ब्युटी आणि मेकअप टिप्ससाठी तुम्ही अनेक ब्युटी एक्सपर्टचा सल्ला घेत असाल. सोशल मीडियावरील अनेक ब्युटी ब्लॉगर तर हमखास मॉईस्चराईझर आणि सनस्क्रीन एकत्र करून लावताना दिसतात. कारण हे फक्त स्किनकेअर रूटिनमधील एक स्टेप वाचवण्यासाठी असते. म्हणूनच आम्हाला असं करणं नक्कीच चुकीचं आहे असं वाटतं. मॉईस्चराईझर आणि सनस्क्रीन एकत्र न करण्याचं महत्त्वाचं कारण असं की जरी ही दोन्ही प्रॉडक्ट समान कन्सिस्टेन्सी आणि टेक्चरचे असले तरी त्यामध्ये वापरण्यात येणारे केमिकल्स मात्र निरनिराळे असतात. याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी वाचा ही सविस्तर माहिती.
मॉईस्चराईझर आणि सनस्क्रीन एकत्र मिसळणं का योग्य नाही –
आधीच सांगितल्याप्रमाणे मॉईस्चराईझर आणि सनस्क्रीन या दोन्ही प्रॉडक्टमध्ये निरनिराळे केमिकल्स असतात. या दोन्ही प्रॉडक्टमधील केमिकल्स एकत्र मिक्स झाल्यामुळे ते वापरल्यावर या उत्पादनांचा त्वचेवर होणारा परिणामदेखील बदलतो. यामुळे त्या दोन्ही प्रॉडक्टचा त्वचेवर कोणताच चांगला परिणाम होत नाही. एवढंच नाही तर कदाचित असं केल्यामुळे तुमच्या त्वचेवर अॅलर्जीदेखील होऊ शकते. यासाठीच मॉईस्चराईझर आणि नस्क्रीनच नाही तर कोणतेच प्रॉडक्ट एकत्र मिक्स करून त्वचेवर लावू नयेत.
Shutterstock
मग यावर उपाय काय ?
जर तुम्हाला तुमच्या स्कीन केअर रूटिनमध्ये वेळ वाचवण्यासाठी सनस्क्रीन लावण्याची महत्त्वाची स्टेप कमी करायची असेल तर तुम्ही एक युक्ती वापरू शकता. यासाठी तुम्ही असं मॉईस्चराईझर निवडा ज्यामध्ये आधीच SPF घटक असतील. मात्र असं कोणतंही मॉईस्चराईझर खरेदी करताना त्याचे पॅकिंग नीट चेक करा. ज्यामुळे तुमचा वेळतर वाचेलच शिवाय त्वचेचं नुकसानही होणार नाही. शिवाय सनस्क्रीन निवडताना एक काळजी घ्या की, फाऊंडेशनप्रमाणे सर्व गोष्टी एकाच प्रॉडक्टमध्ये असलेलं सनस्क्रीन तुम्हाला मिळू शकत नाही. त्यामुळे तुम्ही फक्त SPF असलेलं मॉईस्चराईझरच यासाठी निवडू शकता. मात्र यासाठी कोणतंही चांगलं सनस्क्रीन आणि SPF असलेलं मॉईस्चराईझर निवडण्यासाठी आधी तुमच्या त्वचेचा प्रकार ओळखा आणि त्यानुसारच प्रॉडक्ट निवडा. तुमच्या त्वचेला सूट करतील असे काही मॉईस्चराईझचे प्रकार आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत ते नक्की ट्राय करा.
ड्राय त्वचेसाठी तुम्ही हे SPF आणि क्रिमी टेक्चर असलेलं मॉईस्चराईझर निवडू शकता.
तेलकट त्वचेसाठी तुम्हाला ऑईल फ्री SPF मॉईस्चराईझर ज्यात मॅटिफाईंग फॉर्म्युला वापरला आहे असं प्रॉडक्ट उपयुक्त ठरेल.
अॅक्ने असलेल्या त्वचेसाठी तुम्ही SPF मॉईस्चराईझर अथवा सनस्क्रीन जेल वापरू शकता.
पण जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर झिंक आणि टिटॅनिअम डाओऑक्साईड असलेलं हे SPF मॉईस्चराईझर अथवा सनस्क्रीन जेल वापरा
SPF मॉईस्चराईझर निवडताना अशी घ्या काळजी
कोणतंही मॉईस्चराईझर वापरण्यापूर्वी ते तुमच्या चेहऱ्याच्या आणि शरीरावरच्या दोन्ही त्वचेसाठी करण्यात आलं आहे हे तपासणं आवश्यक आहे. कारण बऱ्याच महिला SPF मॉईस्चराईझर चेहरा आणि शरीरावर असं दोन्हीकडे वापरतात. पण ते जर तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेसाठी उपयुक्त नसेल तर यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचे पोअर्स बंद होतात आणि चेहरा तेलकट दिसतो. यासाठी पॅकिंगवरील सूचना वाचा, पॅच टेस्ट घ्या आणि मगच मॉईस्चराईझर चेहऱ्यावर लावा.
फोटोसौजन्य – शटरस्टॉक
अधिक वाचा –
कोणत्याही ब्युटी प्रॉडक्टशिवाय दिसा सुंदर, जीवनशैलीत करा असे बदल
तुमचेही हात आहेत का रुक्ष? मग अशी घ्या काळजी