ADVERTISEMENT
home / आरोग्य
the-significance-of-thalassemia-screening-during-pregnancy-in-marathi

गर्भधारणेदरम्यान थॅलेसेमिया तपासणीचे काय आहे महत्त्व

थॅलेसेमिया म्हणजे नेमके काय, तर थॅलेसेमिया ही एक आनुवंशिक स्थिती आहे. ज्यामध्ये शरीर पुरेसे हिमोग्लोबिन तयार करण्यात अपयशी ठरते, जे रक्तप्रवाहाद्वारे ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी जबाबदार असते. जर एखाद्या जोडीदाराला थॅलेसेमिया असेल तर बाळाला हा आजार होण्याची शक्यता निश्चित करण्यासाठी दुसऱ्या जोडीदाराची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. तुम्हाला हे जाणून धक्का बसेल की बीटा ग्लोबिन प्रोटीन तयार करणाऱ्या जनुकातील बदलांमुळे बीटा थॅलेसेमिया नावाची स्थिती निर्माण होते. अल्फा-ग्लोबिनच्या जनुकातील कोणत्याही बदलामुळे अल्फा थॅलेसेमिया होतो. विविध अभ्यासांनी पुष्टी केली आहे की बीटा थॅलेसेमिया हा देशातील सर्वात सामान्य एकल-जीन विकार आहे. दरवर्षी थॅलेसेमिया घेऊन जन्माला येणाऱ्या मुलांची संख्या सर्वाधिक आहे. अशाप्रकारे, गर्भधारणेदरम्यान थॅलेसेमिया तपासणी करणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे प्रत्येक महिलेनं डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार थॅलेसेमिया चाचणी न विसरता करणं आवश्यक आहे. याबाबत आम्हाला डॉ. प्रेरणा अग्रवाल, टेक्निकल ऑपरेशन व्यवस्थापक, अपोलो डायग्नोस्टिक्स, पुणे यांनी अधिक माहिती दिली आहे. तुम्हीही याबाबत जाणून घ्या. 

गर्भधारणेपूर्वी थॅलेसेमिया स्क्रिनिंगबद्दल 

गर्भधारणेपूर्वी, हिमोग्लोबिन इलेक्ट्रोफोरेसीस किंवा हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी (HPLC चाचणी) या नावाने ओळखल्या जाणार्‍या चाचणीच्या मदतीने भागीदारांची थॅलेसेमियासाठी तपासणी केली जाते. लाल रक्तपेशींची संख्या आणि हिमोग्लोबिनच्या एकाग्रतेतील कोणतीही विकृती शोधण्यासाठी संपूर्ण रक्त मोजणी (CBC) रक्त चाचणीद्वारे थॅलेसेमिया वैशिष्ट्याची उपस्थिती देखील तपासली जाऊ शकते. गर्भवती महिलांनी ही चाचणी डॉक्टरांच्या देखरेखीखाली करणं गरजेचं आहे.  

गर्भधारणेदरम्यान थॅलेसेमियाचे निदान

Mental Health During Pregnancy

थॅलेसेमिया असलेल्या महिलेची प्रसूती ही उच्च जोखमीची मानली जाते. त्यामुळे पालकांनी नियमित प्रसूतीपूर्व तपासणीसाठी जावे जेणेकरुन आई आणि बाळाच्या आरोग्यावर लक्ष ठेवले जाईल. जर फक्त आईमध्ये थॅलेसेमियाचे लक्षण असेल तर तिला गर्भधारणेदरम्यान अॅनिमियाचा त्रास होऊ शकतो आणि तिला योग्य काळजी आणि व्यवस्थापनाची आवश्यकता भासते. जर दोन्ही पालकांमध्ये हे लक्षण असेल, तर बाळाला थॅलेसेमिया मेजर आहे की नाही हे पाहण्यासाठी जन्मपूर्व चाचणी केली जाते.

थॅलेसेमिया आहे किंवा नाही याची माहिती नसलेल्या महिलांना गर्भधारणदरम्यान थॅलेसेमिया स्क्रीनिंग करण्याचा सल्ला दिला जातो. बऱ्याचदा डॉक्टर आई-वडील दोघांनाही थॅलेसेमिया चाचणी करण्यास सांगतात. बाळाच्या जन्मानंतर शारीरिक वाढ होत नसल्यास चिडचिड होताना दिसते आणि आहारात समस्या असल्यास पहिल्या दोन वर्षांत किंवा 6-12 वर्षांच्या कालावधीत ही चाचणी केली जाते. जीन सिक्वेन्सिंगद्वारे रक्तातील बीटा थॅलेसेमिया तपासणीद्वारे ही चाचणी केली जाते. याबाबत अजूनही बऱ्याच जोडप्यांमध्ये जागरूकता निर्माण झालेली नाही. त्यामुळे ज्या जोड्यांना बाळ होत नाही. त्यांनी वेळीच चाचणी करून घ्यायला हवी. अर्थात या आजारामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. हा आजार असला तरीही तुम्ही बाळाला जन्म देऊ शकता. पण त्यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. 

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

12 Apr 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT