घरात मुलामुलींचा जन्म झाल्यानंतर आपल्याकडे सर्वप्रथम सगळ्यांना एक काम लागतं ते म्हणजे बाळाच्या आद्याक्षरावरून नाव ठेवणे. गणपतीच्या नावावरून, शिव वरून नाव, वेगवेगळ्या आद्याक्षरांवरून नावं आपण नेहमी आपल्या मुलांची ठेवत असतो. आतापर्यंत आपण म वरून मुलींची नावे, ल वरून मुलांची रॉयल नावे अशा अनेक आद्याक्षरावरून नावे पाहिली आहेत. श वरून मुलींची रॉयल नावे आपण जाणून घेतली आहेत आणि आता श वरून मुलांची नावे (Sha Varun Mulanchi Nave) जाणून घ्या. श हे आद्याक्षर थोडे वेगळे आहे आणि त्यामुळे या आद्याक्षरावरून नावेही वेगळीच असणार. अर्थासह नावे घ्या जाणून.
Table of Contents
श वरून मुलांची नावे | Sh Varun Mulanchi Nave
श वरून मुलांची नावे जर तुम्हाला हवी असतील तर काही खास आणि विशिष्ट नावे अर्थासह आम्ही तुम्हाला इथे देत आहोत. तुमच्याही बाळाचे आद्याक्षर श आले असेल तर जाणून घ्या खास नावे.
नावे | अर्थ |
शाल्व | पौराणिक राजा, महाभारतातील एका राजाचे नाव, प्राचीन देश |
शार्दुल | वाघ, एका ऋषीचे नाव, श्रेष्ठ |
शालीन | नम्र असा |
शमींद्र | इंद्रियांचे शमन करणारा, शंकर |
शर्देंदू | शिव, इंद्राचे नाव |
शकुंत | एका पक्षाचे नाव, मोर |
शकुन | शुभ, शुभाशुभ चिन्ह |
शत्रुघ्न | शत्रूचा नाश करणारा, रामाचा भाऊ |
शशीश | चंद्र |
शान | रूबाब, रूबाबदार |
शारद्वत | एक कण्व शिष्य |
शाहू | महाराजांची पदवी |
शिबी | उदीनर राजाचा उदार असणारा पुत्र |
शितांश | थंड, थंडगार |
शील | सदाचारी, स्वभाव, सौंदर्य |
शिल्प | कला आणि कौशल्य |
शिलादित्य | एका राजाचे नाव |
शिव | शंकर, शंकराचे एक नाव |
शक्ती | बळ, सामर्थ्य |
शकार | शक वंशाचा माणूस |
श वरून मुलांची युनिक नावे | Sha Varun Unique Mulanchi Nave
श वरून मुलांची युनिक नावे तुम्हाला हवी असतील तर तुम्ही या लेखाचा नक्कीच आधार घ्यायला हवा. युनिक नावांचा सध्या ट्रेंड आहे. या ट्रेंडमध्ये तुम्हालाही आपल्या बाळाचे युनिक नाव ठेवायचे असेल तर नक्की वाचा.
नावे | अर्थ |
शिवेश | भगवान शिव, शंकराचे एक नाव |
श्वेत | पांढरा, सफेद रंग, धवल, उजेड |
शिवाय | भगवान शिव, शंकर |
शुक्ल | स्वच्छ, शुभ्र |
शुची | शुद्ध, उज्ज्वल, पवित्र, योग्य |
शुभ | चांगले, पवित्र |
शौनक | एका ऋषीचे नाव, भारत आणि पुराणे ज्या सुताने सांगितले तो ऋषी |
शुद्धोदन | शुद्ध, गौतम बुद्धाचे पिता |
शुभम | मोक्ष, शुभ, तेजस्वी, मंगल |
शारंग | चातक, मोर, हरीण, भ्रमर |
शंभो | भगवान शिव, शुभ |
शिनी | चमकणारा असा पांढरा रंग |
शैल | पर्वत |
शशिन | चंद्र, चंद्रमा |
शिवम | शुभ, शिव, उत्कर्ष, पाणी |
शेष | बाकी, शिल्लक, नाग |
शिवाजी | शिवाचे नाव, महाराज |
शिशिर | दव |
शैशव | बाल्य, शंकराचे भक्त |
शोण | कर्णपुत्र, अत्रि कुलोत्पन्न राजा, एका नदीचे नाव |
श वरून मुलांची नावे 2022 | Sh Varun Mulanchi Nave Marathi 2022
श वरून मुलांची नावे 2022 मध्ये जी तुम्ही ठेऊ शकता आणि जी युनिकही असतील अशा नावांची यादी खास तुमच्यासाठी.
नावे | अर्थ |
शुभंकर | मंगलदायक असा |
शांतहः | स्कंदाचा उपदेशक |
शिवानंद | शिवाचा भक्त, आनंद व्यक्त करणारा |
शुक्रींद्र | शुक्र, इंद्र |
शरण | एखाद्याला सोपवून देणे |
शाहिद | वीर मरण येणारे |
शिरीष | एका फुलाचे नाव |
शरद | ऋतूचे नाव |
शरदचंद्र | शरद ऋतूमधील चंद्र, थोर कादंबरीकाराचे नाव |
श्यामसुंदर | सुंदर संध्याकाळ |
शशिशेखर | चंद्र डोक्यावर असणारा, भगवान शंकर, शिवशंकर |
शिवांश | शिवाचा अंश |
शौभित | सुशोभित करणारा |
शहाजी | शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव |
शैलुत | सोज्वळ |
शैलेश्वर | पर्वतावर राहणारा |
शशधर | एका राजाचे नाव, चंद्र |
शशांक | चंद्र |
श्याम | काळासावळा, कृष्णाचे एक नाव |
शशिमुख | चंद्रमुखी, चंद्रासारखा |
श वरून मुलांची आधुनिक नावे | Sha Varun Modern Mulanchi Nave
आजकाल मुलांची आधुनिक नावे ठेवण्याची पद्धत आहे. अशीच काही आधुनिक नावे खास तुमच्यासाठी. श हे आद्याक्षर जरा वेगळे आहे. त्यामुळे याची नावेही जरा वेगळीच आहेत. तुम्हालाही हवी असतील अशी काही आधुनिक आणि वेगळी नावे तर नक्की वाचा
नावे | अर्थ |
शशी | शिव, महादेव, महादेवाचे एक नाव |
शाश्वत | स्थायी, सतत, नेहमी |
शूलीन | आनंद देणारा, आनंद वाटणारा |
शिवन | शिवाचे नाव, शंकर |
शिविन | शंकराचे एक नाव, शिव |
शमीश | भगवान शिव, शंकर |
श्लोक | स्तुतीपर प्रार्थना, स्तुती, मंत्र |
शंतनू | भिष्मपिता, कुरूवंशीय राजाचे नाव |
शोभित | मनमोहक, सुंदर |
शंभू | शिवाजी महाराज, शिवशंकर |
शौर्य | वीरता, वीर |
शर्विल | शिवशंकराचा भक्त, पवित्र |
शुभ्रांशु | शुभ्र किरण, स्वच्छ |
शीघ्र | लवकर, तत्पर |
शर्मिल | लाजाळू, लाज असणारा |
शब्बीर | पवित्र, सुंदर |
शारंगधर | तीरंदाज, अप्रतिम तिरंदाजी करणारा |
शेषधर | साप पाळणारा |
शेषशायी | विष्णूचे नाव, नागावर झोपणारा |
शकुंतल | नायक, हिरो |
श वरून मुलांची रॉयल नावे | Sha Varun Royal Mulanchi Nave
मुलांची रॉयल नावे ऐकून अगदी कानांनाही बरं वाटतं. जरा वेगळं नाव आणि ते उच्चारताना येणारा वेगळाच भाव आई – वडिलांनाही छान वाटतो. तसंच नाव सांगताना भारदस्त आणि रॉयल नाव असलं की सांगणाऱ्यालाही खूपच अभिमान वाटतो. अशीच काही रॉयल नावे.
नावे | अर्थ |
शिवराज | शुभ राजा, शुभाचा राजा |
शूरसेन | शूर, धैर्यवान |
शूर | धैर्यवान असणारा |
शुक्र | ग्रहाचे नाव, शुक्राप्रमाणे तेजस्वी |
शिशुपाल | चेदी देशाचा राजा, राजाचे नाव |
शोधन | शुद्धीकरण, पवित्र |
शैलेंद्र | पर्वतांचा राजा, इंद्राचे नाव |
शत्रुंजय | शत्रूला पराभूत करणारा |
शांभव | देवी पार्वतीचा अंश |
शुभेंदू | कल्याणकारी चंद्र, चंद्राप्रमाणे शांत |
शारद्वान | शिष्य |
शैव | शिवाचे भक्त |
शिलांत | सदाचार, सदैव |
शुभव | शुभ असणारा, शुभ |
शशिकांत | चंद्राचे नाव, चंद्र |
शोभन | शोभिवंत, तेज, तेजस्वी |
शोभित | शोभणारा, शोभिवंत |
शैलपुत्र | पार्वतीपुत्र |
शेखर | गजरा, मोर, शिखरावर असणारा |
शिखर | पर्वताचे टोक, पर्वत |
तुम्हीही तुमच्या बाळाचे नाव श आद्याक्षर आले असेल तर या नावांमधून नक्की निवडून ठेवा. या सर्व नावांचा अर्थही तुम्हाला आम्ही इथे दिला आहे. त्यामुळे तुम्हाला त्याचा अर्थ शोधण्याची गरज भासणार नाही.