ADVERTISEMENT
home / Summer
तुमच्या वॉर्डरोबसाठी ट्रेंडी क्रॉप टॉप्स – Trendy Crop Top Designs (2020)

तुमच्या वॉर्डरोबसाठी ट्रेंडी क्रॉप टॉप्स – Trendy Crop Top Designs (2020)

तुम्ही जर फॅशनिस्टा असाल तर तुमच्या वॉर्डरोबमध्ये असलाच पाहिजे ट्रेंडी क्रॉप टॉप. कारण या नियमाला अपवाद अगदी आपल्या बॉलीवूड अभिनेत्रीही नाहीत. अगदी पेन्सिल स्कर्ट्सपासून ते पलाझ्झोपर्यंत सर्व प्रकारांवर क्रॉप टॉप तुम्हाला पेअर करता येतो. या लेखात तुमच्यासाठी मुद्दाम घेऊन आलो आहोत क्रॉप टॉपमधले प्रकार जे तुम्हाला ऑनलाईन खरेदी करता येतील आणि त्यासोबतच सेलिब्रिटी स्टाईलबुकमध्ये बॉलीवूड अभिनेत्रींचे काही क्रॉप टॉप्स लुक. मग येणाऱ्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्हालाही ही ट्रेंडी आणि कूल क्रॉप टॉपची फॅशन नक्कीच करता येईल (Trendy Crop Top Designs).

बोल्ड रेड कलर क्रॉप टॉप

तुम्हाला जर बोल्ड कलर टॉप्स आवडत असतील तर हा शीन वेबसाईटवरचा क्रॉप व्ही कट कॅमी टॉप तुम्हाला नक्कीच आवडेल. जो जास्त महागही नाहीय. कोणत्याही शॉर्टस्कर्ट, ट्राऊजर किंवा जीन्ससोबत तुम्ही हा क्रॉप टॉप पेअर अप करू शकता. या टॉपचा लुक एकदम कॅज्युअल आहे त्यामुळे वीकेंडसाठी हा टॉप परफेक्ट आहे. तसंच याचं फॅब्रिकही समर फ्रेंडली आहे

वाचा – ट्युब टॉपसाठी स्टाईलिंग टिप्स

ADVERTISEMENT

स्ट्राईप्ड क्रॉप टॉप

तुम्ही जर एवढे बोल्ड लुक टॉप वापरत नसाल तर काहीच प्रोब्लेम नाही. हा क्रॉप टॉप तुमच्यासाठी एकदम सूटेबल आहे. जो क्रॉप्डही आहे आणि जास्त बोल्डही नाही. या टॉपचा लुक एकदम सनी आणि कॅज्युअल आहे. तुम्हाला स्ट्राईप्स आवडत असतील तर हा पिवळा टॉप तुम्हाला नक्कीच आवडेल. सध्या स्ट्राईप्सचे कपडे तसेही ट्रेंडमध्ये आहेतच. यासोबत तुम्ही हॉट पँट्स, मिनी स्कर्ट किंवा जीन्सही पेअर अप करू शकता. तसंच याची किंमतसुद्धा एकदम बजेट फ्रेंडली आहे.

एलिगंट बर्गंडी क्रॉप टॉप

तुम्हाला जर रफल्ड लुक असलेले टॉप आवडत असतील तर हा क्रॉप टॉप तुम्हाला नक्कीच आवडेल. बर्गंडी रंगातला हा रफल्ड क्रॉप बार्डोट टॉप कोणत्याही इव्हिनिंग पार्टीसाठी परफेक्ट आहे. ज्यामुळे तुम्हाला एकदम क्लासी लुक मिळेल. तुम्ही टॉप लाँग स्कर्ट किंवा जीन्ससोबत पेअर अप करू शकता. तसंच हा टॉप ऑफ शोल्डर असल्यामुळे हवं असल्यास त्यावर जॅकेटही घालू शकता. हा क्रॉप टॉपसुद्धा बजेट फ्रेंडली आहे.

ट्युनिक टॉप (Tunic Tops In Marathi)

ADVERTISEMENT

चेकर्ड क्रॉप टॉप

कॅज्युअल आणि कॉलेज गोईंग मुलींसाठी हा क्रॉप टॉप परफेक्ट आहे. निळा रंग सगळ्यांना जास्तकरून आवडतोच. याचे स्लीव्ह्ज्ससुद्धा पफ आहेत. नेक चौकोनी आहे. त्यामुळे जर तुम्हाला चेक्स प्रिंट आवडत असेल तर हा कॉटनचा क्रॉप टॉप तुमच्या समर वॉर्डरोबमध्ये असलाच पाहिजे.

नेव्ही टेक्स्ट क्रॉप टॉप

तुम्ही अगदीच गर्ली टॉप्स घालत नसाल किंवा थोड्या बॉईश लुक क्रॉप टॉपच्या शोधात असाल तर हा टॉप तुम्हाला आवडेल. फुल स्लीव्हज्स नेव्ही टेक्स्ट असलेला हा आहे क्रॉप टीशर्ट. या टॉपचा क्रू नेक असून तो पूर्णपणे कॉटनचा आहे. मग तुम्हाला कॉलेजला जाताना किंवा एखाद्या कॅज्युअल आऊटिंगसाठी हा क्रॉप टॉप जीन्ससोबत पेअर अप करून घालता येईल. 

पिंक मिकी माऊस क्रॉप्ड टॉप

आपल्यापैकी बऱ्याच जणींना आजही कार्टून्स आणि जास्तकरून मिकी माऊस आवडत असेलच. मग तुम्हाला हा मिकी माऊस प्रिटेंड क्रॉप टॉप नक्कीच आवडेल. हा क्रॉप टॉप अगदी कंफर्टेबल तर आहेच. सोबतच याचं स्टाईलिंगही हटके आहे. याच्या बॅकसाईडला नॉट आहे. त्यामुळे हा क्रॉप टॉप एकदम ट्रेंडी आहे. फक्त हा टॉप ऑन्ली ब्रँडचा असल्यामुळे त्याची किंमत जास्त आहे.

ADVERTISEMENT

यलो बेल स्लीव्हज्स क्रॉप टॉप

मला पर्सनली हा क्रॉप टॉप फारच आवडला आहे. कारण यामुळे तुमचा लुकही एकदम इंप्रेसिव्ह दिसेल आणि हा बजेट फ्रेंडलीसुद्धा आहे. नेहमीच्या क्रॉप टॉपपेक्षा हा टॉप वेगळा आहे. याचा व्ही नेक असल्याने जर तुम्ही थोड्या हेल्दी असलात तरी हा टॉप तुम्हाला घालता येईल. तसंच हाय वेस्ट जीन्स सोबत पेअर अप केल्यास लुक परफेक्ट होईल. फक्त हा टॉप प्युअर कॉटन नसून पॉलीकॉटन आहे. त्यामुळे याला समर फ्रेंडली क्रॉप टॉप म्हणता येणार नाही.

ब्लॅक फिट्टेड क्रॉप टॉप

ब्लॅक कलर हा कधीही छानच दिसतो. त्यातच या क्रॉप टॉपचा पॅटर्नही हटके आहे. हा टॉप वन शोल्डर आहे. तसंच याचा दुसरा स्लीव्ह लांब आहे. त्यामुळे हा टॉप तुम्ही क्लबिंग किंवा डिनर आऊटिंगला घालू शकता. त्यात हा टॉप कॉटनचा असल्यामुळे समर फ्रेंडली आहे. चेकर्ड हाय वेस्ट ट्राऊजर किंवा ब्लू डेनिमसोबत तुम्ही तो पेअर अप केल्यास छान दिसेल. तसंच हा टॉप बजेट फ्रेंडली आहे.

ADVERTISEMENT

पोलका डॉट क्रॉप टॉप

आपल्या वॉर्डरोबमध्ये एकतरी पोलका डॉट्स टॉप असतोच. कारण पोलका डॉट्सही फोरएव्हर फॅशन आहे जी कधी आऊटडेटेड होत नाही. जर नसेल तर तुम्ही हा पोलकाडॉट क्रॉप टॉप घेऊ शकता. हा पूर्णपणे कॉटनचा असल्यामुळे समर फ्रेंडली आहे आणि व्ही नेक असल्यामुळे तुम्ही बारीक नसलात तरी हा चांगला दिसेल. समर आऊटिंगसाठी हा क्रॉप टॉप परफेक्ट आहे.

ब्लेस्ड क्रॉप टॉप

POPxo च्या ट्रेंडी टीशर्ट कलेक्शनमधला हा ब्लेस्ड क्रॉप टीशर्ट आहे. जो एकदम बजेट फ्रेंडली असून तुम्हाला देईल चिक लुक. कॉलेज गोईंगसाठी हा टॉप परफेक्ट आणि कंफर्टेबल आहे. तुम्ही हा टॉप शॉर्ट स्कर्ट्स, हॉट पँट किंवा डेनिमसोबतही पेअर अप करू शकता. तसंच हा समर फ्रेंडलीही आहे.

ओव्हर थिंकर क्रॉप्ड टॉप

तुम्हीही करता का जास्त विचार. मग आपले विचार मांडणारा किंवा दुसऱ्यांना जास्त विचार करू नका असा संदेश देणारा हा क्रॉप टॉप. जो एकदम कूल आहे. POPxo कलेक्शनमधला हा अजून एक ट्रेंडी क्रॉप्ड टीशर्ट. कॉलेजला जाताना किंवा मित्रमैत्रिणीसोबत हँगआऊटला जाताना हा टॉप परफेक्ट आहे. तसंच याची किंमतही पॉकेट फ्रेंडली आहे.

ADVERTISEMENT

सेलिब्रिटींची क्रॉप टॉप फॅशन

सेलिब्रिटीजची फॅशन नेहमीच फॉलो केली जाते. कोणत्या सेलिब्रिटी कोणता वनपीस घातला किंवा कोणती साडी नेसली यावरूनही अनेक ट्रेंड सेट होत असतात. मग याला अपवाद क्रॉप टॉप कसा असेल. पाहा सेलेब्सने केलेली क्रॉप टॉप फॅशन

दिशा पटानी

बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानी ही सध्याची युश आयकॉन आहे. त्यामुळे तिने घातलेलं एखादं आऊटफिट लगेच ट्रेंड होतं. तसाच आहे हा दिशाने घातलेला सी-थ्रू फुल स्लीव्हज्स क्रॉप टॉप. जो तिने पेअर अप केला आहे प्रिटेंड कार्गो पँटसोबत. तुम्हीही असा कॅज्युअल लुक करू शकता.

आलिया भट

आलिया भटने घातलेला हा क्रॉप टॉप एकदम समर फ्रेंडली आहे. चेकर्ड पँट आणि चेकर्ड क्रॉप टॉप असा हा लुक बीच व्हेकेशनसाठी परफेक्ट आहे. तसंच हा टॉप आणि पँट्स लिनन असल्यामुळे उन्हाळ्यात घालण्यासाठी बेस्ट आहे. मग तुम्ही जर गोवा किंवा दुसरं एखादं बीच व्हेकेशन प्लॅन करत असाल तर असा सेट तुमच्याकडे असायलाच हवा.

मीरा कपूर

कबीर सिंग फेम शाहीदची बायको मीरा कपूर हिचा फॅशन सेन्स बॉलीवूडमध्ये प्रसिद्ध आहे. तिचं प्रत्येक आऊटफिट छान असतंच असतं. मीराचा हा क्रॉप टॉप नेहमीच्या क्रॉप टॉप्सपेक्षा एकदम हटके आहे. हाय वेस्ट ऑरेंज पँट्सवर तिचा हा थ्री फॉर्थ स्लीव्ह कलरफुल क्रॉप टॉप खूपच छान दिसतोय. तुम्हीही क्रॉप टॉपसोबत असं कॉम्बिनेशन करू शकता.

ADVERTISEMENT

मिथिला पालकर

वेबसीरिजमुळे चर्चेत आलेली मराठमोळी अभिनेत्री मिथिला पालकरसुद्धा फॅशनच्या बाबतीत ट्रेंडसेटर आहे. मॉर्डन असो वा ट्रेडिशनल मिथिलाचा प्रत्येक लुक छानच असतो. तसंच आहे तिच्या या क्रॉप टॉपबाबतही. तिचा हा प्लंजिग नेक फ्रील फुल स्लीव्ह क्रॉप टॉप बोल्ड लुक देणारा आहे. डीनर डेट किंवा क्लबिंगला जाताना तुम्हीही असा क्रॉप टॉप घालू शकता.

अभिज्ञा भावे

फॅशन कोणतीही असो अभिज्ञा भावे ती बिनधास्तपणे करते. तिने घातलेला हा क्रॉप टीशर्टही एकदम फ्रेश लुक देणारा आहे. निऑन ग्रीन रंगाचा हा पोलो नेक क्रॉप टीशर्ट कॅज्युअल असून समर परफेक्ट आहे. असा टॉप तुम्ही कोणत्याही डेनिम किंवा शॉर्ट स्कर्ट अगदी हॉट पँटवरही पेअर अप करू शकता.

तितिक्षा तावडे

जर तुम्ही क्रॉप टॉप घेण्याबाबत द्विधा मनस्थितीत असाल तर तुम्ही तितिक्षाप्रमाणे क्रॉप टॉप स्टायलिंग करू शकता. एखाद्या व्हाईट शर्टचा तुम्ही नॉट बांधून क्रॉप टॉप करू शकता. आता उन्हाळा म्हटल्यावर पूर्ण शर्ट घालणं कठीणच आहे. त्यामुळे असं स्टाईलिंग केल्यास ते नक्कीच समरफ्रेंडली ठरेल आणि तुमचा क्रॉप टॉप विकत घेण्याचा खर्चही वाचेल. 

सोनम कपूर

बॉलीवूड फॅशन आयकॉन म्हणजे सोनम कपूर. जर तुम्हाला प्रोपर क्रॉप टॉपच हवा असेल तुम्ही असा क्लासिक क्रॉप्ड शर्ट घेऊ शकता. जो आहे परफेक्ट समर वेअर . कोणत्याही डेनिमसोबत तुम्ही तो पेअर अप करू शकता.

ADVERTISEMENT

सारा अली खान

युथ फेव्हरेट सारा अली खान तिच्या कंफर्टेबल कपड्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. सारा बऱ्याचदा सलवार कुर्त्यात दिसते. पण ती वेस्टर्न कपड्यांबाबतही तेवढीच चूझी आहे. तिने घातलेला हा बेल स्लीव्हज्सचा क्रॉप शर्ट कॅज्युअल आऊटिंगसाठी परफेक्ट आहे. जर तुम्हालाही काळा रंग प्रिय असेल तर तुम्हीही साराप्रमाणे असा लुक करू शकता.

हेही वाचा –

उन्हाळ्यासाठी कूल आणि ट्रेंडी टॉप्स डिझाईन्स

उन्हाळ्यात हे 5 कपडे तुम्हाला ठेवतील कुल आणि ट्रेंडी

ADVERTISEMENT

अशी करा Palazzo सोबत हटके स्टाईल – How To Style Palazzo

 

27 Mar 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT