ADVERTISEMENT
home / Natural Care
घरातील ट्यूबलाईटमुळेही येऊ शकतात चेहऱ्यावर  सुरकुत्या, जाणून घ्या कारण

घरातील ट्यूबलाईटमुळेही येऊ शकतात चेहऱ्यावर सुरकुत्या, जाणून घ्या कारण

सुरकुत्या हे वयोमानानुसार त्वचेवर जाणवणारे एजिंगचे लक्षण आहे. असं असलं तरी आजकाल चेहऱ्यावर सुरकुत्या येण्याची अनेक कारणं असू शकतात. बऱ्याचदा ताणतणाव, अती काम, अपुरी झोप, पाण्याची कमतरता, चुकीची जीवनशैली, अयोग्य आहार अशा अनेक गोष्टींमुळे चेहऱ्यावर सुरकुत्या येतात. एवढंच नाही तर काही संशोधनात असंही आढळलं आहे की, स्वयंपाक करताना शेगडीतून निर्माण होणारी उष्णता, प्रखर सुर्यकिरण याप्रमाणेच त्वचेसाठी घरातील ट्यूबलाईटच्या किरणेदेखील त्रासदायक ठरू शकतात. कंम्युटर स्क्रिन, मोबाईल अथवा ट्यूबलाईटमधून निघणारी अल्ट्रा व्हायोलेट किरणं तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात. तुमच्या चेहऱ्याची नाजूक त्वचा जेव्हा या किरणांच्या सतत संपर्कात येते तेव्हा त्वचेत रंगाची निर्मिती करणाऱ्या हॉर्मोन्समध्ये अचानक बदल घडू लागतात. ज्यामुळे तुमची त्वचा सैल पडते आणि त्यावर सुरकुत्या दिसतात. या किरणांमुळे वीस ते पन्नास वयोगटातील महिला आणि गरोदर महिलांवर जास्त परिणाम दिसून येतो. यासाठी जाणून घ्या कोणत्या महिलांना आणि कधी यामुळे त्रास होऊ शकतो.

त्वचेवर हॉर्मोनल बदलचा होणारा परिणाम –

गरोदरपणात महिलांना तणाव आणि हॉर्मोनल बदलांना सामोरं जावं लागतं. ज्यामुळे त्यांच्या त्वचेवर परिणाम होतो. जर काही कारणांमुळे त्वचेचे योग्य पोषण झालं नाही तर अशा कोणत्याही गोष्टीमुळे त्यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडू शकतात.  जर तुम्ही गर्भनिरोधक गोळ्या घेत असाल तर तुमच्या त्वचेच्या समस्या वाढू शकतात. वारंवार गर्भनिरोधकं घेण्यामुळे तुमची त्वचा संवेदनशील होते. अशात जर तुम्ही अति प्रमाणात गॅस शेगडीजवळ काम केलं, ऊन्हात फिरला अथवा ट्यूबलाईटच्या जास्त संपर्कात आला तर तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडू शकतात. यासाठीच तज्ञ्जांच्या सल्ल्यानुसार आणि प्रमाणात गर्भनिरोधकांचे सेवन करा.

Shutterstock

ADVERTISEMENT

सुरकुत्या कमी करण्यासाठी उपाय काय –

सुरकुत्या कमी करण्याचा सोपा उपाय म्हणजे सनप्रोटेक्शन क्रिम अथवा सनस्क्रिन लावणं. अल्ट्रा व्हायोलेट किरणांमधील रेडिएशनचा दुष्परिणाम कमी करण्यासाठी अथवा त्यापासून बचाव करण्यासाठी हे क्रिम तुमच्या फायद्याचं आहे. गॅसजवळ काम असताना यासाठी शेगडीपासून थोडं दूर राहून काम करा. ऊन्हात फिरताना स्कार्फ, सनग्लासेस आणि सनस्क्रिन लावा. घरात कंम्युटरवर काम करताना अथवा ट्यूबलाईटच्या संपर्कात असतानाही सनस्क्रिन लावणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. त्याचप्रमाणे जर तुम्हाला सतत मोबाईल अथवा कंम्युटरवर काम करावे लागत असेल तर काही ठराविक वेळाने पाच मिनीटांचा ब्रेक घेण्याची स्वतःला सवय लावा.

घरगुती उपाय –

घरात असताना ट्यूबलाईटच्या किरणांचा  दुष्परिणाम टाळण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय नक्कीच करू शकता. यासाठी अशी फळं खा ज्यामध्ये मुबलक प्रमाणात लोह असेल. यासाठी नियमित योगासन,प्राणायाम आणि मेडिटेशन करणं तुमच्यासाठी फायद्याचं आहे. शिवाय यासाठी दिवसभर भरपूर पाणी प्या ज्यामुळे तुमची त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होईल. सुरकुत्यांवर उपाय करण्यासाठी घरात असलेल्या काही गोष्टींचा वापर करून तुम्ही फेसपॅक तयार करू शकता. आम्ही तुम्हाला नियमित असे अनेक घरगुती उपाय आणि  होममेड फेसपॅक कसे तयार करायचे हे शेअर करत असतो. या सर्व गोष्टी फॉलो करा आणि त्वचेला तजेलदार करा.

Shutterstock

ADVERTISEMENT

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

अधिक वाचा –

घरच्या घरी बनवा अँटिएजिंग फेसपॅक आणि मिळवा सुंदर त्वचा (Anti Aging Face Packs In Marathi)

घरच्या घरी कसं करावं फेशियल, जाणून घ्या फेशियलबाबत सर्व माहिती ( Facial At Home)

ADVERTISEMENT

चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी करा हे ‘5’ घरगुती उपाय (Anti-Aging Home Remedies In Marathi)

09 Dec 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT