मराठीमध्ये ‘चंद्रमुखी’ हे नाव सर्वप्रथम वाचलं गेलं, ऐकलं गेलं ते सुप्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांच्या लेखणीतून आणि आता ‘चंद्रमुखी’ नाव मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात एका नव्या सिनेमाची घोषणा करण्यात आली आणि त्या सिनेमाचे नाव आहे ‘चंद्रमुखी’. आपल्या रपाने आणि घुंगराच्या ठेक्यांनी अनेकांना मोहीत करणारी सौंदयवती, ‘चंद्रमुखी’ हे विश्वास पाटील यांच्या कादंबरीतलं एक महत्त्वाचं पात्रं. त्यांच्या कादंबरीवर आधारित ‘चंद्रमुखी’ या मराठी सिनेमाचे टीझर पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे.
कादंबरीवर आधारित सिनेमा ‘चंद्रमुखी’
या सिनेमाची निर्मिती प्लॅनेट मराठीचे अक्षय बर्दापूरकर यांनी केली आहे. विशेष म्हणजे ‘AB आणि CD’, ‘गोष्ट एका पैठणीची’ या दोन सिनेमांच्या निर्मितीनंतर ‘चंद्रमुखी’ हा त्यांचा तिसरा सिनेमा आहे. अक्षय यांच्या पहिल्या सिनेमात बिग बी अमिताभ बच्चन यांनी काम केले आहे तर दुस-या सिनेमात सायली संजीवच्या भूमिकेतून पैठणीसाडी भोवती एक सुंदर गोष्ट मांडली आहे आणि आता कादंबरीवर आधारित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आणत आहेत. विश्वास पाटील लिखित ‘चंद्रमुखी’ ही राजकारण आणि तमाशा यांची उत्तम सांगड घालणारी कादंबरी आहे. तमाशात लावणी सादर करणारी नृत्यांगना, सौंदर्यवती अशा भूमिकेला अगदी सहजपणे शोभून दिसणारी आणि ‘चंद्रमुखी’च्या पात्राला अचूक न्याय देणारी अभिनेत्री कोण असेल याकडे आता सर्वांचे लक्ष असणार आहे.
(वाचा : प्रियदर्शन जाधव दिग्दर्शित ‘चोरीचा मामला’ सिनेमाचं पोस्टर लाँच)
प्रसाद ओक करणार दिग्दर्शन
प्रसिद्ध लेखकाच्या प्रसिद्ध लेखणीवर जेव्हा सिनेमा तयार केला जातो तेव्हा त्या सिनेमाचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखन कोण करणार हा सहजपणे मनात येणारा प्रश्न असतो. कारण कादंबरीत जे मांडलंय ते पडद्यावर तितक्याच ताकदीने मांडलं गेलं पाहिजे ही एक अपेक्षा आणि इच्छा असते. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी अभिनेते-दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी सांभाळली आहे. लेखकाचं मनोगत पडद्यावर मांडण्याचं प्रसाद ओक यांचं कौशल्य अनेकांनी त्यांच्या ‘हिरकणी’ या सिनेमात अनुभवलं आहे. ‘चंद्रमुखी’ सिनेमाचे पटकथा- संवाद चिन्मय मांडलेकर यांनी लिहिलेले आहे. ‘हिरकणी’ची लेखक-दिग्दर्शक जोडी ‘चंद्रमुखी’साठी पुन्हा एकदा एकत्र आली आहे.
(वाचा : मलायकासारखी फिगर हवीय, पाहा तिच्या फिटनेसचं रहस्य सांगणारा VIDEO)
नवीन वर्षात हे सिनेमे येणार प्रेक्षकांच्या भेटीला
‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’
राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिनेते गिरीश कुलकर्णी आणि सयाजी शिंदे पहिल्यांदाच एकाच चित्रपटात काम करणार आहे. प्रसाद नामजोशी आणि सागर वंजारी दिग्दर्शित ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ या चित्रपटात हा योग जुळून आला आहे. त्यांच्या अभिनयाची जुगलबंदी या चित्रपटात रंगणार आहे. ‘फटमार फिल्म्स एलएलपी’ या निर्मिती संस्थेकडून ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ची निर्मिती करण्यात येत आहे. हा सिनेमा 3 एप्रिल 2020 ला बॉक्सऑफिसवर झळकणार आहे.
(वाचा : भाईजान सलमानचा व्हिलनसोबत दोस्ताना, कोट्यवधींची कार केली गिफ्ट)
‘शहीद भाई कोतवाल’
‘एकतर स्वातंत्र्य, नाहीतर स्वर्ग’ असं म्हणत ब्रिटिशांविरोधात निधड्या छातीनं लढणाऱ्या ‘शहीद भाई कोतवाल’ यांच्यावर आधारित चित्रपट 24 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. स्वरजाई आर्ट मीडिया प्रॉडक्शनच्या प्रवीण दत्तात्रेय पाटील यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर सिद्धेश एकनाथ देसले, सागर श्याम हिंदुराव चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. या चित्रपटात आशुतोष पत्की, ऋतुजा बागवे, निशिगंधा वाड, माधवी जुवेकर,अरुण नलावडे, गणेश यादव, पंकज विष्णू, कमलेश सावंत, मिलिंद दस्ताने, सिद्धेश्वर झाडबुके, श्रीरंग देशमुख, अभय राणे, परेश हिंदुराव, प्राजक्ता दिघे आदींच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
‘इभ्रत’
एक अस्सल मराठमोळं प्रेमी युगुल आहे मल्हार मायडी. ही जोडी इभ्रत नावाच्या प्रेमकथेतून रुपेरी पडद्यावर अवतरणार आहे. डॉल्फिन सिनेक्राफ्ट या बॅनरखाली श्रुती वसंत दांडेकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर प्रवीण रमेश क्षीरसागर यांनी इभ्रतच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या चित्रपटात संजय शेजवळ, शिल्पा ठाकरे, सुरेश विश्वकर्मा असे प्रमुख कलाकार दिसणार आहेत. तरल आणि प्रेमाची गोष्ट सांगणारा इभ्रत 21 फेब्रुवारी 2020 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
हे देखील वाचा :
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.