राखी सावंतने काहीही करायला गेली की ती लगेच ट्रोल होते. असेच काहीसे पुन्हा झाले आहे. बिचाऱ्या राखीला दादासाहेब फाळके पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत तू हा पुरस्कार विकत तर घेतला नाही ना? असा प्रश्न विचारल्यानंतर राखी चिडली आणि तिने हा प्रश्न विचारणाऱ्याला याच ट्रॉफीने मारेन असा सज्जड दम भरला. मग काय असे विधान केल्यानंतर राखी लगेचच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली.पण राखी जे बोलली त्यानंतर अनेकांनी तिला पाठिंबा दिला आहे.
‘ग्रँड मस्ती’ मधील ही अभिनेत्री गरोदर, फोटो झाला व्हायरल
म्हणून मिळाला अॅवार्ड
राखी सावंत तिच्या स्पष्ट बोलणे आणि कॉन्ट्राव्हर्सीजसाठी ओळखली जाते. पण ती एक उत्तम डान्सर आहे. तिने आतापर्यंत 100हून अधिक आयटम साँगमध्ये काम केले आहे. 12 वर्ष ती या इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. पण तिला आतापर्यंत एकदाही अॅवॉर्ड मिळाला नाही. तर तिला लोकांच्या टीकेचा सामना करावा लागला. अखेर राखी सावंतला तिच्या नृत्याला हा पुरस्कार मिळाला आहे.
पुरस्कारानंतर काय होती राखीची प्रतिक्रिया
राखी म्हणाली की, मी इतकी वर्ष काम करतेय. पण मला कधीच कोणता पुरस्कार प्रदान करण्यात आला नाही. मी इतक्या गाण्यांमध्ये काम केले आहे. ती गाणी हिट झाली पण त्यासाठी मला कधीही कोणीही पारितोषिक देऊन सन्मानित केले नाही.अखेर एका आयटम गर्लला पुरस्कार मिळाला याचा मला आनंद आहे. या इंडस्ट्रीत नाव कमावण्यासाठी मी खूप मेहनत केली आहे याचे फळ मला मिळाले आहे.
नम्रता शिरोडकरच्या नो मेकअप लुकवरुन ती झाली ट्रोल, दिले सडेतोड उत्तर
…म्हणून चिडली राखी
राखीला पुरस्कार मिळाल्याचा आनंद असताना तिने हा पुरस्कारा विकत तर घेतला नाही ना? अशा प्रकारचा प्रश्न जेव्हा तिला विचारण्यात आला तेव्हा ती म्हणाली की, पुरस्कार विकत घेण्याइतकी माझी लायकी नाही. दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारतातील एक महत्वपूर्ण पुरस्कार आहे. भारत सरकारद्वारे तो दिला जातो. ज्यांनी सिनेमाची मुहुर्तमेढ रोवली अशा दादासाहेब फाळके यांच्या आठवणीत हा पुरस्कार दरवर्षी प्रदान करण्यात येतो. या पुरस्काराला परंपरा असून अनेक कलाकारांना या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
दीपिकाने घेतली एक्स बॉयफ्रेंडच्या पालकांची भेट
राखी म्हणजे केवळ चर्चा
राखी कायमच चर्चेत असते. गेल्या काही महिन्यांपूर्वी ती दिपक कलालसोबत लग्न करणार अशा चर्चा होत्या. पण त्या चर्चांना तिने स्वत:च फुलस्टॉप देऊन टाकले. पण त्यासाठी तिने सोशल मीडियावर केलेला तमाशा अनेकांना आवडला नाही. त्यामुळे नेटीझन्सनी तिला चांगलेच फटकारले. तर काही दिवसांपूर्वी तिने एक आक्षेपार्ह फोटो टाकला. पाकिस्तानच्या झेंड्यासोबत तिने काढलेला तो फोटो पाहून अनेकांनी तिला देशद्रोही असल्याचे म्हटले होते या ट्रोलर्सना तिने उत्तर दिले होते. तिने लिहिले होते की, आपण सगळे आतंकवाद्यांच्या विरोधात आहोत. कोणत्याही देशाच्या झेंडयांच्या नाही. त्यामुळे आपण त्याचा आदर ठेवला पाहिजे.