संजय लीला भन्सालीच्या गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं. यात मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री आलिया भट शूटिंगच्या सेटवरच चक्कर येऊन पडली. ज्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागलं होतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आलिया गेले दोन महिने लागोपाठ शूटिंग करत आहे. संजयच्या गंगूबाईसोबतच तिचं राजमौलीच्या आरआरआर या चित्रपटाचंही शूटिंग सुरू आहे. ज्यासाठी ती गेले कितीतरी दिवस मुंबई ते हैदराबाद असा रोज प्रवास करत आहे. सहाजिकच यामुळे तिला थकवा आणि डिहायड्रेशन झालं आणि ती चक्कर येऊन पडली. शूटिंग सुरू असताना तिला अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. मात्र हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर तिला बरं वाटू लागलं आणि ती एका दिवसात फ्रेश झाली. दुसऱ्याच दिवशी ती पुन्हा गंगूबाईच्या सेटवर शूटिंगसाठी हजर होती. आलिया भटला सेटवर चक्कर येण्याची ही पहिलीच वेळ नाही यापूर्वीही ती स्टुडंट ऑफ दी ईअर, शानदार आणि आगामी चित्रपट ब्रम्हास्त्रच्या सेटवर आजारी पडलेली आहे. ज्यामुळे आता तिने तिच्या तब्येतीची खास काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
गंगूबाईच्या सेटवर पुन्हा एकदा आलिया आजारी पडल्यामुळे शूटिंगवर स्ट्रेसमुळे अशाप्रकारे आजारी पडणाऱ्या इतर अनेक बॉलीवूड अभिनेत्रींविषयी चर्चा सुरू झाली. आजवर अशा अनेक बॉलीवूड अभिनेत्रींना स्ट्रेसमुळे सेटवर शूटिंग सुरू असतानाच चक्कर आलेली आहे. जाणून घेऊ या त्यांच्या विषयी…
प्रियांका चोप्रा –
बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राही एकदा अशीच सेटवर चक्कर येऊन पडली होती. प्रियांकाला बाजीराव-मस्तानीच्या सेटवर चक्कर आली होती. ज्याचं कारण एका महत्त्वाच्या सीनसाठी तिला सतत रिटेक द्यावे लागले होते. ज्यामुळे तिचा ताण वाढला आणि कामाच्या अती तणावामुळे तिला सेटवर चक्कर आली. प्रियांकाने या चित्रपटात बाजीराव पेशवेंची पत्नी काशीबाई यांची भूमिका साकारली होती. मात्र या प्रसंगावरून काशीबाई साकारणं प्रियांकासाठी नक्कीच आव्हानात्मक होतं हे जाणवतं.
दीपिका पादुकोण –
दीपिका पादुकोणच्या पद्मावत चित्रपटातील स्ट्रेसबाबाबत यापूर्वी नक्कीच ऐकलं असेल. मात्र एवढंच नाही तर दीपिका एका अॅवॉर्ड शोमध्येही आजारी पडली होती. एका अॅवॉर्ड शो दरम्यान ती तिचा डान्स परफॉर्मन्स देणार होती. त्याच काळात म्हणजे 2014 साली तिचं हैप्पी न्यु इअर या चित्रपटाचं शूटिंगही सुरू होतं. ज्यामुळे तिला लागोपाठ तीस तास काम करावं लागलं होतं. ज्यामुळे अॅवॉर्ड फंक्शनच्या गाण्याची रिहर्सल करता करता ती चक्कर येऊन पडली होती.
कैतरीना कैफ –
कैतरिना कैफ तिचं सौंदर्य आणि नृत्यसाठी लोकप्रिय आहे. तिचं शीला की जवानी हे आयटम सॉन्ग आजही कोणत्याही पार्टीत अनेकांना थिरकायला लावतं. मात्र या गाण्यासाठी तीस मार खान या चित्रपटात शूटिंग करताना कैतरिना चक्कर येऊन पडली होती. या चित्रपटात शूटिंग दरम्याना अती उष्णतेमुळे कैतरिनाला त्रास झाला होता. ज्यामुळे तिला डिहायड्रेशन आणि ताण आला आणि ती आजारी पडली.
जैकलीन फर्नांडिस –
जैकलीन चित्रपटामधील डान्स आणि तिच्या अॅक्शन सीनने अनेकांना घायाळ करते. मात्र एका चित्रपटात असाच अॅक्शन सीन करता करता तिला त्रास झाला होता. कारण अॅक्शन सीन केल्यावर लगेचच तिला एका डान्सची रिहर्सल करायची होती. ज्यामुळे तिने लागोपाठ शूटिंग केलं आणि तिची तब्येत बिघडून तिला चक्कर आली होती.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
मानसी नाईकच्या लग्नानंतर सुरू झाली आता सिद्धार्थ-मितालीच्या लग्नाची लगबग
‘माझ्या मित्राची गर्लफ्रेंड’ फेम अभिनेत्री प्राजक्ता परब अडकली विवाहबंधनात
Good News: अभ्या अर्थात समीर परांजपे झाला बाबा, कन्यारत्नाचा जन्म