ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
shrawan-month-pooja-tips-women-should-keep-these-things-in-mind-while-worshiping-mahadev-in-marathi

श्रावणात महादेवाची पूजा करताना स्त्रियांनी केस का मोकळे ठेऊ नयेत

श्रावण महिना म्हटलं की सगळं कसं पवित्र आणि छान वाटतं. हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याचे महत्व कोणीही नाकारत नाही. श्रावण महिन्यात विविध सण येतात आणि या महिन्यानंतर पुढचे सगळे महिने सण चालू राहतात. महादेवाच्या व्रताचा हा महिना अत्यंत खास आहे. श्रावण महिन्यात उपवास केले जातात. महादेवाला प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळी व्रते करण्यात येतात. विशेषतः अविवाहित मुली या आपल्याला शंकरासारखा पती प्राप्त व्हावा यासाठी कडक श्रावणी सोमवारचे व्रत करतानाही दिसून येतात. तर विवाहित महिला या आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी हा उपवास करतात. पण हे महादेवाचे व्रत करताना अर्थात श्रावणात महादेवाची पूजा करताना काही नियम (Shrawan 2022 Special Tips) पाळावे लागतात. महिलांना या व्रताबाबत माहिती तर असते पण नक्की कोणते नियम या काळात महिलांनी पाळावे याची माहिती (Information about Shrawan Month Pooja Tips) आम्ही तुम्हाला या लेखातून देणार आहोत. 

श्रावणात महादेवाची पूजा करताना पाळावयाचे नियम 

  • महिलांना शिवलिंगाला स्पर्श करण्यास मनाई आहे. शिवलिंगाला स्पर्श केल्यास, देवी पार्वतीचा कोप होतो असा समजा आहे. त्यामुळे शिवलिंगाची पूजा न करता महिला महादेवाची पूजा करू शकतात. शिवलिंगाची पूजा करताना स्पर्श न करता बेलाची पाने वहावीत
  • सर्वात महत्त्वाचे म्हणजे पूजा करताना महिलांनी आपले केस कधीही मोकळे ठेऊ नयेत असे सांगण्यात येते. याचे कारण म्हणजे घरात नकारात्मक ऊर्जा येते. शास्त्रामध्ये सांगण्यात आल्याप्रमाणे, लग्नाच्या वेळी माता सीतेला तिच्या आईने केस बांधून ठेवण्यास सांगितले होते, कारण कोणतेही व्रत करताना बांधलेल्या केसांप्रमाणे नातीही बांधलेली राहतात आणि टिकून राहतात असा समज आहे
  • शंकर अर्थात महादेवाला हळद लावणे योग्य नाही अशुभ मानले जाते. महादेवाची पूजा करताना धोत्र्याचे फूल, बेलपत्र अथवा बेल, पांढरे फूल, मध आणि ताजी फळे अर्पण करावी 
  • तसंच महादेवाची पूजा करायची असेल तर या महिन्यात मांसाहार त्यागावा लागतो. मांस – मच्छीचे सेवन या महिन्यात त्याज्य आहे. तसंच तामसी पदार्थ अर्थात श्रावण महिन्यात कांदा, मिरपूड, आले, लसूण, कढीपत्ता, मुळा, वांगे असे पदार्थ वर्ज्य आहेत. यामुळे तामसी वृत्ती अधिक निर्माण होते असे म्हटले जाते आणि म्हणूनच संपूर्ण श्रावण महिना हे पदार्थ न खाता पूजा करावी
  •  मासिक पाळीच्या वेळी महादेवाची पूजा करू नये असंही म्हटलं जातं
  • तर नकारात्मक ऊर्जा आसपास राहू नये यासाठी काळ्या कपड्यांचा वापर करू नये

विशेषतः महिलांनी हे उपाय पाळावे असे सांगण्यात येते. असे शास्त्रानुसार सांगण्यात आले आहे. मात्र आता यापैकी अनेक जण विज्ञानाचा आधार मागतात. आम्ही तुम्हाला अंधश्रद्धा ठेवा असे सांगत नाही मात्र या लेखातून आम्ही कोणते नियम साधारणतः पाळले जातात याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. मोकळे केस हे नेहमीच नकारात्मक ऊर्जा घेऊन येतात असं समजण्यात येते आणि म्हणूनच श्रावणातही पूजा करताना सहसा मोकळे ठेऊ नये असे सांगण्यात येते. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

28 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT