तसं तर सगळेच महिने प्रेमाचे असतात.पण त्यात फेब्रुवारी महिना जरा जास्त खास आहे. कारण फेब्रुवारीमध्ये असतो व्हॅलेंटाईन.. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणांसाठी हा दिवस खास असतो. कारण त्यांच्यासाठी हा महिना प्रेम व्यक्त करण्याचा असतो. अशाच प्रेमावर आधारित प्रेमवारी हा चित्रपट ८ फेब्रुवारी रोजी रिलीज होत आहे. या चित्रपटातील तरुणांच्या धमाल-मस्तीवर आधारीत दांडीगुल हे गाणे नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. या तरुणांची दांडीगुल का झाली ? यासाठी तुम्हाला हे गाणं पाहावे लागेल.
‘लकी’ चित्रपटाचे टायटल ट्रॅक रिलीज
गाण्यात हॉस्टेलची धमाल मस्ती
कितीबी घासली नशिबाने ठासली… असे म्हणत या गाण्याची सुरुवात होते. हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांची धमालमस्ती या गाण्यात दाखवण्यात आली आहे. हे गाणं अमितराज, आदित्य पाटेकर आणि हर्षवर्धन वावरे यांनी स्वरबद्ध केले आहे. गाणे ऐकायला चांगले असले तरी व्हिज्युअली या गाण्याला म्हणावा तितका न्याय मिळालेला वाटत नाही. शिवाय कॉलेजची मुले म्हणजे फक्त धमाल आणि दारु इतकंच यातून दाखवण्यात आल्यामुळे गाणं मनाचा ठाव अजिबात घेत नाही. त्यामुळे हे गाणे सो- सो आहे असेच म्हणायला हवे.
चैतन्य देवढेचे गायलेले कोंकणी गाणे ऐकले का?
चिन्मय आणि मयुरीची जोडी पहिल्यांदाच एकत्र
मालिकेतून घराघरात पोहोचलेला चिन्मय या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. विशेष म्हणजे पहिल्यांदाच चिन्मय उद्गीरकर आणि मयुरी कापडणे ही जोडी एकत्र काम करणार आहेत. या दोघांवर आधारीत एक गाणे या आधीच रिलीज झाले आहे. बघता तुला असे या गाण्याचे बोल आहेत. हे गाणे सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांनी गायले आहे. या गाण्याबाबतीतही अगदी तसेच वाटते. गाणे ऐकायला चांगले आहे. परंतु गाण्याचे व्युवलायजेशन, कोरीओग्राफी अगदीच साधी आहे. त्यामुळे हे गाणे सुद्धा एकदम बोअर वाटते. हे गाणे पाहिल्यानंतर प्रत्येक वेळी शाहरुखच्या काही मुव्हमेंट कॉपी करत असल्याचा भास होतो. त्यामुळे हे गाणेही थोड्याफार प्रमाणात फेल आहे असेच म्हणायला हवे.
विक्रांत आणि इशाच्या लग्नसोहळ्यातील ३ लक्षवेधी क्षण
मीरा जोशीचा हॉट अंदाज
चित्रपटातील आयटम साँगमध्ये अभिनेत्री मीरा जोशीचा हॉट अंदाज पाहायला मिळत आहे. मीरा जोशीचे हे दुसरे आयटम साँग आहे. ‘तू ऑनलाईन ये ना’ असे या गाण्याचे बोल असून हे गाणे वैशाली सामंत हिने गायले आहे. गाण्यातील मजा कोरिओग्राफीमध्ये उतरवण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यात आला आहे. या शिवाय यातील पुजाच्या हळदीला हे गाणे आदर्श शिंदे आणि अमितराज यांचे आहे.
कसा होता ट्रेलर?
प्रेमवारी या सिनेमाचा ट्रेलरही पाहता तसा सो- सो आहे. राहुल आणि पूजा यांच्या प्रेमवारीला काहीतरी वेगळा ट्विस्ट देण्याचा प्रयत्न केलाय खरा.. पण श्रीमंत मुलगी आणि गरीब मुलगा असेच हे प्रेम दाखवण्यात आले आहे. त्यांचीही प्रेमवारी अडचणीवर मात करुन पूर्ण होऊ शकेल का? हे दाखवणारा हा सिनेमा ट्रेलरवरुन तरी वाटत आहे. चिन्मय उदगीरकर, मयुरी कापडणे, अभिजित चव्हाण, भारत गणेशपुरे यांच्या प्रमुख भूमिका या चित्रटात आहेत. साईममित प्रोडक्शन निर्मित ‘प्रेमवारी’ या चित्रपटाची निर्मिती, लेखन आणि दिग्दर्शन राजेंद्र कचरू गायकवाड यांनी केले आहे. शिवाय निर्मितीही त्यांचीच आहे.
पुढे वाचा –