ADVERTISEMENT
home / Hair Cuts
(10 कारणे) केस कधी कापावेत | When To Do Haircut In Marathi

(10 कारणे) केस कधी कापावेत | When To Do Haircut In Marathi

हेअर कट केल्यावर तुम्ही आकर्षक दिसता, तुमचा आत्मविश्वास वाढतो. मात्र बऱ्याच जणींना असं वाटत असतं केस लांब व्हावेत त्यामुळे त्या केस नियमित कापत नाहीत. केस सतत कापले तर लवकर वाढत नाहीत असाही काहींचा समज असतो. वास्तविक केस नियमित ट्रिम केल्यामुळे केसांची वाढ चांगली होते. जर तुमच्या केसांचा पोत बदलला असेल, केसांना फाटे फुटले असतील, केस गळत असतील, केस निस्तेज झाले असतील तर तुमचे केस ट्रिम करणं खूप गरजेचं आहे.

यासाठीच आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगत आहोत. ज्यावरून तुमच्या लक्षात येईल की केस कधी कापावेत (Kes Kadhi Kapave) एखादा न्यु हेअर कट (Tips For Haircut In Marathi)  करण्याआधी तुम्हाला या टिप्स नक्कीच फायद्याच्या ठरतील. तेव्हा जर तुमच्या केसांमध्ये आम्ही दिलेले खालील बदल जाणवत असतील तर वेळीच हेअर कट करण्याचा निर्णय घ्या. जाणून घ्या तुमच्या चेहऱ्याच्या आकारावरून कोणता ‘हेअरकट’ तुम्हाला सूट करेल (Latest Haircut In Marathi)

केस कधी कापावेत याची कारणे – When Should Hair Be Cut In Marathi

अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या निरीक्षण करून केस कधी कापली गेली पाहिजे हे आपण ठरवू शकतो.

केस कधी कापावे याची 10 कारणे पुढीलप्रमाणे

ADVERTISEMENT
  1. केसांना फाटे फुटणे (Split Ends)
  2. केसांची टोकं कोरडी पडणे (Dry Ends) 
  3. गुंतल्यामुळे केस विंचरता न येणे (Hard To Comb Hair)
  4. केसांना बाउन्स नसणे (No Bounce)
  5. केस खूप पातळ होणे (Thin Hair)
  6. स्टाईल करता न येणे (Not Hold A Style)
  7. केसांना शेप नसणे (No Shape)
  8. निस्तेज केस होणे (Dull Hair)
  9. केस खूप छोटे होणे (Short Hair)
  10. केस मोठया प्रमाणावर गळणे (Hair loss)

केसांना फाटे फुटणे – Split Ends in Marathi

केसांना फाटे फुटणे - केस कधी कापावेत
केसांना फाटे फुटणे

केसांना दोन फाटे फुटणे हा केसांची वाढ थांबल्याचा एक संकेत आहे. फाटे फुटलेल्या केसांची वाढ होत नाहीच शिवाय असे केस लवकर कोरडे आणि रूक्ष होतात. अशा वेळी मस्त हेअर कट करणं अथवा केस ट्रिम करणं गरजेचं असतं. केस ट्रिम करताना केसांच्या टोकाकडील भाग कापला जातो. ज्यामुळे केसांचे फाटे निघून जातात आणि केस पुन्हा जोमाने वाढण्यास मदत होते.

जर तुम्हाला केस फार लहान करायचे नसतील तर केस ट्रिम करणं हा तुमच्यासाठी चांगला पर्याय राहिल. फाटे फुटल्यावर केस कधी कापावेत (Kes Kadhi Kapave) अशी शंका मनात असेल तर केस लगेच ट्रिम करा.  पण केस वाढवण्यासाठी फाटे फुटले असतानही केस न कापण्याचा निर्णय घेऊ नका कारण त्यामुळे तुमच्या केसांची वाढ खुंटेल. यासोबत वाचा केस सिल्की करण्यासाठी घरगुती उपाय (Silky Hair Tips In Marathi)

केसांची टोकं कोरडी पडणे – Dry Ends

केस कोरडे होताना सर्वात आधी केसांचा टोकाकडी भाग सर्वात जास्त कोरडा पडू लागतो.  कारण जेव्हा केसांच्या क्युटिकल्सचं नुकसान होतं. तेव्हा केसांवरील आवरण निघून गेल्यामुळे केस ओलावा टिकवून ठेवू शकत नाहीत. त्यामुळे अशा अवस्थेत केस धुतल्यास तुमच्या केसांचा टोकाकडील भाग जास्त कोरडा होतो. कारण केसाच्या इतर भागापेक्षा केसांचा टोकाकडील भाग लगेच सुकतो. यासाठीच अशा वेळी केसांचा टोकाकडील भाग कापून टाकण्यासाठी तुम्हाला केस कापणे गरजेचं आहे. 

गुंतल्यामुळे केस विंचरता न येणे – Hard To Comb Hair in Marathi

केस कोरडे असतील तर तर ते मॅनेज करणं खूप कठीण जातं. कारण अशा परिस्थितीत केस सतत गुंतून केस एकमेकांमध्ये अडकतात. गुंतलेले केस कंगवा अथवा हेअर ब्रशने सहज सुटत नाहीत. ज्यामुळे केस मोठ्या प्रमाणावर तुटतात आणि गळू लागतात. यासाठीच अशा परिस्थितीत तुमच्या केसांना हेअर कटची जास्त गरज असते. कारण केस अती कोरडे झाल्यामुळे आणि पातळ झाल्यामुळे गुंता वाढत जातो. जर ते वेळीच ट्रिम केले तर गुंता कमी होईल शिवाय केस चांगले वाढू लागतील. 

ADVERTISEMENT

केसांना बाउन्स नसणे – No Bounce in Hairs

केसांना बाउन्स नसणे - Kes Kadhi Kapave
केसांना बाउन्स नसणे – Kes Kadhi Kapave

जर तुमचे केस नैसर्गिक पद्धतीने कर्ली असतील तर निस्तेज झाल्यावर तुमचे केस पातळ आणि सरळ होतात. केसांमधील नैसर्गिक बाउन्स कमी होतो आणि केस स्काल्पवर चिकटून राहतात. केसांच्या या अवस्थेमुळे तुमचा संपूर्ण लुक बदलतो. जर तुमच्या केसांमधील बाउन्स कमी झाला असेल तर तुम्हाला लवकर केस कापण्याची गरज आहे. कारण केस कापण्यामुळे ते पुन्हा बाउन्सी आणि कर्ली दिसू लागतात. अशा वेळी तुमच्या हेअर स्टायलिस्टची मदत घ्या आणि केस जास्तीत जास्त बाउन्सी दिसतील असा न्यु हेअर कट करा. ज्यामुळे तुमचे कर्ली हेअर पुन्हा पूर्ववत दिसतील. 

केस खूप पातळ होणे – Thin Hair

केस मोठ्या प्रमाणावर गळत असतील तर तुमच्या केसांचे प्रमाण कमी होते आणि केस पातळ दिसू लागतात. प्रत्येकाच्या डोक्यावर विशिष्ठ प्रमाणात केसांची संख्या असते. केस गळण्यामुळे तुमच्या डोक्यावरील केसांचे प्रमाण नक्कीच कमी होते. अशा परिस्थितीत केस गळण्यामुळे तुम्हाला टक्कलदेखील पडू शकते. पण जर तुम्हाला केस कधी कापावेत (Kes KadhiKkapave) हे माहीत असेल तर तुमचे केस गळणे रोखता येऊ शकते. यासाठी वेळीच तुम्हाला तुमचे केस ट्रिम करून पुन्हा केसांची वाढ नियमित करता येऊ शकते.

मात्र केस कापण्यासोबतच तुम्हाला केस गळणे रोखण्यासाठी काही उपायदेखील करायला हवेत. यासाठी Ayurvedic Hair Care Tips In Marathi | आयुर्वेदिक पद्धतीने घ्या केसांची काळजी

स्टाईल करता न येणे – Not Hold A Style

घनदाट आणि चमकदार केसांवर एखादी हेअर स्टाईल नक्कीच शोभून दिसते. मात्र जर तुमचे केस खूप प्रमाणात गळत असतील अथवा निस्तेज झाले असतील तर अशा केसांवर हेअर स्टाईल शोभून दिसत नाही. अचानक तुमच्या केसांमध्ये असे बदल झाले असतील आणि तुमच्या केसांवर कोणतीच हेअर स्टाईल करता येत नसेल तर आता तुम्हाला केस कापण्याची नक्कीच गरज आहे हे ओळखा.

ADVERTISEMENT

कारण केस अती प्रमाणात पातळ झाल्यावरही तुमच्या केसांवर हेअर स्टाईल करता येत नाही. केस कापल्यावर पुन्हा केसांचा व्हॉल्युम वाढतो ज्यामुळे हेअर स्टाईल करणं सोपं जातं. 

केसांना शेप नसणे – No Shape

केस गळणं ही एक खूप मोठी समस्या आहे. आजकाल केस गळण्यामागे अनेक कारणं असू शकतात. जर तुमचे केस लांब असतील तर गळण्यामुळे तुमच्या संपूर्ण केसांचा शेप बदलू शकतो. आधी घनदाट वाटणारे केस अचानक पातळ आणि कोरडे दिसू लागतात. अशा वेळी हेअर स्टाईल करून तुम्ही केसांचा व्हॉल्युम वाढवू शकता. केस कापताना जास्त लेअर्स ठेवल्यामुळे केसांची घनता वाढल्यासारखी दिसते. ज्यामुळे केसांना छान शेप येतो आणि तुमचा लुक पुन्हा चांगला दिसू लागतो. यासाठी केसांची शेप बदलला की लगेच हेअर कट करण्याचा निर्णय घ्या.

निस्तेज केस होणे (Dull Hair)

When To do Hair Cut In Marathi
When To do Hair Cut In Marathi

केस कमी पोषण मिळाल्यामुळे निस्तेज दिसू लागतात. मग तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी केस लगेच चांगले दिसत नाहीत.स कारण चमकदार केस हे निरोगी केसांचे प्रमुख लक्षण आहे. केस पुन्हा चमकदार करण्यासाठी तुम्हाला केसांना योग्य पोषण मिळेल याची काळजी घ्यायला हवी. पण त्यासोबतच तुम्ही  तुम्हाला निस्तेज झालेले टोकाकडील केस थोडे ट्रिम करून तात्पुरता उपाय करू शकता. ज्यामुळे केसांना छान आकार आणि चमक मिळू शकते. यासाठी केसांची चमक कमी झाली असेल तर लगेच हेअर कट करण्याचा निर्णय घ्या.

केस खूप छोटे होणे – Short Hair

केसांची उंची हा प्रत्येकाच्या आवडीचा विषय असतो. काही जणींना लहान म्हणजेच छोटे केस ठेवणं आवडतं तर काहींना आपले केस लांब असावेत असं वाटत असतं. मात्र जर तुमचे लांब केस अचानक लहान झाले असतील तर त्यामागे केसांचे अपुरे पोषण कारणीभूत असू शकते. केसांवर सतत धुळ, माती, वातावरणातील बदल आणि प्रदूषणाचा परिणाम होत असतो.

ADVERTISEMENT

बऱ्याचदा केसांवर केल्या जाणाऱ्या स्टाईल आणि ट्रिटमेंटही केस लहान होण्याला कारणीभूत असू शकतात. मात्र जर तुम्ही केस नियमित ट्रिम केले तर केसांच्या वाढीला मदत होते आणि तुमचे केस पुन्हा मजबूत होतात आणि लांबसडक दिसू लागतात. यासाठी वेळीच केस ट्रिम करण्याची युक्ती लक्षात ठेवा.

केस मोठया प्रमाणावर गळणे – Hair loss

केस गळणे ही आजकाल अनेकांना सतावणारी केसांची एक मुख्य समस्या आहे. केस का गळतात याची कारणे अनेक असू शकतात. मात्र केसांना योग्य प्रमाणात पोषण न मिळाल्यास केस जास्त प्रमाणात गळतात. केसांची वाढ पूर्ववत करण्याचा सोपा मार्ग म्हणजे केसांची निगा राखणे, केसांना नियमित तेल मसाज करणे, उष्णता देणाऱ्या ट्रिटमेंट टाळणे, केस धुताना काळजी घेणे आणि केसांना पोषक आहार घणे. यासोबत तुम्हाला केस केस कधी कापावेत (kes kadhi kapave) हे माहीत असायला हवे. कारण कारण केस नियमित ट्रिम केल्यामुळे केसांच्या वाढीला प्रोत्साहन मिळते आणि केस गळणे कमी होते. 

केस कधी कापावेत काही निवडक प्रश्न – FAQ’s

1. केस गळणे ही हेअर कट करणे आवश्यक असल्याचा संकेत आहे का ?

– केस गळण्यामागे विविध गोष्टी कारणीभूत असू शकतात.मात्र तुम्ही केस गळत असताना ते जर कापले तर तुमचे केस पुन्हा पहिल्यासारखे होण्यास मदत होते. कारण केसांचा टोकाकडील भाग कापला गेल्यामुळे केसांची वाढ पुन्हा जोमाने होऊ शकते.

2. जर तुम्ही हेअर कट केला नाही तर काय होईल ?

– जर तुम्ही हेअर कट केला नाही तर केसांच्या टोकांकडील भागाचे नुकसान होऊन केसांना फाटे फुटतील. असं झाल्यास तुमच्या केसांची वाढ रोखली जाते. यासाठी केस नियमित वाढण्यासाठी आणि चेहऱ्याला चांगला लुक येण्यासाठी नियमित हेअर कट करणं गरजेचं आहे.

ADVERTISEMENT

3. वारंवार केस कापणे चुकीचे आहे का?

– साधारणपणे केसांची वाढ चांगली होण्यासाठी दर तीन महिन्यांनी अर्धा इंच केस कापणं गरजेचं आहे. जर तुम्ही यापेक्षा जास्त वेळा आणि अधिक केस कापत असाल तर तुमच्या केसांच्या वाढीवर दुष्परिणाम होऊ शकतो. 

आम्ही वर दिलेल्या संकेतावरून तुम्हाला आता केस कधी कापावेत (kes kadhi kapave) हे नक्कीच समजले असेल. हेअर कट करून फक्त तुमच्या केसांचे आरोग्य नक्कीच सुधारणार नाही, केस कापण्यामुळे फक्त केसांची वाढ पुन्हा चांगली होईल. पण केसांच्या वाढीसाठी त्यांना आतून योग्य पोषण मिळणं तितकंच गरजेचं आहे. हेअर कटमुळे तुम्हाला तात्पुरता चांगला लुक नक्कीच मिळेल. त्यानंतर मात्र तुम्हाला केसांना योग्य पोषण देण्याची जास्त गरज आहे. यासाठी हेअर कट सोबत केसांची योग्य निगा नक्की राखा. 

हेही वाचा

13 Dec 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT