बॉलीवूडमधील सर्वात सुंदर जोडी म्हणून दीपिका आणि रणवीरच्या जोडीकडे पाहिलं जातं. या दोघांनी गेल्यावर्षी काही मोजक्या जवळच्या माणसांच्या उपस्थितीत लग्न केलं. त्याचं लग्न हा संपूर्ण महिनाभर चर्चेचा विषय ठरला होता. कारण या आधी इतके रिसेप्शन कोणत्याही बॉलीवूड सेलिब्रिटीचे झाले नसतील, जेवढे रिसेप्शन दीपिका आणि रणवीरने केले. पण तरीही ही जोडी एकत्र असली की, इतरांचं लक्ष फक्त याच लव्हबर्ड्सकडे लागून राहिलेलं असतं. लग्न करण्यापूर्वी दीपिका आणि रणवीर एकमेकांना तब्बल 6 वर्ष डेट करत होते. त्यामुळे सगळ्यांनाच हा प्रश्न असतो की, यांचं नातं इतकं टिकलं कसं? तर याचं उत्तर आता खुद्द दीपिकाने दिलं आहे. दीपिकाचं हे उत्तर ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.
तुमचा आवडता रणवीर बनणार गुज्जू भाई, साकारणार जयेश भाई
मामि फेस्टिव्हलमध्ये दीपिकाने केला खुलासा
मुंबईमध्ये नुकताच मामि फेस्टिव्हल पार पडला. यामध्ये अनेक दिग्गजांंनी उपस्थिती लावली होती. राजीव मसंद आणि अनुपमा चोप्रा यांनी या फेस्टिव्हलमध्ये दीपिकाची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये दीपीकाने दिलखुलास उत्तरं दिली. त्यामध्ये अगदी आपल्या करिअरपासून कामापर्यंत आणि खासगी आयुष्याबद्दलही दीपिकाने काही खुलासे केले. त्यापैकी एक म्हणजे दीपिका आणि रणवीरचं नातं नक्की कसं टिकलं? दीपिका मामि फेस्टिव्हलची चेअरपर्सन आहे. त्यामुळे या फेस्टिव्हलची सुरुवात ही तिच्यापासूनच झाली. दीपिकाला विचारण्यात आलं की, तिच्या लग्नामधील अशी कोणती खास गोष्ट आहे जी तिला सर्वात जास्त आवडते? त्यावर दीपिकाने अगदी मनापासून उत्तर दिलं. दीपिकाने सांगितलं की, रणवीरबरोबर आपलं नातं अधिक काळ टिकलं कारण दर सहा महिन्यानंतर एक वेगळी व्यक्ती म्हणून समोर येत आहे. त्यामुळे हे नातं टिकायला अधिक मदत झाली.
आगामी ’83’ मध्ये रणवीर सिंगचा नवा रेकॉर्ड
चेन्नई एक्स्प्रेसचा सिक्वल यावा अशी इच्छा
दीपिका पादुकोणची चेन्नई एक्स्प्रेस या चित्रपटाचा सिक्वल यावा अशी इच्छा आहे. त्यासाठी तिने रोहित शेट्टीशी बोलणं केल्याचंदेखील यावेळी सांगितलं. चेन्नई एक्स्प्रेस हा दीपिकाच्या करिअरमधील अप्रतिम चित्रपट ठरला होता. यातील मिन्नमा आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अशा पद्धतीचा चित्रपट यायला हवा अशी दीपिकाची इच्छा आहे. त्याशिवाय दीपिकाने आपला आगामी चित्रपट ‘छपाक’बद्दलदेखील चर्चा केली. याबद्दल तिचा नेमका अनुभव काय होता हे तिने सांगितलं. जेव्हा या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं तेव्हा दीपिकाने शेवटच्या दिवशी या प्रोस्थेटिक मेकअपवर दारू ओतून तो जाळला होता. जोपर्यंत तो मेकअप पूर्ण जळला नाही तोपर्यंत दीपिका त्या जळणाऱ्या मेकअपकडे पाहत राहिली होती. तो मेकअप पूर्ण जळल्यानंतरच त्या रात्री ती झोपली होती असं तिने सांगितलं. या चित्रपटाच्या व्यक्तिरेखेसाठी तिने बरीच तयारी केली असल्याचंही सांगितलं. दीपिकाच्या या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं असून तिचा हा चित्रपट पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये प्रदर्शित होणार आहे. शिवाय तिचा रणवीर सिंहबरोबरचा ‘83’ हा चित्रपटदेखील पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात दीपिकाने कपिल देवच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट 1983 मध्ये जिंकून आणलेल्या वर्ल्ड कपवर आधारित असून कपिल देवची भूमिका रणवीर सिंहने साकारली आहे. आजपर्यंत दीपिका आणि रणवीरने एकत्र काम केलेला एकही चित्रपट फ्लॉप झालेला नाही. त्यामुळे या चित्रपटाकडूनही प्रेक्षकांची अपेक्षा खूपच जास्त आहे.
रणवीरच्या शब्दांनी दीपिका झाली भावूक
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.
मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.