सध्या बायोपिकचा जमाना आहे. आधीच फ्लोअरवर एकापेक्षा एक दर्जेदार बायोपिक येणार आहेत. त्यात आता आणखी एका बायोपिकची भर पडणार आहे. हा बायोपिक अन्य कोणाच्या जीवनावर आधारीत नसून दिवंगत नेत्या, अभिनेत्री जयललिता यांचा आहे.या चित्रपटात काम करण्याची संधी झाशी द क्वीन म्हणजे कंगना रनौतला मिळाली आहे. कंगना रनौतला हा चित्रपट मिळाला याचे फार आश्चर्य नाही. पण या रोलसाठी कंगनाला तब्बल २४ कोटी रुपयांचे मानधन मिळाले आहे. या मानधनामुळे कंगना आता दीपिकाच्याही पुढे गेली आहे.
कंगनाला मिळाले मोठे मानधन
सध्या बॉलीवूडमध्ये हायेस्ट पेड अभिनेत्री म्हणून दीपिकाचे नाव घेतले जाते. पण आता दीपिकाला कंगनाने मागे टाकले आहे. २४ कोटी ही रक्कम थोडी थोडकी नाही. दीपिकाने लग्नाआधी संजय लीला भन्साळी यांचा ‘पद्मावत’ चित्रपट केला होता. त्यासाठी तिला २० कोटीच्या आसपास रक्कम मिळाली होती. अनेक कॉन्ट्राव्हर्सीज नंतर हा चित्रपट खूप चालला. पण आता कंगनाला मिळालेल्या मानधनामुळे तुमच्या भुवया उंचावल्या वाचून राहणार नाही. त्यात कंगनाने एका रोलसाठी २४ कोटी घेतले म्हणजे आता कंगनाला खरचं बॉलीवूडची ‘क्वीन’ म्हणावे लागेल. कारण दीपिका वगळता कोणत्याच अभिनेत्रीला अद्याप इतके पैसे मिळाले नाही. त्यामुळे कंगनाने दीपिकाला मागे टाकले.
या वेबसीरिज ठरल्या अव्वल, तुम्ही पाहिल्या का?
जयललितांचे आणि माझे आयुष्यसारखेच
जयललिता यांची दाक्षिणात्य प्रदेशातील ख्याती सगळ्यांनाच माहीत आहे. त्यांच्या जाण्यानंतर तेथील लोकांवर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यांच्या पॉलिटिकल करीअरसोबतच त्यांनी केलेले घोटाळेदेखील गाजले. त्यांच्या जीवनावर चित्रपट करायचे ठरवल्यानंतर कंगनाला यासाठी निवडण्यात आले. कंगनासमोर चित्रपटाची स्टोरी वाचल्यानंतर तिला ती स्वत:च्या जीवनाशी निगडीत असल्याचे वाटले. म्हणून तिने हा चित्रपट साईन केल्याचे सांगितले.
रिजनल चित्रपटात काम करण्याची इच्छा
या व्यतिरिक्त कंगनाला नव्या भाषेतील प्रयोगाबाबत विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली की, मला नेहमीच इतर भाषिक चित्रपटांचे आकर्षण राहिले आहे. तुम्ही आंध्रप्रदेश किंवा तामिळनाडू या भागात गेलात तर तुम्हाला कळेल की, तेथील लोक त्यांच्या चित्रपटांवर किती प्रेम करतात. स्वत:ची एक वेगळी ओळख तयार करण्यासाठी ही एक चांगली संधी असल्याचे कंगनाने सांगितले.
आलिया भटबद्दल काय म्हणाली होती कंगना, वाचा
चित्रपसाठी शिकणार तामिळ
जयललितांवर आधारीत या चित्रपटाचे नाव ‘थलाईवी’ असे निश्चित करण्यात आल्याचे समजत आहे.या शिवाय चित्रपटासाठी ‘जया’ हे नाव देखील स्पर्धेत आहे. हा तामिळ चित्रपट असून तो हिंदीत देखील प्रदर्शित केला जाणार आहे. म्हणून या चित्रपटासाठी कंगना खास तामिळ भाषेचे प्रशिक्षण घेणार आहे. जर कंगना ठरलेल्या कालावधीत तामिळ भाषेवर प्रभुत्व मिळवू शकली नाही तर मग चित्रपट डब केला जाणार आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट अशी की ‘थलाईवी’ या चित्रपटाची कथा बाहुबली आणि मणिकर्णिका या चित्रपटाचे लेखक विजेंद्र प्रसाद यांनी लिहिली आहे.
दीपिका ‘छपाक’ मध्ये व्यग्र
तर दुसरीकडे दीपिका ‘छपाक’ या चित्रपटात व्यग्र आहे. नुकताच दीपिकाने या चित्रपटातील फर्स्ट लूक तिच्या सोशल अकाऊंटवरुन शेअर केला. त्यात तिने अॅसिड विक्टीम लक्ष्मी अग्रवालची भूमिका साकारली आहे. तिचा मेकअप पाहिल्यानंतर या चित्रपटानंतर दीपिका एका वेगळ्या उंचीला पोहचणार आहे हे नक्की!
(सौजन्य- Instagram)