#BBM2 ग्रँड प्रीमिअरनंतर आजपासून सुरू होणार 'बिग बॉस मराठी सिझन 2' ची धमाल

#BBM2 ग्रँड प्रीमिअरनंतर आजपासून सुरू होणार 'बिग बॉस मराठी सिझन 2' ची धमाल

अखेर 26 मे ला 'बिग बॉस मराठी सिझन 2' ग्रँड प्रीमिअर झाला. अनेक दिवसांपासून मराठी बिग बॉस कधी सुरू होणार याची प्रेक्षकांना उत्सुकता होती. या प्रिमीअरची दणक्यात सुरूवात झाली ती अभिनेता आणि बिग बॉस मराठी सिझन्सचे होस्ट महेश मांजरेकर यांच्या धमाकेदार परफॉर्मन्सने. या परफॉर्मन्समध्ये त्यांनी प्रेक्षकांना बिग बॉस हाऊसची टूरही घडवली.


बिग बॉस मराठी सिझन 2 चं घर

यंदा बिग बॉस मराठी लोणावळ्यात नाहीतर आपली मुंबईतील गोरेगाव फिल्मसिटीत होतंय. लोणावळ्याहून मुंबईत शिफ्ट झालं तरी बिग बॉस मराठीच घर अजूनही हटकेच आहे. घरात एंट्री करताच लक्ष वेधलं जातं ते भल्यामोठ्या मिरची-लिंबूकडे, रंगीबेरंगी बांगड्या, मराठमोळी नथ, घुंगरू आणि कंटेस्ट्सच्या रूम्स हे हिंदी बिग बॉसपेक्षा थोडं हटके आहे.


कोण आहेत बिग बॉस मराठी सिझन 2 मधले कंटेस्टंट


यंदाच्या बिग बॉस मराठीमध्ये खूपच धम्माल येणार असं वाटतंय. कारण यंदाचे कंटेस्टंट्स वेगवेगळ्या क्षेत्रातील असून प्रत्येकाची पर्सनॅलिटीही हटके आहे. कोणी शेफ आहे, तर कोणी गायिका आहे तर कोणी लावणी सम्राज्ञी आहे. त्यामुळे एकूणच हा सिझन पहिल्या सिझनपेक्षा जास्त हिट होईल असं आम्हाला तरी फिलींग येतंय. तुमचा बिग बॉस मराठी सिझन 2 चा ग्रँड प्रीमिअर एपिसोड मिस झाला असेल, तर आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी या कंटेस्ट्सची थोडक्यात ओळख


किशोरी शहाणे


bbm2-kishori-shahane


हिंदी आणि मराठी चित्रपट, टीव्ही सीरियल्समध्ये नावं कमावल्यानंतर अभिनेत्री किशोरी शहाणे पहिल्यांदाच रिएलिटी शोमध्ये दिसणार आहे. किशोरीकडे आजही पाहून वाटणार नाही की, वयाच्या 51 व्या वर्षात आहे.


नेहा शितोळे


bbm2-neha-shitole


सेक्रेड गेम्समधल्या प्रसिद्ध काटेकर या पात्राच्या बायकोची भूमिका करणारी नेहा शितोळे. नेहाने मराठी चित्रपट आणि सीरियल्समध्ये काम केलं आहे.


दिगंबर नाईक


दिगंबर नाईक हे त्यांच्या कॉमेडीतील परफेक्ट टायमिंगसाठी ओळखले जातात. त्यांनी आत्तापर्यंत अनेक हिट मराठी चित्रपट दिले असून रिएलिटी शोमध्ये हा त्यांचा पहिलाच प्रयत्न आहे.


अभिजीत बिचुकले


कविमनाच्या राजकारणी व्यक्तीची बिग बॉसमध्ये एंट्री होणार असा प्रोमो आल्यावर पहिल्यांदा सर्वांना एका प्रसिद्ध राजकारणी व्यक्तीचं नाव वाटलं होतं. पण ही व्यक्ती साताऱ्याची राजकारणी व्यक्ती आहे कळल्यावर अभिजीत बिचुकलेच्या नावाची चर्चा झाली. काल गुगलवर अभिजीत टाकल्याटाकल्या बिचुकले असा सर्च लगेचच येत होता.


वीणा जगताप


bbm2-veena-jagtap


राधा प्रेमरंगी रंगली मुळे घराघरात पोचलेली वीणा जगताप हीचं नाव पहिल्यापासूनच बिग बॉससाठी घेतलं जातं होतं.


वैशाली भैसने-माडे


bbm2-vaishali-made


वैशालीसाठी रिएलिटी शो काही नवीन नाही. सारेगामापा चॅलेंज 2009 जिंकल्यावर वैशालीने अनेक मराठी आणि हिंदी गाण्यासाठी आवाज दिला.


शिवानी सुर्वे


bbm2-shivani-surve


देवयानीमुळे शिवानीला ओळख मिळाली त्यानंतर तिने हिंदी सीरियल्समध्येही काम केलं. लाल इश्क, एक दिवाना था आणि जाना ना दिल से दूर या हिंदी सीरियल्समध्ये तिने काम केलं आहे.


शिव ठाकरे


bbm2-shiv-thakre


रोडीज रायझिंगमध्ये शिव झळकला होता. तो एक चांगला डान्सर असून त्याची स्वतःची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे.


सुरेखा पुणेकर


bbm2-surekha-punekar


महाराष्ट्राची लावणी क्वीन म्हणून ओळख असलेल्या सुरेखा पुणेकर. त्यांच्यासाठी रिएलिटी शो काही नवा नाही कारण नुकतंच त्यांनी अप्सरा आली हा रिएलिटी शो जज केला होता.


माधव देवचके


माधव देवचकेचा प्रवास हा हिंदी टू मराठी असा झाला आहे. हमारी देवरानी या हिंदी शोमधून त्याने सुरूवात केली आणि त्यानंतर त्याने मराठीत बस्तान बसवलं आहे.

रूपाली भोसले


रूपालीने अनेक मराठी सीरियलमध्ये काम केलं असून तिने एका हिंदी सीरियलमध्येही काम केलं आहे. रूपालीला इन्स्टावर चांगलंच फॅन फॉलोइंग आहे.


अभिजीत केळकर


bbm2-abhijit-kelkar


अभिजीतने आत्तापर्यंत अनेक प्रसिद्ध चित्रपट उदा. काकस्पर्श, बालगंधर्व आणि मी शिवाजी राजे भोसले बोलतोय मध्ये काम केलं आहे. तर सीरियल्समध्येही त्याने अनेक रोल केले आहेत.


विद्याधर जोशी


विद्याधर यांनी मराठी चित्रपटसृष्टीत तब्बल 20 पेक्षा जास्त चित्रपटात काम केलं आहे. हे सगळे चित्रपट हिट ठरले आहेत.


मैथिली जावकर


bbm2-maithili-javkar


मैथिलीने आधी मराठी चित्रपटसृष्टी आणि नाटक मग राजकारण आणि आता रिएलिटी शो असा प्रवास केला आहे.


पराग कान्हेरे


bbm2-parag-kanhere


गृहिणींचा आवडता शो आम्ही सारे खवय्येमधून पराग कान्हेरे घराघरात पोचला. त्यामुळे आता बिग बॉस हाऊसमध्ये जाऊन पराग किचन टेकओव्हर करणार का असा प्रश्न आहे.


मग सज्ज व्हा बिग बॉस मराठी सिझन 2 च्या धमाल मनोरंजन सफरीला आजपासून….


हेही वाचा -


मराठी प्रेक्षकांना मिळणार 'करोडपती' होण्याची संधी