ADVERTISEMENT
home / Recipes
Shankarpali Recipe In Marathi

खुशखुशीत शंकरपाळी रेसिपी मराठीतून (Shankarpali Recipe In Marathi)

 

शंकरपाळी अथवा शंकरपाळे हा महाराष्ट्रात दिवाळीत बनवला जाणारा एक खास पदार्थ आहे. दिवाळी जवळ आली की घरोघरी शंकरपाळी तळण्याची सुंगध दरवळू लागतो. महाराष्ट्रात विविध प्रांतात निरनिराळ्या प्रकारच्या शंकरपाळी बनवल्या जातात. काहीजण गोड शंकरपाळी करतात, तर काहींना तिखट शंकरपाळी आवडते. मूळ मैद्यापासून बनवला जाणारा हा पदार्थ अतिशय स्वादिष्ट आणि चटपटीत असतो. आजकाल बेक केलेल्या आणि गव्हापासून बनवलेल्या पौष्टिक शंकरपाळी देखील बनवल्या जातात. यासाठीच जाणून घ्या खुसखुशीत शंकरपाळी (khuskhushit shankarpali recipe in Marathi) बनवण्याची सोपी पद्धत आणि काही रेसिपीज.

खुशखुशीत शंकरपाळी (Khuskhushit Shankarpali Recipe In Marathi)

Khuskhushit Shankarpali Recipe In Marathi

Khuskhushit Shankarpali Recipe In Marathi

 

शंकरपाळी हा दिवाळीत केला जाणारा पारंपरिक पदार्थ आहे. बऱ्याच जणांच्या घरी गोड खुशखुशीत शंकरपाळी बनवली जाते. गोड शंकरपाळी मैद्यापासून तयार करण्यात येते. तळल्यानंतर ही शंकरपाळी अतिशय खुशखुशीत लागत असून तोंडात टाकल्यावर लगेच विरघळते. दिवाळीच्या फराळात गोड खुशखुशीत शंकरपाळी खाण्याची मजा काही वेगळीच असते. 

साहित्य –

ADVERTISEMENT
  • अडीच वाटी मैदा
  • अर्धी वाटी रवा
  • पाऊण वाटी पिठीसाखर
  • पाव वाटी दूध
  • पाव वाटी तूप
  • चवीपुरतं मीठ
  • तळण्यासाठी तेल

गोड खुशखुशीत शंकरपाळी बनवण्याची कृती –

  • रवा आणि मैदा चाळून घ्यावा
  • सर्व साहित्य जवळ ठेवून पीठ मळण्यासाठी बसावे पिठीसाखर आणि दूध एकत्र करावे
  • पीठ मळताना त्यात चिमूटभर मीठ टाकावे
  • पीठ मळण्यापूर्वी त्यात एक पाव वाटी तूप चांगले गरम करून ओतावे याला मोहन असं म्हणतात
  • चमच्याने सर्व साहित्य एकत्र करावे. 
  • तूप थंड झाल्यावर मैदा आणि रवा त्या तूपावर मळून घ्यावा.
  • दूध आणि साखरेचा हात लावत पीठ फा
  • र कडक नाही आणि फार सैल नाही असे मळून घ्यावे
  • अर्धा तास पीठाच्या गोळ्यावर ओले फडके ठेवून ते बाजूला ठेवावे
  • अर्धा तासाने पुन्हा एकदा मळून घ्यावे आणि त्याचे ठराविक भाग करावे
  • पीठाचा मोठा गोळा मळून त्याची जाडसर पोळी लाटावी.
  • शंकरपाळीचा साचा अथवा सुरीने शंकरपाळीचे आकार पाडावे.
  • सर्व पीठाच्या शंकरपाळे करून घ्यावे
  • गॅसवर तेल अथवा तूप गरम करावे
  • सोनेरी रंग येईपर्यंत शंकरपाळे तळून घ्यावे
  • थंड झाल्यावर शंकरपाळी हवाबंद डब्यात भरून ठेवावी.

यासोबतच वाचा मैद्याचे पदार्थ रेसिपी मराठीत, बनवा विविध प्रकारच्या ‘या’ खास डिश (Maida Recipes In Marathi)

खारे शंकरपाळी (Khari Shankarpali Recipe In Marathi)

Khari Shankarpali Recipe in Marathi

Khari Shankarpali Recipe in Marathi

 

गोड शंकरपाळी खाण्याचा कंटाळा आला असेल अथवा वजन कमी करण्यासाठी तुम्ही गोड खाणं टाळत असाल तर तुम्ही घरी खारे शंकरपाळे करू शकता. घरातील साहित्य वापरून तुम्ही हे शंकरपाळे करत असल्यामुळे तुमच्या डाएटवर याचा दुष्परिणाम नक्कीच होणार नाही. तेव्हा घरच्या घरी बनवा स्वादिष्ट आणि नमकीन असे खारे शंकरपाळी

ADVERTISEMENT

साहित्य –

  • दोन वाटी मैदा
  • अर्धी वाटी रवा
  • थोडी कसूरी मेथी
  • अर्धा चमचा ओवा
  • एक चमचा जिरे पावडर
  • एक चमचा धणे पावडर
  • चवीनुसार मीठ

खारे शंकरपाळे बनवण्याची कृती –

  • मैद्यामध्ये तूपाचे मोहन टाकून ते चांगले मिक्स करून घ्या
  • पीठात जिरा पावडर, धणे पावडर, मीठ, कसूरी मेथी, ओवा टाका
  • पाण्याचा हात लावत पीठ घट्ट मळून घ्या
  • पीठ पंधरा मिनीटे बाजूला ठेवा
  • पीठाची पातळ पोळी लाटा आणि त्याची शंकरपाळी पाडून घ्या
  • कढईत तेल गरम करा आणि त्यात खारे शंकरपाळे ब्राऊन रंगाचे होईपर्यंत तळून घ्या.

वाचा – अनारसे रेसिपी मराठी (Traditional Anarsa Recipe In Marathi)

तिखट शंकरपाळी (Tikhat Shankarpali Recipe In Marathi)

Tikhat Shankarpali Recipe In Marathi

Tikhat Shankarpali Recipe In Marathi

ADVERTISEMENT

 

गोड शंकरपाळी आवडत नसेल तर तुम्ही तिखट शंकरपाळ्या बनवू शकता. यामध्ये मसाले वापरण्यात आलेले असल्यामुळे या शंकरपाळ्या चवीला चटपटीत आणि स्पायसी असतात. चहासोबत अथवा जेवणाच्या मधल्या वेळेत तुम्ही स्नॅक्स म्हणून या शंकरपाळ्या नक्कीच खाऊ शकता. 

साहित्य – 

  • दोन वाटी मैदा
  • दोन चमचे तूप
  • चार ते पाच काळीमिरी
  • दोन चमचे जिरे
  • चवीनुसार मीठ
  • एक चमचा तिखट
  • तेल
  • एक कप पाणी

तिखट शंकरपाळी करण्यासाठी कृती –

  • मैदा चाळून त्यात तूपाचे मोहन टाकावे
  • मैद्यामध्ये मीठ, तिखट, जिरे पावडर, काळीमिरी पावडर टाकावी
  • थोडे पाणी टाकत पीठ मळून घ्यावे
  • दहा ते पंधरा मिनीटे पीठ बाजूला झाकून ठेवावे
  • पंधरा मिनीटांनी पुन्हा मळाववे आणि गोळे बनवावे
  • पोळी लाटून शंकरपाळीचे आकार सुरीने पाडावे.
  • या शंकरपाळ्या डायमंड शेपच्या कराव्या
  • तेल गरम करून त्यात शंकरपाळे तळून घ्यावे
  • चहासोबत मस्त तिखट शंकरपाळी खाण्यास घ्यावी.

शंकरपाळीप्रमाणे दिवाळीचा खास फराळ तयार करण्यासाठी वाचा या मराठमोळ्या फक्कड रेसिपीज (Diwali Faral Recipes In Marathi)

ADVERTISEMENT

रव्याचे शंकरपाळी (Rava Shankarpali Recipe in Marathi)

Rava Shankarpali Recipe In Marathi

Rava Shankarpali Recipe In Marathi

 

शंकरपाळी करण्याचे विविध प्रकार आहेत. तुम्ही जर याआधी गोड शंकरपाळी, तिखट शंकरपाळी आणि खारे शंकरपाळे केले असतील तर यावेळी थोडा वेगळा प्रकार म्हणजे फक्त रव्याचे शंकरपाळे करा. कारण रव्यापासून तयार केलेले शंकरपाळे जास्त खुशखुशीत म्हणजेच खस्ता होतात. 

साहित्य –

  • एक वाटी बारीक रवा
  • दोन चमचे तूप
  • दोन ते चार चमचे पिठीसाखर
  • मीठ
  • अर्धी वाटी दूध
  • तेल

रव्याचे शंकरपाळे करण्याची कृती –

ADVERTISEMENT
  • रवा आणि पिठीसाखर एकत्र करा
  • रव्यात थोडं तूप, चिमूटभर मीठ आणि दूध मिसळत घट्ट मळून घ्या
  • मळलेलं पीठ अर्धा तास ओल्या फडक्याखाली ठेवून द्या.
  • अर्धा तासाने पीठ पुन्हा हाताने मळून घ्या आणि त्याची पोळी लाटा.
  • तुम्हाला आवडतील अशा आकाराच्या शंकरपाळ्या पाडून घ्या.
  • तेल गरम झाल्यावर त्यात शंकरपाळी सोडा आणि कुरकुरीत तळून घ्या.

यासोबतचरव्याचे पदार्थ पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी (Rava Recipes In Marathi)

गव्हाची शंकरपाळी (Gavachi Shankarpali Recipe In Marathi)

Gavachi Shankarpali Recipe In Marathi

Gavachi Shankarpali Recipe In Marathi

 

शंकरपाळी हा पारंपरिक पदार्थ मैद्यापासूनच केला जातो. मात्र आजकाल सर्वजण हेल्थ कॉन्शिअस झाले आहेत. ज्यामुळ प्रत्येक पदार्थ पौष्टिक असण्यावर जास्त भर दिला जात आहे. मैदा पचायला जड असल्यामुळे मग आजकाल गव्हाच्या शंकरपाळीचा पर्याय निवडला जात आहे. म्हणूनच घरच्या घरी करून पाहा गव्हाची शंकरपाळी

साहित्य – 

ADVERTISEMENT
  • गव्हाचे पीठ दोन वाटी
  • पिठीसाखर पाऊण वाटी
  • दूध अर्धा कप
  • तीन चमचे तूप
  • वेलची पावडर
  • चिमूट भर मीठ
  • तेल

गव्हाची शंकरपाळी करण्याची कृती –

  • गव्हाचे पीठ चाळून घ्या
  • त्यात मीठ आणि वेलची पावडर मिसळा
  • दूधात पिठीसाखर मिसळा
  • पीठात तूपाचे मोहन टाका आणि चांगले एकडीव करा
  • दूध आणि पाणी मिसळत हळू हळू पीठ मळून ग्या आणि अर्धा तास बाजूला ठेवा.
  • पिठाचे एकसमान गोळे करा आणि पोठी लाटून घ्या
  • सुरीने पोळीला शंकरपाळीचे आकार द्या
  • तेल गरम करा आणि शंकरपाळी तळून घ्या. 

वाचा – चटपटीत आणि स्वादिष्ट राजमा रेसिपीज

जिरा शंकरपाळी (Jeera Shankarpali Recipe In Marathi)

Jeera Shankarpali Recipe In Marathi

Jeera Shankarpali Recipe In Marathi

 

शंकरपाळी अधिक रुचकर आणि स्वादिष्ट करण्यासाठी तुम्ही त्यामध्ये जिरे टाकू शकता. जिरे पचनासाठी उपयुक्त असल्यामुळे मैद्याच्या शंकरपाळीत जिरे घातल्यामुळे त्या पचायला हलक्या होतात. शिवाय शंकरपाळी खाण्यामुळे पोटात गॅस निर्माण होत नाही. चवीला अप्रतिम लाग असल्यामुळे घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना ही शंकरपाळी आवडते.

ADVERTISEMENT

साहित्य –

  • मैदा दोन वाटी
  • जिरे दोन चमचे
  • मीठ चवीपुरते
  • तेल

जिरे शंकरपाळी करण्याची कृती –

  • मैदा चाळून घ्या
  • जिरे जाडसर दळून मैद्यात मिसळा
  • तेलाचे मोहन पीठात टाका आणि एकजीव करा
  • पाणी लावून पीठ घट्ट मळून घ्या
  • पंधरा मिनीटे बाजूला ठेवून पोळी लाटा
  • शंककपाळे पाडून गरम तेलात कुरकुरीत तळून घ्या

मेथी शंकरपाळी (Methi Shankarpali Recipe In Marathi)

Methi Shankarpali Recipe In Marathi

Methi Shankarpali Recipe In Marathi

 

शंकरपाळीचा हा प्रकार अतिशय चविष्ट तर असतोच शिवाय आरोग्यासाठी उत्तम असतो. कारण या शंकरपाळीत मेथीचा वापर केलेला आहे. मेथी आरोग्यासाठी चांगली असते. थंडीच्या दिवसांत मेथी खाणं शरीरासाठी चांगलं असतं. मेथीमुळे शरीरात पुरेशी ऊर्जा निर्माण होते. यासाठीच जाणून घ्या मेथीचे शंकरपाळे कसे बनवावे

ADVERTISEMENT

साहित्य –

  • एक वाटी निवडलेली मेथीची भाजी
  • एक वाटी मैदा
  • एक चमचा लाल तिखट
  • अर्धा चमचा हळद
  • एक चमचा धणे पावडर
  • एक चमचा जिरे पावडर
  • चवीनुसार मीठ
  • तेल

मेथीचे शंकरपाळे बनवण्याची कृती –

  • मेथीची भाजी निवडून, धुवून बारीक चिरून घ्या
  • एका भांड्यात मैदा चाळून घ्या
  • मैद्यामध्ये तिखट, हळद, मीठ, धणे पावडर आणि जिरा पावडर मिसळा
  • तेलाचे गरम मोहन टाकून पिठात मेथीची भाजी मिसळा
  • सर्व घटक एकजीव करत पीठ मळून घ्या
  • पीठाचा गोळा पंधरा मिनीटे झाकून ठेवा
  • पंधरा मिनीटांनी पोळी लाटा आणि शंकरपाळीचे आकार पाडून घ्या
  • तेल गरम करा आणि मेथीची शंकरपाळी तळून घ्या.

वाचा – भाजणीची चकली (Bhajani‌ ‌Chakli‌ ‌Recipe‌ ‌in‌ ‌Marathi‌)

11 May 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT