ADVERTISEMENT
home / Make Up Trends and Ideas
tips to get glass lip look in Marathi

ग्लास लिप लुक आहे ट्रेंडमध्ये, असा करा लुक

मेकअप ही आज प्रत्येकीची गरज झाली आहे. फॅशनेबल आणि स्टायलिश दिसण्यासाठी तुम्हाला ट्रेंडनुसार मेकअप करावा लागतो. लग्नसोहळा, सणसमारंभ याचप्रमाणे ऑफिस, कॉलेज अथवा वेकेशनवर असतानाही मेकअप केला जातो. त्यामुळे सध्या कोणता ट्रेंड सुरू आहे हे प्रत्येकीला माहीत असावं लागतं. सध्या एक नवीन मेकअप ट्रेंड सर्वांना भुरळ घालत आहे. ज्याचं नाव आहे ग्लास लिप लुकया लुकमुळे तुम्हाला हाय इंटेसिन शाइन आणि काचेप्रमाणे चकाकणारे ओठ करता येतात. सेलिब्रेटीजमध्ये सध्या ग्लास लिप लुक सध्या खूपच लोकप्रिय ठरत आहे. यासाठीच हा लुक करण्यासाठी तुम्ही या टिप्स फॉलो करू शकता.

ग्लास लिप लुक कसा करावा 

कोणताही खास लुक अथवा मेकअप करताना जर योग्य टिप्स फॉलो केल्या तर तुम्हाला चांगला फायदा होतो. यासाठी या टिप्स अवश्य लक्षात ठेवा.

ओठ ग्लास लिप लुकसाठी तयार करा 

जर तुम्हाला ग्लास लिप लुक करायचा असेल तर आधी तुम्हाला तुमचा चेहरा आणि स्किन त्याप्रमाणे करावी लागेल. यासाठी त्वचेला इव्हन करण्यासाठी आधी त्वचा स्वच्छ करा. ओठांवरील डेड स्कीन काढण्यासाठी लिक्विड एक्सफोलिएटरचा वापर करा. 

ओठांची घ्या खास काळजी

चेहरा स्वच्छ केल्यावर ओठांची निगा राखण्यासाठी त्यावर लिप बाम लावायला विसरू नका. ज्यामुळे ओठ हायड्रेट होतील आणि कोरडेपणा कमी होईल. या लुकसाठी नाही तर नियमित ओठांची काळजी घेण्यासाठी तुम्ही या दोन्ही टिप्स फॉलो करू शकता. 

ADVERTISEMENT

लिप पेन्सिलने द्या शेप

कोणतीही लिपस्टिक अथवा लिप ग्लॉस ओठांवर थेट लावण्यापेक्षा त्याआधी लिप पेन्सिलने ओठांना शेप द्या. असं केल्यामुळे तुमच्या ओठांना एक क्लीन आणि बोल्ड लुक मिळेल.तुमच्या लिपस्टिक शेडपेक्षा एक शेड डार्क शेड लिप पेन्सिल निवडा. ओठांना शेप देण्यासाठी क्युपिड बो पासून सुरूवात करा आणि खालच्या ओठापर्यंत शेप द्या. आऊट टक करण्यासाठी हलका स्ट्रोक द्या. त्यानंतर तुमची फेव्हरेट लिपस्टिक अथवा लिपल लायनरने ओठांना फिल करा.

हाय शाइन ग्लॉस वापरा

ओठांना जर ग्लास इफेक्ट द्यायचा असेल तर ओठांवर ग्लॉस लावणं गरजेचं आहे. ज्यामुळे तुमचे ओठ तुम्ही कोट केल्यावर एक चकाकणारा लुक मिळेल. ओठ हायलाइट करताना लक्षात ठेवा ओठांच्या मध्यभागी ग्लॉस लावा आणि मग तो संपूर्ण ओठांवर पसरवा.  तुम्ही जेव्हा जास्त चकाकी असणारे ग्लॉस वापरता तेव्हा तुमचे ओठ काचेप्रमाणे चकाकू लागतात. 

22 Dec 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT