ADVERTISEMENT
home / Natural Care
नाईट क्रिम की स्लीपिंग मास्क काय आहे त्वचेसाठी चांगलं

नाईट क्रिम की स्लीपिंग मास्क काय आहे त्वचेसाठी चांगलं

रात्री झोपण्यापूर्वी स्कीन केअर रूटिन फॉलो करणं  फार गरजेचं आहे. यासाठी कुणी रात्री झोपण्यापूर्वी नाईट क्रिम वापरतं तर कुणी स्लीपिंग मास्क…नाईट क्रिमपेक्षा आकर्षक स्लीपिंग मास्क सध्या जास्त लोकप्रिय आहेत. मात्र तरिही या दोन्ही प्रॉडक्टपैकी तुमच्या त्वचेसाठी नेमकं काय चांगलं आहे हे माहीत असायला हवं. नाईट क्रिम की स्लीपिंग मास्क ? काय आहे चांगलं या प्रश्नाचं उत्तर हेच की ही दोन्ही प्रॉडक्ट त्वचेसाठी उत्तमच आहेत. कारण ती खास तुमच्या त्वचेला रात्री आराम मिळावा यासाठी बनवलेली आहेत. मात्र या दोन प्रॉडक्टपैकी नेमकं काय चांगलं हे तुमचं स्कीन केअर रुटिन आणि तुमच्या त्वचेचा प्रकार यावर अवलंबून आहे. 

स्लीपिंग मास्क हे साधारणपणे एक जेल बेस उत्पादन आहे त्यामुळे ते सर्व प्रकारच्या त्वचेसाठी उपयुक्त असू शकतं. मात्र नाईट क्रिम जेल बेस, क्रिम बेस अथवा ऑईल बेस अशी कोणत्याही स्वरूपात असू शकते. शिवाय नाईट क्रिम तुम्ही नियमित वापरू शकता. स्लीपिंग मास्क मात्र तुम्हाला आठवड्यातून दोनदा अथवा फारतर तीनदा वापरता येते. नियमित स्लीपिंग मास्क वापण्यामुळे त्याचा परिणाम कमी होतो शिवाय तुमच्या त्वचेला जळजळही होऊ शकते. नाईट क्रिम तुमच्या त्वचेला काही तास  मऊ आणि मुलायम ठेवते. याउलट स्लीपिंग मास्क रात्रभर तुमच्या त्वचेला मॉईस्चराईझ ठेवतो. जेव्हा तुम्हाला शांत, निवांत ब्युटी स्लीप हवी असते अशा वेळी स्लीपिंग मास्क लावण्याचा नक्कीच चांगला फायदा होतो. कारण स्लीपिंग मास्क तुमच्या त्वचेला आतून दुरूस्त करते आणि त्वचेची काळजी घेते. बराच काळ हा मास्क तुमच्या त्वचेवर तसाच राहू शकतो. ज्यामुळे तुमच्या त्वचेवर त्यातील घटकांचा रात्रभर परिणाम होतो आणि सकाळी तुम्ही अगदी फ्रेश दिसता. स्लीपिंग मास्कच्या टेक्चर, परिणामकारक घटकांमुळे तो कोणत्याही त्वचेच्या प्रकारावर उपयुक्त ठकतो. शिवाय त्यांची खास रचना तुमच्या त्वचेला हायड्रेट, मऊ ठेवेल आणि चमकदार बनवेल अशी केलेली असते.  जर तुमची त्वचा खूप कोरडी असेल तर स्लीपिंग मास्क वापरण्यापू्र्वी एखादं क्रिमी प्रॉडक्ट त्वचेवर जरूर लावा. 

दोन्ही प्रॉडक्टच्या टेक्चरमध्ये काय असतो फरक –

नाईट क्रिम आणि स्लीपिंग मास्क या दोन्ही प्रॉडक्टमधला सर्वात महत्त्वाचा फरक हा त्यांच्या टेक्चरमध्येच असतो. नाईट क्रिम थोडी हेव्ही असून ती त्वचेत मुरवण्यासाठी तुम्हाला खूप वेळ मसाज करावा लागतो. याउलट स्लीपिंग मास्क हा जेल बेस असल्यामुळे तो तुमच्या त्वचेत लवकर मुरतो. शिवाय अनेक नाईट क्रिम या कोरड्या त्वचेला मॉईस्चराईझ करणाऱ्या, त्वचेच्या समस्या कमी करणाऱ्या, सुरकुत्या कमी करणाऱ्या, पिगमेंटेशनवर उपाय करणाऱ्या अशा विविध समस्येसाठी वेगवेगळ्या तयार केलेल्या असतात. तर स्लीपिंग मास्कमध्ये अॅंटि ऑक्सिडंट आणि त्वचेची काळजी घेणारे घटक भरपूर असतात. ज्यामुळे तुमची त्वचा मऊ आणि दुरूस्त दोन्ही होऊ शकते. यासाठी नाईट क्रिमप्रमाणेच स्लीपिंग मास्कचा स्किन केअर रूटिनमध्ये अवश्य समावेश करा

ADVERTISEMENT

स्लीपिंग मास्क कसा वापरावा –

नाईट स्कीन केअर रूटिन पूर्ण झाल्यावर नाईट क्रिम वापरण्याऐवजी स्लीपिंग मास्क लावा. लक्षात ठेवा स्लीपिंग मास्क लावणे ही तुमच्या स्कीन केअर रुटिनमधली शेवटची स्टेप असेल. झोपण्यापूर्वी कमीत कमी वीस मिनीटे आधी स्लीपिंग मास्क चेहऱ्यावर लावा. ज्यामुळे तुम्ही सकाळी उठाल तेव्हा तुमची त्वचा टवटवीत दिसेल. 

आता तुम्हाला नाईट क्रिम आणि स्लीपिंग मास्क या दोन्ही प्रॉडक्टमधील फरक नक्कीच समजला असेल. त्यामुळे तुमच्या त्वचेची गरज ओळखा आणि  त्यानुसार या दोन्ही प्रॉडक्टचा तुमच्या स्कीन केअर रुटिनमध्ये समावेश करा. 

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

अधिक वाचा –

ADVERTISEMENT

तुमच्या नाईट स्किन केअर रूटिनमध्ये असायलाच हवे हे ब्युटी प्रॉडक्ट

सर्व प्रकारच्या त्वचेसाठी ‘या’ नाईट क्रीम आहेत बेस्ट (Best Night Creams In India In Marathi)

स्किन केअर प्रॉडक्ट त्वचेवर लावण्याचा योग्य क्रम आणि पद्धत

07 Oct 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT