढ-उतार होत असतो. कधी हे एवढे महाग होतात की, घेतानाही विचार करावा लागतो तर कधी दोन देशांच्या युद्धात बिचाऱ्या टोमॅटोवर नामुष्कीची वेळ येते. भारतात टोमॅटोची सर्वात जास्त उत्पादन होते, त्यामुळे ते सहज उपलब्ध होतात. आपल्या दैनंदिन आयुष्यात टोमॅटोचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. खाण्याशिवाय वजन कमी करण्यांमध्ये आणि अनेक आजारांचा सामना करण्यात टोमॅटो गुणकारी आहे. जाणून घ्या किचनमध्ये सहज उपलब्ध असणाऱ्या टोमॅटोचे फायदे (tomato che fayde in marathi) आणि तोटे.

पोषक तत्वयुक्त टोमॅटो (Tomatoes Are Rich In Nutrients)

टोमॅटो चे फायदे

टोमॅटो हे चवीला काहीसे आंबट असतात, कारण यामध्ये सायटीक अॅसिड असते. याशिवाय टोमॅटोमध्ये प्रोटीन, व्हिटॅमीन्स, मिनरल्स आणि फायबरची मात्राही भरपूर असते. हे व्हिटॅमीन ए, व्हिटॅमीन सी, व्हिटॅमीन ई आणि व्हिटॅमीन के चा खूप चांगला स्त्रोत आहे. ही सर्व व्हिटॅमीन्स आरोग्यासाठी खूप चांगली मानली जातात. व्हिटॅमीन ए ची मात्रा असल्याने टोमॅटो डोळ्यांसाठी खूपच फायदेशीर आहे. टोमॅटोमध्ये पोटॅशिअम आणि मँगनीज भरपूर प्रमाणात असते. तसंच टोमॅटो कॅल्शिअम, आर्यन, कॉपर, मॅग्नेशिअम, फॉस्फरस आणि झिंक यासारख्या तत्त्वांनी युक्त असतो. टोमॅटोमध्ये अँटीऑक्सिडेंट गुणही आढळतात, जे कॅन्सर आणि हृदयरोगासारख्या गंभीर रोगांपासून बचाव करण्यासाठी सहायक असतात. टोमॅटोमधील लाल रंग हा त्यातील लाइकोपीनमुळे प्राप्त होतो, जे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. याच कारणामुळे कच्चा टोमॅटो पिकल्यानंतर अजून प्रभावकारक ठरतो.  

टोमॅटो खाण्याच्या पद्धती (Ways To Eat Tomato)

रोजच्या भाज्यांमध्ये टोमॅटोचा वापर (Use Tomato In Vegetable)

प्रत्येकाच्या किचनमध्ये टोमॅटो हा असतोच. याशिवाय कोणतीही भाजी अपूर्ण आहे. प्रत्येक भाजी आणि आमटीची चव वाढवण्यात टोमॅटोचा सर्रास (tomato information in marathi) वापर होतो. प्रत्येक भाजीच्या वाटणासाठी तुम्ही कांदा, लसूण, आलं आणि मसाल्यांसोबत टोमॅटोचा वापर करायलाच हवा. मग बघा तुमच्या भाजीची चव दुपटीने वाढेल आणि रंगही छान येईल.  

टोमॅटोची कमाल चटणी (Tomato Chutney Is Also Amazing)

ADVERTISEMENT
tomato uses in marathi

टोमॅटोचा वापर हा फक्त भाजी आणि आमटीमध्ये नाहीतर चवदार चटणी बनवण्यासाठीही केला जातो. जाणून घ्या चवटार टोमॅटो चटणीची सोपी रेसिपी

आवश्यक साहित्य (Necessary Ingredients)

टोमॅटो – 7 ते 8

कांदा – 1

ADVERTISEMENT

लसूण – 8- 10 पाकळ्या

हिरवी मिरची – 1

मोहरी – अर्धा चमचा

तिखट – अर्धा चमचा

ADVERTISEMENT

तेल- 4 चमचे

मीठ – चवीनुसार

हींग- चिमूटभर

कृती  (Method To Make)

ADVERTISEMENT

1- सर्वात आधी गॅस लावून त्यावर एक पातेल ठेवा.

2- आता या पातेल्यात पाणी उकळून घ्या. पाणी उकळल्यावर त्यात टोमॅटो घाला आणि 2 ते 3 मिनिटं उकळून घ्या. मग गॅस बंद करा.

3- थोड्यावेळानंतर टोमॅटोची सालं काढून मिक्सरमध्ये वाटून घ्या.

4- नंतर कांदा आणि लसून बारीक चिरून घ्या.

ADVERTISEMENT

5- आता एका कढईत तेल गरम करा आणि त्यात फोडणीचं साहित्य घाला. मोहरी तडूतडू लागल्यावर त्यात लसून, कांदा आणि हींग घाला. परतून घ्या.

6- चांगलं परतून झाल्यावर त्यात वाटलेला टोमॅटो, तिखट आणि मीठ घालून चांगलं मिक्स करा.

7- आता हे मिश्रण चांगल परतून घ्या जोपर्यंत ते दाट होईल. दाट झाल्यावर गॅस बंद करा. तुमची चटणी तयार आहे.

वेटलॉससाठी करून पाहा ‘ही’ योगासनं (Weightloss Guide)

ADVERTISEMENT

पौष्टीक सॅलडची चव वाढवा (Increase The Taste Of Salad)

टोमॅटोचा वापर आपण सर्रासपणे कोंशिबीरीत करतो तसंच तो सॅलडमध्येही करू शकतो. सॅलडमध्ये कच्चा टोमॅटो वापरताना त्याचं सालं काढू नका. कारण टोमॅटोच्या सालांमध्ये सर्वात जास्त पौष्टीक तत्त्व आढळतात.

टोमॅटोचे फायदे (Tomato Benefits In Marathi)

tomato benefits in marathi

हाडांच्या बळकटीसाठी (For Strengthen Bones)

टोमॅटोही अक्षरक्षः गुणांची खाण आहे. यामध्ये व्हिटॅमीन के आणि कॅल्शिअम आढळतं, ही दोन्ही तत्त्वं हाडांना मजबूत करण्यात आणि हाडांची दुरूस्ती करण्यात उपयोगी पडतात. तसंच टोमॅटोमधील व्हिटॅमीन सी आणि अँटीऑक्सीडंट हाडातील दोष दूर करण्यास मदत करतं.

कॅन्सरपासून बचाव करतो टोमॅटो (Tomato Protects Against Cancer)

टोमॅटोच्या औषधीय गुणांमुळे कॅन्सरसारख्या घातक आजारांपासूनही बचाव होतो. टोमॅटोमध्ये लायकोपीन नामक घटक भरपूर प्रमाणात आढळतो, जो कोणत्याही प्रकारचा कॅन्सर रोखण्यास फायदेशीर आहे. कॅन्सर कमी करण्याऱ्या लायकोपीन या तत्त्वाशिवाय टोमॅटोमध्ये नियासीन, व्हिटॅमीन बी6, पोटॅशिअम यांसारखी तत्त्वही असतात. ही सर्व तत्त्व हृदयासाठी फायदेशीर मानली जातात. अनेक सर्वेक्षणानुसार, जर तुम्ही नियमितपणे एका आठवडाभर कमीतकमी 10 टोमॅटोचं सेवन केल्यास कॅन्सर होण्याची शक्यता जवळपास 45 टक्क्यांनी कमी होते. पुरूषांनी जर रोज टोमॅटो खाल्ला तर प्रोस्टेटच्या कॅन्सर होण्याची शक्यता कमी होते. एवढंच नाहीतर ज्या लोकांना ट्यूमर आहे, त्यांचा ट्यूमर कमी होण्यास आणि ट्यूमरची वाढ थांबण्यासही टोमॅटोची मदत होते. तर महिलांना याचा फायदा सर्वात जास्त होतो. जर तुम्हाला पोटाचा कॅन्सर टाळायचा असेल तर रोज सॅलडच्या रूपात टोमॅटो खायला हवा.

ADVERTISEMENT

वजन कमी करतो टोमॅटो (Tomato Also Reduce Weight)

तुम्हाला माहीत आहे का, टोमॅटोचं सेवन वाढत्या वजनाला आटोक्यात आणू शकतं. खरंतर यामध्ये खूप कमी प्रमाणात चरबीसोबतच जीरो कॉलेस्टॉल असतं, जे वजन वाढू देत नाही. टोमॅटोमधील भरपूर पाणी आणि फायबरमुळे विना कॅलरीज तुमचं पोट भरण्यास मदत होते. त्यामुळे भूक कमी लागते. जर तुम्ही वाढत्या वजनामुळे चिंतीत असाल आणि वजन कमी करण्याबाबत विचार करत असाल तर आजच टोमॅटोचं नियमित सेवन सुरू करा.

टोमॅटोच्या ज्यूसचे फायदे (Benefits Of Tomato Juice)

टोमॅटोमध्ये पाणी आणि फायबरची मात्रा जास्त असते. त्यामुळे पोट लवकर भरतं आणि फॅट्सही वाढत नाहीत. तुम्ही टोमॅटोचं सेवन ज्यूस, सूप, सॅलड कोणत्याही प्रकारे करू शकता. आम्ही तुम्हाला सांगत आहोत टोमॅटोच्या ज्यूसचे फायदे.

1- जर तुम्हाला लो किंवा बैचेन वाटत असेल तर टोमॅटो ज्यूस प्या. कारण टोमॅटोचा ज्यूस शरीराला उर्जा देतो.

2- टोमॅटोचं सेवन हाय बीपीने त्रस्त असलेल्या लोकांसाठीही फायदेशीर आहे. कारण टोमॅटोमध्ये पॉटेशिअम भरपूर प्रमाणात आढळतं. त्यामुळे टोमॅटोचा एक कप ज्यूसही फायदेशीर आहे. हृदयरोगांमध्येही टोमॅटो ज्यूसचं सेवन गुणकारी असतं. पण हा ज्यूस घेण्याआधी एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.  

ADVERTISEMENT

3- टोमॅटोचा ज्यूस फक्त मोठ्यांनाच नाहीतर लहानग्यांसाठीही फायदेशीर आहे. मुलांच्या मानसिक आणि शारीरिक विकासात यामुळे मदत होते. याशिवाय मुलांच्या पोटात जंत झाल्यास सकाळी रिकाम्या पोटी टोमॅटो ज्यूसमध्ये काळीमिरी घालून दिल्यास फायदा होतो.

4- टोमॅटोमध्ये व्हिटॅमीन ए आणि सी आढळतं, जे डोळ्यांची नजर वाढवण्यास मदत करतं.  याशिवाय टोमॅटोमुळे डोळ्यांना होणारा रांताधळेपणाही कमी होतो. टोमॅटो मोतीबिंदूची वाढही रोखतो.

टोमॅटो ज्यूस कसा बनवावा (Recipe Of Tomato Juice)

tomata juice

आवश्यक साहित्य  (Necessary Ingredients)

ADVERTISEMENT

टोमॅटो – दोन पिकलेले

काळी मिरी – ¼  चमचा

मध – दोन चमचे

टोमॅटो ज्यूस बनवायची कृती (Method To Make)

ADVERTISEMENT

1- सर्वात आधी टोमॅटो मिक्सरमध्ये वाटून त्याचा रस काढून घ्या.

2- दुसरीकडे काळी मिरी कुटून किंवा वाटून त्याची पावडर करून घ्या.

3- आता टोमॅटो रस ग्लासात घेऊन त्यात काळी मिरी पावडर चांगली मिसळून घ्या.

4- आता या मिश्रणात दोन चमचे मध मिसळा.

ADVERTISEMENT

5- तुमचा ज्यूस तयार आहे.

6- या ज्यूसचं सेवन आधी डॉक्टरांचा सल्ला घेऊन मगच रोज सकाळी करा.

वाचा – भारतीय स्वयंपाकात वापरण्यात येणाऱ्या हिंगाचे महत्त्व

टोमॅटो सूपही फायदेशीर (Tomato Soup Is Also Beneficial)

ADVERTISEMENT
tomato soup

टोमॅटो खाण्याचे जितके फायदे (tomato khanyache fayde) आहेत, त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त फायदेशीर आहे टोमॅटो सूप पिणं. आपण नेहमीच जेवणाआधी टोमॅटो सूप घेणं पसंत करतो. थंडीत तर हे सूप जास्तच चवदार लागतं. या सूपमध्ये कॅलरीची मात्रा खूपच कमी असते. यामध्ये व्हिटॅमीन ए, ई, सी, के आणि अँटी ऑक्सीडंट्ससारखी पोषक तत्त्व असतात. जी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. टोमॅटो सूप पिणाऱ्यांच्या शरीरात कधीच रक्ताची कमतरता निर्माण होत नाही. याशिवाय हे डायबेटीजवरही लाभदायक आहे. धूम्रपानामुळे शरीराचं नुकसान झाल्यास टोमॅटो सूप पिऊन तुम्ही ती उणीव भरून काढू शकता. टोमॅटो सूपमध्ये भरपूर प्रमाणात कॉपर आढळतं, ज्यामुळे नर्व्हस सिस्टम चांगलं राहतं. यामध्ये पोटॅशिअम भरपूर असतं. हे तत्त्व मेंदूला बळकटपणा देतं.

कसं बनवाल टोमॅटो सूप (Recipe Of Tomato Soup)

आवश्यक साहित्य (Necessary Ingredients)

टोमॅटो- 3 से 4 मध्यम आकाराचे

ADVERTISEMENT

लसूण- 2 ते 3 कळ्या

कांदा- 1 छोटा

तमालपत्र – 1 पान

काॅर्नफ्लोवर- 1 छोटा चमचा

ADVERTISEMENT

बटर- 1 ते दीड छोटा चमचा

पाणी- 1 कप

क्रीम- 1 ते 2 चमचे

साखर- अर्धा चमचा किंवा आवश्यकतेनुसार

ADVERTISEMENT

ब्राउन किंवा व्हाईट ब्रेड- 1 ते 2 स्लाईस

काळी मिरी – चवीनुसार

मीठ- चवीनुसार

टोमॅटो सूप बनवण्याची कृती (Method To Make)

ADVERTISEMENT

1- सर्वात ताजे आणि लाल टोमॅटो धूवून घ्या.

2- आता एका पातेल्यात पाणी घेऊन त्यात एक छोटा चमचा मीठ घालून उकळून घ्या.

3- आता उकळत्या पाण्यात टोमॅटो घाला आणि गॅस बंद करा.

4- आता हे उकळतं पाणी कमीत कमी 15 ते 20 मिनिटं छाकून ठेवा.

ADVERTISEMENT

5- या दरम्यान लसूण आणि कांद्याचे छोटे छोटे तुकडे करून ठेवा.

6- आता एक तवा घेऊन गॅसवर ठेवा. त्यावर दोन्ही बाजूने ब्रेड ब्राऊन आणि क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्या.

7- नंतर भाजलेल्या ब्रेडचे चौकोनी तुकडे करून घ्या.

8- आता कोर्नफ्लोवर पाण्यात मिसळून पेस्ट बनवून घ्या.

ADVERTISEMENT

9- वेळ पूर्ण झाल्यावर पाण्यातून टोमॅटो काढून घ्या आणि त्याची सालं काढा.

10- आता टोमॅटो मिक्सरमध्ये वाटून त्याची प्युरी करून घ्या.

11- यानंतर एक पॅन गॅसवर ठेवून त्यात बटर घाला. बटर वितळल्यावर त्यात तमालपत्र घाला आणि 5 ते 6 सेकंदापर्यंत तळून घ्या. नंतर त्यात लसूण अॅड करून सोनेरी होऊ द्या.

12- अशाच प्रकारे त्यात कांदा घालून सोनेरी होईपर्यंत तळा.

ADVERTISEMENT

13- आता या मिक्श्चरमध्ये टोमॅटो प्युरी, मीठ आणि काळी मिरी मिक्स करा. मंद आचेवर सूप शिजू द्या, जोपर्यंत त्याला उकळी येत नाही.

14- उकळी आल्यावर त्यात काॅर्नफ्लोवरची पेस्ट घाला आणि 3 ते 4 मिनिटांपर्यंत मंद आचेवर शिजू द्या.

15- आता यात थोडी साखर घाला आणि क्रीम अॅड करून गॅस बंद करा.

16- तुमचं सूप तयार आहे. आता हे सूप बाऊलमध्ये घेऊन ब्रेडचे तुकडे त्यात घाला आणि कोथिंबीरीने सजवा.

ADVERTISEMENT

टोमॅटोचे तोटे (Side Effects Of Tomato)

1- टोमॅटोच्या बियांमुले किडनी स्टोन होण्याची शक्यता असते. जर तुम्हाला किडनी स्टोनचा त्रास असेल तर टोमॅटोच्या बिया काढून मग त्याचं सेवन करा.

2- टोमॅटोमध्ये अधिक प्रमाणात आम्ल असतं त्यामुळे ज्यादा सेवन केल्यास अॅसिडीटी होऊ शकते आणि छातीत जळजळही होऊ शकते.

3- टोमॅटोच्या जास्त सेवनाने पोटात दुखणे आणि गॅसचा त्रासही होऊ शकतो.

तुम्हाला कदाचित या गोष्टी आवडतील:

ADVERTISEMENT

कमी वेळात चमकदार त्वचा हवी असल्यास वापरा बदामाचं तेल

जाणून घ्या आयुर्वेदानुसार पाणी पिण्याचं महत्त्व आणि योग्य पद्धत

तुमच्या आयुष्यातील तणावाला करा बाय-बाय

Health Benefits Of Giloy & How To Make Giloy Kadha In Marathi

ADVERTISEMENT

Benefits Of Olive Oil For Skin, Hair & Health In Marathi

Tomato Benefits in Hindi

25 Mar 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT