बॉलीवूड मध्ये पुन्हा एकदा लग्नाचा सीझन मोठ्या धूमधडाक्यात सुरू झाला आहे. सेलिब्रेटीजच्या लग्नाचं कौतुक आणि थाटमाट नेहमीच निराळा आणि चाहत्यांची उत्सुकता वाढवणारा असतो. लवकरच सर्वांचा आवडता अभिनेता वरूण धवन त्याची बालपणीची मैत्रीण नताशा दलालसोबत विवाहबद्ध होणार आहे. याच महिन्यात म्हणजे जानेवारी महिन्यात या लग्नाचा थाटमाट सर्वांना पाहता येणार आहे. एवढंच नाही तर या शाही लग्नाचं ठिकाणही ठरलं असून लग्नाच्या तयारीला जोरदार सुरूवातही झाली आहे.
कुठे असणार वरूणच्या लग्नाचा शाही थाट
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वरूण आणि नताशाच्या लग्नसोहळ्यासाठी अलिबागमध्ये एक पंचतारांकित हॉटेल बूक करण्यात आलं आहे. या लग्नात जवळच्या नातेवाईक आणि मित्रमंडळींना आमंत्रित केलं जाणार आहे. सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळत फक्त जवळची दोनशे पाहुणे मंडळी या लग्नात सहभागी होणार आहेत. असं असलं तरी वरूण आणि नताशा यांच्याकडुन लग्नाची तारिख अजूनही जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र हे लग्न जानेवारी महिन्यातच होणार हे मात्र खरं आहे.
नताशा आहे वरूणची खूप जवळची मैत्रीण
काही दिवसांपूर्वीच करिना कपूरने तिच्या व्हॉट वुमन वॉंट या रेडिओ शोमध्ये नताशाला वरूणची भावी पत्नी असं संबोधलं होतं. तेव्हाच वरूणने या गोष्टीला मुक संमती दिली आणि तो लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार हे जाहीर झालं होतं. याआधीच या दोघांचा साखरपुडा झालेला आहे. शिवाय वरूण आणि नताशा दोघंही एकमेकांना लहानपणापासून ओळखतात. बऱ्याच वर्षापासून ते एकमेकांना डेटसुद्धा करत आहेत. ज्यामुळे त्यांच्या लग्नाची चर्चा मागच्या वर्षीपासूनच सुरू होती. मात्र कोरोना आणि लॉकडाऊनमुळे हे लग्न पुढे ढकलण्यात आलं असावं. शिवाय लॉकडाऊनमुळे रखडलेले काही प्रोजेक्ट वरूणला लग्नाआधी पूर्ण करायचे होते. आता मात्र सर्व अडथळे दूर झाले असून या महिन्यातच वरूण आणि नताशा लग्नाच्या बंधनात बांधले जाणार आहेत.
वरूण आणि नताशाची लव्हस्टोरी –
वरूणने करिनाच्या शोमध्ये त्याची आणि नताशाची लव्हस्टोरी चाहत्यांसोबत शेअर केली होती. वरूणने सांगितलं होतं की, त्याची आणि नताशाची पहिली भेट आम्ही शाळेत सहावी इयत्तेत असताना झाली होती. अर्थातच तेव्हा आम्ही एकमेकांना डेट करत नव्हतो. मात्र कॉलेजला गेल्यावर अकरावी आणि बारावीत आमची चांगली मैत्री झाली. त्यानंतर हळू हळू वरूणला नताशा खूप आवडू लागली. वरूण तिच्या प्रेमात आखंड बुडाला होता. त्याने तिला पहिल्यांदा प्रपोज केलं तेव्हा तिने त्याला चक्क नकार दिला होता. मात्र वरूणने प्रयत्न सोडले नाहीत. सतत प्रपोज करत राहीला आणि शेवटी दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र असं असलं तरी वरूणने त्याची लव्हस्टोरी जाहीर होऊ दिली नाही. स्टार झाल्यावरही मीडियापासून त्याने त्याचं प्रेमप्रकरण लपवून ठेवलं होतं. मात्र त्याचं सतत एकमेकांना भेटणं तो लपवू शकला नाही आणि त्याने तो नताशाला डेट करत आहे हे जाहीर केलं. मागचे दोन वर्ष त्यांच्या लग्नाच्या चर्चा सुरू आहेत. मात्र वरूण तेव्हा लग्नासाठी तयार नव्हता. मागच्या वर्षी तो लग्नासाठी तयार झाला आणि त्याने नताशासोबत साखरपुडा केला. मात्र कोरोनामुळे त्याला लग्न करता आलं नाही. आता नवीन वर्षाची सुरूवातीलाच त्याने लग्नाच्या तयारीला जोरदार सुरूवात केली आहे. ज्यामुळे लवकरच चाहत्यांना त्यांचा लाडका अभिनेता वरूण धवन लग्नाच्या बोहल्यावर चढताना पाहता येणार आहे.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
मराठी चित्रपटसृष्टीतल्या ‘10’ हॉट (Hot) आणि बोल्ड अभिनेत्री
प्रसिद्ध मराठी अभिनेता आशुतोष कुलकर्णी अडकला विवाहबंधनात, चाहत्यांना सुखद धक्का
हे बॉलिवूड सेलिब्रिटी नाहीत आऊडसाईडर, त्यांचे आहेत असे कनेक्शन