आजच्या धकाधकीच्या जीवनात शरीराचे आणि मनाचे असे दोन्ही आरोग्य सुरक्षित नाही. ज्यामुळे चांगले आरोग्य राखणे ही काळाची गरज झाली आहे. यासाठी आरोग्यदायी टिप्स मराठी (Health Tips In Marathi) तुमच्या नक्कीच फायद्याच्या ठरू शकतात. आजच्या काळात प्रत्येकाला व्यायामाचे जीवनातील महत्त्व आणि फायदे माहीत असायला हवे. योगासनामुळे तुमचे मन आणि शरीर संतुलित राहण्यास मदत होते. इतर काही योगासनांप्रमाणेच तुमच्या मनाला शांत करणारी आणि शरीराला निरोगी ठेवणारी एक योग्य क्रिया म्हणजे योगनिद्रा (Yoga Nidra in Marathi) जेव्हा तुम्ही खूप थकता अथवा तुम्हाला पुरेसा आराम मिळत नाही,तेव्हा काही मिनीटांची योग निद्रा घेऊन तुम्ही फ्रेश होऊ शकता. योग निद्रा म्हणजे झोप आणि जागृती यांच्यामधील एक स्थिती आहे. ज्यामुळे तुमच्या शरीराला ऊर्जा आणि मनाला आराम मिळतो. या निद्रेला आध्यात्मिक निद्रा असंही म्हणतात. कारण यामुळे तुमचा मेंदू, मन, शरीर आणि शरीरातील प्रत्येक रक्तवाहिनी रिलॅकिस होते. ज्यामुळे तुम्ही शांती आणि आराम अशा दोन्ही गोष्टींचा एकत्र अनुभव घेता. योग कुटीर योगा स्टुडिओ (Yog Kutir Yoga Studio) च्या मनिश यादव (Manish Yadav) यांच्या मते, ” योग निद्रा हा जागृत झोपेचा एक योग प्रकार आहे. या जागृत झोपेत स्व उपचारांचे रहस्य दडलेले आहे. योग निद्रा हे असे एक प्रत्याहार तंत्र आहे, ज्यामध्ये विचलित झालेले मन एकाग्र होते आणि हळू हळू शांत, निवांत होत जाते “
Table of Contents
योग निद्रा फायदे – Yoga Nidra Benefits In Marathi
योग निद्रा हा आराम करण्याचा एक सोपा मार्ग आहे. मात्र योग निद्रा म्हणजे फक्त निवांत पडून राहणं नाही तर त्यापेक्षा बरंच काही आहे. जाणून घ्या योग निद्रेचे फायदे (Yoga Nidra Benefits in Marathi)
शरीर टवटवीत होते
योग निद्रा घेताना तुमचे शरीर शांत आणि निवांत होत जाते. जर तुम्ही योग निद्रेचा नियमित सराव करत असाल तर तुमच्या शरीरातील त्रास आणि समस्या यामुळे कमी कमी होत जातात. कारण योग निद्रा घेताना तुमची शारीरिक हालचाल कमी होते, मेटाबॉलिझम सुधारतं, हॉर्मोनल कार्य सुरळीत होतं. ज्यामुळे शरीराला समस्या दूर करण्यासाठी पुरेसा वेळ आणि ऊर्जा मिळते. शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकले गेल्यामुळे तुम्ही टवटवीत होता. शरीरात साठली गेलेली ऊर्जा तुमचा थकवा कमी करते. तुम्ही अगदी बराच वेळ झोपून उठल्यासारखे फ्रेश दिसू लागता. उत्तम आरोग्य राखण्यासाठी यासोबतच जाणून घ्या जाणून घ्या गोमुखासना संपूर्ण माहिती | Gomukhasana Information In Marathi
ताण कमी होतो
आजकालच्या धकाधकीच्या काळात प्रत्येकाला कसला ना कसला ताण आहेच. त्यामुळे कधी अति कामामुळे, कामाच्या प्रेशरमुळे, नातेसंबधामधील दुराव्यामुळे, आर्थिक चिंतेमुळे अथवा भविष्यात काय होणार या विचारामुळे तुम्ही त्रस्त असू शकता. या मानसिक ताणामुळे शारीरिक आणि मानसिक दुखणी निर्माण होतात. ताणामुळे तुमची काम न करताही शक्ती कमी होते, थकल्यासारखं वाटत राहतं, आयुष्य जगणं कठीण होतं. मात्र प्रत्येकाला आयुष्यात येणाऱ्या या ताणाला योग्य वेळीच नियंत्रित करता यायला हवं. नाहीतर त्याचे भविष्यात गंभीर परिणाम दिसू शकतात. व्यायाम आणि ध्यानामुळे तुमच्या शरीर आणि मनाचे संतुलन राखले जाते. योग निद्रेचा सराव केल्याने तुमच्या मनात खोलवर रुतलेल्या ताणावर उपचार करता येतो. ताण नियंत्रित करण्याचा सोपा मार्ग म्हणजे नियमित योग निद्रेचा सराव करणे.
एकाग्रता वाढते
एकाग्रता म्हणजे कोणत्याही एका गोष्टीवर ध्यान केद्रिंत करण्याचं कसब मिळवणं. पण आपल्या माकडाप्रमाणे इकडून तिकडे उड्या मारणाऱ्या चंचल मनाला हे सहज शक्य होत नाही. कारण मनाला सतत काहीतरी नवीन हवं असतं. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना एकाग्रता मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. अभ्यास असो वा एखादं काम तुम्ही जितकं एकाग्रतेने ते कराल तितकं यशस्वी व्हाल. योग निद्रा करताना आपल्याला सहज एकाग्रता साध्य होते. कारण आपण या दरम्यान स्वयंसूचनांचे पालन करत असतो. असं नियमित स्वयंसूचना फॉलो केल्यामुळे मनाला एक चांगलं वळण लागतं आणि ते एका ठिकाणी एकाग्र होण्यास शिकतं.
स्मरणशक्ती सुधारते
योग निद्रा (Yoga Nidra in Marathi) नियमित केल्यामुळे तुमची स्मरणशक्ती वाढते. आजकाल वयस्कर लोकांना स्मरणशक्ती कमी होण्याचा त्रास जाणवतो. मात्र त्यांनी जर योग निद्रेचा सराव केला तर त्यांची स्मरणशक्ती नक्कीच सुधारू शकते. एखादी गोष्ट लक्षात ठेवणे आणि त्या गोष्टीप्रमाणे वागण्याची सवय तुम्हाला योग निद्रेमुळे लागते. आपल्या मनात अनेक नको त्या विचारांचा साठा असतो,ज्यामुळे नकळत मनावरील ताण वाढतो. या ताणामुळे कधी कधी तुमची स्मरणशक्ती कमी होत असते. मात्र योग निद्रेमुळे तुमची ही समस्या कमी होत जाते.
मज्जासंस्थेचे कार्य सुधारते
स्वायत्त मज्जासंस्थेमुळे (Autonomic Nervous System (ANS) शरीरातील मेटाबॉलिझम, वाढ, विकास अशी अनेक कार्य सुरळीत होत असतात. या संस्थेचे कार्य ऑटोमेटेकली सुरू असतं. आपण या कार्यात हस्तक्षेप करू शकत नाही. या संस्थेमुळे शरीराला शक्ती मिळते तसंच ताण कमी होतो. जर तुम्हाला या संस्थेचे कार्य ऑटोमेटेकली व्यवस्थित सुरू राहावं वाटत असेल तर शरीराला पुरेशा आरामाची गरज असते. कारण झोपेतही हे कार्य सुरू असतं. जेव्हा तुम्ही योग निद्रेचा सराव करता तेव्हा यासाठी लागणारा आराम तुमच्या शरीराला मिळतो.
झोप लागण्यास मदत होते
आपल्या सर्वांनाच माहीत आहे की अनेक आरोग्य समस्या आणि ताणतणाव हे अपुऱ्या झोपेमुळे निर्माण होतात. अगदी रोग प्रतिकार शक्ती कमी होण्यापासून नैराश्यापर्यंत अनेक समस्या या झोप कमी घेण्याचे परिणाम असू शकतात. शारीरिक आणि मानसिक कार्य सुरळीत चालू राहण्यासाठी पुरेशा झोपेची शरीराला गरज असते. आजच्या जीवनशैलीत मात्र अनेकांना अनिद्रा अथवा निद्रानाशाचा त्रास जाणवताना दिसतो. जर तुम्ही रात्री कमीत कमी सहा तास झोप घेतली नाही तर याचे परिणाम शरीर आणि मनावर दिसू लागतात. यावर उत्तम उपाय म्हणजे झोपण्यापूर्वी योग निद्रेचा सराव करणे. ज्यामुळे तुम्हाला शांत आणि निवांत झोप लागेल. त्याचप्रमाणे दहा ते पंधरा मिनिटात तुम्हाला आठ तासांच्या झोपेचा परिणाम योग निद्रेमुळे मिळू शकतो. त्यामुळे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अथवा रात्री कार ड्राईव्ह करणाऱ्या लोकांनी योग निद्रेचा सराव करावा. ज्यामुळे तुम्ही लवकर फ्रेश व्हाल.
तुम्ही स्वतःशी जोडले जाता
आजकाल बाहेरच्या जगाचा विचार करता करता आपण स्वतःकडे नकळत दुर्लक्ष करत असतो. अनेक गोष्टींसाठी आपण स्वतःचं सिंहालोकन आणि स्वचा साक्षात्कार करून घेतला पाहिजे. यासाठी स्वतःच्या आरोग्याकडे नीट लक्ष द्या. योगासने करणे, नियमित व्यायाम करणे, चालणे, सायकल चालवणे अथवा ध्यान आणि योगनिद्रेचा सराव तुमच्या शरीर आणि मनाला संतुलित करतो. योग निद्रा करताना तुम्हाला न कळत स्वतःची जाणिव होते. आत्मा आणि शरीराचे संतुलन प्रत्येकाच्या निरोगी आरोग्यासाठी गरजेचे आहे. एवढंच नाही तर योग निद्रेचा महिलांच्या जीवनावरही (Yoga Nidra in Marathi for Female) चांगला फायदा होतो. यासाठी योग निद्रेचा सराव करण्याचा कंटाळा करू नका.
वाचा – पद्मासन बद्दल माहिती मराठी मध्ये
योग निद्रा कशी घ्यावी – How To Do Yoga Nidra
योग निद्रा घेणं अतिशय सोपं असून सरावाने कोणतीही व्यक्ती योग निद्रा घेऊ शकते. या काही स्टेपनुसार तुम्ही योग निद्रा घेऊ शकता.
- सर्वात आधी एका शांत आणि मोकळ्या जागी जिथे फार सूर्यप्रकाश नसेल अशा ठिकाणी एका मॅट अथवा आसनावर पाठीवर झोपा.
- तुमचे संपूर्ण शरीर सैल सोडा आणि डोळे बंद करून तळहात आकाशाच्या दिशेने ठेवा.
- दीर्घ श्वास घ्या आणि शांतपणे सोडा असे तीन ते चार वेळा करा ज्यामुळे तुमचा श्वास संथ सुरू राहिल.
- श्वासावर लक्ष ठेवत हळू हळू तुमच्या शरीरातील प्रत्येक अवयवावर तुमचे लक्ष क्रेंद्रित करा. जसं की डावा पाय, डाव्या पायाचा अंगठा, डाव्या पायाचे पाऊल, डाव्या पायाची मांडी असे शरीरातील प्रत्येक अवयवावर लक्ष देत देत संपूर्ण शरीरावर तुमचे लक्ष क्रेंद्रित करा.
- शरीरातील प्रत्येक अवयव डावा पाय, उजवा पाय, डावा हात, उजवा हात, छाती, पोट, खांदे, बेंबी, गळा, कंबर, डोके अशा प्रत्येक अवयवामधील संवेदना अनुभवा.
- संपूर्ण शरीरावर लक्ष देण्याची क्रिया पूर्ण झाल्यावर पुन्हा तीन वेळा दीर्घ श्वास घ्या.
- अशा वातावरणात तुम्हाला हवे तितका वेळ तुम्ही शांतपणे पडून राहू शकता.
- उठण्यासाठी आधी डाव्या कुशीवर वळा त्यानंतर उजवा हात पोटाजवळ ठेवत सावकाश मांडी घालून बसा.
- तळहात एकमेकांवर रगडा आणि हाताची उष्णता डोळ्यांना देत हळू हळू डोळे उघडा.
योग निद्रा आसन – Yoga Nidra Aasan In Marathi
योग निद्रा घेताना जमिनीवर पाठीवर झोपून, डोळे बंद करून फक्त दिल्या जाणाऱ्या स्वयंसूचनांचे पालन करायचे असते. मात्र योग निद्रेचे आसन करण्यापूर्वी या गोष्टी अवश्य लक्षात ठेवा.
- योग निद्रे दरम्यान शरीरातील सर्व छोट्या छोट्या अवयवांवर लक्ष देण्याचा प्रयत्न करावा.
- योग निद्रा घेण्यापूर्वी पोट फार भरलेले नसावे.
- योग निद्रेसाठी निवडलेली जागा शांत आणि हवेशीर असावी.
- योग निद्रा जमीनीवर थेट करू नये अंगाखाली मॅट,टॉवेल अथवा बसण्याचे आसन घ्यावे.
- योग निद्रा घेताना गाढ झोप लागली तर घाबरण्याचे कारण नाही. सरावाने तुम्हाला योग निद्रा घेणे जमू लागेल.
योग निद्रा व्हिडिओ – Yoga Nidra Video
योग निद्रा आसन करणं अतिशय सोपं आहे सरावाने योग निद्रा जमू लागते. मात्र त्यासाठी आम्ही शेअर करत असलेल्या योग निद्रेचा सराव अवश्य करा.
योगनिद्रेबाबत प्रश्न – FAQs
प्नश्न: योग निद्रा घेताना नेमकं काय घडतं ?
उत्तर: योग निद्रा म्हणजे एकप्रकारची अशी योग क्रिया ज्यामध्ये तुम्ही झोप आणि जागृतीच्या मधल्या अवस्थेत जाता. शरीर आणि मनाचे संतुलन राखण्यासाठी योग निद्रेचा खूप फायदा होतो. योग निद्रेतील सूचनांमुळे तुमच्या मेंदूचे कार्य आणि शारिरिक हालचाली मंदावतात. ज्यामुळे तुम्हाला दहा ते पंधरा मिनीटांमध्ये सात ते आठ शांत झोप घेतल्यावर फ्रेश झाल्यासारखं वाटतं.
प्रश्न : योगनिद्रा म्हणजे संमोहन आहे का ?
उत्तर : योग निद्रा आणि संमोहन या दोन्ही गोष्टी करण्यासाठी शरीराचे आणि मनाचे संतुलन गरजेचे असते. मात्र योग निद्रा म्हणजे संमोहन नक्कीच नाही. योग निद्रेत दिलेल्या स्वयंसूचनेमुळे तुमच्या अंतर्मनाशी तुम्ही जोडले जाता. मात्र संमोहन शास्त्रात थेरपिस्ट तुमच्या अंतर्मनावर ताबा मिळवतात.
प्रश्न : योगनिद्रा हा योगाचा एक प्रकार आहे का ?
उत्तर : शरीर आणि मनाला एकत्र जोडण्यासाठी प्राचीन काळापासून केली जाणारी एक योग क्रिया म्हणजे योग निद्रा. नियमित सरावामुळे तुम्ही बाह्य जगातून सहज अंतर जगात जोडले जाऊ शकता.
प्रश्न : योगनिद्रा आणि शवासन एकच आहे का ?
उत्तर : नाही, शवासन हे व्यायामानंतर शरीराला शिथिल करणारे योगासन आहे. मात्र यो निद्रेत तुम्हाला स्वयंसूचनांच्या आधारे झोप आणि जागृतीच्या मधल्या स्थितीत नेले जाते. ज्यामुळे तुम्ही तुमच्या आंतरिक जगाशी जोडले जाता.
प्रश्न : योगनिद्रा म्हणजे ध्यानधारणा आहे का ?
उत्तर : पारंपरिक पद्धतीने केले जाणारे ध्यानधारणा आणि योगनिद्रा या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. Yoga Nidra Meditation in Marathi जाणून घेताना एक गोष्ट लक्षात ठेवावी ध्यानधारणेसाठी लागणारी मानसिक शांतता तुम्हाला योग निद्रेमुळे प्राप्त करता येऊ शकते.
Conclusion – चांगल्या आरोग्यासाठी, दररोजचा ताणतणाव नियंत्रित करण्यासाठी, शारीरिक आणि मानसिक थकवा कमी करण्यासाठी, महिलांच्या आरोग्य समस्यांसाठी (yoga nidra benefits in marathi ) योग निद्रेचा (yoga nidra in marathi) सराव नक्कीच करायला हवा. योग निद्रा करण्याचे अनेक फायदे (yoga nidra benefits in marathi) आहेत. आम्ही दिलेल्या माहितीचा तुम्हाला काय फायदा झाला हे आम्हाला कंमेटमधून जरूर कळवा.