ADVERTISEMENT
home / Skin Care Products
म्हणून आलिया भट दिसते इतकी सुंदर, जाणून घ्या रहस्य

म्हणून आलिया भट दिसते इतकी सुंदर, जाणून घ्या रहस्य

‘गली बॉय’ मधली रापचिक गर्ल आलिया भट तिच्या अभिनयातील प्रयोगामुळे जितकी प्रसिद्ध आहे तितकी ती प्रसिद्ध आहे तिच्या सौंदर्यामुळे.. तिची नितळ त्वचा तिची ओळख आहे. कारण इतर सेलिब्स कितीही हेवी मेकअपमध्ये असले तरी आलिया तिच्या नॅचरल लुकमध्ये अनेकदा पाहायला मिळते. आलियाच्या याच सौंदर्यावर आम्ही फिदा आहोत. प्रत्येकाची त्वचा ही वेगळी असते. पण जर तुम्ही तुमच्या त्वचेची योग्य काळजी घेतली की, तर तुमची त्वचाही नितळ दिसू शकते.  आलियासारखी त्वचा तुम्हालाही हवी असेल तर तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. आम्ही असेच काही मुद्दे खास तुमच्यासाठी काढले आहेत.

alia bhatt 1

जर तुम्हाला आठवत असेल तर आलियाचे वजन आधी जास्त होते. पण स्टुडंट ऑफ द इयरसाठी तिने स्वत:ला बदलले. त्या सिनेमात अगदीच बबली डबली दिसणारी आलिया हळूहळू बदलत गेली. ‘ राझी’मध्ये तिचा वेगळा अवतार पाहायला मिळाला. यामध्ये तुम्ही निरीक्षण केले असेल तर आलिया अधिक सुंदर दिसत होती. कारण कोणताही अधिकचा मेकअप तिच्या चेहऱ्यावर नव्हता आणि आता गली बॉयमध्येही तिचा तोच फ्रेश नो मेकअप लुक पाहायला मिळत आहे. म्हणजे मेकअपशिवायही सुंदर दिसता येऊ शकते. पण काही गोष्टींचे तुम्ही रोज पालन केले पाहिजे.

व्हॅसलीनचा हा उपयोग तुम्हाला माहीत आहे का?

ADVERTISEMENT
  •  सगळ्यात आधी तुम्हाला जर काही करायचे असेल तर ते म्हणजे तुम्हाला तुमच्या चेहऱ्यासाठी वेळ काढायचा आहे. ऑफिसमधून आल्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा स्वच्छ करण्यासाठी क्लिनझिंग बाम किंवा मेकअप रिमुव्हर वापरायचा आहे. एका कॉटनवर मेकअप रिमुव्हर घेऊन तुमचा चेहरा स्वच्छ करा जरी तुम्ही मेकअप केला नसेल तरी बाहेर इतके प्रदुषण असते की. तुमच्या चेहऱ्यावर बरीच धूळ जमा होते.

        जर तुम्ही कोणता मेकअप रिमुव्हर घ्यायचा असा प्रश्न असेल तर Clinique Take The Day Off Cleansing Balm नक्की वापरुन पाहा.

 असे काढा शरीरावरील अनावश्यक केस 

  •  मेकअप काढून झाल्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा स्वच्छ धुवायचा आहे.त्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीचा फेसवॉश वापरु शकता.
  • फेसवॉश  केल्यानंतर चेहरा मुलायम टॉवेलने पुसून घ्या. चेहऱ्यावर चांगल्या प्रतीचे टोनर लावा. टोनर निवडताना ते नॉन अल्कोहोलीक असू द्या. टोनर तुमच्या त्वचेवरील अनावश्यक पोअर्स बंद करण्याचे काम करत असते.
  •  आता या नंतरची महत्वाची स्टेप म्हणजे तुम्हाला चांगले सिरम लावायचे आहे. सिरममुळे तुमचा चेहरा मुलायम राहतो आणि फ्रेश दिसतो.   

तुम्हाला उत्तम सिरम हवे असेल तर popxo मराठी तुम्हाला Innisfree The Green Tea Seed Serum  वापरण्याचा सल्ला देते.

  •   तुमच्या त्वचेची अधिक काळजी घेण्यासाठी तुम्हाला चेहरा मॉश्चरायझर्स लावायला विसरु नका

 आणि सगळ्यात महत्वाचे

ADVERTISEMENT

घरगुती उपायांनी मिळवा पिंपल्स फ्री त्वचा

दिवसातून शक्य असेल तेव्हा पाणी प्या. कमीतकमी ७ ते ८ ग्लास पाणी तुम्ही प्यायलाच हवे.

जास्तीत जास्त फळे आणि हिरव्या भाज्या तुमच्या आहारात असू द्या. बीटाचा, गाजराचा रस  असे पौष्टिक रस नक्की प्या.

चेहरा अधिक सुंदर दिसण्यासाठी व्यायामही तितकाच महत्वाचा असतो. कारण व्यायामुळे तुमच्या चेहऱ्याचा शेपही चांगला राहतो.

ADVERTISEMENT
06 Feb 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT