ADVERTISEMENT
home / Natural Care
चुकीचे मेकअप ठरु शकते त्वचेसाठी त्रासदायक, होतील हे त्रास

चुकीचे मेकअप ठरु शकते त्वचेसाठी त्रासदायक, होतील हे त्रास

मेकअप करण्याची आवड असेल पण तो योग्य पद्धतीने करणे माहीत नसेल तर तुम्ही तुमच्या त्वचेला  हानी पोहोचवत आहात. खूप जणांना आलेला प्रत्येक नवा मेकअप ट्रेंड फॉलो करायचा असतो. पण तो फॉलो करताना आपल्या त्वचेसाठी एखादे मेकअप प्रॉडक्ट चांगले आहे की नाही, ते वापरायचे की नाही याचा विचार करणेही फार गरजेचे आहे. काही जणांची मेकअप करण्याची आवड आणि चुकीची पद्धत पाहिल्यानंतर चांगल्या त्वचेसाठी काही गोष्टी जाणून घेणे फार गरजेचे आहे. 

फ्लॅट चप्पलही ठरु शकते पायदुखीचे कारण, जाणून घ्या

करु नका या चुका

Instagram

ADVERTISEMENT

फाऊंडेशनची प्रत्येकवेळी नाही गरज 

मेकअप करायचा म्हणजे प्रत्येक वेळी बेसला काही लावायलाच हवे असे नाही. एखादा लग्नकार्यासारखा कार्यक्रम वगळत फाऊंडेशन लावण्याची काहीच गरज नसते. आता चेहऱ्याला फाऊंडेशन शिवाय काय लावायचे असा विचार करत असाल तर सध्याचा ट्रेंड पाहता मिनीमन मेकअप महत्वाचा आहे. अशावेळी तुम्ही चेहऱ्याला केवळ फेस सीरम किंवा फेस मिस्ट लावले तरी पुरेसे असते. 


हेवी आय मेकअपची काय गरज

आय मेकअप हा डोळ्यांचे सौंदर्य वाढवत असला तरी असा मेकअप रोज करण्याची काही गरज नाही. आयशॅडो रोज लावण्याची गरज नसते. जर तुम्हाला आयलीड चांगले दिसावे असे वाटत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीची लिपस्टिक शेड तुमच्या आयलीडला लावू शकता. त्यामुळे तुमच्या डोळ्यांना हवा असलेला रंग मिळेल शिवाय तुमचा मेकअप चांगला दिसेल. त्यामुळे सतत आयशॅडो लावू नका. त्यामुळे डोळ्यांनाही त्रास होऊ शकतो. 

उन्हाळ्यात त्वचा चमकदार ठेवण्यासाठी वापरा हे उटणं

ADVERTISEMENT

आयलायनर आणि काजळचा टाळा प्रयोग 


आयलायनर आणि काजळ हे डोळ्यांना आकर्षक करतात. खूप जण आयलायनर आणि काजळ रोजच्या रोज लावतात. ते लावण्यात काहीच हरकत नाही. पण तुम्ही ते किती लावत आहात हे देखील तुम्ही तपासा. कारण खूप आयलायनर आणि काजळ लावल्यामुळे डोळे अधिक काळे दिसू लागतात.कारण काजळ आणि आयलायनर काढण्याची योग्य पद्धत खूप जणांना माहीत नसते. त्यामुळे त्यांचा आयमेकअप तसाच राहतो. सतत मेकअप राहिल्यामुळे डोळे कायम काळे दिसतात.  त्यामुळे काजळ आणि आयलायनर गरज असेल तेव्हाच लावा.


चुकीचे शेड निवडू नका 

मेकअप तेव्हाच चांगला दिसेल ज्यावेळी तुम्ही योग्य आणि तुमच्या स्किनटोनसाठी परफेक्ट असा शेड निवडाल. खूप जणांना चेहऱ्यासाठी कोणता परफेक्ट शेड निवडायचा कळत नाही. आयशॅडो पॅलेट, लिपस्टिक शेड, आयलायनरचा शेड सगळ्या गोष्टी तुमच्या व्यक्तिमत्वाला आणि तुमच्या कामाच्या स्वरुपाला परफेक्ट फिट बसेल असे शेड्स तुम्ही निवडा. 

ADVERTISEMENT


आता तुम्ही असा मेकअप करत असाल तर या चुका नक्की टाळा.

सॅलिसिलिक अॅसिडच्या मदतीने घालवा पिंपल्सचे डाग

29 Mar 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT